"स्वदेशी" खरा जनक कोण?
स्वदेशी विचाराचे आणी चळवळीचे जनक म्हणून महात्मा गांधीना पाहीले जाते. ते खरोखरच ह्या विचाराचे जनक आहेत का? की ह्या विचाराचा जनक दुसराच कोणीतरी आहे ह्या बाबत मी शोध घेत होतो. आणि अहो आश्चर्यम. मला बहुदा ह्या विचाराचा जनक सापडला.
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी "स्वदेशी" वापर करा हा विचार मांडनारा फटका लिहनारा बालक होता विनायक दामोदर सावरकर. त्याने हे पत्र प्रसिध्द ही केले होते. ह्या पत्राअंतर्गत त्याने लोकांना स्वदेशी वापरन्याची महती सांगीतली व विदेशी गोष्टी सोडून स्वदेशी आग्रह केला. ह्या फटक्यात लेखकाने जनमाणसांतील विर वृत्तीला जूने वैभव सांगून जागृत करन्याचा प्रयत्न देखील केला.
लिखान साल १८९३.
गांधीजी सन १८९३ ते १९१४ अफ्रिकेत असल्यामूळे भारतातील घडामोडींचा अंदाज त्यांना न्हवता तसेच तेंव्हा त्यांनी समाजकारनासाठी जिवन व्यतीत करायचे का नाही हे ही ठरविले न्हवते. शिवाय १९०५ मध्ये ही बंगालात, बंगाल फाळनी झाल्यावर मोठ्या प्रमानावर विदेशी वस्त्रांची होळी झाली होती. त्या काळी पंजाब, महाराष्ट्र व बंगालच्या मातीतून क्रांतीकारक जन्मले व समान विचारांच्या युवकांनी ह्या तिन्ही राज्यात धूम केली होती. सावरकरांनी इंग्लडात शिकत होते तेंव्हा भिकाजी कामा, वर्मा, बापट व इतरांसोबत स्वदेशीची पत्रके गुप्तरितीने भारतात पाठवीली होतीच, त्यामूळे नायरांसारखे इतिहासकार असे मानतात की सावरकरांच्या अश्या पत्रंकामूळेच दक्षिन भारतात स्टूंडट अनरेस्ट सुरु झाली.
१९०५ मध्ये तर गांधी भारताच्या राजकिय पटलावरही न्हवते पण स्वदेशी चळवळीचे श्रेय त्यांनाच दिले जाते. का बरें? महात्मा गांधीनी तूकारामाचे विचार लोकांना सांगीतले हे आपणाला माहीत असेलच, त्यांचा वैचारिक विरोध करनार्या स्वातंत्र्यविराचा विचार ही त्यांनी पुढे नेला, पण योग्य ते श्रेय त्यांना दिले नाही.
गांधी ग्रेट की सावरकर ह्या या लेखाचा मुद्दा नाही. दोघेही ग्रेटच आहेत.
पण मग गांधीनी ही गोष्ट आम जनतेला का नाही सांगीतली हा आमचा सवाल?
ह्यावर अजुन संशोधन करुन इतिहासकारांनी योग्य ती दखल घ्यावी व योग्य तिथे इतिहास निट लिहीला जावा असे मनापासून वाटते.
हा घ्या पुरावा.
"देशी फटका'
लिखान साल १८९३.
आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा ।
हटा सोडनी कटा करुया म्लेंच्छ पटां ना धरु कदा ।।१।।
काश्मीरच्या शाला सोडिनु अल्पाकाला कां भुलतां?।।
मलमल त्यजूनि वलवल चित्ती हलहलके पट कां वरितां?।।२।।
राजमंहेद्री चिटा त्यजुनि विटके चिट हे कां घेतां?।।
दैवे मिळता वाटि, इच्छितो नरोटि नाही कां होता! ।।३।।
येविल सोडिनु पितांबरांना विजार करिन्यांसाठि महा ।।
बेजारचि तुम्ही नटावयामधि विचार करितो कोणि न हा ।।४।।
केलि अनास्था तुम्हिच स्वत: मग अर्थातच ती कला बुडे ||
गेले दिन हे नेले हिरूनी मेले तुम्हि तरि कोण रडे? ।।५।।
अरे आपणच होतो पूर्वी सर्व कलांची खाण अहा ।।
भरतभूमिच्या कुशीं दिप ते कलंक आतां आम्ही पहा ।।६।।
जगभर भरुनी उरला होता नुरला आतां यापार ।।
सकलहि कलाभिज्ञ तेघवां अज्ञ अतां अरिही थोर ।।७।।
निर्मीयली मयसभा आम्हिच ना? पांडव किरीटी आठवारे ।।
मठ्ठ लोकहो! लाज कांहितरी? लठ्ठ असुनि शठ बनलोरे ।।८।।
आम्रफलाच्या कोयीमध्ये धोतरजोडा वसे सदा ।।
होते जेथे प्रतिब्रम्हेंची धिक मी जन्मुनि अपवादा ।।९।।
हे परके हरकामीं खुलविती भुलविती वरवर वाचेने।।
यवहार रीती ऐशि बरोबर सदा हरामी वृत्तीने ।।१०।।
कामधेनुका भरतभूमिका असूनि मग कां ही भिक्षा ||
सहस्त्र कोसांवरुनि खासा पैका हरतो प्रभूदिक्षा ।।११।।
नेती कच्चा माल आमुचा देती साचा पक्व रुपे ।।
आमुच्या वरतीं पोट भरीति परो थोरि कशाची तरी खपे ।।१२।।
पहा तयांची हिच रित हो! भिती नसे त्या लबाडिला ।।
नाना कर्मे नाना वर्मे देश आमुचा लुबाडिला ।।१३।।
निमुली हातामधलीं फडकीं फडकत नाना ध्वज वरतीं ।।
हडलहप्पसे करुनि शिपाई निघत स्वारी जगभर ती ।।१४।।
नाना परिचे रंग भरीती रंग पुंप ते दंग करी ।।
मोर, कावळे, ससे, पारवे, श्वापद विचरती तीं बकरीं ।।१५।।
राजगृहीं गोपुरी झळकती मजले सजले त्यामधुनी ।।
सुंदर नारी दु:ख हर्ष भरि त्या बघित शोभा तरुणी ।।१६।।
नाना जाती पिकली शेती गार हिरवे वस्त्र धरी ।।
भात बाजरी गहूं गाजरी आच्छादली हि भूमि बरी ।।१७।।
अगनग गेले गगन चुंबिण्या सर्व थोरबहु कोराकि ।।
भास पुरुषची निजांकि बसवी स्वानंदाने पोरां की ।।१८।।
चित्र ऐशीं दाविति छत्रे विचीत्र तूम्हा भुल धंदा ।।
तुम्हिंहि भुलतां पहातां घेतां क्षणांत स्वपटाला निंदा ।।१९।।
याला आतां उपाय बरवा एकी करवा मन भरवा ।।
ओतप्रोते अभिंमाने हरवा देशी धंदे पट करवा ।।२०।।
परके वरवर कितीहि बोलती गोड गोड तरि मिनं समजा ।।
सुंदर म्यानीं असे असिलता घातिच होइल झट उमजा ।।२१।।
रावबाजि तरि गाजि जाहले राज्य बुडालें तरि मुख्य ।।
सख्य असे परि परकीयांचें गोष्ट ऋदयिं ही धरु लख्ख ।।२२।।
वैर टाकुं या यास्वत लौकर खैर करो परमेश्वर ती ।।
निश्चय झाला मागें अपुला परदेशी पट ना धरती ।।२३।।
चला चला जाउं या घेउं या देशि पटांना पटापटा ।।
जाडे भरडे गडे कसेही असो सेवुं परि झटाझटा ।।२४।।
ना स्पर्शू त्या पशूपटाला मउ वरि विखार तर भावूं ।।
घेऊं खडतर अंतीं सुखकर धर्मचि मानुनियां राहूं ।।२५।।
द्रव्य खाणि हि खोरे घेउनि परकीपोरें खणतिरें ।।
एकचिंत करुनियां गड्यांनो! वित्त जिंकूया पुररपिरे ।।२६।।
विश्चेश्वरि ती नारायणि ही यमहरि हर अदि सुरवरिणीं ।।
कर्म सिध्दीसी दावो नेउनि मोद देति निज भक्त जनीं ।।२७।।
दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रविज्ञान ।।
वरावयाला रत्न पटांनां करो आर्य ते रणदान ।।२८।।
कवितारूपी माला अर्पी आर्यं बंधुसीं सार्थक हो ।।
भक्तांकरवी मन देवांसी सेवा त्याशीं अर्पण हो ।।२९।।
स्वांतत्र्यविर सावरकर.
prabhuneyogesh, छान माहिती
prabhuneyogesh,
छान माहिती दिलात.
