हे हिंदु-नृसिंहा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.

सावरकरांच्या शाळेत लोकमान्य टिळक एकदा पाहूने म्हणून आले. लहानग्या तात्याने त्या दिवशी हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा हे गीत सादर केले. लोकमान्यांनी त्यांना जवळ बोलावले व विचारले, 'बाळ आता खर सांग हे विरगीत कोणी लिहील'? सावरकर उतरले. मी लिहीले. त्यांना खरे वाटले नाही. अवघ्या ११-१२ वर्षाचा किशोर हे गाणें कसे लिहू शकेल ह्यावर त्यांचा विश्वास बसला नाही.

सावरकरांनी वयाच्या आठव्या वर्षी पासून काव्य रचायला सुरुवात केली. १० व्या वर्षीपासूनच ती काव्य, "जगद्वितेच्छू" ह्या पूण्यातून प्रसिद्ध होणार्या पत्रात ती प्रसिध्द होऊ लागली. प्रसिध्द करनार्‍याला त्यावेळी सावरकरांचे वय माहीत न्हवते.

दरवेळी ही व त्यांचा अनेक अश्या रचना ऐकून मी व्याकूळ होतो. डोळ्यात पाणि जमा होऊन पुढील चित्र धूसर व्हायला लागतं. हे गाणं पहिले कधी ऐकले ते माहीत नाही, पण ती व्याकूळता दर वेळी येते. एक वेगळीच लहर सर्वांगातून उठते.

आत्ता हे सुचायच काय कारण? तर मराठी सारेगमपा चे ऐपीसोड यू ट्यूब वर पाहताना, त्या छोट्या गायकांनी हेच गीत सादर केलेले पाहील आणी मूठी वळल्या गेल्या. डोक्यात जो विचार आला तो मांडला. विचार करून लिहीले नाही. सावरकर माझी दुखती रग आहे. ह्या माणसाला भारताने कायम उपेक्षीत ठेवले. त्या बद्दल पुढे कधी तरी लिहेन. पण तो पर्यंत ....

[video:http://www.youtube.com/watch?v=E5ZjVJ004Ak]

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

प्रकार: 

सावरकर यांना कायम उपेक्षित ठेवले.... अगदी केदार.

येथील लायब्ररीत त्यांच्यावर हिंदीत भाग १ ते १० अशी जाडजूड पुस्तकांची एक सिरीज मी इतक्यातच बघितली.
की ती मूळ मराठीत असलेल्या सीरीजची भाषांतरीत आव्रुत्ती आहे? माहिती आहे का कोणाला?

हे गीत सावरकरांनी १२ व्या वर्षी लिहिलंय हे माहित नव्हतं....

मुलांनी छान म्हटलंय गाणं... लता मंगेशकरने सुद्धा ओरिजिनल गाणं अतिशय सुरेख म्हटलंय....

केदार, हे पाहिलेच नव्हते..

>>ह्या माणसाला भारताने कायम उपेक्षीत ठेवले.
काँग्रेसने म्हण..

भाग्या, त्या सिरीजचे नाव सांगशिल का?

सांतिनो, त्यांनी ते सहा ते सात वर्षाचे असताना संस्कृत मध्ये 'महाकाव्य' लिहिन्याचा प्रण केला होता. त्यांचे लहानपण जर वाचले तर तो माणूस काय ताकदीचा होता ह्याची नव्याने जाण होईल. शिवाजी महराजांनी ज्या वयात शपथ घेतली त्याचाही आधी त्यांनी 'अभिनव भारत' चे मूळ रुजवले होते.

एकदा त्यांचा वडिलांनी त्यांना अशी विरगीते लिहीताना पकडले व त्यांना चिंता वाटली, ते म्हणाले थोडा मोठा झाल्यावर लिही. तर हा पठ्या फक्त मध्यरात्री नंतर उठायचा व अशी विरगीते लिहायचा. ते पाठ करुन सकाळी वहित देखील उतरवून काढायचा.
त्यांचा लहानपणीचे एक दोन कार्य इथे लिहीले तर इथले धर्मनिरपेक्षवादी चिडतील. Happy

स्वा. सावरकर खरच ग्रेट होते, त्यांच्या प्रेरणेनेच पारतंत्र भारतात क्रांतीकारी संघटणा उभ्या राहील्या. नेताजी सुभाषचंद्र बोस देखील स्व.सावरकरांना आदर्श मानीत.

