फार गाजावाजा करून आधार कार्ड योजना आणली गेली, तीत अनेक घोळ झाले पण सध्याच्या घडीला आधार कार्ड डिबी हा एकच डिबी असा आहे ज्यात व्यक्तीचे नाव, जन्म दिनांक , पत्ता, बायोमेट्रिक्स आणि फोटो हे सर्व आपल्याला मिळेल.
२०१४ मतदार यादी तयार करताना सध्याचे घोळ पाहता, डिजिटलायझेशन असताना ते व्यवस्थित वापरले गेले नाही हे समोर येत आहे. साधारण असे दिसते की कुठल्याही डिपार्टंमेंट आपला स्वतःचा असा डिबी असतो व ते माहिती शेअर करत नाहीत. पण मी इथे लिहितोय सिनर्जी बद्दल. ही सिनर्जी जर निवडणूक आयोग आणि आधार कार्ड योजना ह्यांनी अंमलात आणली तर सव्वाशे करोड भारतीयांना फायदा तर होईलच, खूप मोठा खर्च वाचेल आणि सध्या साधारण ६४ लाख मतदार मत देऊ शकत नाहीत असे होणार नाही.
सध्या देशात सध्या हा एकच डिबी असा आहे की जो व्यवस्थित तयार होत आहे. (अजून पूर्ण झाला नाही) पण येत्या ५ वर्षात जर आधार कार्ड योजने मध्ये सर्व लोकांनी नाव नोंदवले तर पूर्ण लोकसंखेचे डिजिटलायजेशन होईल आणि शिक्षक / पालिकेचे कामगार ह्यांना दर निवडणूकी दारोदारी भटकावे लागणार नाही.
माझा उपाय
१. आधार कार्ड डेटाबेस मध्ये बायो मॅट्रिक्स स्वरूपात सर्व लोकांचे ठसे / पत्ते आहेत. ह्या डिबीची एक फिड घेतली तर साधारण लाखो लोक त्यांच्या खर्या पत्तासहित मिळतील. पैकी जी लोकं १८ वर्षाच्या वर आहेत ती लिस्ट महत्वाची, ती डाउनलोड केली जावी, ( पुढच्या निवडणूकी पर्यंत रजिष्ट्रेशन ९० ते ९५ टक्क्यांवर असेल, आजच्या घडीला अनेक जिल्हे ७० टक्यांच्या पुढे आहेत असे टाईम्सला वाचले)
ह्या फिडर मध्ये ८० ते ९०% डेटा - नाव, जन्म दिनांक , पत्ता आणि फोटोसहित मिळेल. बायोमेट्रिक्स डाउनलोडची सध्या गरज नाही.
ही यादी प्रत्येक निवडणूकीच्या आधी प्रकाशित केली जावी, उदा मध्यवर्ती असेल तर ४ महिने आधी आणि ग्रामपंचायत असेल तर २ महिना आधी असा कालावधी निश्चित केला जावा.
यादी सुधारण्यासाठी हा कालावधी वापरला जावा, पण मुळात यादीच निट असल्यामुळे ह्यात सुधारणा फक्त काही टक्क्यात आणि खालील असतील.
१. पत्ता बदलने. - पत्ता आधार कार्डाचा बदलायचा
२. यादीतून नाव कमी करणे (मृत व्यक्ती)
३. ज्यांनी अजूनही आधार नोंदनी केली नाही, त्यांनी आधार नोंदनी करावी, मतदार नोंदनी नाही, म्हणजे मुळ डिबी अपडेट होईल.
प्रत्येक टप्याच्या मतदानाच्या आधी १५ दिवस फ्रिज - परत रि लोड म्हणजे यादी अद्ययावत आपोआप मिळेल. (वरील बदलांसहित)
ह्यामुळे होणारे फायदे.
१. लिस्ट नेहमीच अपडेट राहणार. नवीन लिस्ट तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री, साहित्य, मॅनपावर व टॅक्सपेअर मनी हे सर्व वाचेल.
