चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुगंधा कुलकर्णी (लेखिका) परेश मोकाशी (दिग्दर्शक) कपल चा चित्रपट! एलिझाबेथ सायकल!! तिला विकण्यापासून वाचवण्यासाठी दोन मुलं जी धमाल करतात याचा चित्रपट 'एलिझाबेथ एकादशी'
संवाद खूप चटपटीत आणि निरागस!!

या पिक्चरच्या प्रोमोशनला हवा येऊद्या मधे ही सगळी टीम आली होती. मधुगंधाने एलिझाबेथ राणीसारखाच ड्रेस घातला होता.

हरिचान्द्राची फ्याकटरी नंतर परेश मोकाशी यांचा चित्रपट "एलिझाबेथ एकादशी" आजच बघितला. कथा/पटकथा/संवाद फारच छान. मुलांची काम मस्तच. मधुगंधा कुलकर्णी ( होणार सून ची लेखिका ) आणि जुळून येती मधली मोठी सून हिची पटकथा आणि संवाद. आईच काम करणारी नंदिनी/नंदिता धुरी यांनी ( एका लग्नाची मधली वकिली केस मधली एक अशील ( फटा फटा बोलणारी) आईच काम छान केलंय .सगळीच भट्टी मस्त जमून आल्येय . सिनेमा छान आहेच आणि जाहिरात पण भरपूर. त्यामुळे प्रेक्षक वर्ग भरपूर.

थोडासा किव्वा बराचसा टिंग्या सारखाच ( कथानक) आहे. .टिंग्या वडिलांनी विकू नये म्हणून छोटुनि केलेली धडपड . इथे एलिझाबेथ ( सायकल) आईनी विकू नये म्हणून चार छोट्यांनी केलेली धडपड आहे एवढाच फरक. टिंग्या पण मला खूप आवडला होता पण थियेटर रिकाम. हाच पण तशाच कथानकाचा सिनेमा पण थियेटर फुल Happy

मी कालच पाहिला एलिझाबेथ एकादशी.

एक सहजसुंदर, सरळ आणि मनाला भिडणारी कलाकृती असंच वर्णन करता येईल. अगदी ९० मिनिटांचा चित्रपट पण अगदी अ‍ॅप्ट. उगाच मालमसाला भरला नाही, फिल्मी भपकेबाजी नाही की ओढुन-ताणून जुळवलेलं कथानक नाही. लहान मुलांचा असून मोठ्यांनाही ९० मिनिटे खिळवून ठेवतो हा चित्रपट.

अगदी साधी कथा, सायकलभोवती गुंतलेली आणि ती अगदी साधेपणाने सादर केलेली अशी. लहान मुलांचे अभिनय तर अगदी वाखाणण्याजोगे. पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या आधी २ दिवसांत घडलेलं हे कथानक. खरं तर लहान मुलांच्या भावविश्वातील पण नकळतपणे वारीच्या निमित्ताने पंढरपुर सारख्या तिर्थक्षेत्री काय-काय घडत असतं यावर भाष्य करुन जातं आणि मोठ्यांना विचार करायला लावतं.

मधुगंधा कुलकर्णीने लिहिलेले संवाद फारच छान ! लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करुन त्यानुसार लहान मुलांच्या तोंडचे संवाद लिहिणं ही खरंतर मोठ्यांसाठी कठीण गोष्ट, पण छान पेललंय तिने हे शिवधनुष्य !

चित्रपटाचं चित्रीकरणही पंढरपुरातील गल्ली-बोळात झालंय त्यामुळे चित्रपट अगदी जिवंत वाटतो. यासाठी दिग्दर्शक परेश मोकाशींचे विशेष कौतुक.

एकंदर चित्रपट खूपच आवडला. लहानांबरोबर मोठेही एंजॉय करतील असाच.

जरूर पहाच !

अगदी पहिल्या दृश्यापासून डायरेक्टर आणि सिनेफो़टोग्राफर दाद घेऊन जातो. काय अप्रतिम चित्रण केले आहे...अगदी जिवंत..तिथेच सिनेमा वसूल होतो. आणि पोरांचे अभिनय तर दिवाळी बोनस आहे.....खाऊन टाकलाय सगळा चित्रपट ज्ञाना आणि झेंडूनी...त्यांच्याबरोबरचे बालकलाकार पण तितक्याच ताकदीचे....