************
आपला अमर..... Happy

अरे केदार तरी पण ते दोन कार्ये होती तरी कोण्ती ते सांग ना. वाचू तरी देत आम्हाला काय ते

अमोल टाकतो सावकाश इथे. सध्या वेळ बरोबर नाही. Happy

स्वा. सावरकर खरच ग्रेट होते, त्यांच्या प्रेरणेनेच पारतंत्र भारतात क्रांतीकारी संघटणा उभ्या राहील्या. नेताजी सुभाषचंद्र बोस देखील स्व.सावरकरांना आदर्श मानीत.>>>> काय सांगता नेताजींवरच्या कोणत्याही पुस्तकात याचा उल्लेख कसा काय नाही?

मंदार,
सावरकर-नेताजी भेट २२ जून १९४० ला झालेली आहे. ही तारीख देन्याचे कारण म्हणजे तेंव्हा नेताजी ब्लॅक होल मूव्हमेंट मध्ये काम करत होते. नेताजी सावरकरांना भेटायला आले होते. त्यांचात जे बोलने झाले ते इतके गुप्त होते की त्यांचात ज्या मध्यस्थाने भेट घडवून आणली त्यालाही तिथे उपस्तिथ राहन्याची परवानगी न्हवती. त्या सखोल चर्चेत सावरकरांनी नेताजींना वेगळी सेना देशाबाहेर राहून उभी करा असे सांगीतले असे मानले जाते. चर्चाच गूप्त असल्यामूळे काय झाले हे कोणालाही माहीत नाही, त्या चर्चेत कूठलेही कागद नसल्यामूळे त्याचा पुरावा नाही. पण ही भेट झाल्याचा पुरावा आहे.
नेताजीं तेंव्हा अटकेत न्हवते तर आधी लिहील्या प्रमाने ब्लॅक होल वर काम करत होते. त्यांना पुढे अटक झाली तो दिवस म्हणजे २ जूलै व ते वेश बदलून निघून गेले हे तर सर्वज्ञात आहे. त्यांच्या भेटी नंतर सहा महिन्यांनी १९ जाने १९४१ रोजी नेताजी देशाबाहेर गेले.

आता दुसरी बाजू बघीतलीस तर असे दिसेल की जर नेताजींनी देशाबाहेर जाऊन सैन्य उभे करायचे असते तर ते ब्लॅक होल चळवळीत गूंतून पडले असते का? अटक होऊन पळून जायची संधी शोधून आपण काही वेगळे केले असे त्यांना दाखवायचे होते का? तर उत्तर नाही असे येते.

त्या अटकेच्या काळात असे करन्याचा विचार बळावला गेल्याची शक्यता आहे. कारण तो विचार स्फोटक होता व अटकेत असल्यामूळे सैन्य उभारनीवर सखोल विचार करने शक्य झाले असेल. ह्यात एकच दुवा राहतो तो म्हणजे आगा खान व मिंया अकबर शाह ह्यांनी नेताजीला मदत केली त्याची सुरुवात कशी झाली? शिशीर बोसने अटकेच्या काळात नेताजींना मदत केली. तर निघून जायचे ठरल्यावर देशाबाहेरच व जर्मनी किंवा रशिया मध्येच जाणे भाग होते कारण ते ब्रिटींशाचे दुश्मन होते. मग साहजिकच मुस्लीम देश अफगाण जिथे देखील ब्रिटीश होते त्यांचे सहाय्य घेऊन रशियात पाय ठेवने. ज्यासाठी कदाचित शिशीर ने आगा खान ह्यांच्याशी संपर्क साधला.
सावरकरांनी तो विचार सांगीतला असेल किंवा नसेल, पण त्या बाबतीत चर्चा झाली हे सावरकरांच्या नंतरच्या लिखानात दिसते.
आधी लिहील्याप्रमाने चर्चाच गूप्त असल्यामूळे ह्या वर दोन्ही बाजूंनी वाद होऊ शकतो.

अमोल टाकतो सावकाश इथे. सध्या वेळ बरोबर नाही. खरतर हीच वेळ आहे केदार... तू बिनधास्त टाक...
अभी नही तो कभी नही...

सावरकर यांना कायम उपेक्षित ठेवले.... >> अगदी १००% खरं.
सावरकर म्हणाले होते तशी जर भारताची राज्यघटना झाली असती , भारत-पाक फाळणी झाली नसती तर आजचे हे अराजक कदाचित पाहावे लागले नसते. गांधी अन नेहरूंपेक्षा नेताजी अन सावरकरांना जर ते अधिकार मिळाले असते तर आज भारताचे चित्रच काही वेगळे झाले असते. असो. दुखरी जखम पुन्हा भळभळली.
केदार , तुम्ही सावरकरांचे लहानपण कोणत्या पुस्तकात वाचले सांगाल काय?

---------------------------------------------------------------------------
The only thing you take with you when you're gone is what you leave behind.

