जो येतो तो झोपून उताणा जातो

Submitted by वैवकु on 3 April, 2014 - 15:37

गावामधुनी मी एक फलाणा जातो
दुनिया म्हणते की तुझा दिवाणा जातो

मी येतानाही केविलवाणा येतो
मी जातानाही केविलवाणा जातो

चालून कसा पोचणार त्या जागी मी
जो येतो तो झोपून उताणा जातो

भेट घ्यायला तू तिथेतरी येशिल ना
सांगून तुला मी ठावठिकाणा जातो

मी तुझा शेर करण्याची इच्छा धरतो
श्वासांमधुनी निसटून उखाणा जातो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गावामधुनी मी एक फलाणा जातो
दुनिया म्हणते की तुझा दिवाणा जातो

मी येतानाही केविलवाणा येतो
मी जातानाही केविलवाणा जातो


चालून कसा पोचणार त्या जागी मी
जो येतो तो झोपून उताणा जातो

!!!!

खूप आवडले... खूप फील झाले!

धन्यवाद.

Happy

मी येतानाही केविलवाणा येतो
मी जातानाही केविलवाणा जातो

चालून कसा पोचणार त्या जागी मी
जो येतो तो झोपून उताणा जातो

बढिया !!!

चालून कसा पोचणार त्या जागी मी
जो येतो तो झोपून उताणा जातो

मी तुझा शेर करण्याची इच्छा धरतो
श्वासांमधुनी निसटून उखाणा जातो<<< वा वा

निसटून - व्वा

मी तुझा शेर करण्याची इच्छा धरतो
श्वासांमधुनी निसटून उखाणा जातो....................... वा खूपच सूंदर

मी येतानाही केविलवाणा येतो
मी जातानाही केविलवाणा जातो... हा ही सूंदर
( यात पहिल्या ओळीत येतानाही ऐवजी येताना असते तर ....
साधारण गझलेमध्ये दूसरी ओळ काय आहे हे श्रोत्यांना आधीच कळू नये असे निव्वळ व्ययक्तिक मत ,अर्थात मात्रा वगैरे बघूनच)
एकूणच सर्व शेर आवडले ......... Happy

सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार
( ही गझल /शेर इतक्याजणाना आवडतील ह्याची काहीही खात्री नव्हती )

किरणकुमार आपण सांगत आहात त्याबद्दल विचार करून झालेला आहे . प्रेडिक्टेबिलिटी पेक्षा शेरातला एकंदर खयाल आणि त्यासाठी निवडल्या गेलेल्या शब्दांच्या/अक्षरांच्या मांडणीतील अपसूकतेला व शेर वाचून झाल्यावर त्याच्यातून मनावर पडणार्‍या एकंदर भावनिक वजनाला महत्त्व दिले आहे त्यामुळे बदल करायची गरज वाटली नाही .

सुप्रियातै विशेष अभार असेच आशिर्वाद असूद्यावेत ही प्रार्थना Happy

मी येतानाही केविलवाणा येतो
मी जातानाही केविलवाणा जातो

चालून कसा पोचणार त्या जागी मी
जो येतो तो झोपून उताणा जातो

>> सुंदर !

किरणकुमार ह्यांच्याशी सहमत !
पहिली ओळ वाचल्यावर दुसरी ओळ न वाचताही समजली होती. प्रेडिक्टेबिलिटी प्रत्येक वेळेस मारकच असते असे नाहीच. ह्याच शेराचे पाहिले तर, दुसरी ओळ माहित असूनही मजा आलीच. पण, उत्कृष्टतेकडून सर्वोत्कृष्टतेकडे जाण्याच्या प्रवासात ह्या छोट्या छोट्या पायर्‍या चढून उंची गाठता येत असावी, असे मला मी स्वतः उत्कृष्टतेच्याही काही पायर्‍या खाली असताना, मान उंचावून पाहताना वाटतं.
तू ह्या शेरात बदल करावास असे नाहीच. पण इथून पुढे विचार करत राहावास असे वाटते.

नमस्कार, लिहिणं चालु केलं वाटतं तुम्ही. आपली रचना वाचुन हहपुवा झाली.
प्लीज लेखन केल्यावर कळवत जा..रुटीन रहाटगाड्यात दोन क्षण सुखाचे जातात पाहा. Happy

-दिलीप बिरुटे
(झोपून उताणा पडलेला) Happy

वाटपाडे , शामजी , फाटक साहेब ,जितू मनःपूर्वक आभार
______________________________________________________

उत्कृष्टतेकडून सर्वोत्कृष्टतेकडे जाण्याच्या प्रवासात ह्या छोट्या छोट्या पायर्‍या चढून उंची गाठता येत असावी, असे मला मी स्वतः उत्कृष्टतेच्याही काही पायर्‍या खाली असताना, मान उंचावून पाहताना वाटतं.<<<<<<

जितू तू इतका मनापासून विचार करून इतकं मौल्यवान वाक्य प्रतिसादात द्यावंस असं महत्त्व ह्या मुद्द्याला आहेतरी का असा प्रश्न पडला !!!
सगळ्या गोष्टी माहीत असूनही मी हा शेर असाच आणि असाच करण्याचा ठाम निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला ह्या गोष्टीला तुझ्यालेखी काहीच महत्त्व नाहीये का ?
दुसरी ओळ माहित असूनही मजा आलीच.<< असे कश्यामुळे घडते आहे याचा तपास तुझा तूच कर. कदाचित मग तुला माझा निर्णय योग्य वाटेलही .

अ‍ॅज सेड क्लिअरली.......

>> तू ह्या शेरात बदल करावास असे नाहीच. पण इथून पुढे विचार करत राहावास असे वाटते. <<

सगळं माहित असूनही तू हा शेर असाच लिहिलास, ह्याची किंमत आहेच. पण मी हा शेर फसला, तितकासा चांगला वाटला नाही, वगैरे काही म्हणतच नाहीये. ह्या विचाराचा एक कीडा तू डोक्यात सोडावास आणि तो वळवळत राहावा असे (नवकवितेच्या भाषेत) फक्त सुचवायचे आहे रे !