धन्यवाद.
आर्य बंधुनो उठा उठा कां
आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा ।
>> देश भक्ति पेक्षा आर्य भक्ति जास्त दिसते.
कपडे कसले वापरायचे हे आर्यांनाच तर सांगायचे. द्रविड काय, लुंगी किंवा केळीच्या पानावर संतुष्ट असतात....
आणि मधुकरराव, तुम्ही मनोगतावरील भारतीय लोकवंशावरचा लेख वाचला का? सगळ्या भारतीयांचे खापर पणजोबा आफ्रिकेतच होते म्हणे... आर्य, द्रविड, बौद्ध... सगळ्यांचे.. तुम्ही उगाचच सावरकरांवर खापर फोडत बसलाय ...
कालच यांचे (७७ यांचे) प्रांजळ
कालच यांचे (७७ यांचे) प्रांजळ निवेदन वाचून झापड उघडतंय असं वाटलं होतं.. आले आज मूळपदावर...
.
.
केदार, छान माहिती. आजच हा
केदार,
छान माहिती. आजच हा धागा बघितला. मी कुठेतरी असे वाचले होते की गांधीजी व सावरकर हे प्रचंड गुणदोष असलेली उत्तुंग व्यक्तिमत्वे होती. त्यांच्या जीवनातील विरोधाभास म्हणजे जन्मभर अहिंसेचा पुरस्कार करणार्या गांधीजींचा मृत्यु हिंसेच्या मार्गाने झाला तर जन्मभर सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्या सावरकरांचे निधन अहिंसेच्या मार्गाने (प्रायोपवेशन करून) झाले.
गुरुजी अगदी योग्य मांडले आहे.
गुरुजी अगदी योग्य मांडले आहे. दोन्ही महापुरूषांत जसे गुण तसे दोषही होते. दोघेही हट्टी होते.
एकाचा शस्त्रबलावर तर एकाचा समोरच्याचे विचार पराभूत करण्यावर भर होता. एकाच म्यानात दोन तलवारी बसू शकत नाहीत तसेच काहीसे.
केदार तुम्हाला सावरकरांबद्द्ल
केदार तुम्हाला सावरकरांबद्द्ल आदर आहे हे प्रत्येक लेखामधे दिसत आहे. चांगले आहे. पण म्हणुन जनक म्हणुन त्यांचे बळजबरी नाव घेण्याची गरज नाही. आणी १० वर्षाचे असताना केलेल्या कवितेचा उपयोग करुन त्याना जनक म्हणणे म्हणजे ........
मुळात जनक म्हणुन कोणाचेहि एकाचे (गांधी असो वा सावरकर) नाव घेणे हा बालिशपणाच आहे.
स्वयंपुर्ण खेडी ही स्वदेशीचाच प्रकार होती.
अमेरिकन , आयरिश आणी चायनीज लोकानी अशा चळवळि केल्या होत्या त्यावरुन ही प्रेरणा येउ शकते.
