MH 370चं काय झालं...

Submitted by पालथाघोरस on 15 March, 2014 - 01:41

मलेशियन ऐअरलाईन्सच्या MH 370 च्या गायब होण्याचे गूढ वाढत चालले आहे. तेरा देशांच्या चाळीस नौका, पन्नास विमाने, अत्याधुनीक उपग्रह ईमेजरीचा वापर करुनही या विमानाचा कोणताही मागमुस लागलेला नाही..
नवीन माहीतीनुसार ह्या विमानाने मार्ग बदलून पश्चिमैकडे प्रवास सुरु केला होता ,या विमानात अत्याधुनिक संपर्क यंत्रणा होत्या /आहेत. तरीही यातल्या एकाही यंत्रणेचा वापर झाला नाही ,या यंत्रणा लागोपाठ बंद पडत गेल्या .
या बोईंग 777 विमानाच्या रोल्स राईस इंजिनमध्ये असलेल्या अत्याधुनिक ट्रान्समिटरचा संपर्क उपग्रहाशी होता, विमानाचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क तुटल्यानंतरही उपग्रहाशी ईंजिनाचा संपर्क चालू होता. यातून विमान पश्चिमेकडे वळून भारताच्या दिशेने पूढे चार पाच तास प्रवास करत होते अशी नवी माहीती समोर आली आहे.
विमानाच्या बाबतीत काय घडले असेल असे आपल्याला वाटते.?
1.हा घातपाताचा प्रकार असावा, हायजॅक करुन क्रॅश घडवले असावे?

2.हा एक अपघात असावा, फक्त विमानाचे अवशेष सापडत नसावेत?

3.विमानाच्या बाबतीत ज्ञात अपघातांपेक्षा वेगळे काहीतरी घडले असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्युज मध्ये वाचल्याप्रमाणे, ती रडार बातमी देणे म्हणजे प्रत्येक देशाची सीक्युरीटीला होल पडणारीच आहे.

हा मुद्दा भारताच्या लक्षात आला असेलच ना?

>>महेश, सीरीयसली?? असा एक सरदार टाईप जोक वाचला होता.
नंदिनी, ह्म्म्म हे वाक्य वाचल्यावर मी डोक्याला हात लावून पाहिला Lol

३७० आकडा वाचल्यावर मला आधी वाटले की हा "भलत्याच विषयावरचा विषय चालू झालाय" Proud
नंन्तर निट वाचल्यावर कळले की हा विमानाचा नम्बर आहे. विषय गम्भिर आहे. Happy

आधीच १० दिवस झालेत, हातात आता जेमतेम २० दिवस आहेत फ्लाईट आणि मुख्यत्वे ब्लॅक बॉक्स शोधायला, कारण त्याची बॅटरी ३० पर्यंतच चालते.. जर हे अजून २० दिवसांत मिळवणं शक्य नाही झालं तर फ्लाईटचं नक्की काय झालं होतं हे कायमच एक गूढ राहील.

>>>

एकर फ्रान्स ४४७ (रिओ ते पॅरिस) जुन २००९ मध्ये समुद्रात पडले. त्याचा ब्लॅकबॉक्स मय २०११ मध्ये मिळाला. त्यातून मिळालेल्या माहितीतून ते विमान का अपघातग्रस्त झाले ह्याचा पुरावा मिळाला. ब्लॅक बॉक्स एकच महिना चालू राहतो वगैरे चूक आहे.

सिरीयसली! लिम्बुभाऊ वेळ कळु शकेल की गुगलवरुन. मात्र प्रश्न कुन्डली किन्वा कृष्णमुर्ती पद्धतच वापरावी लागेल. पारम्पारीक पद्धतीला सोडचिठ्ठी द्या आता.

