झटपट उत्तापा

Submitted by निवा on 25 April, 2014 - 13:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य - दीड वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदूळाचे पिठ, एक वाटी ताक्,अर्धा टी-स्पुन बेकींग पावडर, चवीनुसार मिठ, दोन मोठे कांदे, एक-दोन टोमॅटो, तीन्-चार हिरव्या मिरच्या(अथवा आवडीनुसार कितीही),अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

कृती - रवा, तांदूळाचे पिठ, ताक्, बेकींग पावडर, चवीनुसार मिठ हे सर्व एकत्र करुन थोडे पाणी घालून सरसरीत भिजवा, आता हे दहा मिनिटे बाजूला ठेवा, तो पर्यंत कांदा, टोमॅटो, मिरच्या हे सर्व बारीक चिरुन ठेवा.
आता आपला नॉनस्टीक तवा गरम करुन घ्या, त्याला थोडेसेच तेल लावुन त्यावर पळीने पिठ घाला व जरा जाडसरच पसरा,
त्यावर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो पसरुन घाला. हा उत्तापा दोन्ही बाजुने भाजावा.
नारळाच्या चटणीबरोबर खावयास द्यावा.

डाळ, तादूळ भिजवुन पिठ आंबवण्यापे़क्षा हा झटपट उत्तापा मुलांच्या डब्यासाठी जरुर देता येईल.

वाढणी/प्रमाण: 
दोन ते तीन जणांसाठी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users