बालि सहल - भाग ८ - म्यूझियम

Submitted by दिनेश. on 23 March, 2014 - 15:21

बालितले एखादे म्यूझियम बघायची फार ईच्छा होती आणि विजय आम्हाला अगदी योग्य अशा जागी घेऊन गेला.
पूरातन कलाकृती, अवजारे यांचे ते संग्रहालय नव्हते. तरी ती जागा अनोखी अशीच होती.

चला बघू या !

१) प्रथमदर्शन

२) जसजसे पायर्‍या चढून जाऊ तसतसे आणखी काही नजरेच्या टप्प्यात येत जाते. त्या मनोर्‍याखालच्या काचेच्या खिडक्या बघा. आपण तिथे जाणार आहोत.

३) नेहमीप्रमाणेच देखणे प्रवेशद्वार

४) आणि देखणी वास्तू

५) स्वच्छ आवार

६)

७)

८)

९)

१०)

११)

त्या वरच्या सज्ज्यातून दिसणारे देखणे बालि. तिथे उंच इमारतीच नाहीत. काही हॉटेल्स सोडली तर कुठलीच इमारत दोनपेक्षा जास्त मजल्याची नाही. ( विजयने सांगितल्याप्रमाणे नारळाच्या झाडापेक्षा उंच इमारत बांधायची नाही, असा नियम आहे. )

१२ ) सज्ज्यातला आतला भाग

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

गच्चीवर जायला आड्काठी नव्हती

१९)

२०)

२१ )

तिथे बालिच्या इतिहासातील जनजीवनांची अतिशय देखणी मॉडेल्स होती. यातली खास बाब म्हणजे वृक्षांचे डिटेल्स आणि त्याहून खास बात म्हणजे निसर्गापुढे माणसांचा आकार अगदी लहान दाखवून, आपले स्थान
दाखवले होते ( तरी मानवी आकृतीतले डीटेल्सही वाखाणण्याजोगे होते. )

२२)

२३)

२४)

२५)

२६)

२७)

२८)

या फोटोत मी दिसतोय का, बघा बरं

२९)
कुठलीही वस्तू देखणी करून सोडायची बालिकरांना वाईट्ट सवय आहे.

३०)

आणि सर्व परीसर सुगंधित करुन टाकणारी ही यलांग यलांग ची झाडे ( उच्चार बरोबर असावा. )

३१)

शिवाय चाफा

३२ )

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा....

८,९ आणि १० वा फोटो.....असे वाटते आपण स्वर्गात (तिथल्या बागेला नंदन वन असेच म्हणतात ना???? ) थांबलो आहोत आणि कोणत्या हि क्षणी कुणि देवता किवा अप्सरा तिथे येतिल फेरफटका मारण्यासाठि...कित्ति मस्त आहे ते...अगदि कल्पने पलिकडच जग वाटतय...

बाकि, फोटोस, नेहमिसारखेच एकदम भारि.....

गोपिका, सगळ्यात छान ती तिथली स्वच्छता. स्वच्छता म्हणजे परमेश्वर असे आपण फक्त म्हणत राहतो, करत काहीच नाही. १० व्या फोटोत काही तरुण मुले तिथल्या मंडपात बसलेली दिसताहेत पण तरीही कुठे कागदाचा कपटादेखील दिसत नाही.. कुठे देवता असतील आणि त्याना यावेसे वाटले.. तर अश्याच जागी येतील ना ?

वा,वा, अप्रतिम. दिनेशदा तुम्ही म्हणताय ते खरंय, अशाच जागी देवतांना यावसं वाटत असेल. खूप छान स्वच्छता आहे. प्रसन्न वाटले.

वा बालि मस्तच
सगळ्यात छान ती तिथली स्वच्छता. स्वच्छता म्हणजे परमेश्वर असे आपण फक्त म्हणत राहतो, > +१

कसली देखणी वास्तू आहे! भारतीय शैलीच्या खूप जवळाची वाटतेय पण त्याच वेळेला खूप वेगळेपण आहे त्यात. त्या द्वारपालांच्या कमरेची लुंगी आणि डोक्यावरची छ्त्रं बघून गम्मत वाटली.

रच्याकने, बाली हा असुरांचा प्रदेश होता ना? मग तिथे देवता कशा येतील? Wink पण हे सगळे बघून असुर हे स्थापत्य शास्त्रात खूप प्रगत होते हे पटते. मयासुराची मयसभा खरेच अप्रतिम असणार. ती छतावरची नक्षी (१४) आणि तो दरवाजा (२९) सुंदर आहेतच पण मला सगळ्याट जास्त आवडली ती जमिनीवरची नक्षी. सहसा हा प्रकार कुठे पहायला मिळत नाही.

दिनेश, ११व्या फोटोत अँगल जsssरा चुकलाय. नाहीतर एक उत्तम फोटो झाला असता - perfect photo frame! ही मालिका मस्तच चालू आहे पण तुमच्या लेखनाचा अभाव जाणवतोय.

आभार दोस्तांनो.

माधव, काही बाबी प्रकर्षाने वेगळ्या जाणवतात त्या म्हणजे दरवाज्यातली नक्षी. दोन्ही बाजू समान असल्या तरी मधला भाग मोकळाच असतो. तसेच पॅगोडा टाईप पण गवताचे केलेले कळसही वेगळे आहेत.

तो ११ मधला भाग आहे तो खिडकीचा आहे.. खरं तर आणखीही बघण्यासारखे आहे तिथे. मधोमध जलाशयातून वर जाणारा गोलाकार जिना आहे. त्याचे फोटो नाही आले चांगले.

शिवाय एक जाणवलं असेल, जरी आत सोलर लाईटींग वगैरे केलेले असते तरी कुठेही वायरींचे जंजाळ नाही.

हपापल्या नजरेने बघत राहिलो, माहिती मिळवायला वेळ नव्हता.. म्हणून फारसे लिहित नाही.