राजीव गांधी आरोग्य योजनेसाठी "आरोग्य कार्ड" कसे मिळवावे?

Submitted by राहुल१२३ on 6 March, 2014 - 11:13

सध्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर टीव्हीवर अनेक सरकारी योजनांच्या जाहिराती येत आहेत. अनेकांना या योजना अस्तित्वात होत्या हेच माहिती नव्हते.

"राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना" ही त्यातलीच एक. या योजनेनुसार भगवे/पिवळे रॅशन कार्ड धारकांना प्रति कुटुंब १,५०,००० रुपयांचा आरोग्यविमा सरकार तर्फे दिला जाणार आहे, पण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी "आरोग्य कार्ड" असायला हवे.

हे आरोग्य कार्ड कुठे मिळेल, त्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल? याची माहिती द्याल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कर्नाटकात हे कार्ड वाजपेयी आरोग्यश्री कार्ड नावाने मिळते.
आपल्याकडे बीपीएल कार्ड असेल तर जवळच्या सरकारी हॉस्पिटलातून ते दाखवून आरोग्यश्री कार्ड बनवून घेता येते.
जिल्ह्याच्या सिविल हॉस्पिटलात ओपिडी चिठ्ठी मिळते तिथेच आरोग्यश्री कार्डचा काऊंटर आहे.

तुम्ही मुंबईचे आहात असे दिसतय. तुम्ही नेमके कुठे रहाता ते सांगितले तर तुमच्या एरियातील कोणत्या हॉस्पिटलात संपर्क करावा हे कदाचित सांगता येईल. गोवंडीत शताब्दी रुग्णालयात काउंटर आहे. चेंबुरमध्ये सुश्रुत हॉस्पिटलात ( स्वस्तिक पार्क) आहे. तिथे आरोग्य मित्र बसलेला असतो. त्याच्या अ‍ॅप्रनवर छानपैकी मोठ्या अक्षरात आरोग्यमित्र असे छापलेले असते.

राजीव गांधी कार्ड हे पिवळे व भगवे कार्ड धारकांना आहे. पण राजीव गांधी कार्ड अजुन काढले नसेल तरी रेशन कार्ड दाखवून बेनेफिट घेता येईल असे वाटते. त्यासाठी त्या हॉस्पिटलातील आरोग्य मित्राला संपर्क करावा. त्याच्याकडून माहिती मिळेल.

सगळ्या हॉस्पिटलात सगळ्याच रोगांवर उपचार घेता येत नाहीत. म्हणजे एखादे हॉस्पिटल हाड मोडणे याच्या उपचारासाठी असेल, एखादे क्यान्सरसाठी असेल. वगैरे वगैरे. त्याची आधी चौकशी करावी.

http://jeevandayee.gov.in/RGJAY/RGJAY.jsp

eligible families in these districts shall be provided with Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana Health Cards in due course of time. This Health Cards will be used for identification of Beneficiary families in the family under the Scheme. Family Health Cards will be prepared by using data from valid Yellow or orange ration cards coupled with Aadhaar numbers issued by UID authorities. As an interim measure till the issuance of health cards, the valid Orange/Yellow Ration Card with Aadhaar number or in case Aadhaar number not available, any Photo ID card of beneficiary issued by Govt. agencies (Driving License, Election ID,) to correlate the patient name and photograph would be accepted in lieu of health card.

लक्ष्मीचाची, Happy

मी बोरीवली भागात राहतो, याभागातल्या तसेच दादर-परळ भागातल्या केंद्रांची माहिती देऊ शकाल का?

eligible families in these districts shall be provided with Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana Health Cards in due course of time.
>>>
ही कार्ड कधी वाटतील ते देवास ठाऊक! त्यापेक्षा स्वतःच कार्ड काढून घेतलेले बरे!

भगवती हॉस्पिटल, बोरिवली ( प)

के ई एम हॉस्पिटल परेल

टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल

सुष्रुषा हॉस्पिटल , पानेरीजवळ , दादर

ह्या योजनेसाठी "महा ई-सेवा केंद्र" उघडलेली आहेत. ती कुठल्याही हॉस्पिटल्स मध्ये नाहीत. ठाणे जिल्ह्यातील ह्या केंद्रांचे पत्ते फोन नंबर्स हवे असतील तर माझ्याकडे आहेत. कुणाला हवं असल्यास देऊ शकेन.

ह्या "महा ई-सेवा केंद्र"वर जाताना सोबत मूळ रेशनकार्ड (भगवे/पिवळे), फोटो आयडेंटिटी कार्ड (ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड) आणि रेशनकार्डावर नोंद असलेल्या कुटुंब सदस्यांचे प्रत्येकी २ रंगीत फोटो न्यावेत. त्या केंद्रावर मिळालेला प्रिंट आउट घेऊन सिव्हिल हॉस्पिटल किंवा ही योजना राबवली जात असलेल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी केसपेपर्स काढतात त्याच्या जवळच एक खास कक्ष असतो. तिथे हे डॉक्युमेंट्स घेऊन जावेत आणि तिथे स्टँप सही घेऊन रिसिट घ्यावी. ही रिसिट जपून ठेवावी. हॉस्पिटलची सही शिक्का मिळाल्यावरच बर्‍याचश्या सर्जरीज, हॉस्पिटलायझेशन्स पुर्णपणे फुकट होतात.

समजा एखादा उपचार त्या हॉस्पिटल मध्ये करणं शक्य नसेल आणि दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं तर तिथे जाऊन रेशन कार्ड, फोटो आयडी, रंगीत फोटो न्यावेत. त्या हॉस्पिटलच्या कक्षात ती सही शिक्क्याची प्रोसिजर करावी आणि लगेच उपचार करुन घ्यावेत. हे सगळं पटकन होतं.

जर "महा ई-सेवा केंद्र" गाठायला वेळ नसेल आणि इमर्जन्सी आली तर रेशन कार्ड, २ रंगीत फोटो, फोटो आयडी घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ह्या योजनेच्या कक्षात जाऊन एकीकडे रुग्णाला अ‍ॅडमिट करुन उपचार सुरु करावेत.

ही माहिती ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या कक्षातून मिळवली आहे. तिथे ओपीडी रजिस्ट्रेशन दालनामध्ये आठवड्यातून एक दिवस सेवेला असल्यामुळे रुग्णांना जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता यावं म्हणून ठाणे जिल्ह्यातील "महा ई-सेवा केंद्रा"ची लिस्ट प्रिंट काढून त्या कक्षातून देण्या आली.