फॅब्रिक पेंटिंगची बिगरी

Submitted by आनंदनंदिनी on 25 March, 2014 - 07:35

मायबोलीवरील सर्व दिग्गज तायांना स्मरून मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या फॅब्रिक पेंटिंगचा श्री गणेशा केला!

प्रचंड मज्जा आली ते करता आणि पुढची कापडं रंगवायला घ्यायचा उत्साह पण आला!

पेंटिंगबरोबरच थोडंसं थ्रेड वर्क (दोरा काम?) पण केलंय.

फिनिशिंग फार उत्तम असेलच असं नाहे, पण समजून घ्या!!

IMG_20140218_234812.jpgIMG_20140219_002123.jpgIMG_20140219_002133.jpgIMG_20140306_224438.jpgIMG_20140308_023839.jpgIMG_20140310_152147.jpgIMG-20140324-WA0004.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅडम चरण दाखवा आपले __/\__

कसल भारी केलय? बिगरीतच ही कामगिरी आणि म्हणे मॅट्रिकला याहुन बर? म्हणजे मला प्रतिसादायला शब्दच कमी पडणार अस दिसतय

भानुप्रिया मुग्धटलीला अनुमोदन. हे जर का बिगरीतलं काम असेल तर मॅट्रिक मध्ये काय असेल?
अमेझिंग कलर कॉम्बिनेशन अ‍ॅन्ड फिनिशिंग.

अनिश्का, हो गं, साधेच टाके घातलेत, अजून बाकिचे नीट येत नाहीयेत!

मुग्धटले, लाजले बरं का मी!

आणि सगळ्यांचे प्रचंड आभार!
रॉ सिल्कवर केलंय हे, उजव्या खांद्यावरून येणारे हे डिझाईन, कुडत्याच्या.

दक्षिणा, शांकली आणि गोपिका, खूपच धन्यवाद!

मस्त !!!

हेव बिगरी ते मॅट्रिक झालयं गं! मस्त्त्त्त्त!!! Happy
चला मी ही बिगरीत यायला हरकत नाही तुझा गाईडन्स ( शब्द आठवत नाही ) खाली....>>> अनिश्का, मार्गदर्शनाखाली म्हण Wink रच्याकने मार्गदर्शन लगेच मिळणार असेल तर मी ही यायला तयार आहे.

तायांनो, मार्गदर्शन वगैरे करण्याइतकं मला खरंच येत नाही बरं का!

दिनेशदा, मला प्लीज 'अहो' नका म्हणू, मी प्रचंड लहान आहे!

आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार!

सुरेख गो.. पहील्याच बॉलवर झक्कासपैकी षटकार ठोकलायस की गो Happy रंग नीट कळत नाहीये कापडाचा.. नेव्ही ब्लू आहे का? आणि रॉ सिल्क प्रकार आहे का कापडाचा?
डिझाईन मस्त दिसतंय. फक्त पानं पिस्ता वै. असती तरी छान वाटली असती... दुरंगी डिझाईन! पन हे ही सुरेख.

तुझी रंगसंगती ची समज लाजवाब आहे भानु! आप्के फॅशन सेन्स के तो ह्म फॅन है ही! Happy फॅशनगुरूमैयाजी कुछ टिप्स हमें भी दे दो.. आणि हल्ली त्या फॅशनच्या धाग्यावर असा शुकशुकाट का आहे? वेमांनी किती हौशीने काढले होते धागे Happy

ड्रीमगर्ल, इश्श्य!!!

खूप डीप नेव्ही ब्लु आहे रंग. पानांना आधी सोनेरी रंग लावायचा ठरवला होता, पण तो जरा ओव्हरपॉवरिंग झाला असता गं म्हणून मग गुलाबीच ठेवला. रंगसंगती ठरवण्यात नवरेबुवांचा पण ५०% वाटा आहे, त्यामुळे मी एकली सगळं क्रेडिट घेउ शकत नाही! Proud

रॉ सिल्क कापडाचा प्रकार आहे, अतिशय रिच दिसतं ते कापड, आणि सेल्फ टेक्श्चर पण मस्तं असतं त्याचं.

आणि खरंच की गं, फारंच बंद पडलाय तो फॅशनचा धागा! Sad

Pages