तुझी अर्धोन्मिलीत कविता!

Submitted by बागेश्री on 24 March, 2014 - 05:03

तुझ्या प्रतिभेच्या काठाशी मी ओणवी बसताच,
उग्र डोळ्यांत दिसते एक कविता..
धसमुसणारी, अर्ध्यावर सोडलेली, व्यथित!
दुसर्‍या डोळ्यांत मात्र ओलं हितगुज...
हिंदकळत राहते मी काठाशी
कधी व्यथेने, कधी ओलेती..
तुझ्या व्याकुळ शब्दांचा वारा
घालमेल वाढवत उर धपापता ठेवणारा
ना बुडता येतंय,
ना तरंगता...
उठून जायचा विचार करू तर,
पायात येते,

तुझी अर्धोन्मिलीत कविता!

 
-बागेश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता छान आहे..
पण अजून रूपक खुलायला हवे असेही वाटले.

अवांतर- अर्धोन्मीलित असे लिहिणे योग्य.
ना बुडता येतंय ना तरंगता- इथेही ना च्या ऐवजी न असायला हवे असे वाटते आहे, पण खात्री नाही.