२. घोळ कमी होईल. सध्या साधारण ८१ करोड मतदार आहेत आणि बातम्या अश्या आहेत की ६४ लाख लोकं मतदान करू शकणार नाहीत, म्हणजे साधारण ८ टक्के मतदार! जर हा डिबी परिपूर्ण झाला तर नक्कीच ८ टक्यांपेक्षा कमी घोळ होईल, तो पण करोडोंमध्ये रूपये वाचवून.
३.इ मतदानाची ही पहिली पायरी होऊ शकते. ( अर्थात हे व्हायला अजून २० वर्ष लागतील, पण पहिले पाऊल उचलले जाईल)
४. बायो मेट्रिक्स पण उपलब्ध असल्यामुळे भविष्यात मे बी ५० वर्षांनतर यादी वगैरे बाद होऊन कोणी कुठूनही बायो वर मत देऊ शकेल. ( पण हे खूप पुढचे भविष्य आहे )
ही वरील यादीत अनेक क्रॉस टॅली डिबी पण वापरता येतील, पुढे जाऊन. सध्यातरी ही सुरूवात करावी असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटत की मतदार याद्या कश्या असाव्यात?
लोन रिपेमेंट कॅपेसिटी चेक
लोन रिपेमेंट कॅपेसिटी चेक करायला कंपन्यांना ऑप्शन असेल तर चांगले >> याची पण रजिस्ट्री चालू झाली आहे काही वर्षांपासून आणि बँका ( काही सहकारी बँका सोडून) लोन देताना ही रेजिस्ट्री चेक करतात.
माझ्या मते सगळ्यात आधी
माझ्या मते सगळ्यात आधी आपल्याला आपली पोस्टाची पत्त्यांची सिस्टीम बदलली पाहिजे. >>>> आपल्या देशात पत्ता हा प्रकारच नाही आहे मुळात ... कैच्याकै पत्ते असतात.. भारत रत्न द्यायला हवीत अपल्या सगळ्या पोस्टमन लोकांना ... १ ओळीच्या पत्यावर देखील ते पत्र पोहचवतात .. सामान्य नविन नागरीक अश्या पत्यावर पोहचु शकत नाही..
मधले शेवटचे दोन अनावश्यक
मधले शेवटचे दोन अनावश्यक वाटले... इंकम डाटा सरकार कडे असतोच राहीला बँकिंग वगैरे....तो सरकार कडे असतो त्यासाठी परत वेगळा डाटा बनवायची आवश्यकता नाही...
जसे आधारकार्ड चा नंबर बँकेत देणे चालु केले त्यावर आपले ट्रांझिक्शन आणि लोन वगैरे बँकिंग सामाईक डाटा तयार होउ शकतो ..
खास वेगळा करण्याची गरज नाही
म्हणजे उपलब्ध डेटाबेस (
म्हणजे
उपलब्ध डेटाबेस ( परिपूर्ण नाहीत तरी)
- आधार कार्ड डेटा
- ग्रामिण भागातले विविध दाखले इत्यादीचा डेटा ( अजुन तो सेंट्रल आहे की कसे ते नीटसे कळले नाहीये )
- लोन रिपेमेंट कॅपेसिटी रजिस्ट्री
- इन्कम टॅक्स इन्फॉर्मेशन डेटा
- मतदार डेटा
- एन एस आर डेटा
हे सगळे एकत्रित करुन अधिक सोयीचे आणि अॅक्सेसिबल करता यायला हवे.
उदयन, काही डेटा आहेच पण तो
उदयन, काही डेटा आहेच पण तो सेंट्रलाईज्ड सिस्टीममधे आणावा असे त्या डायग्राममधे दाखवायचे आहे. विस्कळीत , अनकनेक्टेड डेटा असेल तर वापरणे सोयीचे होत नाही.
पासपोर्ट मधे देखील
पासपोर्ट मधे देखील बायोमॅट्रिक डाटा असतो. फक्त त्यात डोळ्यांचा डाटा नाही आहे तो आधारकार्ड मधे आहे..
आधारकार्ड नव्याने चालु करायला हवे..पासपोर्ट सारखे सिस्टीम उभारुन ज्यात चार्जेस असायला हवे ( भारतीयांना फुकट मिळाल्याची किंमत नसते) मुलाला जन्मल्यापासुनच आधारकार्ड सक्तीचे असावे.. आणि १८ वर्ष झाल्यानंतर त्यात डोळ्यांचा डाटा आणि हातांचे ठसे यांचा समावेश करण्यात यावा..
