२०१४ वर्ष सुरू झाले तेंव्हा कोणालाही वाटले वाटले नसेल की पहिल्या १४ दिवसात, अमेरिकेतील शाळांमध्ये ७ वेळेसे शुटिंग होईल ! आयमिन ७ आणि ते पण जानेवारी २०१४ पर्यंत. ( मागिल वर्षाला कम्पेअर करायचे असेल तर पूर्ण २०१३ मध्ये एकुण २६ शुटिंग झाल्या.)
काल आणखी एक घटना घडली ज्यात एका टिनएजरने २१ जनांना स्टॅब केले !
बरं हे एका स्टेट पुरतंच मर्यादित आहे असंही नाही. खालील मॅप बघा. जिथे जिथे रेड आहे, तिथे दोन किंवा अधिक लोकं मेली आणि जिथे यलो,तिथे निदान एक किंवा कोणीही नाही.
शाळेतील निरपराध मुलं, जे शाळेत शिकायला जाताते, ते मृत्यूमुखी पडतात. नेमकं कसं पचवणार हे?
बरं हा मॅप फक्त शाळांपुरताच आहे, मॉल शुटिंग्स, होम / रोड शुटिंग्स हे सर्व ह्यात नाही. तो डेटा एकत्र केला तर हे चित्र भयानक दिसेल.
अमेरिकित सध्या शाळा / कॉलेज मधून मास शुटिंग / मास किलिंग च्या घटना खूप वाढत आहेत. इतक्या की त्या वाचल्यावर, पुढे नक्की काय होणार? हे सर्व कधी थांबणार देखील आहे की नाही? आणि मुख्य म्हणजे शाळा / कॉलेज मधील मुलं इतकी हिंसक का होत आहेत ह्यावर कोणालाही उत्तर सापडत नाही.
तुम्हाला काय वाटतं?
गन लॉ किती दिवस रेंगाळत ठेवणार. लोकं म्हणतात की वेपन डजन्ट किल पिपल, पिपल किल पिपल. पण माझ्यामते हे आर्ग्युमेंट योग्य नाही.
की प्रगत देशाचे वेगळे मानसिक प्रश्न ह्या सदराखाली हे सर्व येणार?
प्रत्येकवेळी थरकाप उडतो ह्या
प्रत्येकवेळी थरकाप उडतो ह्या घटना आठवल्या की. अस वाटतं खुप बोलायचय ह्यावर पण ते नुसतेच बोलणे होईल पण उपयोग काही होणार असे काहीसे वाटून हताश व्हायला होतं.
सध्यातरी बंदुका उठताबसता कोणालाही विकु नये हा कायदा आला तर निदान थोडेतरी बंदुक विकत घेणारे (कदाचित) कमी होतील. पण शेवटी तेच... नुसतेच आपण बोलत रहातो, कायदा टेबलावर वाट पहात पडुन रहातो. गोगावाचे, मैत्रेयी ह्यंचा प्रतिसाद पटला.
कुंटुंबसंस्था यावर लक्ष देण
कुंटुंबसंस्था यावर लक्ष देण गरजेचं आहे...भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल...पण हे लॉग-टर्म सोल्यूशन आहे....
बिधडलेली सामाजीक घडी आणि मानसिकता हे मूख्या कारणं आहे अस मला वाटंत... गन फक्त निमित्त, पण गेल्या काही वर्षात गोळीबार बघतान असं वाटतं की गन-लॉ वर नियंत्रण हवं.
पुर्वी अमेरीकेतील गून्हेगारीमूळे बंदूक बाळगायची गरज वाटत असावी. न्यू-यॉर्क, शिकागो ई. शहरात मोकाट सूटलेला माफिया यामूळे असेल कदाचीत... पण आता चित्र बदलय.
१. सध्यातरी ज्यांच्या कडे बंदूक आहेत त्यांना एक ट्रेनिंग देण्यात याव, गन कूठे ठेवावी, कशी बाळगावी ई. आणि त्याचं पर्मिट देण्यात यावं. आणि हे पर्मिट वर्ष भरानी परत रिन्यू करायचं.
२. गन घेणार्या कूटूंबाची पण मानसीक चाचणी करायला हवी आणि त्यांना पण ट्रेनिंग.
३. गनच्या किमती वाढवाव्यात, जेणेकरुन काहीजण तरी दूसरा विचार करतील.
