हुंदका उरातच गोठवायचा आहे

Submitted by वैवकु on 14 April, 2014 - 13:25

हुंदका उरातच गोठवायचा आहे
हा त्रास मला कोळून प्यायचा आहे

चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे

कोरंट तरी आपली फुलुन येते का
अन् तुला नवा फुलबाग घ्यायचा आहे

"नागरीक"चा एवढा अर्थ आहे की
हा देश मलाही वाचवायचा आहे

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे

लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला 'पाळणा' गायचा आहे

___________________________________________________________

दि. ३०-३-२०१४ रोजी पनवेल येथील मुशायर्‍यात सादर केलेल्या गझलेत दोन शेर वाढवून एक वगळून ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे

लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला 'पाळणा' गायचा आहे <<< वा वा

झोका, पाळणा खूप आवडले.
कोरांटीचे फूल असा शब्दप्रयोग माहित होता, कोरंटही म्हणतात हे नव्याने कळले.

कोरंट तरी आपली फुलुन येते का
अन् तुला नवा फुलबाग घ्यायचा आहे <<कोरंट हा शब्दच माहित नव्हता .त्यामुळे शेर कळला नाही .

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे

लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला 'पाळणा' गायचा आहे

आवडलेच . Happy

अरविंदजी , आबा , खुरसाले खूप खूप धन्स

खुरसाले ...कोरंट (अपभ्रंश ) म्हणजे कोरांटीचे फूल /त्याची वेल
मला स्मरते आहे की ह्या वेलीला आय मीन झुडपाला कोवळे पण तीक्ष्ण काटेही असतात