परेश मोकाशींचे सगळ्यात जास्त कौतुक करावे यासाठी वाटले की कुठेही मेलोड्रामाच्या आहारी नाही गेले. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये तो धोका बराच असतो. प्रेक्षकांना रडवण्यासाठी उगाच ह्दस्पर्शी प्रसंग टाकण्याचा अट्टाहास नाही. जे आहेत ते कथेच्या फ्लोमधले आहे आणि कुठेही अतिशयोक्त वाटत नाही.
अजून एक म्हणजे फ्लॅशबॅकचा वापर टाळला आहे..खास करून वडीलांच्या बाबतीतला...त्यासाठी मोकाशींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत...
एकही पात्र अनावश्यक नाही...आज्जीपासून ते घरमालकीणीपर्यंत...
नंदिता धुरी देखील फारच छान...आईचा हळवेपणा, राग, चिडचिड सगळे इतके यथार्थ उभे केले आहे की आपली आईच डोळ्यासमोर येते...रागाच्या भरात मारणारी आणि नंतर स्वतच रडत रडत पोराला जवळ घेणारी....
लाजवाब....

आख्या सिनेमाचा यूएसपी म्हणजे संवाद आहेत...
मला शंभरपैकी ४२ मिळालेत गणितात हे पैकीच्या पैकी मिळाल्याच्या ठसक्यात म्हणणारी झेंडू
आणि तुमचे गणित चांगलेच असेल ना असे म्हणणारा ज्ञाना....
केवळ अप्रतिम....

सर्वांना मम! एक अत्यंत सुरेख चित्रपट- एलिझाबेथ एकादशी.

पेराले तेच उगवेल, ऊर्जा वाया जात नाही, फक्त रूप बदलते या सिद्धांतांचा इतका खुबीने वापर करून घेतला आहे! आंब्याची कोय पेरली की आंबाच येतो, बाभळ पेरली तर बाभळच येईल, चांगलं वागाल तर मधुर फळ मिळेल नाहीतर काही नाही- हा उपदेश प्रत्यक्ष कृतीमधून साकार होतो.

बाबांची शेवटची आठवण, जणू ज्ञाना-झेंडूचं अजून एक भावंडंच अशी ती एलिझाबेथ. पैशाची तंगी आहे म्हणून आपण घरातल्या माणसाला विकू का? नाही ना? मग एलिझाबेथला का विकायचं? मग तिला वाचवण्यासाठी काय काय करता येईल ते ते करू, पण तिला जाऊ द्यायची नाही. हा एकच विचार. आणि तो कृतीत आणण्यासाठी केलेल्या अनेक क्लृप्त्या- ही सिनेमाची गोष्ट. सिनेमाचा शेवट गोड होणार आहे हे माहित असलं तरी तो शेवटापर्यंत कसा नेला आहे हे पाहणं जाम उत्सुकतेचं ठरतं.

मुलांची आई म्हणून नंदिता धुरी कमाल! दोन लहान, हुशार मुलांची 'सिंगल मदर' होणं सोपी गोष्ट नाही. प्रपंच चालवणं, सासूच्या तब्येतीकडे लक्ष देणं, मुलंही भरकटत नाहीयेत ना याकडे डोळ्यात तेल घालून बघणं आणि पैशाची कधीच न संपणारी जमवाजमव करत राहणं... आई म्हणून ही व्यक्तीरेखा अक्षरशः जिवंत होते. तिचा संताप, निराशा, मुलांवर असलेलं प्रेम पर्फेक्ट.

आजीही अगदी आपल्या आजीसारख्या वाटतील अशा. आपला संसाराला काही उपयोग होत नाही, पण जमेल तेवढे हातपाय आपणही मारू. सुनेला दोन पैसे कमवून देऊ. 'पाच वाजून पाच मिनिटांनी' चहाचा स्टॉल लावणार्‍या आजी, माझ्या वातींचे पन्नास रुपये घे गं असं सांगणार्‍या आजी खरंच ग्रेट.

आणि सिनेमाचे खरे हीरो, अर्थातच सर्व मुलं. अतिशय महत्त्वाचं म्हणजे चुणचुणीत मुलं दाखवण्याच्या भरात रुपेरी पडद्यावरची मुलं अतीशहाणी दाखवली जातात. ही फाईन लाईन पर्फेक्टली सांभाळली गेली आहे. मुलं ही ज्या वयाची आहेत त्याच वयाप्रमाणे विचार करतात, बोलतात, घाबरतात, रडतात आणि स्वभावाला झेपेल इतकाच बेरकीपणाही करतात. ना कम ना ज्यादा. म्हणूनच ती थेट मनात घर करतात. ही मुलं टीव्हीवर लाईव्ह शोमध्येही आली होती, तेव्हाही खरंच निरागस वाटत होती. आपण स्टार आहोत असा आव कुठेही नव्हता, म्हणून त्यांचं जास्त कौतुक Happy

हा संपूर्णपणे दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. एलिझाबेथही टिळा लावून घ्यायला लाजते आणि मान फिरवते, बिडीचं दुकान नाही बांगड्यांचं- हे खुणेने सांगणं, आईचा डोळा चुकवून तिसर्‍याच्या गच्चीतून, चौथ्याच्या घरातून बिनदिक्कत पळणं, आई एलिझाबेथला काढणार नाही ना याची सतत असलेली धास्ती, 'व्यापारातली' सचोटी, 'गणिके'ची झालेली मदत... सगळंच वेल थॉट. कोणत्याही सिनेमाची गोष्ट ही पाच वाक्यात सांगून संपू शकते. काही लोक मात्र ती कमालीची रंगवून सांगतात. परेश मोकाशीही हे निश्चितच त्यातले एक. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत.