४. Ban high capacity magazines/Guns.
५. मैत्रेयीने सांगीतल्या प्रमाणे मूलांना हिसंक खेळ/गोष्टी यापासून दूर ठेवाव. बर्याच पालकांना देखिल माहित नसतं त्यांची मूल एखादा हिंसक गेम खेळत आहेत आणि त्याच्यावर काय परिणाम होत आहेत ते.. हिंसक गेमवर/चित्रपटांवर सरकारने कंट्रेल आणावा किंवा त्याचे द्रुषःपरिणाम सांगावेत (Like warnings) जेणेकरुन त्यांचे पालाकांना पूर्व कल्पना येईल.
६.शाळेत मूलांची मानसीकता जाणून घेण्याकरता काही प्रयोजन असावं(Emotional Abuse Test/Emotional Violence Test) यानी माथेफिरु मूलांच निदान करता येऊ शकतं आणि वेळीच उपाय पण.
चमन, चांगली पोस्ट.
चमन, चांगली पोस्ट.
६.शाळेत मूलांची मानसीकता
६.शाळेत मूलांची मानसीकता जाणून घेण्याकरता काही प्रयोजन असावं(Emotional Abuse Test/Emotional Violence Test) यानी माथेफिरु मूलांच निदान करता येऊ शकतं आणि वेळीच उपाय पण. >>> अशक्य गोष्टं.
जी भयंकर गोष्टं/गुन्हा एखाद्याने केलाच नाहीये (मग तो तुमची ती टेस्ट १००० का वेळा फेल होईना) आणि केवळ तो/ती असा गुन्हा करू शकतो ह्या हायपोथेसीस वर त्याच्यावर ऊपाय/ऊपचार करणे? हा पर्याय अंमलात आणायला चालू केला तर सेन लोकंही रस्त्यावर बंदुका घेऊन ऊतरतील.
चमन, मानसिक अवस्थेवर उपचार
चमन, मानसिक अवस्थेवर उपचार व्हायलाच हवेत की - गुन्हा करेल की नाही याच्या रिगार्डलेस.
ज्या मूलांची टेस्ट पॉझीटीव्ह
ज्या मूलांची टेस्ट पॉझीटीव्ह येइल याचा अर्थ त्याला उपचाराची गरज असेलचं ना... आणि अश्या मूलांच्या हातात गन लागणार नाही याची काळजी घेता येइलच की.
हे सगळे प्री-कॉशन्स आहेत.
हो स्वाती! पण अगदी जेन्यूईन
हो स्वाती! पण अगदी जेन्यूईन केसमध्ये सुद्धा तू आईवडिलांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास कुठले आईवडील वरवर पूर्ण नॉर्मल दिसणार्या मुलासाठी केवळ 'शक्यता आहे' म्हणून असे ऊपचार अॅक्सेप्ट करतील. आणि एकदा का ह्या ट्रीटमेंटचा शिक्का बसला की, समाज अश्या मुलांना कोणत्या नजरेतून बघणार?
ज्या मूलांची टेस्ट पॉझीटीव्ह येइल याचा अर्थ त्याला उपचाराची गरज असेलचं ना... आणि अश्या मूलांच्या हातात गन लागणार नाही याची काळजी घेता येइलच की. >> तन्मय पॉझिटिव वा निगेटिव कुठल्याच मुलाच्या हातात गन लागायला का हवीये?
बुद्ध्यांक १६०+ किंवा ६०- १२ वर्षाच्या मुलाच्या हातात गाडीच्या चाव्या आल्या तर काय होईल तुम्ही कसं सांगू शकाल?
>> वरवर पूर्ण नॉर्मल
>> वरवर पूर्ण नॉर्मल दिसणार्या मुलासाठी
अरे असं सरसकट नव्हे.
उदा. घरी मेन्टल इलनेसची हिस्टरी, ब्रोकन फॅमिली, एरवीचं वागणं/बोलणं/मिसळणं यातून पॉइन्टर्स मिळतातच ना, फक्त सजग लक्ष हवं.
आणि उपचार म्हणजे काउन्सिलिंग / ग्रूप थेरपी / बिहेवियरल असेही (प्रिवेन्टिव्ह) असतात ना? लगेच गोळ्या खायला घाला असं नव्हे.
मूळात सामान्य नागरिकाना
मूळात सामान्य नागरिकाना बंदुका बाळगायची गरजच काय? नागरिकाना स्व्-संरक्षणासाठी बंदुका बाळगायला लागणे हे सरकार्-न्यायसंस्था-पोलिस यांचे अपयश नव्हे काय?
