पुन्हा एकदा क्रोशे.... डॉयली..

Submitted by शांकली on 2 March, 2014 - 23:01

ही एक सुंदर डॉयली फेसबुक वर एकीने केलेली बघितली; आणि अवलच्या मार्गदर्शनाखाली केली Happy

IMG_5490.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली, खुप सुरेख ग. तुझ्या पेशन्स आणि सफाईदार पणाचे खुप कौतुक ग Happy ही डॉली खुप मोठी आहे
अन डिझाईन पण खुप ट्रिकी आहे. शाब्बास ग !

खुप सुंदर !
पुर्वी दिवाळीचा फराळ वगैरे देताना त्यावर असे विणलेले रुमाल झाकून न्यायची पद्धत होती. त्या काळात बहुतेक बायका स्वहस्ते असे रुमाल विणत असत. मग पुढे प्लॅस्टीकचे तयार मिळायला लागले. आरतीने आणि तूम्हा लोकांनी ती कला परत जागृत केली.

अतिशय सुंदर..

डॉयली दिसायला किती मस्त दिसते पण ज्यांनी केलीय त्यांनाच माहित किती कठिण आहे ते. मी आधी करायचे तेव्हा किती वेळा मध्ये फुगा यायचा, उसवुन उसवुन परत करा.. कंटाळा यायचा अगदी... पण नीट झाल्यावर इतके बरे वाटायचे..

शांकली अवल खूप मस्त. मला पण आवड आहे क्रोशे विणकामाची. मला काही येत नव्हत. नेट वरुन, यू ट्यूब वरुन अगदी सुई कशी धरायची इथपासून सर्व शिकले. नेट वर फ्री पॅटर्न मि ळतात. आता विरंगुळा म्हणून काही छोट छोट करत असते. हा मी केलेला एक रुमाल. pineapple and peacock pattern.

From mayboli

हेमा, अहो कित्ती सुंदर केलंय तुम्ही!! खूप म्हणजे खूप आवडलं! शिवाय सुबक तर किती झालंय! आणि नेटवरून बघून तुमचं तुम्ही शिकलात हे तर फारच विशेष आहे. हॅट्स ऑफ टु यू!! ग्रेट वर्क!! Happy बघत रहावंसं वाटतंय.

खूप मस्त झाले आहे काम शांकली आणि हेमा. फक्त मला एक शंका आहे की बायका क्रोशे शिकतात तेंव्हा अशा डॉलीज खूप करतात पण त्यांचा उपयोग मी खूप पाहिलेला नाही. एवढे कष्ट घेऊन केलेले इतके मस्त काम नक्की कुठे वापरले जाते? एक्सेप्ट फराळाची ताटं झाकायला. तो उपयोग आता फार राहिला आहे असं मला वाटत नाही. मला हा प्रश्न खूप दिवस पडला आहे. प्लीज सांगा. Uhoh

Pages