वांग्याचे केचप (सॉस)
गतवर्षी मी व माझी पत्नी आम्ही उभयता मलेशियाला माझ्या मुलाकडे जाऊन आलो. त्यावेळी तेथे त्याच्या हाताखाली कामाला आलेल्या एका जसबीर सिंग कौर नांवाच्या मुलीने आम्हाला तिच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते म्हणून आम्ही सर्व तिच्या घरी गेलो असता तिने आम्हाला बाजारातून विकत आणलेले भारतीय पद्धतीचे सामोसे व त्याचे सोबत चटणी म्हणून तिने स्वत; घरीच बनवलेले सॉस दिले होते. ते सॉस मला एकदम नवीन वाटले व खूपच आवडले म्हणून मी त्याची नांव विचारल्यावर तिने ते वांग्याचे सॉस आहे असे सांगितल्यावर मी तीच्या कडून त्याचे साहित्य व कृती लिहून घेतली व भारतात पुण्याला परत आल्याबरोबर आठच दिवसात स्वत: ते घरी बनवून बघितले व जमले असल्याची खात्री होताच त्याचा फोटो काढून ठेवला. त्याचाह फोटो व रेसीपी मी आज तुमच्यासाठी येथे देत आहे.
साहित्य : - दोन जांभळी मोठी भारताची वांगी , दोन माध्यम टोमॅटो , चिंचेचा कोळ , गूळ , पुदिन्याची पाने , दोन वाळलेल्या लाल मिरच्या , मीठ , खाण्याचा लाल रंग
कृती : - वांगी व टोमॅटो उकडून घ्या व दोघांची साले काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. पुदिन्याची पाने निवडूनव धुवून घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
नंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात वांगी,टोमॅटो व पुदिण्याची पेस्ट एकत्र करून त्यात चिंचेचा कोळ , गूळ , मीठ , दोन वाळलेल्या लाल मिरच्या व दहा थेंब खाण्याचा लाल रंग घालून मिक्सरमधून फिरवून घ्या व सरव्हिंग बाउल मध्ये काढून ठेवा.
वांग्याचे केचप (सॉस)
Submitted by pltambe@yahoo.co.in on 9 April, 2014 - 06:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे पाककृती. (अवांतर -
मस्त आहे पाककृती.
(अवांतर - सतीश देवपूरकरांशी काही परिचय झाला आहे का सर आपला?)
बेफ़िकीर : (अवांतर - सतीश
बेफ़िकीर : (अवांतर - सतीश देवपूरकरांशी काही परिचय झाला आहे का सर आपला?)
नाही. मी अद्याप तरी त्यांना यापूर्वी कधीही भेटल्याचे मला स्मरत नाही. बाय द वे - काय करतात हे सतीश देवपूरकर
छान काहीतरी वेगळे, बघतो ट्राय
छान काहीतरी वेगळे, बघतो ट्राय करुन. चिकन ड्रम स्टिक किंवा मंचुरियन ड्राय बरोबर चांगले लागेल असे वाटतेय.
बेफिजी, अवांतराबद्दल
बोले तो एकदम झक्कास
बोले तो एकदम झक्कास !!
बेफीजींचा प्रश्न भारी .
वेगळे व सोपे आहे. बनवुन
वेगळे व सोपे आहे. बनवुन पहाणार.
मस्तच
मस्तच
आवडली.वेगळी आहे पा.कृ.
आवडली.वेगळी आहे पा.कृ.
काका, हा सॉस टिकाऊ आहे का? चव
काका, हा सॉस टिकाऊ आहे का? चव तर चांगलीच असणार..
व्वा मस्तच..........
व्वा मस्तच..........
फ़िकीर : (अवांतर - सतीश
फ़िकीर : (अवांतर - सतीश देवपूरकरांशी काही परिचय झाला आहे का सर आपला?)
नाही. मी अद्याप तरी त्यांना यापूर्वी कधीही भेटल्याचे मला स्मरत नाही.
>>>
बरेच लकी आहात काका तुम्ही मग
हे सॉस मला आवडेल याची शक्यता वाटत नाही. वांगं
वेगळाच प्रकार दिसतोय. चवीची
वेगळाच प्रकार दिसतोय. चवीची कल्पना येत नाही, करून बघावा लागेल.