६. मुलांची मानसिकता
६. मुलांची मानसिकता जाणण्यासाठी केलेल्या प्रयोगातून एम्पथी लेवल गेल्याकाही वर्षांत झपाट्याने खालावल्येय असं दिसलय.
A thirty year study of 14,000 college students, published by the University of Michigan in 2010, found that overall empathy levels in students had dropped by 40% since the 1980s. The biggest drop came after the year 2000, which was attributed to a combination of greater media immersion and personal isolation.
http://www.livescience.com/9918-today-college-students-lack-empathy.html
साधे सरळ उपाय आहेत - बॅन गन्स
साधे सरळ उपाय आहेत -
बॅन गन्स टू कॉमन पिपल. पिरेड! असॉल्ट असो वा नसो !
अत्यंत कठोर शिक्षा द्या गन सापडली की! #$@$@%$ सगळे चोर आपापल्या पळवाटा शोधताहेत!
सुलू, तुम्ही अमेरिकेत आहात
सुलू, तुम्ही अमेरिकेत आहात का? सँडी हूकनंतर पिअर्स मॉर्गन पहात नव्हतात का? ज्यांची मुलं गन वायलंसला बळी पडली आहेत असे आई वडीलही गनच्या विरोधात नाहीत हे बघितल्यावर मला काही कळेचना.
स्वाती मला तुझा मुद्दा कळाला,
स्वाती मला तुझा मुद्दा कळाला, पण "घरी मेन्टल इलनेसची हिस्टरी, ब्रोकन फॅमिली, एरवीचं वागणं/बोलणं/मिसळणं" ह्यावरून एखाद्या वेगळं वागण्याराला बाजूला काढून वेगळं ट्रीट करणं (गोळ्या, प्रोसीजर नव्हे पण नुसतं काउन्सिलिंग / ग्रूप थेरपी / बिहेवियरल अॅनालिसिस सुद्धा) हे केवळ गृहीतकांच्या आधारावर कसं ठरवणार? कायद्यात तरी कसं बसवणार. फार तर तुम्ही पालकांना एंगेज करू शकता आणि करतातच म्हणा पण पालकांच्या परवानगीशिवाय एखाद्या पाल्याला अश्या काऊन्सिलिंगला कसं तयार करणार? आणि पालक कशी परवानगी देतील?
शाळेत मारामारी करणारा मुलगा आणि ईतरांना बुली करणारा, कायम शांत राहणार्या मुलापेक्षा घातक म्हणायला हवा की नाही. मग दुसर्या मुलांने मला मी शांत राहतो, कमी बोलतो म्हणून मला बुली केलं आणि मी झोंबाझोंबी केली किंवा राग व्यक्त केला तर माझी रवानगी काउन्सिलिंग / ग्रूप थेरपी मध्ये.
सुलू शांत व्हा.
मूळात सामान्य नागरिकाना बंदुका बाळगायची गरजच काय? नागरिकाना स्व्-संरक्षणासाठी बंदुका बाळगायला लागणे हे सरकार्-न्यायसंस्था-पोलिस यांचे अपयश नव्हे काय? > काय लॉजिक आहे ह्या मागे?
तुमचा राग समजू शकतो पण सगळे अमेरिकन्स एडिसन, सॅन होजे किंवा प्लानोमध्ये रहात नाहीत हे तुम्हाला माहित असेलच. ईथे मला-तुम्हाला अनसेफ वाटतील अशी हजारो शहरं आहेत. अतिदुर्गम भाग आहेत. पोलिस बळ तुलनेने खूप कमकुवत आहे, सरकारी तिजोरितून अश्या भागांसाठी फार प्पैसा जात नाही. (हो अमेरिकेत पण हे होतं, सगळी अमेरिका सुख समृद्ध आहे असा बर्याच लोकांचा गैरसमज आहे.) आणि प्रत्येकाला पोलिस येईपर्यंत हरप्रकारे स्वसंरक्षण करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. म्हणून म्हणालो रक्तपाताशिवाय ईथला गन लॉ चेंज होणे अशक्य आहे.
चमन तुमचे विचार खूपच आवडले.
चमन तुमचे विचार खूपच आवडले.
पुराव्याअभावी घडलेला
पुराव्याअभावी घडलेला गुन्ह्यासाठीसुद्धा शिक्षा करता येत नाही ईथे तर आपण न घडलेल्या गुन्ह्याबद्दल केवळ शक्यता गृहीत धरून एखाद्या अपरिपक्व मेंदूवर ऊपचार करण्याबाबत बोलत आहोत. त्या वयात तर आई वडीलांविरुद्ध सुद्धा मुलं बंड करून ऊठतात. नकळत्या वयात मुलं बोलतात काहितरी, करतात भलतसलतं पण म्हणून 'हे होऊ घातलेले सायकोपाथ' आहेत अश्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे बघणं हा त्यांच्यावर अन्यायच आहे ना.
