पाँडीचेरी आणि अंदमान : भाग १ पाँडीचेरी

Submitted by मामी on 30 March, 2014 - 08:19

अँडी आणि पाँडी!

मागच्याच आठवड्यात ८ दिवसांची पाँडीचेरी आणि अंदमानची सफर करून आले. एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. अर्थात दक्षिणेकडे जाण्यासाठी हा काही फारसा सुखावह ऋतू नाही. नोव्हेंबर ते जानेवारी हा सर्वोत्तम काळ. पण उन्हाळा अगदीच सहन न करता येण्यासारखा नव्हता.

पाँडीचेरी येथिल अरविंद आश्रम ( ऑरोविल)

मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक डॉक्युमेंटरी बघायला मिळते. त्यात आश्रमाची माहिती दिली जाते. त्यानंतर जवळजवळ सव्वा किमी दूर मातीच्या रस्त्याने चालत जाऊन मातृमंदिर बघता येते. वयस्क व्यक्ती, लहान मुले वगैरेंसाठी गाडी आहे. येताना सगळ्यांकरता बस उपलब्ध आहे.

हा तो रस्ता :

पोहोचलोच. :

आधी हा तिथल्या विस्तीर्ण मैदानातील पुरातन वटवृक्ष बघा. किती पारंब्या पुन्हा जमिनीत घुसून झाड वाढत गेलं आहे. मुख्य खोडाला कुंपण घातलं आहे.

मातृमंदिराकडे :
<मातृमंदिर. हे आश्रमातील मुख्य ध्यानकेंद्र. इथे आपल्याला जाता येत नाही. फक्त लांबून बघता येते. हे आश्रमाच्या मध्यभागी बांधलेले आहे. आश्रमात राहणारे आधी बुकिंग करून इथे जाऊन ध्यान करू शकतात. आतमध्ये कोणत्याही देवतेची अथवा धर्माची आठवण होईल असे काही नाही. मधोमध फक्त एक स्फटिकाचा मोठा गोल आहे. अरविंद आश्रमात जगातील कोणालाही जाऊन राहता येते. आणि त्या शांत आणि प्रसन्न वातावरणात आपली अध्यात्मिक उन्नती करून घेता येते.

या आश्रमाच्या आजूबाजूला अनेक फ्रेंच, इटालियन छोटी छोटी रेस्तॉरंटस आहेत. आम्ही एका ठिकाणी मस्त वुड फायर्ड पिझ्झा खाल्ला.

पाँडीचेरीचे रीझॉर्ट आणि बंगालचा उपसागर :

होळीपौर्णिमेचा चंद्र :
पाँडीचेरी आणि अंदमान : भाग २ अंदमान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान फोटो. पाँडेचेरी मधून ५ पिढ्यांपुर्वी साऊथ आफ्रिकेत आलेले माझे काही मित्र आहेत. त्यांना ही लिंक पाठवतो. ते तर परत कधी तिथे येऊच शकले नाहीत.

पाँडी माझ्या हाताखालील टेरिटरी होती त्यामुळे विशेष आत्मियता वाटते. चिल आउट करायला मस्त जागा आहे.
इथे तमिळ आणि फ्रेंच पद्धतीचे जेवण फार मस्त मिळते. चेट्टीनाड चिकन जबरदस्त. काही फ्रेंच बांधव इथे राहतातच ते चीज, चॉकोलेटस वगैरे उत्तम बनवून विकतात. हॉटेल्स पण तर्‍हे तर्‍हेची आहेत. मद्रास हून गाडीने तीन तासात येता येते. व ती ड्राइव पण सुरेख आहे. जवळ वैलंकनी चर्च, डॅनिश फोर्ट वगैरे जागा
बघण्यासारख्या आहेत. ऑरोविल पॉटरी, बाटलीतल्या बोटी ( अनेक आकारातल्या ) कपडे वगैरे घेता येते.
शंख शिंपल्यांच्या वस्तू देखील मिळतात. एक कॅसाब्लँका म्हणून दुकान आहे तिथे लेडीज टॉप्स डिझायनर वेअर मिळते. उधावि ऑरोशिखा अगरबत्ती ह्यांच्या दुकानात एक्स्पोर्ट क्वालिटी अगरबत्ती मिळतील. ह्याचे मालक फ्रेंच आहेत.

