Submitted by dr.sunil_ahirrao on 12 April, 2014 - 01:24
जीवनाचा हाच साला घोर आहे
येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे
भामटा असणार हा नक्कीच नेता
ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे
खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता
हे कुणाचे माजलेले पोर आहे
मांडतो प्रस्ताव आता एकतेचा
कालचा तो हाच दंगेखोर आहे
मी निघालो आणि तू आलीस राणी
फैसला हा छान काटेकोर आहे
डॉ.सुनील अहिरराव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खेळतो पैसा भल्यामोठ्यांत
खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता
हे कुणाचे माजलेले पोर आहे
वा. गझलेत तक्रार एके तक्रार असू नये, असे वाटते.
>> मी निघालो आणि तू आलीस
>>
मी निघालो आणि तू आलीस राणी
फैसला हा छान काटेकोर आहे
>> हा सर्वांत जास्त आवडला
समीर चव्हाण, जयदीप धन्यवाद .
समीर चव्हाण, जयदीप धन्यवाद .
समीर चव्हाण,तुमचे म्हणणे
समीर चव्हाण,तुमचे म्हणणे बरोबर आहे. यापुढे शक्यतो तक्रार करणार नाही.
मी निघालो आणि तू आलीस
मी निघालो आणि तू आलीस राणी
फैसला हा छान काटेकोर आहे
खास...आवडल्या ओळी.
-दिलीप बिरुटे
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे,
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे, धन्यवाद सर.
मी निघालो आणि तू आलीस
मी निघालो आणि तू आलीस राणी<<<ही एक ओळ आवडली
जोर आहे आणि दंगेखोर आहे वरून हे आठवले ....अब की बार मोदी सरकार
वैवकु खूप खूप आभार
वैवकु खूप खूप आभार