ब्रोकन फॅमिली, अब्युजिव पेरेंट्स म्हणून सगळे थोडीच टेड बंडी किंवा अॅडम लान्झा होतात.
चमन, इथे साधं डे लाइट
चमन, इथे साधं डे लाइट सेव्हिंग बंद / सुरू झालं तर रेडिओवर काउन्सिलिंगबद्दल चर्चा होतात. 'वेगळं काढून' वगैरे काही नाही करावं लागत. इथे तो इतका टॅबू नाहीये. अॅडम लॅन्झाचं नाव घेतलंस - असा मुलगा घरात असताना घरात बंदुका असू नयेत हे कळणं इतकं अवघड आहे का खरंच?
चमन, तुमचे काही मुद्दे
चमन, तुमचे काही मुद्दे पटले.
<<
मूळात सामान्य नागरिकाना बंदुका बाळगायची गरजच काय? नागरिकाना स्व्-संरक्षणासाठी बंदुका बाळगायला लागणे हे सरकार्-न्यायसंस्था-पोलिस यांचे अपयश नव्हे काय? > काय लॉजिक आहे ह्या मागे?
>>
सरळ साधा प्रश्न आहे. पोलिस बळ तुलनेने खूप कमकुवत का आहे? सरकारी तिजोरीतून पैसा जात नाही म्हणून सामान्य नागरिकानी बंदुका बाळगायच्या यात काहीही लॉजिक दिसत नाही. मग पोलिस हवेतच कशाला? lets go back to wild wild west!
प्रत्येकाला पोलिस येईपर्यंत स्व-संरक्षण करू दे ना! पण बंदुकाच कशाला पाहिजेत? तुम्ही विचाराल चोराकडे बंदुका आणि आपल्याकडे चाकू हे कसे चालेल? तिथेच मूळ प्रश्न आहे. चोराकडे बंदुक येईल म्हणून आपल्याकडेही? उद्या चोरांकडे बाँब तर आपल्याकडेही? हे लॉजिक ??
आज ज्या अलेक्स ने पोराना चाकूने भोसकले, त्याने गन वापरली असती तर २० जखमी च्या ऐवजी ४० मृत ही बातमी वाचली असती सगळ्यानी!!
शांत रहाणे खरेच कठीण आहे. लहान पोरांच्या आयुष्याची माती पहावत नाही.
सुलूच्या पोस्टवरून ट्रेव्हॉन
सुलूच्या पोस्टवरून ट्रेव्हॉन मार्टिनची केसही आठवली.
आत्ता सुरू असलेल्या ऑस्कर पिस्टोरियसच्या केसबद्दलही असंच वाटलं होतं. बर्गलर आहे असं नुसतं 'वाटलं' म्हणून थेट गोळीच घातली? तुम्हीआम्ही घालू?
थोडक्यात चमन काय म्हणतोय गन
थोडक्यात चमन काय म्हणतोय गन कल्चर निर्माण करा. गुड ! मुद्दा म्ह्णून प्रतिवाद करायला खूप चांगला आहे की ! घटने पासून २०१४ पर्यंत किती शे वर्ष गेली? झाले का संस्कार? का नाही? ह्यावरही काही मुद्दे असतील तर येऊदेत.
अतिदुर्गम भाग आहेत. पोलिस बळ तुलनेने खूप कमकुवत आहे, सरकारी तिजोरितून अश्या भागांसाठी फार प्पैसा जात नाही. >>
अतिदुर्गम भाग आणि रँचेस साठी वेगळा गन कायदा करता येत नाही असं चमन सुचवू पाहत आहे का? मग करा की कायदा युटिलिटी पाहून लायसंस द्यायचा. त्या आधी ट्रेनिंग घ्यायचा.
कोणी थांबवले, पण त्यासाठी सॅन होजे मधील वॉलमार्ट मध्ये गन कशाला मिळायला हवी?
चमन - मूलांच मानसीक संतूलन
चमन - मूलांच मानसीक संतूलन जाणून घेणं गरजेचं नाही वाटतं का ?
