सामाजिक उपक्रम २०१४ - आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 10 March, 2014 - 09:57

नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे पाचवे वर्ष. हा उपक्रम आता तसा आपल्याला नवा नाही. तरीही नवीन सभासदांना माहिती व्हावी ह्यादृष्टीने ही थोडक्यात ओळख.

ह्या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना वस्तुरुपात मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. त्याकरता देणग्या मागवण्याचे हे आवाहन आहे.

देणग्या मार्च-एप्रिल ह्या २ महिन्यात मागवण्यात येतात. नंतर एकुण जमा झालेल्या निधीतुन संस्थांच्या प्राधान्यानुसार वस्तु खरेदी करुन त्यांना पोचवल्या जातात व त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते.

ही झाली थोडक्यात ह्या उपक्रमाची ओळ्ख.

आतापर्यंत ज्या संस्थांना मदत केली गेली आहे व ज्या संस्थांची ह्यावर्षी नावे कळली आहेत त्यातल्या काही संस्थांनी त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे ते आधीच कळवलेले आहे. काही नंतर कळवतील.

वरील संस्थांची ओळख ह्याच धाग्याच्या पहिल्या प्रतिसादात करुन देत आहे (जेणेकरुन मुख्य धागा फार मोठा होणार नाही).
ओळख - प्रतिसादाची लिंक
http://www.maayboli.com/node/48057#comment-3056644

त्याचप्रमाणे मायबोली अ‍ॅडमिन टीमच्या सुचनेनुसार ह्यावर्षीपासुन देणगी मागवायच्या धोरणात बदल केला आहे तो असा,
देणगीदारांनी आपली देणगी आता थेट संस्थेच्या ८०जी खात्यावर पाठवायची आहे. त्यात नक्की काय करायचे आहे ते ह्याच धाग्याच्या दुसर्‍या प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे.
देणगी पाठवायची पद्धत - प्रतिसाद दुसरा लिंक
http://www.maayboli.com/node/48057#comment-3056645

पैसे जमा करण्याकरता सर्व संस्थांच्या बँक खात्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे

bank accounts list.jpg

आशा आहे हा उपक्रम मागील वर्षापेक्षा जोरदार होईल.

सामाजिक उपक्रम टीम चमु - अकु, मो, स्वाती२, केदार, सुनिधी, जाई, कविन, असामी.
संस्थेशी व्यवहार करताना मदत करणारी मंडळी - साजिरा, नीधप, हर्पेन, जिज्ञासा

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अनिकेत.

शबरी सेवा समिती संस्थेने कळवलेली त्यांची गरज - व्यायामाची साधने - वरील यादीत अ‍ॅड केली आहे.

धन्यवाद जाई.....

ईमेल आलाच पाहिजे असे काही नाही आता....रक्कम तुमच्याकडे कशी पाठवायची तेवढे मात्र इथे कळविलेस तरी चालेल...

नमस्कार मायबोलीकर,

सामाजिक उपक्रम २०१४ साठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! अजूनही या उपक्रमासाठी कुणाला मदत करायची इच्छा असेल तर त्यांचे स्वागत आहे. इच्छुक देणगीदारांनी इमेल द्वारे संपर्क करावा ही विनंती.

देणगीदारांनी देणगी कुठल्या पत्यावर पाठवायची, मेमोत काय लिहायचे याबाबतचा तपशील लवकरच इमेलने कळवण्यात येईल तसेच इथे बाफवरही माहिती दिली जाईल. देणगीदारांनी पावती स्वतःच्या नावाने घ्यावी आणि देणगी दिल्यावर त्यासंबंधीची माहिती स्वयंसेवकांना कृपया इमेलने कळवावी.
प्रत्येक लाभार्थी संस्थेला एकूण किती नीधी उपलब्ध होत आहे त्यानुसार कोणत्या वस्तू विकत घ्यायच्या, तसेच कुठून अणि किती किमतीला विकत घ्यायच्या याची माहिती संस्थेकडून मागवली जाईल. वस्तूंची खरेदी झाल्यावर त्याबाबतची माहिती इथे बाफवर दिली जाईल.

देणगी देण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या सर्व प्रतिसादकांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!

ज्यांनी ज्यांनी आमच्यापैकी कोणाला इमेलद्वारे देणगी देण्याबद्दल कळवले आहे त्या सर्वांना येत्या कालावधीत आम्हा ७ जणांपैकी कोणीही एक स्वयंसेवक संपर्क करतील. तरी आपले इमेल कृपया चेक करत राहावे ही विनंती. काहीजणांना ऑलरेडी संपर्क केला आहे व त्यांचा त्यानुसार प्रतिसादही मिळाला आहे.

अरुंधती....