१८४९ मधे लोकहितवादि (गोपाळ देशमुख) यानी स्वदेशी चळवळ केली होती. रानडे आणी जी व्ही जोशी याचेही यात योगदान आहे. १८६७ मधे राजनारायण बासु, द्विजेन्द्र्नाथ टागोर, नबगोपाल मित्रा यानि स्थानीक उद्योगाना प्रोत्साहन देण्यास हिन्दु मेळा स्थापन केला. भारतीय स्वदेशी चळवळिचे मुळ म्हणुन त्याकडे पाहु जाउ शकते (विकि). १८७३ मधे भोलानाथ चन्द्रा यानी स्वदेशी चळवळ केली होती. दयानंद सरस्वती यांनी देखिल स्वदेशीवर भर दीला होता. १८७५ पासुन मांचेस्टर कपड्यांचा बहिष्कार करण्यात येत होता. १८९६ मधे टिळकांनी वीदेशी मालावर बहिष्कार घातला होता. १८९७ मधे रविंद्र्नाथ टागोर यांनी स्वदेशी भंडार तर १९०३ मधे सरला देवी लक्ष्मी भंडार स्थापन केले होते. १९०५ मधे खर्या अर्थाने ही चळवळ जनसामन्यात पोहोचली असावी कारण ५०००० लोकानी विदेशीचा बहिष्कार केल्याचा उल्लेख आहे. नंतर गांधीजींनी ती अजुन पसरवली. या सगळ्यात बाकिंच्या कित्येक लोकांचे योगदान आहे, नावे माहित नसलेल्या कित्येकांचे असु शकते.
शेवटी विषयांतराचा रोष घेउनही - स्वदेशी हा प्रकार आता नामशेष झाला आहे. कीतीहे केले तरी पुर्ण स्वदेशी काहीही मिळणे शक्य नाहि
स्वदेशी विचाराचे आणी चळवळीचे
स्वदेशी विचाराचे आणी चळवळीचे जनक म्हणून महात्मा गांधीना पाहीले जाते. ते खरोखरच ह्या विचाराचे जनक आहेत का? की ह्या विचाराचा जनक दुसराच कोणीतरी आहे ह्या बाबत मी शोध घेत होतो.
मधुकर,पुर्ण अनुमोदन !
नुसता कुठला विचार मांडुन,भाषणबाजी करणारे किंवा पुस्तक लिहिणारे शेकडो होते,आहेत पण महात्मा गांधीसारखा माणुस आपलं संपुर्ण जीवन त्यासाठी अर्पण केल, तसा त्याग केला, तस जगुन दाखवलं ,त्यामुळे भारतच काय संपुर्ण जग आज त्यांच्या विचारांना सलाम करत आहे,गांधींजींचे कार्य हे एखाद्या सुर्यासारखे प्रखर आहे, त्यापुढे चांदण्यांचा प्रकाश तो काय ?
गांधींजींचे कार्य हे एखाद्या
गांधींजींचे कार्य हे एखाद्या सुर्यासारखे प्रखर आहे, त्यापुढे चांदण्यांचा प्रकाश तो काय ? >>> आता इथे रणकंदन उसळु शकते
नुसता कुठला विचार
नुसता कुठला विचार मांडुन,भाषणबाजी करणारे किंवा पुस्तक लिहिणारे शेकडो होते,
उगाच आगाउ वक्तव्ये करु नका.विचार मांडुन भाषणबाजी करायची काम गांधीजींनीच जास्त केली.सावरकर क्रांतिकारक होते.परदेशात जाउन त्यांनी क्रांतीकार्य केले,तिकडुन इकडे शस्त्र पाठवली.ब्रिटीशांविरोधात केलेल्या कार्याने त्याम्ना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या.तिथे अक्षरशः नरकयातना सोसाव्या लागल्या.
गांधीजींच्या विचारांना जग सलाम करत पण त्यांचे विचारांप्रमाणे कोणीच चालत नाही.ओबामा भाषणबाजी करताना म्हणतो की गांधी माझे आदर्श.तुम्ही लगेच सपाट!त्याला विचारायला पाहिजे की बाबारे गांधीजींना आदर्श मानतोस ना मग तुझा देश जो जगभरात शस्त्रास्त्र पसरवुन हिंसेला हातभार लावतो,ते का नाही बंद करत??
गांधीजींच्या विचारांना जग
गांधीजींच्या विचारांना जग सलाम करत पण त्यांचे विचारांप्रमाणे कोणीच चालत नाही.
--- पण त्यात विचारांचा आणि पर्यायाने ते मांडणार्या गांधीजींचा काय दोष? त्यांच्या समाधीला बुश पण भेट देतो, हात जोडतो पण प्रत्यक्ष जिवनात एकदम विरुद्ध वागतो. आपले सर्व राजकीय पुढारी २ ऑक्टोबर, ३१ जानेवारीला गळे काढतात... पण प्रत्यक्ष जिवनात १ % पण त्यांचे गुण, आदर्श बाळगत नाहीत. गांधीजीं केवळ ओठातच रहातात :अरेरे:...
