चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेमानी किडा - निव्वळ अफलातून पिक्चर . बम्बैया भाषेत सुलेमानी किडा म्हणजे स्वस्थ न बसता उचापत्या करणारा इसम . Bollywood writers हि जमात कायमच उपेक्षित , underpaid आणि अन्याय झालेली . (सलीम -जावेद चा अपवाद वगळता). त्यांचा पहिला ब्रेक मिळवण्याचा संघर्ष तर अजूनच भयानक असतो .पण या लेखकांच स्वतःच एक जग असत . हि जमात वर्सोव्यात राहते . तिथून त्याना पुढची झेप सरळ बांद्र्यात घ्यायची असते . नोकरदार माणसांकडे हे लेखक तुच्छतेने बघतात आणि ती लोक यांच्याकडे झू मध्ये ठेवलेल्या प्राण्यांकडे बघावे तसे कुतुहुलाने . ते लोकांकडून उधार मागून सिगारेट फुकतात . घरमालकाला भाड देताना यांची तारांबळ उडते . आराम नगर मधल्या बार मध्ये बसून स्वस्त दारू पिताना हे लोक १०० crore फिल्म बनवून bollywood पे छा जाने के ' बेत बनवत असतात . आज खिसा फाटका असला आणि बूट चावत असला तरी आने वाला कल आपलाच असेल असा आत्मविश्वास त्याना असतो . सुलेमानी किडा हा चित्रपट अशाच संघर्षरत दुलाल आणि मैनक या दोन लेखकांची कहाणी . दुलाल आणि मैनक हि जोडगोळी लेखक म्हणून ब्रेक मिळवण्यासाठी धडपडत असतात . मैनक हा उथळ , वाक्या वाक्यात शिव्या वापरणारा , आणि यशासाठी कुठलीही तोडजोड करण्यास ना नसणारा इसम . दुलाल हा तुलनेने मवाळ , संवेदनशील आणि अंत नसलेला struggle करण्यात आपल जीवन तर संपून जाणार नाही ना या भीतीच्या छायेत जगणारा लेखक . हि जोडगोळी 'chance of life ' साठी महेश भट पासून ते अमृता राव पर्यंत सगळ्यांचे उंबरठे झिजवतात . फावल्या वेळात पोरीना टापून 'action ' मिळवण्यासाठी पुस्तकांची दुकान आणि फडतूस कवितांचे मुशायरे पावन करत असतात . अशाच एका ठिकाणी दुलाल रुमा ला भेटतो . रुमा च्या सहवासात येउन तो आयुष्याबद्दल वेगळा विचार करू लागतो . त्याना पहिला ब्रेक मिळतो का ? सलीम -जावेद सारखे दुलाल -मैनक जोडी बनते का ? याची कहाणी म्हणजे सुलेमानी किडा . यातल्या दोघाही मुख्य कलाकारांनी या भूमिका भन्नाट केल्या आहेत . यातले काही सीन तर अफलातून भन्नाट आहेत . मैनक दुलाल ला घेऊन सलमान खान च्या घरासमोर जातो आणि विचारतो ,"बता ये किसका घर है ?"
"सलमान खान का ." दुलाल .
"और किसका घर है ."
"सलीम खान का ."
"देखा writer हमेशा actor का बाप होता है ."

महेश भट चा यांच्यासोबतचा सीन असलाच भारी . हा चित्रपट लेखकाना 'autobiographical ' संदर्भामुळे नक्की आवडेलच पण १० ते ५ मधल्या लोकाना एका वेगळ्या जगाची लेखकांच्या जगाची सैर घडवून आणेल . दिग्दर्शक अविनाश मसुरकर ला हि भन्नाट फिल्म बनवल्याबद्दल hats off . या विकांताला हा चित्रपट नक्की बघा . पुण्यात फ़क़्त ३ screen वर हा चित्रपट चालू आहे . थोडा त्रास होईल पण its worth .

"अ‍ॅक्शन जॅक्सन" भिकार चित्रपट. काही काही अ‍ॅक्शन सीन्स आणि एक-दोन विनोदी प्रसंग सोडले तर उर्वरित चित्रपट भिकार. इंटर्वलला खाल्लेला बर्गर जास्त चांगला होता.

सई ताम्हणकरच्या प्रत्येक चित्रपटात असण्याचा आता कंटाळा आला आहे. फुकट काम करते का, प्रत्येक चित्रपटात हिला घेत असतात ते ? की तिला अशी भीती वाटते की आज काम मिळतंय तोवर जे मिळेल ते सगळं करून घ्यावं, उद्या कुणी विचारलं नाही तर ?>>>>>>>>>>>>>>>>१००००+ अनुमोदन .

विनोद खन्ना, सुनील शेट्टी व विपिन्नो म्हणून एक नवीन कलाकार यांचा 'कोयलांचल' चांगला आहे. कथा नक्की कशा पद्धतीने दाखवायची आहे याबाबत दिग्दर्शकाचा अनेक वेळा गोंधळ झाल्यासारखा वाटतो पण तरीही बघण्यासारखा आहे. कोळसा माफिया विरूद्ध सरकार असा थ्रिलर दाखवायचा आहे, की त्यातील व्हिलन व्यक्तिरेखांना अनावश्यक भाव देउन जास्त कलात्मक करायचा आहे हे नीट ठरत नाही असे वाटते.

