बालि सहल - भाग १० - देवालय

Submitted by दिनेश. on 10 April, 2014 - 05:23

त्या देवळाच्या परीसरातून पायच निघत नव्हता.. इतकं सुंदर आणि शांत वाटत होतं ना तिथे.

१)

२) साधं पुत्रंजीवीचे झाडही असे सुंदर वाढले होते.

३) बहुतेक झाडाखाली असे नाव लिहिलेले होते ( आपल्यासारखे झाडावरच ठोकलेले नव्हते. )

४) सर्वाना आवडलेले हेच ते फुल.. माथावरची बिंदी किंवा कानातला झुमका म्हणून किती छान दिसेल ना ?

५) शेजारून एक नदी पण होती..

६)

७)

हा फुलोरा ओळखता येतोय का बघा.. ( करमळाचा आहे )

८)

९)

कांचन जरा वेगळा ( नाजूक ) वाटला मला.

१०)

११)

१२)

१३)

कसावाचे झाड. आफ्रिकेत हे एवढे मोठे वाढू देत नाहीत. मग त्याची मूळे चिवट होतात आणि खाता येत नाहीत.

१४) कसावाचीच फुले

१५) देवळाबाहेरचा फलक

१६) आता वाचा

१७) बालित रस्त्याच्या कडेने सगळीकडे ही झाडे होती. आधी मला रातांब्याची वाटली पण नव्हती ( हो मी पाने खाल्ली, सवय जात नाही )

१८) स्वप्नातल्या कळ्यांनो

१९) एक देखणा पुतळा ( ऋषीचे नाव विसरलो )

२०) बालि ( देनपसार ) विमानतळ.. प्रवेश भाग इतका भव्य असणारा विमानतळ क्वचितच बघितला मी.

२१)

बालिचा निरोप घेताना

खरं तर इथे समारोप करायला हवा पण वाटेतल्या सिंगापूरातली देखणी ऑर्किडस अजून बघायची आहेत ना..
म्हणून..

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू आणि साधना.. या फुलोर्‍याचे नाव सांगितले तर तुमच्या तोंडाला पाणी सुटणार.. आता ओळखा.

बालीतली नदी अगदीच गढूळ हो! (याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षे आंबट) Happy

दिनेश, हा पण भाग मस्तच. अनंताची कळी - अहाहा!

माधव, ऐन पावसाळ्यातली आहे ना नदी ! मुंबईतली मिठी नदी या जरी रंगाची दिसली तर मी उडी मारेन. ( नदीत नाही, जागच्या जागी. ) माझा कालिनाचा भाचा लहानपणी मिठी नदीकडे बघून म्हणायचा.. हा रस्ता किती चकाकतो ना. मी चालत जाऊ शकेन त्यावरून.

ती जागा खरेच खुप मस्त होती.

ही सगळी लेखमाला आज वाचली. खूपच सुंदर! तुमचे फोटो पण छान आहेत. एकदा बालीला नक्की जाणार.