मुलाला जन्मल्यापासुनच
मुलाला जन्मल्यापासुनच आधारकार्ड सक्तीचे असावे.. आणि १८ वर्ष झाल्यानंतर त्यात डोळ्यांचा डाटा आणि हातांचे ठसे यांचा समावेश करण्यात यावा.. >> +१. जन्म दाखल्याबरोबरच आधार कार्डपण द्यायला हवे.
जन्म दाखल्याबरोबरच आधार
जन्म दाखल्याबरोबरच आधार कार्डपण द्यायला हवे. >> आधारकार्ड सक्तीचे आणि हे मी वर लिहिले आहे.
हे सगळे एकत्रित करुन अधिक सोयीचे आणि अॅक्सेसिबल करता यायला हवे. <<< नाही मी आधी लिहिल्यासारखे सगळे डिबी एकत्र प्रायव्हसी मुळे करता येणार नाहीत. रादर मी स्वतः देखील त्या विरोधात राहीन.
ह्या मुद्द्यांचा समावेश नसावा असे मला वाटते.
१. त्याकडे किती अकाउंट आहेत.
२. त्याचे उत्पन्न किती
३. मेडिकल हिस्टी
४ पॉलिसीज
५. तो नौकरी कुठे करतो.
६. ह्या शिवाय काहीही पर्सनल.
का?
तर आपल्याला केवळ इथे किती लोकं राहतात / कुठे राहतात आणि त्यांचे नाव / वय व बायोमेट्रिक्स हेच फक्त हवे आहे. एकदा का हे फिल्ड गोळा केले की इतर फिल्ड जसे त्याची सोशल हिस्ट्री, त्याचा पॅन नं, तो कुठे जॉब करतो हे किंवा कोणती गाडी चालवतो हे लगेच मिळवता येईल.
इनफॅक्ट सावली जे काही म्हणतेय, त्यातील प्रायव्हसी सोडून तसे एण्ड स्टेट आर्किटेक्चर असायला हवे हे मला हे मला मान्य आहे.
पण एक डीबी असेल त्या लिंक कधीही प्रस्थापित करता येतील ( जन्म दिनांक आणि नावावरून) आणि त्या लिंक प्रस्थापित करणे हे त्या त्या डिपार्टेमेंटचे (म्हणजे जर क्रिमिनल असेल तर पोलिस) आणि लोन द्यायचे असेल तर बँक (जे आत्ताही तुमचे इनकम एनीवे तपासतात) करू शकतील.
म्हणजे आपण लिहिताना फक फोकस्ड मेल लिहावे. ज्यात त्याचे इनडायरेक्ट फायदे वर्णन केले जावेत, जर एकावेळी आपण ७-८ डिबी इंटरकनेक्ट करा असे लिहिले तर त्याचे विशस सर्कल बनेल, पेक्षा फोकस्ड १ डिबी, क्रॉस टॅली डिबी आणि त्यातून निर्माण होणारा एक सिटिझन / मतदार डिबी असे ठेवले तर सोपे पडेल.
मी असे काहीसे म्हणतो होतो.
आधी लिहिल्यासारखे जे नॉन नागरिक (पण से, आधार कार्ड होल्डर) आहेत, ते क्रॉस टॅली मुळे (जन्म डिबी) आपोआप नागरिक म्हणून त्या डीबीत घोषीत होणार नाहीत.
निदान मला हे ब्रेन स्ट्रॉमिंग आवडले, आपण किती आणि कसा विचार करतो आहोत / व एक नागरिक म्हणून कुणाच्या काय अपेक्षा आहेत ते पण इथे मांडले जात आहे. अन्यथा भांडायच्या चर्चा आपण नेहमीच करतो.
कुठल्या पासपोर्ट मध्ये
कुठल्या पासपोर्ट मध्ये बायोमेट्रीक डाटा आहे???