मी म्हणतोय की अमेरिकन सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत मतावर लोकांचा विश्वास नाहीये. कृपया इथे पहा : http://en.wikipedia.org/wiki/Opinion_polls_about_9/11_conspiracy_theories . तिथे २००८ सालच्या सर्वेक्षणानुसार जागतिक सरासरीने केवळ २५% लोक अल-कायद्याने ९११ घडवले असे मानतात.>>
तुम्ही ह्याच ग्राफबद्दल बोलत असाल तर आकड्यांची सरमिसळ झालेली आहे.

http://en.wikipedia.org/wiki/File:911worldopinionpoll_Sep2008_pie.png

बर लोकहो इथे विमानाशी/ त्याच्या अपहरणाशी आणी त्याच्या उड्डाणाशी सम्बधीतच चर्चा करा.:फिदी: ती चर्चा योग्य हवाई मार्गावरच चालू द्या, नाहीतर विमान भरकटले तशी चर्चा पण भरकटत जाऊन हा बाफ विमानासारखाच अस्तन्गत होईल.:डोमा::दिवा:

चला आता विमानाची कुंडली मांडुन शोध घेणे चालु आहे ? Uhoh

मागे कुठेतरी वाचलेले की मलेशियन प्रधानमंत्री ने जादुटोणा करणारे आणलेले होते शोध घेण्यासाठी ..

लिंबुभाउ फुल्ल स्कोप आहे तुम्हाला मलेशियन प्रधानमंत्रीला लवकर गाठा ..... Happy

लिंबूभाऊ, ह्या ब्रिगेडी शक्तींचा हात असणार अशी मला दाट शंका आहे. जरा कुंडली मांडून काही मिळतय का बघा.

गापै, लगे हात एक चश्मा पण विकत घेऊन टाका.

ओपिनियन पोल म्हणजे मते.

अमेरिकेत तसेच भारतातहि सर्वांना मते असतात. मत व्यक्त करण्याचा हक्क असतो. काही देशात नसतो. पुरावा नसला तरी मत व्यक्त करण्याचा हक्क असतो. मत व्यक्त करणे म्हणजे सत्य सांगणे नव्हे. अमुक माणसाने तमुक माणसाचा खून केला असे मत असू शकते. पण ते कोर्टात उभे राहून, खरे सांगेन अशी शपथ घेऊन सांगितले तर ते खरे का खोटे हे पडताळून पहाता येते. आणि खोटे निघाल्यास खोटे सांगणार्‍याला शिक्षा होऊ शकते. मताचे तसे नाही.

ज्या देशात बरेच लोक अजूनहि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मत व्यक्त करतात त्या देशात तरी मत काय आहे नि सत्य काय आहे, यात बरेच अंतर असते.

हातात आता जेमतेम २० दिवस आहेत फ्लाईट आणि मुख्यत्वे ब्लॅक बॉक्स शोधायला, कारण त्याची बॅटरी ३० पर्यंतच चालते. >>> तुम्ही जी बॅटरी म्हणताय ती पाण्याचा स्पर्श झाल्यावर चालु होणार्‍या पाण्याखाली चालणार्‍या फ्लाईट रेकॉर्डरच्या लाईट्सची असते , जिच्यामुळे पाण्याखाली शोध घेण थोडसं सोपं होतं.

काय राव गापै. तुम्ही पण गंमत करताय.
विमानाची कुंडली मांडायची आयड्या भारी आहे. Lol

<<आयला, तुम्ही पाकीस्तानी लष्कराला ही आयड्या विकत द्या, पाच पिढ्यांची सोय होईल. पण तत्पूर्वी भारत सोडून कुठेतरी पळून जा!
>>

झक्की महाराज, सत्य हे कल्पनेपेक्षा काल्पनिक असतं. ९/११ किंव २६/११ व्हायच्या आधी तुम्हाला कोणी हे होणार म्हणून सांगितलं असतं तर तुम्ही हेच बोलला असतात. सध्याच्या जगात naive रहाणं मूर्खपणाच! आणि जोपर्यंत काहीच सुगावा पुराव्यासहीत लागत नाही तोपर्यंत कुठलीही शक्यता नाकारता येत नाही.

