आता बसता-उठता विठ्ठल

Submitted by वैवकु on 26 March, 2014 - 11:01

आता बसता-उठता विठ्ठल
आता हसता-रडता विठ्ठल

हा देहाचा चिंच डवरतो
मनामधे गाभुळता विठ्ठल

आज पिऊ दोघेच 'बेफिकिर'
उगाच का बोलवता विठ्ठल

कधी मला काँग्रेस वाटतो
कधी बिचारी जनता विठ्ठल

ह्यावर अवलंबुन नसते ..की..
तुम्ही कसा वागवता विठ्ठल

मी त्याच्याकरता आहे की
आहे माझ्याकरता विठ्ठल

मी मुलखाचा माणुसघाणा
पण अवघी मानवता विठ्ठल

(अपूर्ण...)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवळपास सगळेच शेर आवडले .

कधी मला काँग्रेस वाटतो
कधी बिचारी जनता विठ्ठल << Lol

मी मुलखाचा माणुसघाणा
पण अवघी मानवता विठ्ठल << क्या बात है ....

' विठ्ठल अवघ्या मानवतेच्या बापाची गाठोडी ' ही तुमचीच ओळ आठवली . Happy

ह्यावर अवलंबुन नसते ..की..
तुम्ही कसा वागवता विठ्ठल

काय अवलंबुन नसते हे कळले नाही.

कधी मला काँग्रेस वाटतो
कधी बिचारी जनता विठ्ठल

निव्वळ टाळीबाज शेर वाटला, भाजपाही बसेल की वृत्तात.

मी त्याच्याकरता आहे की
आहे माझ्याकरता विठ्ठल

अतिशय ट्रिवियल इश्यू वाटतो, असो आपण अधिक जवाबदारीने लिहायला हवे असे वाटते.
एक-दोन शेर चांगले झालेत हेही सांगतो.

आज पिऊ दोघेच 'बेफिकिर'
उगाच का बोलवता विठ्ठल

लैच झालं भो आता हे...दोघंच बसा (बेफिकिर' म्हणजे स्टँडिंग अव्हेशनवालेच का.)
तेवढं ते विठ्ठलाला सतत आणि विनाकारण नका आणु बॉ...लै वात आणला भो आपल्या रचनेने.

साला शेर असा पाहिजे की दोन ओळीवरुन नजर हटू नये, शेर असा खोलवर आत रुतला पाहिजे बशीर बद्र म्हणतो-

हजारो शे'र मेरे सो गये कागज की कब्रो में.
अजब मा हूं कोई बच्चा मेरा जिन्दा नही रहता.

-दिलीप बिरुटे

''आता बसता-उठता विठ्ठल '' ही काही तुमची लहर नाही वैवकु , तेव्हा ही गझल अपूर्ण असणं क्रमप्राप्त आहे, तिच्या अभिव्यक्तीचं परिष्करण करत राहावं लागणार आहे तुम्हाला.
हा देहाचा चिंच डवरतो
मनामधे गाभुळता विठ्ठल ..
अप्रतिम.

मी त्याच्याकरता आहे की
आहे माझ्याकरता विठ्ठल

मी मुलखाचा माणुसघाणा
पण अवघी मानवता विठ्ठल

मस्त.

धन्यवाद मुटे सर धागा वर आणल्याबद्दल Happy
सर्व प्रतिसादकांचे अभार

बिरुटे तुमचे गझलगुरू आता पुन्हा माबोवर आलेत तेव्हापासून तुम्ही गायबच झालात