Submitted by dr.sunil_ahirrao on 21 March, 2014 - 05:44
दावती नुसता उमाळा बेगडी
माणसे आतून सारी कोरडी
पाय मातीचेच सार्यांचे इथे
चाल उंटाचीच होती वाकडी
पोट छोटे, भूक मोठी फार ही
ही पहा कुरकूर करते आतडी
थोर समतेचा तुझा दावा खरा
मारती ही हात आता मापडी
तू जरी आजन्म करशी भिक्षुकी
ही तुझी झोळीच आहे तोकडी
छान तू हा न्याय सार्यांना दिला
वाजतो हा दंड नुसता लाकडी
जी मघा मिरवीत गेली पालखी
त्यात होती जातधर्माची मढी
हे कसे स्वातंत्र्य आम्हाला दिले
ही अता विद्रोह करते कातडी
पापपुण्ये मोज सारी तू पुन्हा
थरथरु दे ही जीवाची पालडी
वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू
ने भरोनी देह अमुचे कापडी
डॉ.सुनील अहिरराव
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. >>जी मघा मिरवीत गेली
छान आहे.
>>जी मघा मिरवीत गेली पालखी
त्यात होती जातधर्माची मढी
मस्त
पहिला पण छान आहे.
पाय मातीचेच सार्यांचे इथे चाल
पाय मातीचेच सार्यांचे इथे
चाल उंटाचीच होती वाकडी>>>
पाय मातीचेच सार्यांचे इथे
चाल उंटाचीच होती वाकडी>>>>
वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू
ने भरोनी देह अमुचे कापडी>>>.. अतीशय सुरेख!
धन्यवाद रश्मी ,पारिजाता !
धन्यवाद रश्मी ,पारिजाता !
अनेक शेर आवडले मतला सर्वाधिक
अनेक शेर आवडले
मतला सर्वाधिक आवडला
वैभव वसंतराव कुलकणीं, खूप खूप
वैभव वसंतराव कुलकणीं, खूप खूप धन्यवाद सरजी.
मतला आणि मढी : खूपच
मतला आणि मढी : खूपच आवडले!!!!!
धन्यवाद
जयदीप खूप खूप धन्यवाद!
जयदीप खूप खूप धन्यवाद!
पोट छोटे, भूक मोठी फार ही ही
पोट छोटे, भूक मोठी फार ही
ही पहा कुरकूर करते आतडी
बहोत बढिया.
छान गझल.
छान गझल.