निरोप १

Submitted by सन्केत राजा on 13 March, 2014 - 04:34

२९ फेब्रुवारी २०११. आज हायस्कुलचे मैदान गजबजत होते. तसे ते रोजच गजबजायचे पण फ़क्त सकाळच्या वेळी प्रार्थनेसाठी. आज कारणही फ़ार वेगळे होते आणि वेळही. संध्याकाळचे ४ वाजले आणि सगळ्या वर्गातल्या मुलांना बाहेर येऊन मैदानात बसण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे सर्व मुले रांगेने बाहेर येऊन मैदानात बसत होती. सगळा शिक्षकवर्ग सुद्धा येऊन समोर मांडलेल्या खुर्च्यांवर बसला. कार्यक्रम सुरु करण्याच्या उद्देशाने शालेय सांस्कृतीक विभागाचे प्रमुख श्री. पाटील सर उठले, "विद्यार्थीमित्रांनो, आपणा सर्वांना माहितच असेल की येत्या १ मार्च २०११ पासुन माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इ. १० वी ची परिक्षा सुरु होत आहे. त्यामुळे आज आपण इथे आपल्या प्रशालेत शिकणार्या १० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत. तेव्हा सर्वप्रथम मी इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन परीक्षार्थींना शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद."
प्रास्ताविक संपवून सर खाली बसले आणि ९ वी मधील एक मुलगी पुढे आली. "माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मला हे सांगताना वाईट वाटत आहे की उद्यापासुन १० वी ची मुले या शाळेत आम्हाला दिसणार नाहीत. आम्ही जेव्हा ५ वी मध्ये आलो तेव्हापासुन त्यांच्यातल्या प्रत्येक जणाला पाहात आलो आहोत ते आजपर्यंत. पण यापुढे मात्र आम्हाला ती दिसणर नाहित याची खंत वाटते. असो. तर आज मी त्यांना आमच्या ९वी च्या वर्गातर्फ़े परीक्षेसाठी शुभेच्छा देते. प्रत्येकाला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळु दे अशी इच्छा करते आणि त्यांना निरोप देते."
ती आपल्या जागेवर जाऊन बसली. आणखी २-४ मुलांनी शुभेच्छा दिल्या आणि ८ वी च्या वर्गाला आवाहन करण्यात आले. या वर्गातील काही मुलांनी शुभेच्छार्थ भाषण केले. क्रमाक्रमाने एकेका वर्गातील मुले येऊन बोलून गेली आणि पाटील सर १०वी च्या वर्गाकडे वळले. "आता मी १०वी च्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपले मनोगत व्यक्त करावे." असे म्हणुन सर बसले तेव्हा...........................................................................................................
सगळ्यांचे लक्ष १०वी च्या मुलांकडे गेले आणि सगळ्यांनाच ते प्रथमच बघायला मिळाले__________________________________________

इयत्ता १०वी च्या मुलांचे, विशेषत: जे इतर वेळी कोणत्याही शालेय कार्यक्रमात भाषणे करण्यात माहिर असायचे त्यांचे चेहरे आज का कोण जाणे, उतरलेले दिसत होते

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users