या, गरे खायला!

Submitted by देवीका on 24 April, 2014 - 04:01

फणसाचे कशाला चित्र टाकले? असेच वाटले असेल ना? पण कित्येक वर्षांनी पुर्ण फणस मिळाला बाजारात आणि आनंद मावेनासा झाला. म्हटलं, तुम्हाला सुद्धा सामिल करु या.

ह्या आधीही चायना बाजारातून आणलेले फणस खराब निघालेले, तेव्हा घाबरतच अख्खा फणस घेतला. आणि काय आश्चर्य , सुंदर करकरीत गरा अवीट गोडीचा व सोनेरी रंगाचा निघाला. मन एकदम गावी पोहोचले. भारताबाहेर असताना ह्या अश्या गोष्टींचे भारीच कौतुक असते. नाही का?
2014-04-11 001 (640x480) (400x300).jpg2014-04-11 003 (536x640) (335x400).jpg2014-04-11 006 (425x640) (266x400).jpg

हि आठळांची केलेली भाजी,
http://www.maayboli.com/node/48564

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैला, काय मस्त गरे आहेत. रंग पण एकदम झकासे. Happy

रच्याकने, नुसतेच या म्हणताय गरे खायला. पत्ता द्या की कुठे यायचे ते. Proud Light 1

gireedada, he vaach ; <<भारताबाहेर असताना ह्या अश्या गोष्टींचे भारीच कौतुक असते. नाही का?>>

as if tyani patta dila tar tu lagech janar ahes fanas khayala Wink Proud

वर्षा, हो बरेच गरे मिळाले. ते पॅक करून फ्रीजर मध्ये ठेवले.

हा फणस मेक्सिकन बाजारात मिळाला. फणस मेक्सिकोहूनच आणलेले असे विक्रेत्याने सांगितले.

रश्मी, हो गरे पोटाला नक्कीच चांगले. Happy

फणस कापणे हे एक मोठं जिकिरिचं आणि वेळखाऊ काम आहे. पण तुम्ही ते अगदी निगुतिने केलेलं दिसतय. गरे ही छान दिसतायत. मारा ताव. होऊ दे खर्च Happy

दक्षिणा, फणस साफ करणं हे माझं आवडत काम आहे.(एकून विचित्र वाटेल पण मला आवडतो). एकदा का मधला चिकेरा काढला की झालं.

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.