सावरकर महान देशभक्त होते हे
सावरकर महान देशभक्त होते हे कोणी नाकबूल करत नाही. पण सावरकरांना मोठे ठरवताना गांधीजींची उंची का खटकावी? काळ्या पाण्यात यातना भोगल्या हे मोठेपणाचे परिमाण आहे का? सावरकरांनी २ जन्मठेपा =५० वर्षांची शिक्षा पूर्ण भोगली नव्हती.
Savarkar was sentenced to 50 years' imprisonment and moved to the Cellular Jail in the Andaman and Nicobar Islands. He was released in 1921 under restrictions after signing a plea for clemency in which he renounced revolutionary activities.
गांधिजींनी दाखवलेल्या मार्गाने जणारे, त्यांच्या विचारांने आदर्श मानणारे जगात अनेक नेते आहेत. जे त्यांचा मार्ग अनुसरत नाहीत त्यांना तोंडदेखले का होईना गांधींच्या विचारांचे महत्त्व मान्य करावेच लागते ना. गांधींनी स्वातंत्र्यलढ्याला व्यापक आणि जनांदोलनाचे रूप दिले, अहिंसा आणि सविनय कायदेभंगासारखे नवे मार्ग दाखविले, आनि आज विरोधाचे सर्वमान्य मार्ग तेच मानले जातात.
मी गांधीजींच्या विरुध्द मुळीच
मी गांधीजींच्या विरुध्द मुळीच नाही,त्यांच्याबद्दलचा मी लिहिलेला लेख तुम्ही माझ्या रंगिबेरंगीमधे वाचु शकता.पण गांधीभक्तांना इतरांना कमी लेखण्याची घाणेरडी सवय जदलेली आहे.'नुसता कुठला विचार मांडुन,भाषणबाजी करणारे किंवा पुस्तक लिहिणारे शेकडो होते,आहेत पण महात्मा गांधीसारखा माणुस आपलं संपुर्ण जीवन त्यासाठी अर्पण केल, तसा त्याग केला, तस जगुन दाखवलं ,त्यामुळे भारतच काय संपुर्ण जग आज त्यांच्या विचारांना सलाम करत आहे,गांधींजींचे कार्य हे एखाद्या सुर्यासारखे प्रखर आहे, त्यापुढे चांदण्यांचा प्रकाश तो काय ?' यातुन हे स्पष्ट होत.त्याग कोणी जास्त केला हा प्रश्न विचारला तर सावरकर्,भगत सिंग्,सुभाषबाबुंनी तो त्याग नक्कीच जास्त केलाय.भाषणबाजी वगैरे गांधीजींनीच जास्त केली.इतर अनेकांनी जीवाची पर्वा न करता कार्य केल.सावरकरांची सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी अवलंबलेला मार्ग मराठी माणसासाठी तरी काही नविन नाही.अगदी शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कशी पत्र लिहिली होती ते बघा.
पण त्यात विचारांचा आणि पर्यायाने ते मांडणार्या गांधीजींचा काय दोष?
एक संत म्हणुन ते विचार ठिक आहेत पण ते व्यावहारीक नाहीत त्यामुळे लोक ते पाळत नसावेत.
गांधींनी भाषणबाजी जास्त केली?
गांधींनी भाषणबाजी जास्त केली? असेल, पण त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यचे आंदोलन हे जनांदोलन झाले ना? त्यांनी दाखवलेला अहिंसक विरोधाचा मार्ग अनुसरणे लाखो भारतीयांना शक्य होते, पटले होते. पुन्हा अहिंसेची संकल्पना याच भूमीतली.
सुभाषचंद्र, सावरकर यांच्या मार्गाने जाणे सगळ्यांना शक्य नसते, रुचलेही नसावे.
गांधी आणि सावरकर एकमेकांचा करत नसतील इतका द्वेष त्यांचे भक्त विरोधातल्या महापरुषाचा करतात, तेही होऊन गेलेल्या गोष्टींबद्द्ल. कशाला?
