'आजोबा' - चित्र रंगवा आणि घोषवाक्य लिहा स्पर्धा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 April, 2014 - 02:11

काय बच्चेकंपनी, सध्या परीक्षा संपल्याने धमाल चालू आहे ना? पत्ते, कॅरम, आंबे, आईस्क्रीम, व्हिडिओ गेम आणि सिनेमे... आणखी काय काय बरं? अर्थात सध्या ऊन खूप असल्याने दुपारी आई बाहेर खेळायला जाऊ देत नसणार. मग कधीकधी दुपारी नुसतं घरात बसून काय करायचं बुवा, असा प्रश्नही तुम्हांला पडत असणार. ते ओळखूनच आम्ही घेऊन आलो़ आहोत 'चित्र रंगवा' स्पर्धा. चित्रसुद्धा खास आहे बरं का! ते आहे 'आजोबा'चं. तुम्ही म्हणाल, हा तर बिबळ्या आहे. हा आजोबा?

हा आजोबा आहे रुबाबदार, अंगभर सुंदर नक्षी असणारा. अगदी सिनेस्टारच. आता तो नक्की काय काय करतो, हे कळेल तुम्हांला ९ मेला. 'आजोबा' हा चित्रपट पाहिल्यावर. पण तुम्हांला उत्सुकता असेल ना आजोबाबद्दल? त्याच्या करामतींबद्दल? तर मग व्हा सज्ज! आजोबाचं चित्र झक्कपैकी रंगवून आम्हांला पाठवा.

सध्या निवडणूकांची जोरदार धामधूम चालली आहे. या चित्रातला आजोबा नुकताच मतदान करून आलाय. या चित्रातून तो आपल्याला काहीतरी सांगतोय. तो काय सांगत असावा, हेही त्या रंगवलेल्या चित्राबरोबर आम्हांला कळवा! फक्त एका वाक्यात!!!

आजोबाचं चित्र रंगवणार्‍या आणि तो आपल्याला काय सांगत आहे हे मस्तपैकी सांगणार्‍या तीन विजेत्या स्पर्धकांना आणि त्यांच्या एकेका पालकाला मिळतील मुंबईत ६ मे रोजी आणि पुण्यात ९ मे रोजी होणार्‍या 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाची तिकिटं.

तर तुम्हांला रंगवायचं आहे खालील चित्र -

ajoba1.jpg

तुम्ही रंगवलेलं चित्र आणि त्याच्या जोडीला असणारं कॅप्शन 'आजोबा' या ग्रुपात नवीन धागा उघडून चिकटवायचं आहे.

तुम्हांला घोषवाक्य सुचत नसेल, तरी हरकत नाही. नुसतं चित्र रंगवा आणि नवीन धाग्यावर अपलोड करा. Happy

धाग्याचं शीर्षक - 'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - स्पर्धकाचं नाव - असं हवं.

चित्राबरोबर तुमच्या पाल्याचं वय आणि तुमचा मायबोली आयडीही हवा.

ही स्पर्धा फक्त ७ ते १५ वयोगटातल्या ज्युनिअर मायबोलीकरांसाठीच आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांच्या पालकांनी मायबोलीकर असणं अर्थातच आवश्यक आहे.

रंगवलेलं चित्र आणि कॅप्शन देण्याची मुदत असेल २४ एप्रिल ते २ मे.

विजेत्या स्पर्धकांची निवड स्वतः दिग्दर्शक सुजय डहाके करणार आहेत.

तयार आहात ना मग तुम्ही सर्व आजोबाला तुमच्या आवडीचं रंगरूप द्यायला आणि त्याचा निरोप आपल्या सगळ्यांकडे पोहोचवायला?

ajoba poster 1.jpg

मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाघोबाने केलं मतदान Happy

कसलं गोड आहे चित्र... मस्त अगदी.
चित्रपट बघण्याची उत्सुकता आहेच.. आमच्या वाघोबाने रंगवलेलं चित्रं सुजयकाकांना आवडलं तर प्रिमीयर बघायला मिळेल. वॉव!!

