सुटका

Submitted by समीर चव्हाण on 31 March, 2014 - 06:40

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होण्याआधी सुटका मोठी गंमत असते
झाल्यानंतर आपण नसतो, गंमत नसते << व्वा ! >>

असते केवळ अपुल्यापाशी अपुली चिंता
सोबत कोणी कोठेही केव्हाही नसते << सही...मस्तच >>

एकाड्याची गोष्ट छानशी जीवन असते<< हे लक्षात आले नाही /संदर्भ लगला नाही ओळ मजाही देत नाही आहे फारशी
अस्पष्ट दरी आणि थांबलेले लोक हे शेर उलगडले नाहीत मला ..संदिग्ध जाणवले
एकंदर गझल आवडलीच

सर्वाथाने ..????? .....टायपो असावा बहुधा !......सर्वार्थाने ?

धन्यवाद.
टायपो सुधारलाय.

एकाड्याची गोष्ट छानशी जीवन असते<< हे लक्षात आले नाही /संदर्भ लगला नाही ओळ मजाही देत नाही आहे फारशी
अस्पष्ट दरी आणि थांबलेले लोक हे शेर उलगडले नाहीत मला ..संदिग्ध जाणवले

एकाड म्हणजे एककल्ली/विचित्र. आयुष्य छान आहे मात्र वैचित्र्यपूर्ण आहे अश्या अर्थाने की सोबती असूनही न टळणारे
एकटेपण आहे, अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत. बाकीचे दोन शेर स्पष्ट असावे, असे वाटले. दरीचा शेर इतकाच सांगतो की जन्म-मरणामधे एक अवस्था अशी असते की जी स्वतःला लोटून दिल्याशिवाय येत नाही. आली की आपोआप सगळे काही स्पष्ट होते.
थांबलेले लोक ह्या शेरात अनेक क्रेडिट न मिळालेले लोक आहेत की ज्यांसोबत स्वतःची तुलना करताना शरम वाटावी.
एकूणच संदिग्धता माझ्या शेरात असते.

सगळ्यांचे मनापासून आभार.

किती भले हे लोक थांबले कधीपासुनी
गणती करता अपुली अपुल्यावर मन हसते<<< मस्त शेर आहे

होण्याआधी सुटका मोठी गंमत असते
झाल्यानंतर आपण नसतो, गंमत नसते

किती भले हे लोक थांबले कधीपासुनी
गणती करता अपुली अपुल्यावर मन हसते

नजरेनजरेला दिसते वेगळेच बहुधा
जे दिसते ते असते जे ना तेही असते

वाह! खूप भिडले हे शेर ....