त्यांनी दाखवलेला अहिंसक
त्यांनी दाखवलेला अहिंसक विरोधाचा मार्ग अनुसरणे लाखो भारतीयांना शक्य होते, पटले होते. पुन्हा अहिंसेची संकल्पना याच भूमीतली.सुभाषचंद्र, सावरकर यांच्या मार्गाने जाणे सगळ्यांना शक्य नसते, रुचलेही नसा
हे मलाही मान्य आहे पण अनिल७६ यांनी आगाउ वक्तव्य करायची गरजच नव्हती.
मला वाटते अनिशयोक्ती हा
मला वाटते अनिशयोक्ती हा त्यांचा आवडता अलंकार असावा. जाऊ दे चर्चेचा विषय दुसरा आहे, खरे तर काहीच नाही...
मला प्रत्येक वेळी विंदांच्या या ओळी आठवतात
इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेउन ना नाचा
करा पदस्थल त्यांचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा.
आतापर्यंत चुकीची/न पटणारी/ मान्य नसलेली माहिती/विधाने आहेत म्हणून पुस्तके जाळता यायची. आता हे सगळे नेटवर येते, आत काय जाळायचे? ५०/१०० वर्षांनी कुणी हे इतिहास म्हणून वाचले तर त्याचा काय समज होईल? तेव्हा कदाचित पुस्तके छापली जाणे बंद झालेले असेल.
आता हे सगळे नेटवर येते, आत
आता हे सगळे नेटवर येते, आत काय जाळायचे?
---- प्रतिकात्मक (खरे नाही) संगणक गोळा करायचे, जाळायचे किंवा जोरदार हातोडी हाणायची.
माझ ते वाक्य "जे गांघींजीना
माझ ते वाक्य "जे गांघींजीना विनाकारण कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत,त्यांच्या साठी होतं, सावरकरांनी देशासाठी काम नक्कीच केल आहे, पण म्हणुन स्वदेशी म्हणजे सावरकर असं म्हणन निव्वळ हास्यास्पद आहे, आणि चिन्या१९८५, तुम्हाला हा आगाऊपणा वाटत नाही का ?
मी गांघींच्या बरोबर सुभाषचंद्र,भगतसिंग यांनाही सलामच करतो पण प्रत्येकाची उंची, त्यांनी केलेल्या कामाची व्याप्ती ही वेग वेगळी नक्कीच आहे ...
तस आपल्या देशात अनेकांनी खोटा इतिहास रचण्याचा प्रयत्न खुप केला आहेच ...
अरेच्या! चालू विषय कमी पडतात
अरेच्या! चालू विषय कमी पडतात म्हणून हा दीड वर्षापूर्वीचा धागा नव्याने चालू करून, इतिहासातल्या गोष्टींवर वादविवाद? बरोबर आहे - कारण इथे अजून भाजप वि. काँग्रेस, ब्राह्मण वि. दलित, अमेरिका वि. भारत अश्या मार्गाने वैयक्तिक टीका चालू होइस्तवर हा धागा चालूच राहील.
अरेच्या! चालू विषय कमी पडतात
अरेच्या! चालू विषय कमी पडतात म्हणून हा दीड वर्षापूर्वीचा धागा नव्याने चालू करून, इतिहासातल्या गोष्टींवर वादविवाद? >>>>>.
मुळात जाणुननुजुण चुकिची माहिती देउन धागा सुरुच कशाला करायचा ?
बरे पण माझ्या पोस्ट ला केदार यांचे उत्तर नाहि आले अजुन.
पण म्हणुन स्वदेशी म्हणजे
पण म्हणुन स्वदेशी म्हणजे सावरकर असं म्हणन निव्वळ हास्यास्पद आहे, आणि चिन्या१९८५, तुम्हाला हा आगाऊपणा वाटत नाही का ?
अहो पण आधीच्या प्रतिसादांमधे तसे नाही हे लिहुन आलच होत तेही वाचा की!
<मुळात जाणुननुजुण चुकिची
<मुळात जाणुननुजुण चुकिची माहिती देउन धागा सुरुच कशाला करायचा ?>
कदाचित् म्हणूनच दीड वर्षे तो बंद पडला असावा! तो पुनः पुढे आणण्याचे श्रम कशाला वाया घालवायचे? शिवाय स्वदेशी कुणी का चालू केली असेना. माझ्या मते या दोन्ही प्रमुख व्यक्तींपैकी कुणिहि चालू केली असेल चळवळ तरी ती काही श्रेय मिळण्यासाठी नाही. श्रेय देण्यावरून आपण उगाच भांडतो!