चुकवू नकाच असा निखळ चित्रपट- एलिझाबेथ एकादशी.

सगळ्यांनीच भरभरुन लिहिले आहे ह्या चित्रपटाबद्दल. पूनम, तुझे परीक्षण तर फारच मस्त.
ह्या शनिवार-रविवारी पाहायला हवा. फक्त तिकीटं मात्र आधी बुक करायला लागतील. शोज फुल्ल असतात हल्ली.

' लंचबॉक्स ' बद्दल अजुन कुणीच कसं नाही लिहीलं.. का माझ्या नजरेतुन हुकलं?
ईरफानचा अभिनय तर मस्तच पण निमरत कौर आणि नवाझऊद्दीन पण झक्कास!

अवांतर

<<एलिझाबेथ एकादशी >>
हा चित्रपट गोव्यात IFFI मध्ये दाखवला जाऊ नये अशी हिंदू जनजागृती समितीने मागणी केली आहे. Sad

HJS च्या वेबसाईट्वरूनः
The memorandum says that ‘Ekadashi ‘ is the tithi (eleventh day of the lunar month of Hindu Calendar) which is related to Hindu God Bhagvan Vishnu. There are twenty four Ekadashi’s in a year and each with a particular spiritual significance. Film director has created another ‘Ekadashi’ by naming it as an Elizabeth Ekadashi which is misleading and denigration of ‘Ekadashi ‘. This is hurting the religious sentiments of Hindus.

HJS च्या वेबसाईट्वरूनः
The memorandum says that ‘Ekadashi ‘ is the tithi (eleventh day of the lunar month of Hindu Calendar) which is related to Hindu God Bhagvan Vishnu. There are twenty four Ekadashi’s in a year and each with a particular spiritual significance. Film director has created another ‘Ekadashi’ by naming it as an Elizabeth Ekadashi which is misleading and denigration of ‘Ekadashi ‘. This is hurting the religious sentiments of Hindus.

यांना पोकळ बांबूचे फटके द्या....कसल्याही कारणावरून यांच्या धार्मिक भावना कशा दुखवातात....

अवांतर : शाब्बास!! इतकं करूनही खुसपट मिळालंच का काहीतरी या चित्रपटात!! धन्य!
This is hurting the religious sentiments of Hindus.>> किती नाजूक असतात धार्मिक भावना... जर्र्रा कोणी काही केलं लिहीलं पाहीलं तर टचकन दुखावल्या जातात!!! किती बांधून ठेवलेय,लिमीटेड करून ठेवलीये "कला"!! प्रत्येक बाबतीतली धार्मिक लुडबूड बंद केली पाहीजे आता!!!

स्वयंघोषीत धार्मिक अवतार काय कमी राडे करतात ते इथेही चालू झालं!!

यांना पोकळ बांबूचे फटके द्या....कसल्याही कारणावरून यांच्या धार्मिक भावना कशा दुखवातात....>>> +१ Lol मस्तच

त्यांना निमित्तच पाहिजे "एलिझाबेथ एकादशी" मधली एलिझाबेथ च्या ही भावना दुखावल्यात असं म्हणतील तीची एकादशी करतायत म्हणुन ,यांच्या पेक्शा चित्रपटातली मुलं बरी, ती मुलंसुद्धा जास्त हुषार आहेत आणि यांचा बालीशपणा सुरुच. Proud Happy

कोणीतरी चित्रपट बघताना त्यांच्या पायावर पाय दिला असेल पण अंधारात नीट दिसले नाही म्हणुन त्यांना वाटले की भावना दुखावल्या.
इतकेच

विटी दांडू - उगीच २.५ तास रेंगाळलेला तद्दन फिल्मी. अजय देवगणने उगीचच रोहित शेट्टीस्टाईल फिल्मीगिरी आणलीय. कथेत उणीवा आहेत. काही कलाकार फिल्मी संवादफेक करतात. पण दिलीप प्रभावळकर आणि गोविंदची भूमिका करणाऱ्या निशांत भावसार यांनी मस्त अभिनय केलाय. एक दोन सीन मध्ये दिलीपना सुद्धा फिल्मी अभिनय करावयास लावला पण सोनं कुठेही झळाळून येतं तसा त्यांचा अभिनय सुंदरच वाटला. कोकणाचे चित्रण मस्त आहे. काही ठिकाणी स्पेशल इफेक्ट कळून येतात आणि तितके अपील होत नाहीत पण ओवरऑल चित्रण सुंदर आहे.
२* (लांबी, गाणी आणि फिल्मीपणा कमी असता तर ३.५* देता आले असते)