गृहसजावटीचे सामान, फर्निचर, शीटस लँपशेड्स इत्यादी, खास इंडो फ्रेंच लुकचे देखील अनेक दुकानात मिळते.
लॅबोरेटरी सेंटर् नावाच्या उद्योगात, अत्तरे, रंगवलेले रुमाल व कपडे साबण इत्यादी मिळते. ही जागा साबण, डिटर्जंट उद्योगाची हब आहे. लीव्हरचे प ण थर्ड पार्टी उत्पादन इथे होत असे .

ऑरो विल कम्युनिटीत खास आर्किटेक्चरची घरे आहेत. कलाकार मनोवृत्तीचे फ्रेंच व इतर युरोपीय लोक इथे येउन राहात असतात. विलानूर कम्यून वगैरे त्यांची ठाणी आहेत.

चेन्नाई व येथील एक्साइज मध्ये फरक असल्याने इथे दारू स्वस्त पडते व लोक्स मुद्दामून दारू प्यायला इथे येत असत. संध्याकाळी सातच्या पुढे सोबती शिवाय बाहेर पड्णे अवघड वाटू शकते. ते आपल्याला काही करत नाहीत पण वासाचा त्रास होतोच.

मस्त फोटो...अंदमानात काही अ‍ॅड्वेन्चर स्पोर्ट्स....स्नॉरकलिन्ग इ.इ. आहे असं ऐकलं होतं.
१२/१५ वर्षापूर्वी पॉन्डिचेरीला धावती भेट दिली होती. अती आवड्लं होतं. परत नक्कीच जायचय.

मामी,

केवढ छान लिहितेस. उत्तम लेखिका आहे तू तर!!! काव्यात्मकता आहे लिखाणात आणि तरीही माहिती मिळत जाते.

तिथली माति लाल आहे का? मला गोव्याची आठवण झाली अगदी.

थेरपी, छान माहिती.

एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. <<<<< हे एक बाकी बेस केलंत बघा

सगळे फोटो मस्त आहेत. लाल माती पाहुन मलाही बी सारखेच वाटले...

जिस्म (भाग एक) पाहिल्यापासुन मी पाँडीच्या प्रेमात आहे. एकदातरी जायच्या लिस्टीतले ठिकाण Happy

मातृ मंदिरात जाता येते…पण आदल्या दिवशी स्वतः जाऊन बुकिंग करावं लागतं….खरं म्हणजे ते पर्यटन स्थळ नाही…. ते आहे मेडीटेशन सेंटर….पण येणाऱ्या पर्यटकांना त्या जागेचा महत्व आणि पावित्र्य लक्षात येत नाही…तिथेही जाउन बीच वर आल्या सारखा दंगा करतात…त्यामुळे जे खरच जाऊ इच्छितात, त्यांना आदल्या दिवशी स्वतः जाऊन बुकिंग कराव लागत…अस केल्यामुळे नवशे-गवशे येत नाहीत आणि ज्यांना खरंच इच्छा आहे ते जातात…. पण आवर्जून आत जाऊन बघावं इतक सुंदर आहे आत

मामी , जाता येतं ग मात्रुमंदिरात आणि तो अवश्य घ्यावा असा अनुभव आहे. माझे अगदी जिवलग मित्रमैत्रीण तिथे रहातात, तिथलेच नागरीक आहेत ते आता. होळी निमित्त तिथे मात्रूमंदिरासमोर कार्यक्रम असतो . तो पाहिला का?