चटकदार डांगर (एक तोंडी लावणे)

Submitted by प्रमोद् ताम्बे on 20 April, 2014 - 23:17

चटकदार डांगर
 xxx.jpg
साहित्य : एक वाटी उडदाची डाळ,अर्धी वाटी चणा (हरभरा) डाळ,अर्धी वाटी धने,दोन चमचे जिरे,८ – १० सुक्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ व छोटा चमचा हळद व हिंग.
कृती : प्रथम गॅसवर एका कढईत उडदाची डाळ,चणा डाळ ,धने व जिरे स्वतंत्रपणे खरपूस भानून घ्या,थोड्या तेलावर सुक्या लाल मिरच्याही भाजून घ्या व हे सर्व भाजकलेले पदार्थ हळद,हिंग व मीठ घालून मिक्सरमधून बारीक दळून घेऊन थंड झाल्यावर चालून घ्यावे व एका घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत अथवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आवडत्या दहात सेव करून ठेवलीये.. सवड मिळाली की करीन ..

तुमच्या रेसिपीज , लहानपणी आई , आजी ने केलेल्या पदार्थांशी खूपच मिळत्या जुळत्या आहेत..

अगदी वाचतानासुद्धा चव आपसूकच येते जिभेवर.. Happy

आता हे डब्यात भरलेले पीठ खायचे कसे?
पाकॄ अर्धवटच आलीय. >>> यामध्ये कांदा , कोथिंबिर. तिखट , मिठ , पाणी घालुन घट्ट पिठ भिजवायचे ....झाले तयार ..भाकरि , चपाति,, खिचडी बरोबर मस्त लागते..

सृष्टीसाठी : येथे फक्त हे डांगराचे पीठ / भाजणी काशी करतात एव्हढेच दिले आहे. हे पीठ / भाजणी वर्षभरही छान टिकते व ऐनवेळी झटपट तोंडीलावणे म्हणून केवळ १५ मिनिटात बनवता येते. डांगराचे पिठाचे/भाजणीचे तोंडीलावणे कसे करावे ह्याची सचित्र पाक-कृतीसुद्धा मी आजच स्वतंत्रपणे नवीन धाग्यावर दिलेली आहे ती पहावी.

तुमच्या रेसिपीज , लहानपणी आई , आजी ने केलेल्या पदार्थांशी खूपच मिळत्या जुळत्या आहेत.. अगदी अगदी....
मला अजुन एक लिहावस वाटतय.. तांबे काकु कीत्ती लकी आहेत..:) Happy :

माझ्या पत्नीला नाही ना तसे वाटत !
एक मात्र कबुल करावेच लागेल की मला माझ्या पाक-कृती सह प्रत्येक छंदात (वेडेपणाचा असला तरी) आयुष्यभर तिने मोलाचे सहकार्य दिले आहे व त्याबद्दल मी तिचा सदैव ऋणी आहे.

एक मात्र कबुल करावेच लागेल की मला माझ्या पाक-कृती सह प्रत्येक छंदात (वेडेपणाचा असला तरी) आयुष्यभर तिने मोलाचे सहकार्य दिले आहे व त्याबद्दल मी तिचा सदैव ऋणी आहे. .... व्वा क्या बात है!