>> न घडलेल्या गुन्ह्याबद्दल केवळ शक्यता गृहीत धरून एखाद्या अपरिपक्व मेंदूवर ऊपचार करण्याबाबत बोलत आहोत.
हे काय ?? ईथे मला असं आजीबात म्हणायचं नाहिये... जर मूलांच मानसीक संतूलन ठिक नसेल तर उपचार करावेत ईतकचं सांगायचय....यामध्ये त्या मूलाला आणि त्याच्या कूटूंबालाचं जास्त फायदा होइल. जर मूलं मानसीक रीत्या स्वस्थ असतील अश्या घटना कमी घडतील अस नाही का वाटत ?
ज्यामूलांची टेस्ट पॉझीटीव्ह येइल ती लगेच गोळीबार करणार आहेत असं तूमच मत असेल तर ते साफ चूकीच आहे....त्यांना फक्त मनसिक संतूलनाची गरज आहे ईतकच.
बूली/शांत/खोडकर यावरुन मूलांच मानसीक संतूलन सांगणे हे खूपच वरवरचं आहे. मस्ती करतो, किवा शिव्या देतो यावरुन तूम्ही मूलाचं मानसीक संतूलन नाही सांगू शकत. ते काम तज्ञांवर सोडा.
काही पालकांना त्यांची मूल भेटतचं नाहीत २-३ दिवसं ... अश्या पाल़कांना त्याच्या मूलांच मानसीक संतूलन कस आहे हे कळणारच नाही आणि बर्याचदा अश्या पालकांना हे जाणून घ्याव याची जाणिवचं नसते.
बाँबचा प्रतिसाद भावनिक वाटला
बाँबचा प्रतिसाद भावनिक वाटला म्हणून त्यावर काही लिहित नाही. पण पुन्हा सांगतो शस्त्र बाळगणे ही पिढ्यानपिढ्या बाळगलेली जशी स्वीस तशी अमेरिकन मानसिकता आहे आणि त्याला आम्ही-तुम्ही कितीही भावनिक आवाहन केले तरी ती बदलणार नाहीये. हिंसाचाराच्या ह्या घटना आजच का होत आहेत तर त्याला बदलतं वातावरण आणि सामाजिक स्थित्यंतर कारणीभूत आहेत.
जसे एखाद्या कट्टर गुन्हेगाराला त्याने शिक्षा भोगल्या नंतरसुद्धा आणि हा शंभरटक्के पुन्हा गुन्हा करणार हे माहित असूनदेखील त्याबद्दल कायद्याला धरून फार काही प्रेवेंटिव करता येत नाही. त्याला सोडून दिल्यानंतर तो जे काही करणे ते निस्तरणे फक्त एवढेच करू शकतो.
ह्या घटना अनवाँटेड कॉन्सिक्वेन्सेस आहेत आणि त्या घडून गेल्यानंतर वाट्याला येणारं दु:ख खूप मोठं असतं हेही मान्य. ह्या घटनांच समूळ ऊच्चाटन करणं अशक्य आहे पण शालेय शिक्षणात बदल घडवून त्या नक्कीच कमी करता येतील. 'टीनेज ड्रंक ड्रायविंग' अजून एक ऊदाहरण. ते थांबवणं अशक्य आहे पण शालेय शिक्षणात त्याबद्दल शिकवून अप्रिय घटना कमी करता येतील. त्यावर ऊपाय म्हणून सगळ्या टीनएजर्सचे लायसेंस काढून घेणे पर्याय नाही.
तन्मय मुलांचं मानसिक संतुलन? अहो त्यांचा मेंदू तरी पूर्ण विकसित झालेला असतो का आणि टीवी/मिडिया वरून त्यांचं किती मॅन्युपलेशन होत असतं. (स्पेशल चाईल्ड, जे शांत, अॅग्रेसिव, हरवलेले असे शकते अशांबद्दल आपण बोलत नाही आहोत हे गृहीत धरून) टेड बंडीसारखा एखादा पर्फेक्टली नॉर्मल मुलगा मनात जर स्त्रियांबद्दल काही टोकाच्या सुप्त भावना बाळगून आहे आणि पुढे जाऊन डझनावारी स्त्रिया मारणार आहे, धाकटा सर्नाएव सारखा अनेकांचा मित्र असलेला मुलगा मास किलिंग करतो, कोणी टोकाचं रेसिस्ट आहे रॅडिकलाईझ्ड केलं गेलंय पण वागण्या बोलण्याला नॉर्मल आहेत मग? हे कसं शोधणार.