सुनील शेट्टीच्या टॉप २-३ रोल्स पैकी हा ठरेल इतके चांगले काम केलेले आहे त्याने. विनोद खन्नानेही चांगले केले आहे पण काही खास स्वतःची भर रोल मधे नाही त्याची. एखाद्या जास्त स्टाइलिश कलाकाराने आणखी उठावदार केले असते.

****स्पोईलर अलर्ट ****
पी.के. पाहिला! अनुष्काचा लूक तिच्यापुरता आणि ९ वर्षाखालील मुलांसाठी नवा आहे. बाकी लोक प्रीती झिंटाचा लक्ष्यवाला न्हावी अजून काम करतो वाटत म्हणतात. अनुष्काचे फुगलेले ओठ कथेला अत्यावश्यक आहेत - एलियन सोबत पेयरिंग असेल तर 'मेड फोर इच अदर' हा फील तर यायला हवा. "कोई मिल गया" मधून फक्त थोड्या कथेची उसनवारी केली असे नाही तर सुशांतसिंगचा पूर्ण कपडेपट (!) रिसेलवर घेतला आहे.

चॅटींग, टेक्टींगच्या जमान्यात धपकन प्रेमात पडणार्या भाचीला मी वारंवार सांगते- अक्षर चांगले नसणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नकोस ग बाई. आता सांगते - ज्याचे अक्षर माहित नाही अशा व्यक्तीच्या प्रेमात पडू नकोस ग बाई.

काय रोल मधे आहे वगैरे माहिती आहे का नी? दोन लहान मुलींचा छान रोल आहे त्यात. लीड फीमेल रोल एकच आहे - ती रूपाली कृष्णराव छान आहे.

मला प्रचंड आवडली ती. तिने सुंदर काम केले आहे. पिक्चर बघणेबल नक्कीच आहे, मात्र जरा दिग्दर्शक दोन धाटणीच्या कथा दाखवायला गेला व काही ठिकाणी दोन्ही मिक्स झाल्यासारखे वाटते. कोळसा माफिया विरूद्ध सरकारने रचलेले डाव कधी दाखवलेत - ज्यात सरकारचे कार्यक्षम अधिकारी काय प्लॅन्स करतात वगैरे आहे. पण मधेच ते माफियाकडे जाउन डॉयलॉग्ज मारतात. माफिया वाल्यांची कॅरेक्टर्स मधेच "ग्रे" करण्याचा प्रयत्न, त्यांच्यातील एकाची माणुसकी जागी होणे वगैरे. हे एकसंध नीट करायला जमलेले नाही.

'भोपाळ- अ प्रेयर फोर रेन' अतिशय अंगावर आला. अर्थात ती घटनाच तशी असल्याने सिनेमात तसं असणं फार गरजेचं होतं. त्या काळरात्री काय झालं असेल याचं भयंकर प्रभावी चित्रिकरण. चुरचुरणारे डोळे धुण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून तळमळणारा दिलीप (राजपाल यादव) आणि त्याच्या बहिणीच्या लग्नातले वर्‍हाडी, पुरेशी औषधं नसल्याने परिस्थितीपुढे हताश डॉ.चंद्रा (मनोज जोशी) छान जमून आलाय. राजपाल यादवच्या बायकोचं काम करणार्‍या अभिनेत्रीचं काम पण आवडलं.

"अ‍ॅक्शन जॅक्सन" भिकार चित्रपट. >>>> १०००० अनुमोदन.
दावत-ए-इश्क ही बर्‍यापैकी बघणेबल आहे.

****स्पोईलर अलर्ट **** >>>> मस्त आहे Lol
<<अनुष्काचा लूक तिच्यापुरता आणि ९ वर्षाखालील मुलांसाठी नवा आहे >> Lol
<<अक्षर चांगले नसणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नकोस ग बाई. आता सांगते - ज्याचे अक्षर माहित नाही अशा व्यक्तीच्या प्रेमात पडू नकोस ग बाई..>> Lol

एलिझाबेथ एकादशीबद्दल सर्वाना +१

गोड, सिंपल, सरळसाधा चित्रपट. कोणी अभिनय करतंय असं वाटतच नाही. खूप नॅचरल काम केलंय सर्वांनी. शूटिंग कसं काय जमवलं पंढरपूरचं? सही झालंय गल्ल्याबोळांतलं, गर्दीतलं शूटिंग. चित्रपट बघतोय असं वाटतंच नाही. तिथेच फिरायला गेलोय आणि इकडेतिकडे बघतोय असं वाटतं. एकदम फील-गुड मुव्ही आहे. आजकाल बरेचसे चित्रपट 'वन टाईम वॉच' असतात पण हा परतही बघू शकेन असा आहे.