मला अजूनी ई-मेल आलेला नाही.... जाईने सांगितले होते की रक्कम कशी पाठवायची ते ई-मेलद्वारे कळविले जाईल.

तरीही माझा ई-मेल इथे देत आहे : ashokkolhapur@gmail.com

लोकहो
तुम्ही करत असलेल्या मदतीबद्दल आभार
आम्हा सर्वापैकी लवकरच एक स्वंयसेवक आपणास संपर्क करेल
निश्चित रहा

पैसे जमा करण्याकरता सर्व संस्थांचे बँक अकाऊंट डिटेल्स वरती हेडरमध्ये टाकले आहेत.
सर्व देणगीदारांना स्वयंसेवक मेलमध्ये खातेक्रमांक पाठवतीलच, पण पडताळणी करण्याची झाल्यास आपणास वरचे क्रमांक वापरता येतील.
कोणालाही खातेक्रमांकाबद्दल काही प्रश्न असल्यास आम्हाला कळवा.

सुनिधी, अकु - मी अकुला संपर्क (फोन कॉल) करायचा प्रयत्न केला आहे पण बोलणे होऊ शकले नाहीये. प्लीज मला कोणीतरी फोन करु शकेल का?

झालं काम, हर्पेनशी बोलले आहे. धन्यवाद.

महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४ : आतापर्यंतचे अपडेट्स : (२ जून २०१४)

१] भगीरथ ग्रामविकास समिती, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या संस्थेच्या विनंतीनुसार देणगीदात्यांनी दिलेल्या देणग्यांतून शाळेतील मुलींना सायकल शिकण्यासाठी व सरावासाठी सायकली घेऊन देण्यात आल्या. तसेच एका गरीब, गर्भवती, ग्रामीण महिलेला कॅल्शियम व आयर्न गोळ्यांचा स्थानिक डॉक्टरांकडून नऊ महिन्यांसाठीचा पुरवठा करण्यात आला. संबंधित पावत्या देणगीदारांकडे सुपूर्द करण्यात आल्या. संस्थेने पाठवलेले फोटोग्राफ्स व आभारपत्र लवकरच प्रकाशित करू.

२] निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा : संस्थेकडे देणगीदात्यांनी आपली देणगी रक्कम जमा केली आहे. संस्था या रकमेतून शाळेतील मुलांना वैज्ञानिक प्रयोगांसाठी लागणारे साहित्य विकत घेणार आहे. ह्या कामाची पूर्तता अद्याप बाकी आहे. आतापर्यंत रक्कम जमा केलेल्या देणगीदारांना पावत्या रवाना झाल्या आहेत.

३] अस्तित्व प्रतिष्ठान : संस्थेच्या खात्यात देणगीदारांनी जमा केलेल्या देणगीतून संस्था लवकरच त्यांच्या गरजेची वस्तू विकत घेणार आहे. देणगीदात्यांना पावत्या दिल्या गेल्या आहेत.

४] सावली सेवा ट्रस्ट : संस्थेमार्फत शिक्षण घेणार्‍या मुलांच्या शैक्षणिक शुल्क (स्कूल फी), अन्य शैक्षणिक खर्च व गणवेशासाठी देणगीदारांनी संस्थेच्या खात्यात देणग्या जमा केल्या. आतापर्यंत जमा झालेल्या देणगीदारांना पावत्या पाठवण्यात आल्या आहेत. जूनमध्ये शाळा सुरु झाल्या की गणवेश खरेदी व शैक्षणिक शुल्क भरणे हे पूर्ण होईल. त्याबद्दलचे अपडेट्स संस्था देईलच. काम पूर्ण झाले की संस्था आभारपत्र देईल.

५] स्नेहालय : संस्थेच्या खात्यात देणगीदारांनी आपापली देणगी जमा केली व त्यानुसार त्यांना पावत्या पाठवण्यात आल्या आहेत असे संस्थेने कळवले आहे.

६] मैत्री संस्था : मैत्री संस्थेने वैज्ञानिक प्रयोग साहित्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानुसार देणगीदात्यांनी मैत्रीच्या खात्यात पैसे भरले आहेत. संस्थेकडून पुढील कार्यवाही संदर्भात अपडेट्स येणे बाकी आहे. देणगीदात्यांना संस्थेने पावत्या पाठवून दिल्या आहेत.