पिस्टोरियस केसमध्ये काही सिद्ध होईपर्यंत, 'बर्गलर्' होता हा फक्त युक्तिवाद आहे. त्याहीपेक्षा स्ट्राँग केस तुला सांगतो. डेन्वर मध्ये एका भारतीय मुलीचा 'बर्गलर्' म्हणून गैरसमजातून तिच्या आईवडिलांच्या ऊपस्थितीत फॅमिली फ्रेंडने झाडलेली गोळी लागून मृत्यू झाला.
केदार, वेळ मिळाला की लिहितोच.
टीवी/मिडिया वरून त्यांचं किती
टीवी/मिडिया वरून त्यांचं किती मॅन्युपलेशन होत असतं >> मग हिंसक चित्रपट बघून एखाद्या मॅन्यूप्लेशन झालेल्या मूलाच्या हातात गन आली तर हेच होणार ना.
मानसीक असंतूलन कसं शोधणार >> याचं उत्तर मझ्याकडे नाही पण child psychologist कडे नक्कीच असू शकतं.
आणि मूलं emotionally healthy राहण्यासाठीचे प्रोग्राम्स सूरु करु शकतो.. काही स्कूल्स मध्ये सूरु देखिल झाले आहेत, त्याने देखिल फायदा होउ शकतो.
<< जसे एखाद्या कट्टर
<<
जसे एखाद्या कट्टर गुन्हेगाराला त्याने शिक्षा भोगल्या नंतरसुद्धा आणि हा शंभरटक्के पुन्हा गुन्हा करणार हे माहित असूनदेखील त्याबद्दल कायद्याला धरून फार काही प्रेवेंटिव करता येत नाही. त्याला सोडून दिल्यानंतर तो जे काही करणे ते निस्तरणे फक्त एवढेच करू शकतो.
>>
पटले नाही. एखाद्याने खून केला असेल तर कायद्याने फाशी/मरेपर्यंतची जन्मठेप आहे. शिक्षाच अशी पाहिजे की आपोआप 'प्रिवेंशन' होईल.
<<
'टीनेज ड्रंक ड्रायविंग' अजून एक ऊदाहरण. ते थांबवणं अशक्य आहे पण शालेय शिक्षणात त्याबद्दल शिकवून अप्रिय घटना कमी करता येतील. त्यावर ऊपाय म्हणून सगळ्या टीनएजर्सचे लायसेंस काढून घेणे पर्याय नाही.
>>
हेही पटले नाही. प्रॉब्लेम लायसंस नसून 'ड्रंक' असणे आहे म्हणून त्यासाठी कायदा आहे. आणि शिक्षा म्हणून लायसंसच काढून घेतला जातो. ड्रंक द्रायविंग ने जीव गेला तर फक्त लायसंसच नाही तर फाशी किंवा मोठा तुरुंगवास.
.. अवांतर होते आहे!
तन्मय हो मुलांच्या हातात गन
तन्मय
हो मुलांच्या हातात गन आली तर नकळत अपघात आणि हिंसा घडून येणार. चाकू, लायटर, गाडीच्या चाव्या, ड्र्ग्ज, दारू आणि अजून अश्या बर्याच कितीतरी गोष्टी. ज्या त्यांच्या हाती लागू नये ही काळजी घेणं सगळ्या अॅडल्ट्सचं काम आहेच ह्या बद्दल काही दुमत नाहीये.
child psychologist कडे नक्कीच असू शकतं. >> कुठला सायकोलॉजिस्ट भविष्यात हा/ही मुलगा/मुलगी सायकोपाथ बनेल किंवा बनणार नाही असे सर्टीफाय करेल? (पुन्हा तोच प्रश्न) काहीही फिजिकल एविडन्स नसतांना फक्त हा टीनेजर असा वेगळा विचार करतो/वागतो म्हणून त्याच्यावर ऊपचार करा असे एखाद्या अमेरिकन (किंवा जगातल्या कुठल्याही पालकाला) सांगून बघा. काही प्रमाणात वागण्याचं विश्लेषण करता येईल, डीप्रेसंट, अॅग्झाईटी, लॅक ऑफ फोकस असे कॉमन परिणाम ट्रीटही करता येतील पण त्याला मर्यादा आहेत. काही ट्र्बल्ड मुलांना नक्कीच मदत होऊ शकेल पण ईनमेकिंग सायकोपाथ प्रेडीक्ट आणि प्रेवेंट करणे केवळ अशक्य!!