आधारकार्ड नव्याने चालु करायला
आधारकार्ड नव्याने चालु करायला हवे. >> अरे बंद झाले नाही. उलट आता पासपोर्ट हवा असेल तर आधार कार्ड हे अॅड्रेस प्रुफ म्हणून चालते.
मी पासपोर्ट डिबीचा विचार करत नाहीये. का? तर ७० एक टक्के जनतेकडे पासपोर्ट नसेल असे वाटते.
केदार, तु प्रायवसी डेटाचा
केदार, तु प्रायवसी डेटाचा मुद्दा म्हणालास तो मान्य.
त्या रेजिस्ट्री त्या त्या डिप. साठी वेगळ्या असाव्यात हे पण बरोबर. त्यांचा 'कि डेटा' ज्यावरुन युनिक पर्सन आयडेंटिफिकेशन होईल तो मात्र एकच असावा.
तु डायग्राम काढलास त्यात आत्ता फिल्डवेगळे केले आहेत आणि तो डेटा चार ठिकाणी रिपिट होतोय असे वाटतेय.
मी डायग्राम अपडेट करते आणि देते पुन्हा.
कुठल्या पासपोर्ट मध्ये बायोमेट्रीक डाटा आहे??? >> ++
आधारकार्ड आहेच........
आधारकार्ड आहेच........ नव्याने म्हणजे त्यात अजुन सुधारणा करुन.. जसे पासपोर्ट साठी एक सिस्टीम अत्यंत योग्य आणि सुटसुटीत आहे .. आता सगळे त्याचे ऑनलाईन असल्याने मधले "दलाल" वगैरे सगळे गायब झालेले आहेत..
हा जो बदल झालेला आहे पासपोर्ट सेवेत तो नक्कीच उपयोगी आणायला हवा
पासपोर्ट मधे आपला हाताचे ठसे असतात... आधार कार्डात हाताचे ठसे आणि डोळ्यांचा डाटा दोन्ही आहे..
तु डायग्राम काढलास त्यात
तु डायग्राम काढलास त्यात आत्ता फिल्डवेगळे केले आहेत आणि तो डेटा चार ठिकाणी रिपिट होतोय असे वाटतेय. >>
नाही तीच फिल्ड वेगवेगळे डिबी त्यामुळे रिपिटेशन आहेच. एकच डिबी सर्वांसाठी असे होऊ शकणार नाही. पण एक CEN डिबी हवा. मग तो कसा करायचा. तर त्यासाठी वेगवेगळे डिबी कॉमन फिल्ड वर एकत्र आणायचे.
कॉमन फिल्ड
नाव
डिओबी
पत्ता
माझ्या पासपोर्टच्या वेळेस
माझ्या पासपोर्टच्या वेळेस हाताचे ठसे घेतलेले नाहीत म्हणूनच विचारतोय उदयन की.. कुठल्या पासपोर्ट मध्ये हे ठसे घेतात..
आणि नवीन पद्धत जर सुरु केली असेल तर आधीच्या पासपोर्ट धारकांचे हाताचे ठसे घेण्याची वेगळी प्रोसेस करावी लागेल..
माझा पासपोर्ट मी गेल्या वर्षीच रिन्यू केलेला आहे.. तेव्हा हाताचे ठसे दिलेले नाहीत..
@ सावली.. तो डेटा रिपीट होईलच.. कारण तो वेगवेगळ्या ठिकाणी मेंटेन केला जाणार आहे.... सगळे एक खिडकी योजने सारखे एकत्र आणले तर एकाच ठिकाणी तो डेटा येईल.. आणि सेंट्रलाईझ डेटाबेस तयार होईल..
आता पासपोर्ट हवा असेल तर आधार
आता पासपोर्ट हवा असेल तर आधार कार्ड हे अॅड्रेस प्रुफ म्हणून चालते. >>> आधारकार्डाची 'डेट ऑफ इश्यू' ही पासपोर्ट अॅप्लिकेशनच्या तारखेच्या आधी एक वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तरच चालते. अन्यथा आधारकार्ड + अजून एक प्रूफ लागते
आता, समजा माझ्याकडे आज आधारकार्ड आले, अजून दीड वर्षांनी मी पासपोर्टसाठी अप्लाय केलं, पण दरम्यानच्या काळात मी घर बदललं तर मग आधारकार्डाचाही काही उपयोग नाही.
