उच्च रक्तदाब - लक्षणे आणि घरगुती उपाय

Submitted by nikitasurve on 22 April, 2014 - 02:26

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही.
या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे.

१) तीन ग्रॅम मेथीदाणा. पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे.

२) कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.

३) टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.

४) जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे.

५) उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे.

६) 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे.

७) गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाळावे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वेबसाइटवरून

There's a common misconception that people with high blood pressure, also called hypertension, will experience symptoms such as nervousness, sweating, difficulty sleeping or facial flushing. The truth is that HBP is largely a symptomless condition. If you ignore your blood pressure because you think symptoms will alert you to the problem, you are taking a dangerous chance with your life. Everybody needs to know their blood pressure numbers, and everyone needs to prevent high blood pressure from developing.

अन हे मेयो क्लिनिकच्या वेबसाईट वरुन

Most people with high blood pressure have no signs or symptoms, even if blood pressure readings reach dangerously high levels.

Although a few people with early-stage high blood pressure may have dull headaches, dizzy spells or a few more nosebleeds than normal, these signs and symptoms usually don't occur until high blood pressure has reached a severe or life-threatening stage.

बीन नागा करून म्हणजे?
२० ग्रॅ. पाणी कसे मोजायचे घरच्याघरी?

मेधा, इथे घरगुती उपायाची यादी चाललीए आणि तुम्ही हे काय सायंटिफिक तुणतुण लावलंय.
चला हटा बाजुला.
संयम नसला तर लोक घरगुती उपाय सोडून डॉक्टरकडे जाऊन बीपी तपासून औषधे वैगेरे घेतात.
तुम्ही लोकांना असंयमित का बनवताय?

मेधा, इथे घरगुती उपायाची यादी चाललीए
आणि तुम्ही हे काय सायंटिफिक तुणतुण
लावलंय.
चला हटा बाजुला.
संयम नसला तर लोक घरगुती उपाय सोडून
डॉक्टरकडे जाऊन बीपी तपासून औषधे वैगेरे
घेतात.
तुम्ही लोकांना असंयमित का बनवता >>>>>> +111

अगदी अगदी साती

अजून इथे स्वतला डॉक्टर समजून अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आयडीज यायचेत
ते आले की बाफ सुफ़ळ संपूर्ण होईल

धन्यवाद साती मॅडम. Happy
अवन्ताराबद्दल क्षमस्व. पण नाडी परीक्षा करून रक्तदाबाचं कितपत अचूक निदान/मापन करता येतं?

बोबो,
आयुर्वेदिक डिग्री वाले डॉक्टरही उच्च रक्तदाब स्फिग्मोमॅनोमीटर वापरून्च मोजतात.
हे उपकरण येण्यापूर्वी सगळ्याच पथीचे लोक नाडीपरीक्षा करूनच रक्तदाबाचे अंदाज करत असत.
नाडीपरीक्षा अ‍ॅलोपथीत आणि आयुर्वेदात वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.
आमच्या पॅथीत(म्हंजे सो कॉल्ड अ‍ॅलोपथीत) यात बरेच वेगवेगळे मुद्दे विचारात घेतात.
ते समजावणे या धाग्याच्या स्कोप बाहेरचे आहे अर्थात.
पण स्फिग्मो यायच्या आधी रक्तदाब हा विकार माहिती नव्हता का?
उदा. थर्मामीटर येण्याआधी ताप माहिती नव्हता का?

असो. लोकांची घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांत गल्लत होते नेहमी.

धन्यवाद साती मॅडम. Happy उपयुक्त माहिती दिलीत.

nikita मॅडम,

आगाउपणाबद्दल क्षमस्व. उच्च रक्तदाब हा अतिशय गंभीर प्रकार आहे. त्याचे symptoms सहसा जाणवत नाहीत, म्हणून त्याला Silent Killer म्हणतात.

आमच्या गावच्या वयस्कर, तरीही active आणि तरतरीत आजीला ब्लड प्रेशरमुळे ब्रेन स्ट्रोक(medically योग्य शब्द वापरतोय अशी आशा आहे.) आला तेव्हा कुठे आम्हाला कळलं की तिला रक्त दाब होता. सुदैवाने ती बऱ्यापैकी रिकव्हर झाली. पण नंतर अधून मधून किंचित स्मृतीभ्रंश होत असे.