Facts -
१. इस्राईल Hi Alert वर गेले आहे. ते विमान इराणी किंवा इतर मुस्लिम अतिरेक्यांच्या हातात गेले असण्याची शक्यता ते नाकारत नाहीयेत.
२. विमानाने ठरलेला मार्ग "बदलल्यानंतर" co-pilot ने Ground Control ला Good Night! असा संदेश पाठवला आहे.
३. विमानाचा मार्ग हा route program change आहे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय हे सहजी शक्य नाही असे म्हटले आहे.
४. विमान दुर्घटना-ग्रस्त झाले असेल तर infra-red लहरी निर्माण होतात असे ऐकलेय. या लहरी सॅटेलाईट्स नी पकडायला हवी होती. कुठल्याही देशाने ही नोंदवली नाहीत. ( किंवा कमीत कमी सांगितले तरी नाहीये. पण न सांगायचे कारण कळत नाही!)

इस्राईल कंबर कसुन तयारी करत आहे. लश्कराची जमवा जमव चालू झालीय.

The Malaysian government reportedly is investigating the possibility that missing Malaysia Airlines Flight MH370 avoided radar detection and landed in Pakistan near the Afghanistan border inside Taliban-controlled territory, according to the UK Independent . . . investigators confiscated a homemade flight simulator from the pilot’s home to see if it reveals any useful information . . . the Malaysian foreign minister told reporters that Malaysia asked several Asian countries for assistance in its investigation, including Pakistan . . . Pakistan dismissed the idea that a Boeing 777 could land undetected inside the country but promised to work with the Malaysian government in its search for the missing plane . . . a LIGNET analyst received information from a source at Boeing that the company believes the plane did land in Pakistan . . . Israel is taking the possibility of a terrorist attack seriously by mobilizing air defenses and scrutinizing approaching civilian aircraft, according to the Times of Israel . . . a Boeing 777 requires a lengthy, 7,500-foot runway, and Pakistan has many of them, meaning Flight 370 could conceivably be hidden in a hangar inside the country . . . U.S. surveillance of the area may be able to shed light on the theory through satellite imagery or signals intelligence.

Ref: http://www.lignet.com/InBriefs/Malaysia-Hunts-for-Missing-Jet-in-Pakista...

पाकीस्तानस्थीत आतंकी लोक इस्राईल वर आक्रमण करण्या अगोदर कित्येकदा विचार करतील, पण भारत
एक सॉफ्ट टारगेट अगोदर आहे त्यामूळे आतंक्यांनी इस्राईल ऐवजी भारतावर आक्रमण अशक्य नाही.

पण ईथे भारतात लोकच ईतकी निर्धास्त असतात मग सरकार कस काय मागे असणार ? भारताने शोध
कार्य केंव्हाच बंद करुन टाकलय !!

बाकी हल्ला झाला तर बघु !! असही ईथे बदलापुर अंबरनाथ पर्यंत त्याची झळ काही पोहोचायची नाही. !!

प्रवाशांच्या लिस्ट मधली भारतीय नावे -

६० कोलेकर / चेतना वय ५५
६१ कोलेकर / स्वानंद वय २३
६२ कोलेकर / विनोद वय ५९
११८ शर्मा / चंद्रिका वय ५१
१२० शिरसाट / क्रांती वय ४४

(मिपा. या साईटवरून!)