इनफॅक्ट सावली जे काही म्हणतेय, त्यातील प्रायव्हसी सोडून तसे एण्ड स्टेट आर्किटेक्चर असायला हवे >>> +१
आता बघा. मला वाटतं की डेटा
आता बघा.
मला वाटतं की डेटा रिपीट करायचा नाही. तसे केले तर माझा पत्ता / नाव बदलले तर ते सगळीकडे बदलावे लागणार. सुरुवातीला जन्म नोंदी बरोबरच एक युनिक आयडी तयार करायचा आणि त्याच्या मॅपिंगने डेटा इतर ठिकाणी वापरायचा .
पासपोर्टसाठी माझ्याही हाताचे ठसे घेतले नाहीत. नविन पद्धत असावी मग.
सावली, तुम्ही दिलेले दोन्ही
सावली, तुम्ही दिलेले दोन्ही डायग्रॅम (आधीच्या पानावरचा आणि हा) मला दिसत नाहीत.
गजानन, पिकासा/ ब्लॉगस्पॉट
गजानन, पिकासा/ ब्लॉगस्पॉट ब्लॉक आहे का?

छोटा केला पण अक्षर बारीक आहे.
पिकासा/ ब्लॉगस्पॉट दोन्ही
पिकासा/ ब्लॉगस्पॉट दोन्ही ब्लॉक आहे पण पिकासावरून एम्बेडेड इमेजेस दिसतात इतर पानावरच्या. दुसरीकडून बघतो.
असे कसे...... ???? हिम्सकुल..
असे कसे...... ???? हिम्सकुल.. ?
मी मागच्याच महिन्यात काढला आहे... फोटो देखील तेच काढतात तिथल्या तिथेच... आणि नंतर आपल्या हाताच्या सर्व बोटंचे ठसे घेतात..
आपल्याला फोटो घेउन नाही जायचा आहे आता...आधी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि पैसे देखील ..मग अपॉईंट्मेंट मिळते ... तेव्हा जायचे त्या वेळेला
गजानन, आता दिसत असेल ना? उदयन
गजानन, आता दिसत असेल ना?
उदयन , ही नवी पद्धत आहे मग. जुन्या पासपोर्टला असे नव्हते. इनफॅक्ट जुने पासपोर्ट रिन्यु करतानाही ठसे मागितलेले नाहीत ( मागच्या नोव्हे.पर्यंत तरी )
केदार, तु ३ की फिल्ड म्हणतोयस त्याबद्दल आधीच्या पोस्टमधे लिहायचे राहीले. नाव, डिओबी अणि पत्ता हे कम्बाईंड की तयार करु शकत नाही. प्रायमरी की किंवा कम्बाईंड की साठी नॉनव्हेरिएबल डेटा हवा. नाव कधीही बदलु शकतो. पत्ताही बदलु शकतो. त्यामुळे 'कम्बाईंड की / प्रायमरी की ' साठी डिओबी, प्लेस ऑफ बर्थ , टाइम ऑफ बर्थ हे वापरुन एक युनिक नंबर तयार करावा लागणार. त्यानंतर या नंबरने सगळे मॅपिंग करता येईल. ( हे अगदी बेसिक थॉट्स आहेत. अजुन बरेच फॅक्टर विचारात घ्यावे लागतील अॅक्च्युअल डीझाईन आणि डेटाबेस प्लॅनिंग साठी )
एक उदा.
समजा मी नाव बदललं तर सिस्टीम जुने नाव, आणि नवे आत्ताचे नाव दोन्ही स्टोअर करायला हवं. कधी गरज असेल तेव्हा जुने नाव शोधुन काढता यायला हवे.
समजा पत्ता बदलला तर जुने पत्ते आणि नवा आत्ताचा पत्ता सिस्टीममदे ठेवता यायला हवा. गरजेच्या वेळेस जुना पत्ता शोधुन काढता यायला हवा.
त्यामुळे या दोन गोष्टी की मधे नसाव्यात.