केदार >> आधी कल्चर निर्माण झाले नाही म्हणून आजपासून प्रयत्न करू नये असे थोडीच आहे? येणार्या पिढीला प्रशिक्षण देऊन जबाबदार, सहृदयी आणि मानसिक दृष्ट्या खंबीर बनवू शकतोच की.
रँचेससाठी वेगळा कायदा असं कसं? मग हार्लेमसाठी, नुवर्कसाठी काय असावं? आणि बॉस्टन शिकागोसाठी? बरबँक चा ईतिहास माहित आहे ना?
सुलू
सगळ्या खुन्यांना फाशी होत नाही. शेकडो रेपिस्ट सुटल्यानंतर पुन्हा रेप करतात.
शिक्षाच अशी पाहिजे की आपोआप 'प्रिवेंशन' होईल. >> म्हणजे रेप केला की कॅस्ट्रेशन असे?
प्रॉब्लेम लायसंस नसून 'ड्रंक' असणे आहे >> प्रॉब्लेम ड्रंक असणे नसून, जबाबदारीच्या जणिवेचा अभाव आहे. जी वाढण्यासाठी शिक्षण जरूरी आहे दारूबंदी नव्हे. दारू कारण असते तर तुम्ही ड्रायविंग एक्झाम मध्ये परमिसिएबल ब्लड अल्कोहोल लेवल ०.० लिहून पास होऊ शकला असता.
अवांतर नाहीये मूळ मुद्दा तोच आहे. ट्राफिक अॅक्सिडेंट होतात म्हणून गाड्या बॅन करत नाहीत तर नियम बनवतात आणि वाहने चालवणार्याला प्रशिक्षण देतात. दारू/ सिगरेटचे हजारो दुष्परिंणाम आहेत म्हणून ते बंद करत नाहीत तर त्याचे जबाबदारीने सेवन करायला शिकवतात. टीनेज सेक्स चा प्रश्न मोठा झाला म्हणून मुलामुलींसाठी वेगळ्या शाळा, कॉलेज, कार्यालये, बस गाड्या, विमानं तयार करत नाहीत तर त्यांना लैंगिक शिक्षण देतात. रेप होतात म्हणून पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या जवळ येण्यावर निर्बंध घालत
नाहीत तर काही प्रोटोकॉल ठरवले जातात. तसेच बंदुका आणि ईतर शस्त्रांच्या बाबतीत, त्यांच्या वापर, आणि अक्सेसिबिलिटी (मराठी सुचेना) बद्दल नियम आहेतच, ते अजून कडकही करता येतील. पण त्यांच्या खरेदीवर निर्बंध लादणं हे शक्य नाही आणि ते बरोबरही असणार नाही.
रँचेससाठी वेगळा कायदा असं
रँचेससाठी वेगळा कायदा असं कसं? मग हार्लेमसाठी, नुवर्कसाठी काय असावं? >>. तुला माझा मुद्दा समजलेला नाही.
पण त्या पोस्ट मधील
" ईतर शस्त्रांच्या बाबतीत, त्यांच्या वापर, आणि अक्सेसिबिलिटी (मराठी सुचेना) बद्दल नियम आहेतच, ते अजून कडकही करता येतील."
हे वाक्य थोडेसे समाधान देऊ जाते कारण आता तू नियम आणता येतील आणि ते कडक करता येतील असे लिहित आहेस. आणि आमच्या सारखे काही, शस्त्र हवे तर कंट्रोल्ड करा असे आधी पासूनच म्हणत आहेत. शस्त्रावरच बंदी घाला असे म्हणत नाही.
वर मी एक फॅक्ट मांडली आहे की सध्याच्या घिस्यापिट्या नियमांना बाय पास करून आज कोणीही शस्त्र मिळवू शकते. आणि इतका वेळ मी तेच म्हणतोय की जिथे गरज असेल तिथे कुणी नाही म्हणत नाही.
थोडक्यात काय गन लॉ आणा, नियम बनवा, काटेकोरपणे प्रत्येक स्टेट मध्ये ते पाळले जातात ते बघा. ( अजून एक फॅक्ट फक्त ७ राज्यात ट्रिगर कंट्रोल लॉ आहे) आणि मग परिक्षण देऊन विका.
केळी घेण्यासारखे शस्त्र घेणे आणि योग्य ते कायदे आणि नियम बनवून ते पाळून शस्त्र घेणे ह्यात मुलतः फरक आहे, हेच येथील बहुतेकांचे म्हणणे आहे. तो अमेरिकन सरकारला समजला की सर्वच नाही पण अनेक जीव वाचतील.
