उच्च रक्तदाब - लक्षणे आणि घरगुती उपाय

Submitted by nikitasurve on 22 April, 2014 - 02:26

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही.
या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे.

१) तीन ग्रॅम मेथीदाणा. पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे.

२) कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.

३) टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.

४) जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे.

५) उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे.

६) 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे.

७) गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाळावे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी. तुम्ही मंत्र आणि योग या दोन गोष्टीम्चा एकत्र उल्लेख करीत आहात. तसे पहायला गेल तर अशी सिनरजी असु शकेल का ? यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. पण यातुन तसे काही सिध्ह झाले तर तुम्ही या लेखाच्या द्वारे पेटंट / रॉयल्टी यावर हक्क दाखवु शकाल (जरी तुम्ही स्वतः संशोधन केले नाही तरी.)

(त्यावेळी आमची कन्सलटेशन फी द्यालच. हे लक्षात आणुन दिल्याबद्दलची)

या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे.

या लेखातल्या वाक्यावरून नेमकं काय वाटतंय आपल्याला.
असं म्हटलंय का की औषधांना अ‍ॅडजवंट म्हणून हे उपाय करा?

निवांत पाटील - नक्कीच, मला मानधन मिळणार असेल तर त्यापैकी अर्धा भाग म्हणजे 'मान' मी तुम्हाला नक्की देईन.

मी जरा विनोदी अंगाने खरा संवाद मांडला .रोज असे चार तरी आशावादी रुग्ण स्पेशालिस्टांकडे येत असतात .डॉक्टरही त्यांना हळूच "पण गोळ्या चालू ठेवा"ची गोळी देतात .असे नामजप आणि योगासनांनी (फक्त) हे चिकट पाहुणे घर सोडून जात असते तर मठाधिपती निरोगी नसते का झाले ?ऋषिमुनी नाही .ते वनातले आयुष्य (१००० ?)वर्षे जगायचे म्हटतात .बरेच मठाधिपती राजेशाही जीवन जगतात .चांगले सुग्रास खाणे आणि भरपूर आराम .थोडेसे संध्याकाळी भेटणाऱ्यांना वचनामृत पाजले की शिष्यांकडून चरणकमलांचे पायांचे मर्दन करून घ्यायचे .(केंद्रातले चांगले रवी गुरू हे ऱ्हुद्रोग ,मधुमेह ,रक्तदाबाचेही कारण असावेत ,तसेच हेड ऑफिसातला चांगला जॉब ,अधिपति योग देतात का यावर प्रकाश टाकावा ) . अवांतरावर क्षमस्व .

म्हणताना स्वतः शीर्षासन करा.
<<
धन्यवाद फिबे!
पण मी वर म्हटल्याप्रमाणे शीरशासन हे योगाचा प्रकार नव्हे काय? त्यापेक्षा पाठ दाखवून उभे राहून अथवा नुसतेच उलट म्हटलेले चालेल असे वाटते.

पण मी वर म्हटल्याप्रमाणे शीरशासन हे योगाचा प्रकार नव्हे काय? <<<

औषधांच्या योगायोगापेक्षा नुसता योग बरा!

शुद्धीपत्रक

बेफी: वर लिहताना एक चुक झालीय.

पण यातुन तसे काही सिध्ह झाले तर तुम्ही या लेखाच्या द्वारे पेटंट / रॉयल्टी यावर हक्क दाखवु शकाल (जरी तुम्ही स्वतः संशोधन केले नाही तरी.)

या ऐवजी

पण यातुन तसे काही सिध्ह झाले तर तुम्ही तुमच्या प्रतिसादा द्वारे पेटंट / रॉयल्टी यावर हक्क दाखवु शकाल (जरी तुम्ही स्वतः संशोधन केले नाही तरी.)

धन्यवाद पुण्याची विनिता...... औषधे बंद करून हे घरगुती उपाय करावे असे माझे म्हणणे नाही.... औषध्दांबरोबर तुम्ही हेही उपाय करावे एवढेच सांगणे होते. त्याने कोणते नुकसान तर नाहीच होणार पण फायदे मात्र नकीच होतील......तरीसुद्धा ज्यांना हे पटले नाही त्यांनी माफ करावे हा छोटासा प्रयन्न होता जनजागृतीसाठी.

