फुलं.

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
1’

दक्षे, काय सुंदर दिसतायत फुलं. मस्तच. कुंदाची ओंजळ तर छानच. Happy

परवा शांकलीबैंच्या मुळे बर्‍याच झाडांची नावे कळाली तुझ्या घरी. आता ही फुले बघताना परत तो दिवस आणि आपण केलेली धमाल आठवली.>>>>>>>>>>>>>>>?????????????????? Uhoh

पांढरे - पिवळे गुलाब खूप आवडले. >>चंद्रा थँक्स. जेव्हा या गुलाबाला कळ्या येतात तेव्हा त्या पिवळ्या असतात. पण पुर्ण उमलून फुल झालं की ते पांढरं असतं. कसं काय माहित नाही. फोटोत दिसेलच तुम्हाला ते.

विशाल - Happy

फुलं पाहुन जाणवतेय की तु तुझा आनंद क्षणो़क्षणी त्यांच्याबरोबर शेअर करतेयस. त्या शिवाय ती इतकी फुलायची नाहीत. Happy

एकट्या कुंदाच्या फुलाचा फोटो फार आवडला. आवर्जुन सांगावसं वाटतंय की आयुष्यातलं एक सुंदर तत्वज्ञान त्यात लपलंय. मागे जाळी, पुढे हिरवे गज, त्या कैदेत असून सुद्धा त्या फुलाने फुलणे सोडले नाही. हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतिक आहे, समृद्धीत अडकलेली व्यक्ती कधी कधी बहरणं विसरून जाते, पण त्या फुलाने बहरून हा संदेशच दिलाय जणू की आसमंत कितीही समृद्ध असला तरी स्वत:चं बहरणं विसरू नका. Happy

Dakshina sugandi aani prasanna vatal. Khup chan japteys tu tujhi bag as distay.

दक्षी, अक्षी सुर्रेख बाग, बागेतील रंगीबेरंगी फुलं... सुंदर माझं घर..असं मनात म्हणत असशील तू Happy

बेफि चं सुभाषित आणी कौतुक ची पोस्ट सुंदर आहेत दोन्ही!!!

आपण ओतलेल प्रेम मस्त टवटवीत उमलुन दाखवतात.फुल. गुलाबाला तर किडिपासुन खुपच जपाव लागत.दक्षिणा खुप छान निगराणी केली आहेस.दक्षिणा. बाग पहायला केंव्हा येउ.

दक्षिणा,कसली मस्त फुललीये बाग. तू झाडांची मनापासून घेत असलेली काळजी बागेच्या फुलण्यावरून लगेच लक्षात येतेय. रसरशीत आहेत फुल अगदी. कुंदाचा ओंजळीतला फोटो मस्त.
बेफिकीर ह्यांनी सांगितलेले सुभाषित आणि कौतुकची पोस्ट पण बेस्ट आहे.

वा, काय सुरेख फुलं आणि त्यांचे फोटो पण!! मी आज बघितले...
ग्रीन फिंगर्स आणि तितकंच प्रेमळ मन आहे तुझ्याकडे, फुलं साक्षात आनंदाने हसतायत असं वाटतायत Happy
प्रसन्न आणि हर्षभरीत वाटलं एकदम Happy

मस्तं मस्तं!
गॅलरीत पण काय सुंदर फुलवलीय बाग.
माझ्याकडे कुंदा नाही पण आता ही फुले पाहून कुंदा लावायचे टेंप्टेशन होतेय.
वेलगुलाबही मस्तच.

आज बघितली बघ तुझी फुल दक्षे... मस्तच आहेत.. स्पेशली कुंदाची फुल..

यावरुन एक आठवल आज सकाळीच आमच्या मोगर्‍याला दोन फुल आली... कुणा दुष्टाची त्यावर नजर पडायच्या आत मी ती काढुन आणली आणि स्वामींच्या चरणावर अर्पण केली..

फुलझाडांना केवळ खत घालुन नाही भागत.प्रेम द्यावे. लागते .ते तुम्हीखुपच देतआहात आणि त्यामुळेच इतका सुंदर बहर आला आहे प्रत्येक झाडाला.खुपच छानं
ह्या फुलांच्या गंध काेशात तोपरमेश्वर नक्की विसावला असेल

खूप खूप सुरेख.
तुम्ही काय काय काळजी आणि मेहनत घेता? म्हणजे पाणी दोनदा, खत दर १५ दिवसांनी, फक्त जैविक खतच ई. ई.
माझ्याकडच्या फुलझाडांना इतकी फुले नाही येत.महिन्यातून एखादी कळी येते.
पुण्यात कुठल्या स्पेसिफिक नर्सरीमधून आणता का झाडं?
मी दिनेश यांचे एक पोस्ट वाचले होते की -
नर्सरीत रोपे वाडवताना हार्मोन्स चे फवारे वापरुन जास्त फुले येतील अशी व्यवस्था केलेली असते. कदाचीत मी आणलेली रोपं सुदृढ नसतील. Sad

प्रीती नर्सरीत असे फवारे वगैरे मारतात हे माझ्या ऐकिवात नाही. माझी एक ठरलेली झाडंवाली बाई आहे, सर्व झाडं (मोस्टली) मी तिच्याकडूनच घेते. खत सुद्धा तिथूनच. माझ्याकडे ही सावली असते तरिही झाडं वाढतात हे आश्चर्यच आहे खरं.

तुम्ही कटिंग करता की नाही झाडांचं?

कौतुक, काय सुंदर अर्थ सांगितलास? धन्यवाद! Happy

शोभनाताई कधी पण या, घर तुमचंच आहे>>>>>>>>>>हे आमच्यासाठी पण आहे का? Proud

प्रीतीसखी झाडांना फुलं येऊन गेली की शेंडे कट करायचे असतात. जुनी किंवा वाळलेली पानं ही कट करायची. दर १५ दिवसांनी जैविक खत घालायचं. दर आठवड्याला माती वरखाली करायची. रोज नियमित पाणी घालायचं. इतकंच करते मी. Happy

Pages