तेव्हा जर तुम्ही डॉक्टर(किमानपक्षी आयुर्वेदिक तरी ) नसाल तर असे सल्ले देणं धोकादायक आहे. उगाच कुणीतरी डॉक्टर्सची औषधं बंद करून हे उपाय करायला जायचा आणि फट म्हणता जीवाशी खेळ व्हायचा Sad

कृपया उच्च रक्तदाबासाठी घरगुती उपचारांवर विसंबू नका. दोन जवळच्या व्यक्ती अशा घरगुती / आयुर्वेदिय उपचारांमुळे दगावल्या आहेत.

धन्यवाद, उपयुक्त माहिती. वाचतो आहे.

ताक होल मिल्कचे असावी की फॅट काढलेल्या दुधाचे? १ ग्लासला दही-पाण्याचे प्रमाण साधारणतः किती असावे? पिण्याआधीच ताजे घुसळणे अपेक्षित आहे की सकाळपासून करून ठेवले असल्यास चालेल?

महत्वाचे म्हनजे रक्तदाब किती आहे हे घरच्याघरी कसे मोजता येईल?

ता.क. पूर्वी ते मॅग्नेटवाले ब्रेसलेट्स मिळत असत. त्याने रक्तदाबाचा यश्सवी मुकाबला होत असे असे अनेक ज्येष्ट रक्तदाबी रुग्णांकडून ऐकले. ते ब्रेसलेट पुण्यात कुठे मिळतील?

घरगुती उपाय आपण खोकल्या सर्दीसाठी करत असतो .यात गरम पाणी पिणे ,वाफारा घेणे ,गुळण्या करणे ,छाती शेकणे इत्यादी .अधिक अडुळसा ,तुळस ,आले वगैरे अनेक जिन्नसांचा उपयोग करून केलेले काढे पिणे .हे करतांना डॉक्टरकडे जात देखिल नाही .इतक्या आत्मविश्वासाने स्वत:वर अथवा लहान मुलांवर घरी उपचार होऊन बरे होतात .असं काही या काही रोगांत (मधुमेह ,रक्तदाब इ०)करता येईल असे मला तरी वाटत नाही .काही मोठी माणसे गोळया खायचा कंटाळा येऊन कधी आपल्या मनाने स्वत: असे प्रयोग करत असतात .पण याला मर्यादा आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव असते ."मी सकाळी ॐ जप ,नंतर योगासने करतो त्यामुळे आटोक्यात आहे" असे डॉक्टरने रक्तदाब मोजल्यावर सांगतात .डॉक्टर म्हटतात व्वा !तुमची विलपॉवर जबरदस्त आहे हो !पण गोळ्या चालू ठेवा आणि येत जा (बिल देत जा).
ज्या उपचारावर पूर्णपणे विसंबून करता येतात तेच औषध .

.>>डॉक्टर म्हटतात व्वा !तुमची विलपॉवर जबरदस्त आहे हो !पण गोळ्या चालू ठेवा आणि येत जा (बिल देत जा).<<
Biggrin

.

धन्यवाद, srd.

आपण रक्तादाबी रुग्णांच्या सोयीसाठीच्या घरगुती उपायांत ॐ नामजप व योगासनांची भर घातलित.
(योगासन हा उपचार मला तितकासा खात्रीलायक वाटत नाही. त्यात व्यायाम करावा लागतो.)
पण फक्त उच्चरक्तचापासाठी एकादा विशिष्ट मंत्र आहे काय? ॐ नामजप जरा जनरिक वाटतो. असा मंत्र ठाऊक असल्यास कृपया लिहिणार का? उच्चारांसकट यूट्यूबवर अपलोड करता आल्यास बहार होईल.

आगाऊ आभार.

अतिशय दिशाभूल करणारा धागा>>> अनुमोदन. साती आणि इब्लिस यांनी या धाग्याची प्रचंड दिशाभुल केली आहे. कदाचित डॉ. असलेने 'भुल' हा त्यांच्या प्रॅक्टीसचा भाग असावा अशी दाट शंका येते.

पण फक्त उच्चरक्तचापासाठी एकादा विशिष्ट मंत्र आहे काय? >>>

अजुन एक मनात प्रश्न येतो तो म्हणजे हा मंत्र फक्त हिंदु लोकांना उपयोगी पडतो कि सेक्युलर आहे? सेक्युलर असेल तर ठीक नाहितर तो उलटा काम करतो काय? म्हणजे लो बीपी नॉरमल करणे इत्यादी.