सावली, हो आता दिसतोय.
सावली, हो आता दिसतोय. धन्यवाद.
जुन्या पासपोर्टांच्या वेळी हाताच्या बोटांच्या ठश्यांची सोय/पद्धत नव्हती पण आता आहे. जुने पासपोर्ट रिन्यु करतानाही ठसे घेतले जातायत.
छान आहे विषय आणि चर्चाही
छान आहे विषय आणि चर्चाही चांगली सुरू आहे.
आज ना उद्या आधारसारख्या सर्वंकष कार्डाची गरज लागणार आहेच. पूर्णपणे हे बंद होईल असं वाटत नाही.
मात्र नुकतंच पासपोर्ट रिन्युवल नावाचं कंटाळवाणं काम पार पाडलं. त्यात माझं आधारकार्ड एक वर्ष जुनं नाही म्हणून त्याला सपोर्टिंग कागदपत्रं दाखवावी लागली. ती त्यांच्या व्याख्येत बसेनात म्हणून नॅशनलाईज्ड बँकेत खातं उघडावं लागलं आणि त्यांचं पासबुक दाखवावं लागलं.
*****************
मी मागच्याच महिन्यात काढला आहे... फोटो देखील तेच काढतात तिथल्या तिथेच... आणि नंतर आपल्या हाताच्या सर्व बोटंचे ठसे घेतात.. आपल्याला फोटो घेउन नाही जायचा आहे आता...आधी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि पैसे देखील ..मग अपॉईंट्मेंट मिळते ... तेव्हा जायचे त्या वेळेला
>>> उदयन + १
रिन्युवलच्या वेळी चार्-काउंटर् यात्रा घडवतात. त्याला चार तास लावतात. ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून आपण दिवस निवडू शकतो पण वेळ मात्र मायबाप सरकार देईल तीच गोड मानून त्या वेळेत बरोबर तिथे जावे लागते. शनिवारी जाऊ नका. पासपोर्ट ऑफिसात आलो आहोत की खंडोबाच्या जत्रेला असा संभ्रम निर्माण होईल अशी गर्दी असते. मी या शनिवारच्या जत्रेतच नेमकी जाऊन आले. पर्याय नव्हता म्हणून.
केदार, तु ३ की फिल्ड म्हणतोयस
केदार, तु ३ की फिल्ड म्हणतोयस त्याबद्दल आधीच्या पोस्टमधे लिहायचे राहीले. नाव, डिओबी अणि पत्ता हे कम्बाईंड की तयार करु शकत नाही. प्रायमरी की किंवा कम्बाईंड की साठी नॉनव्हेरिएबल डेटा हवा. नाव कधीही बदलु शकतो. पत्ताही बदलु शकतो. त्यामुळे 'कम्बाईंड की / प्रायमरी की ' साठी डिओबी, प्लेस ऑफ बर्थ , टाइम ऑफ बर्थ हे वापरुन एक युनिक नंबर तयार करावा लागणार. त्यानंतर या नंबरने सगळे मॅपिंग करता येईल. >>
सावली कम्बाईंड की कशाला करायची? युनिक नंबरला? तो आधार कार्डाने मिळतो आहेच की. तो नंबर सिटिझन नं. कारण तो नं युनिक मेथडने ऑलरेडी काढला आहे.
मी असे म्हणतोय,
की तो मतदार / सिटिझन डिबी तयार करताना (अर्थात सिटिझन डिबी म्हणने अयोग्य असेल) त्या फिल्डचे सगळे (मुख्य आधार आणि उरलेले तिन्ही पैकी एक मुख्य म्हणजे जन्म) डीबीची त्याच फिल्ड मध्ये असलेली व्हॅल्यू १००% मॅच झाली की तो त्या उजवीकडी डीबी मध्ये जाणार. म्हणजे आपण एक्सल मध्ये कसे व्हि लुक अप लावतो अगदी तसेच. थोडक्यात मी डेटा मायनिंग ऑप्शन सांगतोय. मॅप नीट झाले की तिकडे रेकॉर्ड तयार होणार, मॅप नीट झाले नाही की एरर, असे सर्व एरर परत उरलेल्या दोन डिबीशी टॅली होणार, आणि त्यातही जे उरले त्यांचे आधार कार्ड असेल पण इतर डॉक नाही, आणि मतदान करताना सिटिझन असावे लागणार, म्हणजे त्याची एक तर बर्थ डेट (जी जन्म डीबी वरून मिळणार) ती जुळायला हवी किंवा आणखी एक चौथा डिबी म्हणजे मायग्रेशन (दुसर्या देशीच्या नागरिकाने भारतीय नागरिकत्व स्विकारले तर) डीबीशी टॅली करणार.