एलिझाबेथ एकादशीबद्दल सर्वाना +१

गोड, सिंपल, सरळसाधा चित्रपट. कोणी अभिनय करतंय असं वाटतच नाही. खूप नॅचरल काम केलंय सर्वांनी. शूटिंग कसं काय जमवलं पंढरपूरचं? सही झालंय गल्ल्याबोळांतलं, गर्दीतलं शूटिंग. चित्रपट बघतोय असं वाटतंच नाही. तिथेच फिरायला गेलोय आणि इकडेतिकडे बघतोय असं वाटतं. एकदम फील-गुड मुव्ही आहे. आजकाल बरेचसे चित्रपट 'वन टाईम वॉच' असतात पण हा परतही बघू शकेन असा आहे. >>>+ १००००

चिरंजीवानी पूर्ण बघितला , एका जागेवर बसून .
सध्या " दगड दगड " आमच्या प्लेलिस्ट मध्ये टॉप वर आहे.
तुनळीवरून गाणं खालीउतरवून घेतलयं .

ए ए मला पण आव्डला. इथली पोस्टे वाचूनच पाहिला. सिंगल पेरेंट आईचे स्ट्रगल म्हणून त्यात काय बघायचे असे बरेच दिवस वाटत होते रडू येइल वगैरे अश्या कारणे पण आई व त्याहूनही मुले फारच गट्सी आहेत ते फार छान वाट्ले बघायला. दगड दगड मला पण फारच आवडले. मुले छान, गरम बांगड्या मस्त. सायकल बाबांनी कशी बनवली होती वगैरे एक फ्लॅश बॅक हवा होता. अगदी हार्ट वॉर्मिन्ग झाले असते. पण जेम ऑफ अ लेडी म्हणजे सर्व त्रासात सुनेला मूक पणे साथ देणारी सासू. अश्या सासू साठी मी तर जान दिली असती. मस्त कॅरेक्टर आहे व खूप खरे. मस्त मुव्ही ओवरऑल.

सिंगल पेरेंट आईचे स्ट्रगल म्हणून त्यात काय बघायचे असे बरेच दिवस वाटत होते रडू येइल वगैरे अश्या कारणे पण आई व त्याहूनही मुले फारच गट्सी आहेत ते फार छान वाट्ले >>> अगदी अगदी .
आणि चित्रपट कुठेही मेलोड्रामा होत नाही .
अगदी मुलं मार खातात तेन्व्हाही .

मला आठवत , कळत नकळत बघताना , मुलं मार खातात तेन्व्हा मी फार रडले होते .
इथे डोळ्यात पाणि फक्त एकदाच आलं , तेही अतिआनंदाने - शेवटी त्या मित्राची आई येते पैसे द्ययला आणि इतके पैसे जमले याचा सगळ्याना विश्वास बसत नाही आणि आश्चर्य वाटते

बिपाशा बसुचा अलोन येत आहे.

त्याचा मूळ सौंदेडियन षिनेमा चारुलता यु ट्युबावर पाहिला . मस्त आहे.

बिपाशा बासू आता हॉरेक्स अशी एक जॉनर एस्टॅब्लिश करायच्या मागे आहे. म्हणजे काही नाही सुंदर बाईने भीती वाटून हा हू करायचे. असे तिने म्हटले आहे. क्रिचर थ्रीडी वगिअरे त्याच टाइपचे ते अलोन असणार. खरी भीती वाटून घ्यायची असेल तर बाबा डुक बघा.

बिपाशा बसुचा अलोन येत आहे. >> किती वाईट दिसतेय ती त्यात .
वय दिसायला लागलं .
म्हणजे तशीही ती सुंदर कधी वाटली नाही पण नो एन्ट्री , जमीन अशा काही चित्रपटात सुसह्य होती.

हो. अलोन जुन्याच कल्पना आहेत. अंधार , सावल्या , आर्शातील प्रतिमा , बाथ टबमध्ये हिरॉइन गुदमरणे , फ्यानला टांगलेले प्रेत दिसणे , पत्ते पिसुन भविसह्य वर्तवणे , शेवटी देवदेवस्की इ इ

चारुलता सिनेमा फार छान आहे. दोन जुळ्या बहिणी एकमेकीना कम्ब्रेतून चिकटलेल्या असतात आणि music शिकण्यासाठी (आय थिंक वायोलिन) एका गुरुकुल टाइप शाळेत जातात तिथे एक मुलगा त्या दोघींपैकी एकीवर प्रेम करू लागतो वैगरे वैगरे ......पुढे त्यातली एक मरते (जिच्यावर त्या मुलाच प्रेम असते) आणि दुसरी जिवंत राहते (ऑपरेशन करून त्यांना वेगळे करण्यात येते) मग सुरु होतो भुताचा खेळ असेच काही तरी. खरच छान आहे तो सिनेमा.

बिपाशा म्हातारी होत आहे. तिचे हिरो मात्र तरणे होत चाललेत>>>>>१००+ अनुमोदन.

Pages