एकादशी फारच सुंदर आहे. त्यासंबंधी वरच्या सगळ्या प्रतिक्रियांना +१

तिकीटं मात्र आधी बुक करायला लागतील. शोज फुल्ल असतात हल्ली.>. +१ हो मला गेल्या रविवारी मिळालं नाही ,आज सकाळच्या शोचे मिळाले. सुंदर आहे चित्रपट. बरीच (बालकं Happy )पाहुन आलेली दिसत आहेत माझ्यासहीत. Happy

मला "हॅपी जर्नी" (प्रिया बापट* - अतुल कुलकर्णी) बघायची उत्सुकता आहे. कोणी पाहिला तर इथे लिहा नक्की.

*चुक सुधारली. याआधी मि अमि आणि शँकिच्या पोस्ट्स दोन वेळा हे वाचुन गेले तरी हे माझ्याच पोस्टविषयी आहे असं वाटलंच नव्हतं. Proud

हॅपी जर्नी : कलरफुल नेत्रसुखद स्टोरी

हा चित्रपट बघावा संवादासाठी. ज्याने कोणी लिहिलेत त्याला हॅट्स ऑफ ! वानगीदाखल हे पहा, "अ‍ॅलीस तर अ‍ॅलीस नाहीतर गेलिस ऊडत. " , " अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय ह्या माझ्या मूलभूत गरजा आहेत.", ' माणस असतात असतात आणि एकदम नाहीशी होतात "

हा चित्रपट एक फँटसी आहे. पण कुठेही चमत्कार / अवाक करणारी द्र्श्ये यात नाहीत. मधे मधे चित्रपट रेंगाळतो ते एक खटकतं. पण ते तेवढ्यापुरत्च. दिग्दर्शकाला आपल्याला काय दाखवायच आहे याच भान आहे हे नेमक दिसत राहत. "सचिन कुंडलकर स्टाईल " अधोरेखित करणारी द्र्श्यही खुबीने पेरलीत.

अतुल कुलकर्णी, प्रिया बापट , पल्लवी सुभाष यांनी चोख काम केलीत. अतुल कुलकर्णीचा सेन्सुअस आणि रस्टी लुक आवडला. पल्लवी गोवन मुलीच्या भूमिकेत शोभून दिसते. आर्वजून ऊल्लेख करावा लागेल तो अ‍ॅलिसच्या आई वडीलांच्या भुमिका बजावलेल्या चित्रा पालेकर आणि शिवा सुब्रमण्यम ( टू स्टेट्स फेम) यांचा. केवळ दोन द्र्ष्यात हे दोघ लक्षात राहावी अशी छाप सोडतात.

सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. गोव्याच चित्रीकरण आहे अस वाटत (चूभूदेघे). अतुल / प्रिया / पल्लवी च्या वेशभूषाही ऊल्लेखनीय आहे. त्यामुळे कलाकरांचा स्क्रीन प्रेझेन्स सुखद अनुभव देतो.

शेवट काय होणार हे माहीत असूनही शेवटपर्यत प्रेक्षक खूर्चीत बसेल याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. गाणी मात्र ठीक्ठाक आहेत. एकंदरीत फ्रेश ट्रीट्मेंट्मुळे हॅप्पी जर्नी बघणेबल झालाय हे नक्कीच..

परेशच्या ए ए मधल्या नंदिता धुरीबद्दल...
आविष्कारची मुलगी आहे. उर्मिला पवारांच्या आयदानचे नाट्यरूपांतर केलेय आविष्कारने. त्यात नंदिता आहे.
बाकीच्या दोघी शुभांगी भुजबळ-सावरकर (बॉम्बे टॉकिजमधल्या दिवाकर बॅनर्जीच्या गोष्टीतली नवाजऊद्दिनची बायको) आणि शिल्पा साने अश्या तिघीजणी आहेत. सुषमा देशपांड्यांनी दिग्दर्शित केले आहे.
अप्रतिम प्रयोग. तिघीही तोडीसतोड कामे करतात. जरूर बघा.

आयदान चे नाट्यीकरण झालेय ? किती छान.
खरं तर हे पुस्तक सादर करणे अत्यंत कठीण आहे.

" बारोमास " पण आले का रंगमंचावर ?

अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय ह्या माझ्या मूलभूत गरजा आहेत.",

.......

आँ !

अन्न वस्त्र निवारा व इंटरनेट सोडले तर उर्वरीत गरजा बिनकामाच्या आहेत.

असे जामोप्या काही वर्शापुर्वी बोल्ले होते ना ?

Pages