साती आणि इब्लिस यांनी या धाग्याची प्रचंड दिशाभुल केली आहे.
<<
निपा,
आपले म्हणणे वाचून विद्ध झालो. Sad धाग्यात दाखविलेल्या घरगुती मार्गावरूनच आमची वाटचाल सुरू आहे. विषयांतर न करता व समाजमनास रंजक वाटेल असे लिहावे, तर आपण त्याला दिशाभूल का म्हणत आहात?

उलट, विषयांतराने दिशाभूल आपणच करीत आहात असे म्हणावेसे वाटते.

तेव्हा सूज्ञ वाचकजनहो, पुनःएकदा अवांतर चर्चेकडे दूरलक्ष करून आपण घरगुती उपायांची चरचा करावी असे नम्रपणे सुचवितो.

औषधे बंद करून हे घरगुती उपाय करावे असे माझे म्हणणे नाही.... <<<

निकिता सुर्वे Happy

गंमत चालली आहे, तुम्हीही आनंदच घ्या, राग मानू नका!

लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसीन.
आता त्याला घरगुती म्हणायचे किंवा कसे ते ठरवा.

असो.
आता तीन तास बीपी/शुगरच्या गोळ्या वाटायला जाते.

ओहोहो! पुनः एकदा धन्यवाद srd!

>>.(केंद्रातले चांगले रवी गुरू हे ऱ्हुद्रोग ,मधुमेह ,रक्तदाबाचेही कारण असावेत <<

हा एक चांगला मुद्दा आपण चरचेत आणलात. आपला सखोल अभ्यास यातून दिसून येतो.

पुरातन काळापासून रोगराई, आजार हे दुष्ट देवता, वा ग्रहयोगांमुळे होतात अशी धारणा त्या काळच्या वैद्यांनी विचारात आणलेली होती, अशा नोंदी अनेक पुरातन ग्रंथांतून सापडतात. व त्यानुसार रोगाचा इलाज म्हणून त्या-त्या देवतेचे आवाहन, बळी/नैवेद्य इ. इलाजही केले जात, असे वाचनात आले होते.

रोगाचे कारक दुष्टग्रह व त्या अनुषंगाने करावयाच्या काही उपचारांबद्दल लिंबूटिंबूंसारख्या अधिकारी व्यक्तींनी इथे लिहावे असे माझे कळकळीचे आवाहन आहे.

इब्लिसः तुमच्या भावना दुखवायचा कोणताही हेतु मनी नाही. तुमचे नंतरचे प्रतिसाद अगदी विषयास अनुसरुन आहेत हे मी इथे नम्रपणे नमुद करतो.

सातीजी: तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टींचा अनुल्लेख केलात यावरुन तुमचा छुपा अजेंडा अजुनच उघड होत आहे.

तरी सिध्ह चुकलेच>>> इथे स्पेलिण्ग मिस्टेक न पहाता विषयाकडॅ पहावे असे नम्र निवेदन देउ इच्छितो. लेख आणि प्रतिसाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नकळत मी लेखाचे श्रेय बेफींना देत होतो, त्याचे श्रेय फक्त प्रतिसादापुरते होते. म्हणुन शुध्हीपत्रक लिहले होते.

लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसीन.>>साअतीजी, मी इथे पुन्हा नम्रपणे नमुद करु इच्छीतो कि तुम्ही मंत्राबरोबर "हसणे " जी आमच्या परंपरेचा एक अविभाज्य घटक असलेली गोष्त ( जरी ती दुसर्‍यावर हसणे असली तरी) तुम्ही औषध या कॅटेगरीमध्ये घालत आहात. हे देकिल तुमचे कुटील कारस्थान आम्ही हाणुन पाडु. उद्या आम्ही हसलो तर विदेशी कंपनीला पुढे करुन रॉयल्टी मागाल आणी आम्हास मग तोंड दडवुन हसावे लागेल जे ज्याच्या वर हसतो त्याला कळणार पण नाही.

