ठसठसणाऱ्या भावना व्यक्त करणाऱ्या नज्म

Submitted by मी मी on 6 April, 2014 - 15:05

http://www.youtube.com/watch?v=JqxQrqkSbdI&feature=share

आह्ह ! सुरुवातीलाच घायाळ होतो माणूस असा आवाज, असे संगीत आणि असे शब्द.
जगजीत सिंग यांचा रुहानी आवाज आणि अतिशय सुरेख मनाला भिडणारे असे बोल असणारी हि 'नज्म'

बहोत दिनों कि बात है. फिजा को याद भी नहीं
ये बात आज कि नही बहोत दिनों कि बात है

प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल अशी ती 'बहोत दिनों कि' तरीही आजची आत्ताचीच वाटणारी, मनात ठसून बसलेली 'बात'.... विसरता न विसरता येणारी आणि हट्खोरपणे नको नको म्हणतांना हमखास आठवणारी अशी ती 'बात'
प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीतरी असतंच … नाही ??
विसरता येत नाही आणि खुल्या मनाने कुणाही समोर आठवताही येत नाही
म्हणाल तर हातून घडलेली आयुष्यातली अमान्य अशी चूक, म्हणाल तर तेव्हाच खरं जगून घेतलेलं आयुष्य !
पाहिलं तर कुणीतरी सोडून दिलेली साथ, आठवलं तर तेव्हापासून साथच न सोडणारया त्या आठवणी

खुपत असतं, सलत असतं पण तरीही हवहवसं फिलिंग असतं हे. …. विचित्र अनुभव

असंच मग कधीतरी निवांत वेळी आठवणी जाग्या होतात आणि सारं मन व्यापून उरतात. मन व्याकूळ होतं आणि सांगून टाकावं वाटतं कुणालातरी नाहीतर सगळ्यांनाच …. एकदाचं … किंवा मग शेवटचं …
आत गच्च धरून ठेवलेला श्वास ती घुसमट सुस्कारत असते सारखी मोकळं व्हायला, उचंबळून बाहेर पडायला व्याकूळ झालेली असते.

अशीच ती कधीतरी घडलेली घटना मनात ठसलेली आणि असह्य होऊन ठसठसणारी हि व्याकुळता, त्या भावना मग अश्याच कुठल्याश्या गझल किंवा नज्म मधून कोणीतरी काफील आझर सारख्या कवीने शब्दात गोवाव्या आणि जगजीत सिंग सारख्या देवदुताने त्या आपल्या कानातून मनापर्यंत आत आत ओताव्या ...
शब्द शब्द ऐकत असतांना ऐकणाऱ्यांच्या आत ती रक्तात भिनली जाते आणि आपल्याही नकळत नसा नसांतून वाहू लागते ,,,.

यासारखीच फिल्म हकीकत मधली कैफी आझमी (शबाना आझमी चे वडील) लिखित, रफी साहब यांनी गायलेली " मै ये सोचकर उसके घर से चला था, के वो रोक लेगी मना लेगी मुझको " हि नज्म सुद्धा काळजाचा असाच थेट ठाव घेणारी, मन पिळवटून टाकणारी आहे.

http://www.youtube.com/watch?v=6p6VvdCuxJM

एकंदरीतच या अद्भुत कलाकृतींना आणि कलाकारांना माझा मनापासून सलाम !!

मित्रांनो, आणखी काही अश्याच आठवणीतल्या गझल, नज्म असतील तर इथे त्याबद्दल माहिती द्यावी आणि एखादी अशीच ठसठसणारी भावना व्यक्त करावी वाटली तर तीही करावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा मयी.
खूप गझल आहेत अशा मला आवडणा~या आणि काळजाला भिडणा~या.

विशेष आवडणारी म्हणजे "जिन्दगी जब भी तेरी बज़्म में लाती हैं हमे" . तिचे शेवटचे कातर करणारे कडवे आणि तलत अजीजचा आवाज !

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यों हैं
अब तो हर वक़्त यही बात सताती हैं हमे !

गीतकार : शहरयार, संगीतकार : खय्याम यांनाही श्रेय दिलेच पाहिजे

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

ह्या गझलमधील खालील दोन कडवी......

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

अगदी बरोबर चंद्रा आणि अश्विनी दोन्ही गझल मस्तच अतिशय हृदयस्पर्शी…. 'रंजिश ही सही' हि तर तुमच्या आमच्या पूर्वजांपासून तर आत्ता तुमच्या आमच्या पर्यंत कुणीही ऐकली तरी तेवढीच असरदार ठरते. काही कलाकृतींना काळ, वेळ आणि पिढीचा बदल यापैकी कुठल्याही गोष्टींचा प्रभाव पडत नाही त्या अजरामर असतात तशाच राहतात.

मयी, किती आतून...हृदयस्पर्शी लिहिलस ग ...
इथे शोधत आले ती एका नज्मेसाठी नाही तर एक मराठी कविता अन त्याबद्दलची लोकसत्तातील बातमी वाचून ...
"अनिलांची 'ती' कविता मुकुलसाठीची..." : http://www.loksatta.com/pune-news/mukul-shivputra-poetry-dvd-kavi-anil-4...