खरे तर आधार कार्ड आणि जन्म डीबी एवढेच पुरेसे आहेत. आणि बाकीचे सर्व रिसिव्हिंग / रिड फ्रॉर्म
राहिला नावाचा प्रश्न.
तो आधार कार्डात एक फिल्ड अॅड करता येईल, ओरिजनल नेम आणि सेकंड नेम, अर्थात ज्यांनी नाव बदलले त्यांना ऑल पर्पज साठी आधार कार्डामध्ये बदल करावा लागणार.
मॅपीसाठी मग वापरात येणारे नाव व दुसरे नाव, उदा लग्न झालेल्या बाईचे आधीचे नाव व नंतरचे नाव (बदलले असल्यास) हे दोन्ही मॅप करणार. पण त्यातही वापरात असणारे नाव महत्वाचेच ठरणार कारण सरकारी कागदपत्र करण्यासाठी तिने / त्याने ते नाव सगळीकडे बदलावे हे अध्याऋत आहे, जे आजही होतेच.
तुझे नवीन चित्र आपण जी चर्चा करत आहोत तसे आहे. फक्त तुझ्या नवीन चित्रात दोन सुधारणा सुचवतो.
डाव्यासाईडचे इनकम डिटेल्स तिथे असायला नको व उजव्या साईडचे PF आणि सर्टिफिकेट / एज्युकेशन नकोत. कारण परत ते प्रायव्हसी.
पण इनकम डिटेल्सला आणि जे जे ऑप्शनल लिहिले आहे त्यांना आपण ऑन डिमांड मॅपिंग लिंक असे नाव देऊ शकतो, म्हणजे मी वर लिहिल्यासारखे त्या माणसाचे IT डिटेल्स हवे असतील तर ते त्याच्या मुळ फिल्ड वरून हवे तेंव्हा एन्फोर्समेंट डिपार्टमेंट वा आय टी डिपार्टमेंट मिळवू शकेल. म्हणून त्याना ऑप्शनल न ठेवता ऑन डिमांड मॅपिंग लिंक / रि चेक डिबी (म्हणजे प्रत्यक्ष लिंक नसतानाही, त्या डीबी मध्ये लॉग इन करून पाहता येईल.)
उदा देतो.
FBI आपला सर्व डेटा SSN वर सहज ट्रेस करते, तुम्ही कुठला फोन वापरता, कुठे राहता, नौकरी करता ते सर्व. पण FBI कडे तो सगळा डेटा असायची गरज नाही, की फिल्ड SSN असले की झाले कारण लायसन्स घेणे ते कर्ज घेणे ह्या सर्व उद्योगात आपल्याला SSN द्यावा लागतो. आणि ते सर्व डीबी वेगवेगळे आहेत.
अगदी तसेच भारतात आधार कार्ड आहे. ते करताना आपण सगळीकडे आधार कार्ड नं वापरून आज नाही तर ५० वर्षांनी सगळे ट्रेस करू शकू असा विचार आहे. तोच नंबर ह्या नवीन डीबीला वापरयचा कारण आधार नं हा त्या नविन डिबीची मदरशिप असणार. ह्यात व्हिल रिइन्वेंट होणार नाही, तर फक्त सिनर्जी होईल, जी नाही.
केदार, आधार नं >> ओके. मला
केदार,
आधार नं >> ओके. मला तसेच म्हणायचे होते पण आता आधार नं तयार होतोच आहे तो वापरावा.
रात्री तुझी बाकी पोस्ट नीट वाचुन मग त्याप्रमाणे चित्रात बदल करते.