इंद्रधनुष्य,
वयाची अट तिकिटासाठी ठेवली आहे. हा चित्रपट ७ वर्षांखालील मुलांसाठी योग्य नाही म्हणून. चित्र रंगवून इथे सगळ्यांकडून कौतुक करवून घ्यायला काहीच हरकत नाही. Happy

अरे वा ..! Happy

मस्त आहे वाघोबा .. मी ट्रेलर बघितलं त्यातला अजोबा मस्त दिसतोय एकदम .. खरंच रुबाबदार! Happy

खूपच आधी, कित्येक महिन्यांपूर्वी पाहिलेला या चित्रपटाचा ट्रेलर, आणि तेव्हाच हा बघायचा हे नक्की केले होते.
यावर स्पर्धाही हे तर खासच !

स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन Happy

सर्वांनी रंगवलेली चित्रं फार म्हणजे फार सुरेख होती.

त्यामुळे 'आजोबा'चे दिग्दर्शक व या स्पर्धेचे परीक्षक श्री. सुजय डहाके यांनी विजेत्यांना क्रमांक न देता ७ वर्षांवरील सर्वांनाच विजेते म्हणून घोषित केलं आहे.

६ तारखेला मुंबईत होणार्‍या व ९ तारखेला पुण्यात होणार्‍या 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाची तिकिटं नीरजा (मंजूडी), सानिका (तोषवी), स्पृहा (सावली), अनन्या (विनार्च), सानिका (कविन), नूपुर (घारुआण्णा), नचिकेत (पौर्णिमा), देविका (जेन्सिया).

या स्पर्धेत भाग घेतलेले अनेक स्पर्धक ७ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. त्यांची चित्रंही खरंच खूप छान आहेत. पण स्पर्धेसाठी वयाची अट असल्यानं खूप इच्छा असूनही त्यांना शुभारंभाच्या खेळाची तिकिटं देऊ शकत नाही, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

स्पर्धेत उत्साहानं भाग घेतल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि अभिनंदन Happy

तोषवी,
तुम्ही सध्या भारतात असाल, तर कृपया चिनूक्स यांच्याशी ९९७०८ ४२४०५ या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद. Happy

सर्व बालविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

माप्रांना धन्यवाद.

आणि चित्रकारांचे विशेष आभार. खूप गोंडस रेखाटलात आजोबा!

मा प्रा, मी सध्या मुंबई/पुणे येथे नाही. माझ्या ऐवजी दुसरं कोणी (आई) आलं तर चालेल काय?
शक्य नसेल तरी काही हरकत नाही. सानिकाला वाघोबा रंगवायला मज्जा आली Happy
धन्यवाद.

सर्व बालविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आर्यनी चित्र काढण एन्जोय केल. इतरांची चित्रे त्याला दाखवली.प्रतिक्रियाही अडखळत का होइना वाचल्या.खुश झाला.एकुण नात्वाबरोबर काम करताना मलाही मजा आली.मा.प्रांचे आभार.

माझ्या ऐवजी दुसरं कोणी (आई) आलं तर चालेल काय?>>> तोषवी, माफ करा पण हा उपक्रम केवळ मायबोलीकरांसाठीच आहे. माध्यम प्रायोजकांच्या सर्व उपक्रमांमध्ये आत्तासारखाच सहभाग नोंदवत रहा. तुम्ही पुढच्या वेळी भारतात येणार असाल तेव्हा नक्की कळवा, त्यावेळी असा काही कार्यक्रम असल्यास मायबोलीतर्फे उपस्थित राहण्यास तुम्हाला प्राधान्य दिले जाईल Happy

सर्व बालविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
आर्याला चित्र रंगवायला नेहमीच आवडतात. एक छान चित्र रंगवायला दिल्याबद्दल माप्राना धन्यवाद Happy

मा_प्रा, 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाची तिकिटं दिल्याबद्दल आभारी आहोत Happy चित्र मस्त होतं, त्यामुळे ते रंगवायलाही मजा आली. चित्रकाराचं नाव सांगाल का?