फैसला

Submitted by dr.sunil_ahirrao on 12 April, 2014 - 01:24

जीवनाचा हाच साला घोर आहे
येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे

भामटा असणार हा नक्कीच नेता
ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे

खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता
हे कुणाचे माजलेले पोर आहे

मांडतो प्रस्ताव आता एकतेचा
कालचा तो हाच दंगेखोर आहे

मी निघालो आणि तू आलीस राणी
फैसला हा छान काटेकोर आहे

डॉ.सुनील अहिरराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता
हे कुणाचे माजलेले पोर आहे

वा. गझलेत तक्रार एके तक्रार असू नये, असे वाटते.

मी निघालो आणि तू आलीस राणी
फैसला हा छान काटेकोर आहे

खास...आवडल्या ओळी.

-दिलीप बिरुटे

मी निघालो आणि तू आलीस राणी<<<ही एक ओळ आवडली

जोर आहे आणि दंगेखोर आहे वरून हे आठवले ....अब की बार मोदी सरकार Happy