अजून थोडंस फायनल केलतं कि
अजून थोडंस फायनल केलतं कि त्यातील चैलेन्ज्स वर चर्चा व्हावी.
उदा.
Hospitals ... Birth and Death Enteries>>>>>>>>>
ह्यात अजूनही ५०% पेक्षा जास्त ठिकाणी Computerized Data ठेवला जात नाही.
माहितीचा सोर्स : काही बायोमेडिकल इंजिनिअर.
त्यातील चैलेन्ज्स वर चर्चा
त्यातील चैलेन्ज्स वर चर्चा व्हावी. >>. अगदी.
फिजिबिलिटी / चॅलेंजेस / सोल्युशन्स / मेथड / फायदे आणि असले तर तोटे अशी प्रत्येक गोष्ट एनीवे लिहावे लागणार आहेतच. ही केस स्टडी म्हणून पाहायची. तरच प्रेझेंट करता येईल / येण्याची शक्यता वाढेल.
ठाण्यात फार गर्दी असते ..
ठाण्यात फार गर्दी असते .. अश्या वेळेला नाशिक ला घ्यायचे... पासपोर्ट ऑफिस नाशिक चे लव्कर होते..
मी अवघ्या ४५ मिनिटात सगळे सोपस्कर पुर्ण करुन बाहेर आलेलो ... (अर्थात कागदपत्रे व्यवस्थित हवीत)
साउंडस लाइक आधार टीमने
साउंडस लाइक आधार टीमने प्रॉब्लेम स्टेट्मेंट, रिक्वायरमेंट डेफिनिशन फेजमधे मार खाल्ला. आपल्याकडे हाच लोचा आहे, डेव्हलपर मेंटॅलिटी असलेली मंडळी अल्पशा माहितीवर डायरेक्ट सोलुशन ठरवतात आणि मग तोंडघशी पडतात.
सेकंडली, वरील चर्चेत हि सगळी प्रोसेस का उगाच काँप्लीकेट केली आहे? व्हाय कँट यु जस्ट रेप्लीकेट ए सिस्टम दॅट हॅज ऑलरेडी बीन प्रुवन एल्सव्हेअर अँड स्टॉप बॉइलींग ओशन... व्हाय टु रिइन्व्हेंट द #किंग व्हील?
मला इब्लिस यांचे म्हणणे
मला इब्लिस यांचे म्हणणे पटतेय. कुठलिही योजना सफल न होऊ द्यायची योजना मात्र सफल होत असते.
म्हणाल कि मी मागास आफ्रिकेतले उदाहरण देतोय.. पण आज नव्हे तब्बल १९९३ साली केनयात प्रत्येक नागरिकाकडे सरकारी ओळखपत्र होते. मी ज्या कंपनीत नोकरीला होतो ती कंपनी शेतकर्यांकडून ऊस घेत असे आणि त्या ऊसाचे पैसे मी निव्वळ ते कार्ड बघून त्यांना रोखीने देत होतो. त्या काळात तर बारकोडही नव्हते.
सध्या अंगोलात बघतोय. ओळख कार्डाशिवाय त्यांना बँकेतले व्यवहारही करता येत नाहीत. हे ओळखपत्र डिजीटलाईज्ड आहे. त्यावर त्या व्यक्तीचा रंगीत फोटो असतो. हे कार्ड बार कोड रीडरने वाचता येते.
अगदी साधीशी गोष्ट. देशाबाहेर किती पैसे वर्षभरात पाठवायचे याला इथे बंधन आहे. तर त्या व्यक्तीने कुठल्याही संस्थेमार्फत पैसे पाठवलेले असोत, त्याचा पूर्ण रेकॉर्ड सर्व संस्थांना उपलब्ध असतो.
इतकेच कशाला या देशात यायच्या आधीच आमचा व्हीसाचा रेकॉर्ड इथे उपलब्ध असतो. मी भेट दिलेल्या सर्व देशातला अंगोला हा एकमेव देश आहे कि जिथे कसलाही अरायव्हल फॉर्म भरावा लागत नाही. ( डिपार्चर फॉर्मही नाही. )
Pages