त टी. : 'रक्तदाबी रुग्ण' हा शब्द भल्ताच लक्षवेधी आहे.

>>ॐ नामजप जरा जनरिक वाटतो.<<
Happy
बघा प्रस्थापित डॉ लोकांना जनरिक गोष्टींचे किती वावड आहे? मला वाटते श्रद्धेने देखील जनरिक असायला हरकत नाही. पहा श्रद्धा धार्मिकांचा प्लासिबो

निवांत पाटील तसं तर मी ऑनलाईन कन्सल्टेशन करत नाही , पण तुमचा प्रश्नं जेन्युईन वाटला.
म्हणून हे उत्तर.
औषधे वय, लिंग सापेक्ष असली तरी धर्मं जात सापेक्ष नसतात.
त्याअर्थाने हा मंत्रं सेक्युलर म्हणू शकाल.
हाय बी पी लो करायला जर हा मंत्र उच्चारणार असाल तर लो बीपी नॉर्मल करायला हाच मंत्रं उलटा म्हणा.
म्हणा- 'मूं...अ'

तर लो बीपी हाय करायला हाच मंत्रं उलटा म्हणा.<<< Lol

किंवा हाच मंत्र सरळच म्हणा फक्त म्हणताना स्वतः शीर्षासन करा.

बेफिकीर, ते अ‍ॅडवांस मेडिसीन आहे. आजाराच्या पुढच्या स्टेजमध्ये देता येईल.
शक्यतो ऑनलाईन कंसल्टेशनमध्ये हा उपाय कुणाला सुचवू नये असे मी तुम्हाला सुचवेन.
याउप्पर तुमची मर्जी.

शक्यतो ऑनलाईन कंसल्टेशनमध्ये हा उपाय कुणाला सुचवू नये असे मी तुम्हाला सुचवेन.
याउप्पर तुमची मर्जी.<<<

तुम्ही आणि इब्लिस ह्यांच्यासारख्या सरळसोट मार्गाने डॉक्टर झालेल्यांना विचारतंय कोण? पदव्या घ्या आणि प्रॅक्टिस करा! इथले आम्ही बघून घेऊ. Proud

साती ,एखाद्याने मूंअअमूंमूंअअमूं असा जप केल्यास रहदय थांवबून त्याची बायपास करता येईल काय?

निकिता यानी औषधे बंद करून घरगुती उपाय करा असे कुठेही लिहिलेले नाही, गोळ्या काय रुग्ण २४ तास घेत नाही. हे उपाय घरगुती आहेत याचा अर्थ औषधे टाळून करायचे आहेत असा कुठे होतो?
ताप आला की आपण औषध ही घेतो व पट्ट्या ही ठेवतो.
डायबेटिस असला की गोळी ही घेतली जाते आणि खाण्यात पण बदल केले जातात,
इथे एवढे अवास्तव वाद का?

खरे आहे, पण हे वाद नाही आहेत, नुसतीच गंमत आहे.

तुम्ही चिनूक्सांचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा, म्हणजे मग धोका पटेल. Happy

औषधे वय, लिंग सापेक्ष असली तरी धर्मं जात सापेक्ष नसतात.
त्याअर्थाने हा मंत्रं सेक्युलर म्हणू शकाल.>>>> सातीजी मी इथे नम्रपणे नमुद करु इच्छितो कि ' मंत्र ' या गोष्टीला औषधाच्या कॅटेगरीमध्ये बसवण्यापाठीमागचा तुमचा छुपा अजेंडा (पक्षी: कुटील कारस्थान ) आमच्या अचुक लक्षात आला आहे. तसेच या पाठीमागचे मल्टीनॅशनल कनेक्शन देखिल आमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटलेले नाही आहे.

आता याला आवर घालण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. योग्य सल्ला मिळताच इथे लिहण्यात येइल याची कृपया नोंद घ्यावी.

त.टी. : बाकि मंत्र उलटा म्हटल्यावर होणारे परीणाम याबद्दल माहिती दिल्याबद्दल आभार.

हो धोका आहेच... लोक्स जर अतिरेकी वागणार असतील तर काय करणार!

बाकी सर्व प्रतिसाद खरेच मस्त

Pages