टण्या जी, श्री जी >> ब्लॅक बॉक्स ३० दिवसात शोधणं ह्या साठी महत्वाचं आहे कि जो सर्च एरिआ तो ६००००० स्क्वेअर किलोमीटर आहे.. ब्लॅक बॉक्सची बॅटरी ३० दिवस असते आणि त्याच कालावधीत तो पाण्याखालूनही अल्ट्रा साॅनिक पल्स ट्रान्समिट करत असतो जो सोनार लोकेटिंग इक्विपमेंट २ मैलाच्या परीघामध्ये पकडू शकतं. हिंदि महासागराची खोली साधारण ८०४७ मीटर.. त्यात मलेशियाची कुवत, हलगर्जीपणा हे सगळं पहाता ३० दिवसांनंतर ब्लॅक बॉक्स मिळण्याची शक्यत धुसर होते. एअर फ्रान्स ४४७ चं उदाहरण एकदम योग्य आहे पण फ्रांस आणि मलेशियाच्या कुवतीचा फरक लक्षात घ्या.. एक तीन फुटी पेटी समुद्राच्या तळाशी शोधनं, ते पण काही बिपिंग, सिग्नल पल्स नसताना, खूप कठीण आहे भाऊ.. म्हणून ३० दिवस.. आणि आता फक्त १७ दिवस..

टण्या आणि श्री,
९/११ आणि २६/११ च्या आधी हे असं होऊ शकतं हे तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही अगदी हेच बोलला असतात गापैंना. आता पण हेच. दूरदृष्टी नसणे आणि सखोल विचार न करता येणे हे घातक ठरू शकते भारतीयांना. चालुद्या Happy

सध्याच्या जगात naive रहाणं मूर्खपणाच! सत्य हे कल्पनेपेक्षा काल्पनिक असतं.

सध्याच्या बातमी नुसार ऑस्ट्रेलियाच्या जवळ समुद्राखाली काहीतरी सापडले आहे, ते त्या विमानाचा भाग असण्याची शक्यता आहे असे या क्षेत्रातील बरेच तज्ञ सांगतात.

अर्थात हेहि केवळ अनेक वर्षे या गोष्टींचा अभ्यास केलेल्या लोकांचे नुसते मतच आहे.

त्यांनी अजून मायबोलीकरांचे मत विचारले की नाही हे सांगितले नाही. तोपर्यंत त्यात काही अर्थ नाही.
अगदी अल कायदाने मान्य केले की ९/११ त्यांनीच केले, तसे पुरावेहि ज्यांना कळते त्यांनी मान्य केले, पण त्यात काही अर्थ नाही. पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वी भोवती फिरतो अशी मते असणार्‍या अनेक लोकांचे मतच महत्वाचे
ना?

मी आजच तुम्हा सर्वांचे लिखाण अमेरिकेच्या सी आय ए किंवा जी संस्था याचा शोध घेत आहे त्यांना पाठवतो. म्हणजे उगाच इकडे तिकडे वेळ नि पैसे घालवण्याचा naive पणाचा मूर्खपणा ते करणार नाहीत.
अर्थात त्या आधी तुमच्या लेखी परवानगीची वाट पहातो.

Happy

सध्याच्या जगात naive रहाणं मूर्खपणाच!
पण असे नुसते म्हणायचे असते ना! करायचे काही नाही.

होइना का लोकसभेवर हल्ला, कारगिल, मुंबईच्या गाड्यांमधे स्फोट, २६/११?

ते काय कल्पनेपेक्षा काल्पनिक सत्य. पण naive रहाण्याचा मूर्खपणाच नव्हे!

तो अमेरिकेत. एकदा ९/११ होऊन गेले त्याला १२ वर्षे उलटून गेली, अजून तसले काही झाले नाही, अमेरिकेच्या भूमीवर.
पण त्याचे कारण त्यांचा naive रहाण्याचा मूर्खपणाच! त्यांना कल्पनाच नाही की सत्य हे कल्पनेपेक्षा काल्पनिक असते.

<<सध्याच्या बातमी नुसार ऑस्ट्रेलियाच्या जवळ समुद्राखाली काहीतरी सापडले आहे>> हे काहीतरी दि १६ मार्च ला सापडलं आहे इतके दिवस का घेतले?

Pages