ही अता विद्रोह करते कातडी

Submitted by dr.sunil_ahirrao on 21 March, 2014 - 05:44

दावती नुसता उमाळा बेगडी
माणसे आतून सारी कोरडी

पाय मातीचेच सार्यांचे इथे
चाल उंटाचीच होती वाकडी

पोट छोटे, भूक मोठी फार ही
ही पहा कुरकूर करते आतडी

थोर समतेचा तुझा दावा खरा
मारती ही हात आता मापडी

तू जरी आजन्म करशी भिक्षुकी
ही तुझी झोळीच आहे तोकडी

छान तू हा न्याय सार्यांना दिला
वाजतो हा दंड नुसता लाकडी

जी मघा मिरवीत गेली पालखी
त्यात होती जातधर्माची मढी

हे कसे स्वातंत्र्य आम्हाला दिले
ही अता विद्रोह करते कातडी

पापपुण्ये मोज सारी तू पुन्हा
थरथरु दे ही जीवाची पालडी

वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू
ने भरोनी देह अमुचे कापडी

डॉ.सुनील अहिरराव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाय मातीचेच सार्यांचे इथे
चाल उंटाचीच होती वाकडी>>>

पाय मातीचेच सार्यांचे इथे
चाल उंटाचीच होती वाकडी>>>>

वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू
ने भरोनी देह अमुचे कापडी>>>.. अतीशय सुरेख!