वा, शीर्षक वाचताच कायेवर रोमांच उमटले. काय महान आणि वीररसपूर्ण गाणे आहे!
धन्यवाद केदार आठवण जागी केल्याबद्दल.

केदार मला असे म्हणायचे होते की नेताजी सावरकरांना आदर्श मानत नसावेत. नेताजींची विचारसरणी सावरकरांपेक्षा भिन्न होती. असो हे विषयांतर होते आहे.

केदार, थोडेसे विषयांतर-

"हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा"

ही मूळ ओळ "हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा" अशी आहे. या गाण्याच्या ध्वनीमुद्रणाच्यावेळी लता मंगेशकरांकडून तो शब्द 'दीप्तितम' असा उच्चारला गेला, आणि ते तसेच प्रचलित झाले. हे हृदयनाथ मंगेशकरांनी एका रंगमंचीय कार्यक्रमात 'लाजून हासणे अन् हासून हे पहाणे' या गाण्यात "ला----जून" असे तोडून का गायले आहे? या प्रश्नाच्या स्पष्टीकरणात सांगितले होते.

काल इंटरनेटवर भटकता भटकता अविनाश धर्माधिकारी यांचे सावरकरांवरचे भाषण सापडले, त्याचा दुवा येथे देत आहे.

भाग १-

http://www.esnips.com/doc/cf0d7370-01a6-44f1-8e3a-dc68773d60e3/Veer-Sava...

भाग २-

http://www.esnips.com/doc/934747e6-db42-4263-b1a5-015005bf7f3f/Veer-Sava...

आणि 'हे हिंदू नृसिंहा' या वरील कवितेत अजून एक कडवं आहे. ते असं आहे...

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

सांतिनो धन्यवाद.
मंदार, वर सांतिनोने जी लिंक दिली आहे त्यात नेताजीला कुठून प्रेरणा मिळाली हे नेताजींनीच अंदमान जिंकल्यावर सांगीतले आहे. (पहिली लिंक). मी न सांगता धर्माधिकारी सांगत आहेत म्हणून नक्कीच काही तथ्य असेल. Happy

केदार,

चांगली माहिती.

सावरकरांच्या वाणीत चित्याचे चापल्य होते असे म्हणतात. त्यांचे भाषण कुठे ऐकायला मिळेल?

-झक्कास.

मला हे कुठे टाकावे हे कळले नाही. शिवाजी महाराजांविषयी आहे म्हणून मग इथे टाकतो आहे.

काल इ-मेल मधून मला हे आल्यामुळे ऐकायला मिळाले.

शिवाजी महाराजांवर हिंदीतून काव्य लिहिणार्‍या कविराज भूषणावर इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी दिलेले व्याख्यान आहे. अगदी ऐकण्यासारखे आहे. त्यात भूषणाची थोडीफार माहिती, काही आख्यायिका, त्याने शिवभूषण आणि शिवबावनी या लिखाणांमधून शिवाजी राजांचे केलेले वर्णन, काही निवडक छंद आणि त्यांचे अर्थ असे सगळे आहे.

भाग १:

http://www.esnips.com/doc/c060b5e5-27b2-4a8c-874d-559f92eb3059/%E0%A4%95...

भाग 2:

http://www.esnips.com/doc/96598bd6-c886-47ed-bc2f-d0e16d5205ec/%E0%A4%95...

भाग ३:

http://www.esnips.com/doc/5352b654-40f0-42f6-b0f0-ccc9d6977f99/%E0%A4%95...

तसेच निनाद बेडेकरांनीच दिलेले शिवाजी महाराजांवरचे 'स्वधर्म' हे व्याख्यानही ऐकायला मिळाले.

स्वधर्म भाग १:

http://www.esnips.com/doc/904cc625-f313-4525-a065-9273bec8f87c/%E0%A4%B8...

स्वधर्म भाग २:

http://www.esnips.com/doc/6ae9769d-30f5-4474-b0bf-09d7ab968ffe/%E0%A4%B8...

वरील सर्व ध्वनिफिती डाउनलोड करायलाही तिथे उपलब्ध आहेत.

>>केदार , तुम्ही सावरकरांचे लहानपण कोणत्या पुस्तकात वाचले सांगाल काय?>>
आशुडी,
ह्या विषयावरचं मला माहीत असलेलं रवीन्द्र भटांच "सागरा प्राण तळमळला" हे पुस्तक खुप छान आहे.

आपण प्रेरणा घेण्यासाठी बघावे अशी २ व्यक्तिमत्वे... तात्याराव आणि थेट शिवराय... Happy

वा... इकडे बऱ्याच ध्वनिफिती मिळाल्या... Happy उत्तम माहिती केदार..