कदाचित् म्हणूनच दीड वर्षे तो
कदाचित् म्हणूनच दीड वर्षे तो बंद पडला असावा! तो पुनः पुढे आणण्याचे श्रम कशाला वाया घालवायचे?
मी थोडाच पुढे आणला! तारखा बघा की जरा.
नुस्तं कविता केली तर तो काही
नुस्तं कविता केली तर तो काही चळवळ केल्याचा पुरावा ठरत नाही..
स्वदेशी चळवळ गांधीजीनी आणि काँग्रेसने व्यापक आणि लोकाभिमुख केली...
महात्मा गांधीनी तूकारामाचे
महात्मा गांधीनी तूकारामाचे विचार लोकांना सांगीतले हे आपणाला माहीत असेलच, त्यांचा वैचारिक विरोध करनार्या स्वातंत्र्यविराचा विचार ही त्यांनी पुढे नेला, पण योग्य ते श्रेय त्यांना दिले नाही.
तुकारामानी मराठीत लिहिले आहे.. गांधिजीना मराठी वाचायला येत होते का? मग तुकारामांचे विचार ते कशाला वाचतील? गांधिजींची मते ही स्वयंसिद्ध होती.. त्यामुळे त्यानी कुणाला श्रेय द्यायचे कारणच नाही..
हे असले गांधिजींना कमी लेखनारे आणि सावरकरांचा उदोउदो करणारे लेख लिहून काही उपयोग होणार नाही... नोटांवर गांधिजींचाच फोटो रहाणार, सावरकरांचा नाही..
नोटांवर गांधिजींचाच फोटो
नोटांवर गांधिजींचाच फोटो रहाणार, सावरकरांचा नाही..
---- निव्वळ नोटांवर गांधीजींना बसवल्याने कार्य सिद्ध होत नाही.... आर्थिक गैरव्यावहारात यांच गांधीजींच्या चित्र असणार्या नोटांची देवाण घेवाण होत असते त्याची चिंता करा. सर्वाधिक देवाण - घेवाण करणारी मंडळी २ ऑक्टोबरला वैष्ण्व जन चा जप करण्यासाठी राजघाटावर पाढरी शुभ्र वस्त्रे परिधान करुन एकत्र येतांत. कृत्ये काळी, वस्त्रे शुभ्र :स्मित:. अरे काही % आचरण करा रे...
२०१० मधे यांच गांधीजींचा चस्मा, काठी, जेवणाची थाळी परत मिळवण्यासाठी मल्यांचा गांधीजींचा फोटो असलेला पैसा कामाला आला होता.
निव्वळ नोटांवर गांधीजींना
निव्वळ नोटांवर गांधीजींना बसवल्याने कार्य सिद्ध होत नाही..
कार्य सिद्ध झाले आहे म्हणूनच फोटो आहे त्यांचा.. नाहीतर तुमचा नाहीतर माझा फोटो नसता का छापला?
निव्वळ नोटांवर गांधीजींना
निव्वळ नोटांवर गांधीजींना बसवल्याने कार्य सिद्ध होत नाही..
कार्य सिद्ध झाले आहे म्हणूनच फोटो आहे त्यांचा.. नाहीतर तुमचा नाहीतर माझा फोटो नसता का छापला?
------ त्यांची कार्य सिद्धते बद्दल मी म्हणत नाहीच आहे.... प्रश्न तुमच्या आणि माझ्या कार्याचा आहे. त्यांचा फोटो नोटेवर असला (किंवा तोंडात नाव असले) म्हणजे आपले कार्य सिद्ध झाले असे होत नाही.
>>> कार्य सिद्ध झाले आहे
>>> कार्य सिद्ध झाले आहे म्हणूनच फोटो आहे त्यांचा..
त्यांचे नक्की कोणते कार्य सिद्ध झाले?
तुमच्या डोळ्यातली
तुमच्या डोळ्यातली हिंदुत्ववादी कावीळ उतरवा म्हणजे त्यांचे कार्य आपोआप दिसेल ..
Pages