या गोष्टीचा मी पुर्ण अखिल भारतीय परंपरा आणि अनुशाशन मंचातर्फे निषेध नोंदवतो.

कणीक आणि बेसन एकत्र करुन पोळ्या कराव्यात. पोळ्याचा प्रश्न तर मिटला.

आता सोबत तोंडी लावायला मेथी दाणा, टरबुजाच्या बिया, तुळशीचा पाला, ताक, कडुलिम्बाचा पाला , खसखस यापासून एखादी भाजीची रेसिपी मिळू शकेल काय?

आता सोबत तोंडी लावायला मेथी दाणा, टरबुजाच्या बिया, तुळशीचा पाला, ताक, कडुलिम्बाचा पाला , खसखस यापासून एखादी भाजीची रेसिपी मिळू शकेल काय?>>>कबेपो मधे भरून पराठे करता येतील की!

इडलीवाला - मउअ असा असायला हवं ना तरच रक्तदाब कमीचा जास्त होईल.

वरचे प्रतिसाद वाचून खूप हसू आलं आणि चुकून जर वाढलाच असेल रक्तदाब तर तो कमी झाला असेल किंवा कमी झालेला वाढला असेल ह्याची खात्री.

असेच लिहित राहा आणी आम्हाला हसत राहा.

कणीक आणि बेसन एकत्र करुन पोळ्या कराव्यात.
<<

गहू + हरभर्‍याच्या डाळीपासून आपल्याकडे पूर्वीपासून पुरणपोळ्या करण्याचा प्रघात आहे. त्यात बहुतेकदा चवीसाठी म्हणून थोडी साखर व तूपही घालतात.

आजकालच्या वेगवान व धकाधकीच्या जीवनात पुरण बनविण्याचा वेळ वाचवून सरळ बेसन व कणीक एकत्र करण्याची अभिनव कल्पना आवडली.

रुचिपालट म्हणून त्यात थोडे तिखट मीठ घालून दशम्याही करता येतील, ज्या डायबेटीस असतानाही उपयुक्त होतील असे सुचवू इच्छितो.

त्या पोळ्या चावून खाल्यामुळे उच्चरक्तचापास आपोआप आळा बसतो हे संशोधन आता पुढे आले आहे असे दिसते. यावरून आपल्याकडील पुरातन पाकसिद्धी किती पथ्यकर होती हेच दिसून येते.

*

वेल,

मायबोलीवरील धागे -विशेषतः राजकारणावरील- वाचून सहसा माझा रक्तचाप वाढत असतो. परंतू माझ्या लिखाणाने तुमचा कमी झाला हे वाचून अत्यानंद झाला

रच्याकने, आपण म्हणता :

>>
असेच लिहित राहा आणी आम्हाला हसत राहा.
<<

आम्ही आपणस हसत नाही आहोत बरे. Sad
अशी समजूत का झाली असावी बरे आपली?

हसवत मधला व मिसला मी.. डोळा मारा<<<

वल्लरीमधला मिसू नका. नाहीतर हाकच मारता यायची नाही. ल्लरी ल्लरी म्हणणार कसं?

Lol Lol Lol

इब्लिसः रक्तदाब आणि रक्तचाप यात काय फरक आहे?

तसे आमच्याकडे माहिचे जेवण जेवताना आग्रहाने दाब आणि चाप असे दोन्ही शब्द यजमानांकडुन वापरले जातात.

रक्तदाब कमी करण्याचा एक नामी घरगुती उपाय,' आँखे' नावाची डीडीवरची एक जुनी मालिका रोज पहावी.>>>> इडलीवाला असे लिहताना कोणत्या प्रताधिकाराचा भंग होत नाहीना याची पुरेपुर काळजी घ्या. संबंधित लोक आपणास जरुर मार्गदर्शन करतील. ते करताना त्यांना आनंदच होइल.

लसणीबद्दल लिहा कोणीतरी ,,,,

रोज सकाळी उपाशीपोटी चार पाकळ्या लसूण नियमितपणे खाल्ल्यास बॅड कॉलेस्ट्रॉल व ट्राय्ग्लिसरॉइड्स चे प्रमाण वाढत नाही ,असे ऐकले आहे...

काही आधार आहे का याला?

Pages