सर्वांचा विनाश होणार: मोदींचे भाकीत

Submitted by Aseem Bhagwat on 2 March, 2014 - 16:36

गुजरातचे आदरणिय मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे प्रधानमत्रीपदाचे उमेदवार आणि स्टार प्रचारक यांनी काल उत्तर प्रदेशात बोलतांना सर्वांचा विनाश होणार आहे अशी भविष्यवाणी केली आहे. यापूर्वी विविध विषयातील त्यांच्या ज्ञानाने जनता दिपून गेलेली आहेच. आता या विषयातही त्यांना गती असून ते आधुनिक नॉस्त्रडॅमस असावेत असं वाटू लागलं आहे. मायन संस्कृतीच्या भविष्यवाणीनंतर आता नॉस्त्रडँमसच्याच भविष्याबद्दल उत्सुकता होती. ते कोडं मोदींनी उलगडलं आहे.

असतील नसतील ते पैसे मौजमजा करण्यात संपवा. आपण गेल्यानंतर त्या पैशांचा काय उपयोग ? प्रत्येक दिवस सुखाचा करा. घर, गाडी, जमीन, बंगला, पार्महाऊस, चहाचे मळे, समुद्रातले बेट इ. विकून टाका. डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये झुगारून द्या. पथ्य पाळलीत तरी विनाश अटळ आहे. दुर्धर आजार असलेल्यांना एकप्रकारे हे दु:खात सुख आहे.

राहून राहून शायरन कोण असावा हा विचार मनात येतो. विनाशापूर्वी तो समजावा ही इच्छा. शाय म्हणजे लाजणारा आणि रन म्हणजे पळून जाणारा = असा नेता म्हणजे अरविंद केजरीवालच असावा. कारण ते आरोप केल्यानंतर शाय अ‍ॅण्ड रन पॉलिसी अंमलात आणतात. काही लोक हिट अ‍ॅण्ड रन म्हणतात खरे पण आरोपांच्या स्पष्टीकरणाबद्दल विचारलं कि ते शायतात आणि रनतात. मुख्यमंत्री असतानाही ते जबाबदा-यांपासून शायून रस्त्यावर झोपले होते. जनता दरबार भरवून ते तिथून रनले. हेच हेच ते आपले शायरन याबाबत आता मनात शंका उरली नाही.

आता शायरन यांचा दिग्विजय (चांगल्या अर्थाने) होतो कि मोदी नॉस्त्रेडँमस म्हणून यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल.

जय (लाल)कृष्ण !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते वाक्य हिंदी आहे.

स ब का विनाश होगा.

स म्हणजे समाजवादी

ब म्हणजे बहुजन पार्टी

का म्हणजे काँग्रेस

>>>> आता शायरन यांचा दिग्विजय (चांगल्या अर्थाने) होतो कि मोदी नॉस्त्रेडँमस म्हणून यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल <<<<
मला वेगळीच काळजी, बोलताबोलता मोदीन्चा बोलबच्चन दिग्गुबाबा झाला नै म्हणजे मिळवली..... Proud

का म्हणजे काँग्रेस हे जमत नाही.+१
यूपीत स आणि ब च महत्त्वाचे प्रतिस्पर्धी ठरतात (इतरांचेही आणि आपापसातही )