ब्रेडची भजी

Submitted by प्रमोद् ताम्बे on 12 April, 2014 - 23:58

ब्रेडची भजी

 भजी xxx.jpg

साहित्य : एक मध्यम स्लाइस ब्रेड , दोन वाट्या बेसन पीठ , दोन टे.स्पून तांदळाचे पीठ,दीड वाटी झणझणीत तिखट अशी बटाट्याची स्मॅश केलेली भाजी(भाजी तळल्यावर तिखटपणा कमी होतो) , चवीनुसार मीठ, मीठ, हिंग,हळद ,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर ,तळणीसाठी कढई व तेल.

कृती : प्रथम एका बाउलमध्ये बेसन व तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, हळद, हिंग ,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. त्यात जरुरीप्रमाणे थोडे थोडे पाणी घालावे. मात्र भज्यासाठी असावे तसे पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे व तेल चांगले कडकडीत तापल्यावरच त्यात ब्रेडच्या कडा काढून टाकून त्रिकोणी अगर चौकोनी तुकडे कापून घेऊन एका तुकड्यावर स्मॅश केलेली बटाट्याची भाजी लावावी व त्याचेवर दूसरा तुकडा ठेऊन भिजवलेल्या पिठामध्ये बुडवून घेऊन भज्यासारखे तळून घ्यावे. ही पावाची भजी हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस सोबत खाण्यास द्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users