अमेरिकन सरकारला समजला तिथे
अमेरिकन सरकारला समजला
तिथे समजण्याचा संबंध नाही. फक्त सत्ता, पैसा, नि त्यासाठी मते!
सरकार म्हंटले म्हणजे मते आली. मते आली की श्रीमंत अशी गन लॉबी आली. गन लॉबी श्रीमंत का झाली? लोक गन विकत घेतात म्हणून.
सरकार काही करू शकत नाही. लोकांची संस्कृति हीन. ती सुधारली तरच. ती तर उलट बिघडतच चालली आहे!
आत्ताच PA स्टॅबिंगची न्यूज
आत्ताच PA स्टॅबिंगची न्यूज वाचली. तो अॅलेक्स एकदम चांगल्या फॅमिलीमधला आहे म्हणे. आजिबात ट्र्बल्ड, विअर्डो किंवा लोनर नव्हता तर ऊलट बर्यापैकी वेल लाईक्ड होता. आता तुम्हीच सांगा अश्या मुलाच्या सायकॉलॉजिकल अॅनालिसिस दरम्यान तो तुमची ती टेस्ट फेल झाला आणि सायकोलॉजिस्टनी त्याला वायलंट किंवा थ्रेट टू हिमसेल्फ ऑर सोसायटी म्हणत ट्रीटमेंट साठी रिकमेंड केले तर त्याचे पालक कसे रिअॅक्ट करतील? कुठल्या अॅगनीतून जातील?
असतीलही काही डीप रूटेड ईश्युज, सायकोलॉजिस्ट सापडूही शकतील पण फिजिकल एविडंस शिवाय काही खात्रीलायक स्टेटमेंट करणं अशक्य आहे.
केदार>> तुझ्या शस्त्रांबद्दलचे नियम कडक करण्याबद्दलच्या पोस्टला अनुमोदन. निर्बंध मात्र कोणताही गवर्नर , पार्टी किंवा प्रेसिडेंट घालू शकणार नाही आणि घालू ही नयेत. घातल्यास ते कायद्याला धरून होणार नाही, कायदा बदलल्यास तो बदलाणारे किंवा बदलू पाहणारे सरकार कोसळेल नि हे परिवर्तन शांतता भंग करणारे असेल.
रँचेसबद्दल्ल तू नक्की काय म्हणत होतास?
संपूर्ण बातमी वाचली.
संपूर्ण बातमी वाचली. 'अमेरिकेत हे असेच होणार' टाईप्स विचार मनात आलाच पण त्याच बरोबर शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षक यांनी ज्या धैर्याने आणि शांतपणे परिस्थितीशी सामना केला ते ही अमेरिकेतच घडेल. मुलांनी गजबजलेल्या कॉरिडॉरमध्ये बेछूट स्टॅबिंग्ज होतात आणि तरीही स्टँपिड होत नाही हा अजब विरोधाभास आहे.
सरसकट बंदी घाला गन्सवर ,
सरसकट बंदी घाला गन्सवर , कशाला पाहीजेत बंदुका स्वसंरक्षणासाठी ? असॉल्टवेपन्स दुकानात सहज विकत मिळत असतील तर अशा मास किलिंगवर उपाय सापडणार तरी कसा ?
वर बर्याच जणांनी म्हटल्याप्रमाणे संस्कार , ब्रोकन फॅमिली ह्या गोष्टीही मुळाशी आहेत पण एखादी व्यक्ती हिंसक झाली तर हाताशी काही नाही म्हणुन समोर येईल त्याच्या थोबाडात लगाउन दिली आणि हाताशी बंदुक आहे म्हणुन समोर येईल त्याला उडवत सुटला ..... खुप फरक आहे.
>> तो अॅलेक्स एकदम चांगल्या
>> तो अॅलेक्स एकदम चांगल्या फॅमिलीमधला आहे म्हणे. आजिबात ट्र्बल्ड, विअर्डो किंवा लोनर नव्हता तर ऊलट बर्यापैकी वेल लाईक्ड होता. आता तुम्हीच सांगा
चमन, कुठलाच प्रतिबंधक उपाय (प्रिवेन्टिव्ह मेझर) १००% लागू पडेल अशी अपेक्षाच नसते. आपण दुर्घटना घडण्याची शक्यता कमी कशी करता येईल या दृष्टीने विचार करतो. अॅलेक्स लोनर नव्हता म्हणून लोनर्सना समजून/सामावून घ्यायचा प्रयत्नच करू नये असं नाही ना?
Pages