७] सुमति बालवन संस्था : संस्थेने सुरुवातीला गरज नोंदवताना शालेय साहित्य (स्टेशनरी) व कपाटाची गरज असल्याचे सांगितले होते. परंतु ह्या शाळेला इयत्ता आठवी सुरु करण्याची परवानगी मिळू शकेल असे नुकतेच कळाले आहे. त्यासाठी शाळेत प्रयोगशाळा व वाचनालय असण्याची अट आहे. ही अट पूर्ण करण्यासाठी शाळा नवे बांधकाम करत आहे. देणगीदारांनी जमा केलेली रक्कम ह्या बांधकामाचे साहित्य विकत घेण्यासाठी वापरत आहोत असे शाळेने कळवले आहे. आतापर्यंत देणगी दिलेल्या सर्व देणगीदारांना पावत्या रवाना झाल्या आहेत.

८] शबरी सेवा समिती : शबरी सेवा समितीने शाळेतल्या मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग साहित्य संच घ्यायचे ठरवले असून त्यांची साहित्य खरेदी प्रक्रिया चालू आहे. त्यांना ह्या साहित्यासाठी सामाजिक उपक्रमाद्वारे देणगी देणार्‍या दात्यांना त्यांनी पावत्या पाठवल्या आहेत. संस्थेची खरेदी पूर्ण झाल्यावर संस्था आभारपत्र व खरेदीचे तपशील देणार आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

अद्याप काही देणगीदारांची देणगी जमा होणे बाकी आहे. त्यांनी काही अपरिहार्य कारणामुळे मुदत वाढवून मागितली आहे. त्या त्या संस्थेकडून त्यांच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी, त्याबद्दलचे अपडेट्स / फोटोग्राफ्स इत्यादी आणि आभारपत्रे पाठवली जातीलच! त्यानुसार वेगळा धागा काढून त्यावर हे सर्व तपशील प्रकाशित करू. मात्र त्यासाठी बहुधा जून अखेर / जुलै उजाडेल असे दिसते.

देणगीदात्यांनी दिलेल्या आश्वासक प्रतिसादामुळे व ह्या उपक्रमात काम करणार्‍या स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत हे काम चालू आहे व समाधानकारक रीतीने पार पडत आहे.

ह्या संदर्भातील सर्व औपचारिकता पूर्ण झाली की नव्या धाग्यावर सर्व तपशील देऊच. आणि ह्या धाग्यावर त्याची लिंकही देऊ.

धन्यवाद!

(उपक्रमात सामील स्वयंसेवक : सुनिधी, मो, स्वाती२, अकु, असामी, जाई., कविन.
संस्थेसोबत समन्वयाचे काम : हर्पेन, साजिरा, नीधप)

अरुंधती....

छान आढावा घेतला आहे आणि वाचून आनंदही झाला की देणगी स्वीकारलेल्या संस्थांनी त्या संदर्भातील कार्यवाहीही लागलीच केली आहे.

पावती मलाही तात्काळ आली. पण केवळ पावतीच नव्हे तर सुमति बालवन संस्थेच्या संचालकांनी प्रत्यक्ष फोन करून माझे आभार तर मानलेच शिवाय संस्थेच्या परिसराला आवर्जून भेट देऊन कार्यही पाहाण्याचे निमंत्रण दिले. हे इथे सांगणे गरजेचे वाटले म्हणून हा प्रतिसाद.

धन्यवाद अशोक! सुमति बालवनला मीही लवकरच प्रत्यक्ष भेट देणार आहे. तेव्हा सचित्र वृत्तांत इथे देईनच. Happy

भगीरथतर्फे दोन महिलांच्या घरी जाऊन सप्लीमेंटस देणे या कार्यक्रमाला हजर राहिले गेल्या आठवड्यात. त्याचे फोटो भगीरथच्या फेसबुक पेजवर आहेत. अकु तुला आणि कविला मेन्शन करतेय तिथे म्हणजे ते फोटो दिसतील. सुनिधी माझ्या फेबु लिस्टीत नसल्याने तिला मेन्शन करता येणार नाही.

यावर्षीच्या दिवाळीची भाऊबीज म्हणून एका संयुक्तेने व तिच्या लेकाने सावली सेवा ट्रस्ट, पुणे येथील ५० मुलींच्या नव्या ड्रेसेससाठी सावली ट्रस्टला देणगी दिली आहे. त्यामुळे शाळेच्या शेवटच्या दिवशी मुलामुलींना नव्या ड्रेसेसचे वाटप करता आले. दिवाळीच्या फराळाचे पुडे आणि नवे ड्रेसेस यांमुळे मुलंमुली विलक्षण हरखली होती.

त्यांची दिवाळी आनंदी बनवणार्‍या मायबोलीकर संयुक्तेचे व आपल्या या सार्‍या बहिणींना भाऊबीज पाठवणार्‍या तिच्या लेकाचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक!! Happy

(ड्रेस खरेदीची पावती व देणगीची पावती सावली ट्रस्टने या संयुक्ता सदस्येस पाठवून दिले आहे.)

Pages