मायबोलीवर दिसणार्‍या जाहिराती

Submitted by webmaster on 1 March, 2014 - 15:23

मायबोलीवर सगळीकडे दिसणार्‍या जाहिराती या मायबोलीसाठी एक महत्वाचा भाग आहेत. ते मायबोलीचं उत्पन्नाचं साधन आहे आणि त्या नसतील तर मायबोली चालू राहणार नाही.

यातल्या काही जाहिराती नुसत्या दिसल्यातरी मायबोलीला उत्पन्न मिळते. काही जाहिरातींवर क्लीक केले तर काही जाहिरातींमुळे प्रत्यक्ष विक्री किंवा कृती झाली तरच उत्पन्न मिळते.

मायबोलीवरच्या जाहिराती त्रासदायक नसतील, व्हल्गर नसतील यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. जेंव्हा मायबोलीकरांनी वेळोवेळी अशा त्रासदायक जाहिराती नजरेस आणून दिल्या आहेत , तेंव्हा शक्य तितक्या तातडीने त्या बंद करण्यात आल्या आहे. या सगळ्या मायबोलीकरांचे मनापासून आभार. तुमच्या कडून या पुढेही हा पाठींबा मिळेल अशी आशा आहे.

मायबोलीवर कधीच Pop up (नवीन खिडकी उघडणार्‍या)जाहिराती नसतात. नुकत्याच एका मायबोलीकरणीला अशा जाहिराती मायबोलीवर दिसत होत्या पण त्याचे कारण त्यांच्या संगणकावर आलेला व्हायरस्/मालवेअर होते असे निष्पन्न झाले.

आपोआप ध्वनीत बडबड सुरु करणार्‍या जाहिराती मायबोलीवरून काढून टाकल्या आहेत (त्या दाखवणारे नेटवर्कच बंद केले आहे)

मायबोलीवर प्रकाशित केलेले फोटो जर डाव्या रकान्याच्या मर्यादेत असतील (जसे इतर लेखन असते) तर जाहिरातींचा त्रास होत नाही. ते फोटो जर डाव्या रकान्याच्या बाहेर जाणारे प्रकाशित केले गेले तर जाहिरातीं मधे मधे येतात. थोडक्यात फोटोंनी अतिक्रमण केले तरच जाहिराती फोटोंवर अतिक्रमण करतात.

मायबोलीवर प्रकाशित होणारे लेखन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ते आधी तपासून पाहून मगच प्रकाशीत करणे शक्य नाही. तसेच येणार्‍या जाहिराती इतक्या वेगवेगळ्या मार्गाने, नेटवर्कमधून येतात की त्या सगळ्या आधी तपासून पाहणे शक्य नसते. त्यातूनही आजकाल बर्‍याच जाहिराती या भौगोलिक पातळीवर मर्यादित (Geo targeted) , किंवा वाचकाच्या आंतरजालावरच्या वाटचालीनुसार मर्यादित (behavioral targeted) असल्याने कुणितरी सांगितल्याशिवाय पडताळूनही पाहता येत नाही.

फक्त मायबोलीसाठीच नाही तर मराठी आंतरजालाच्या वाढीसाठी, जास्तीत जास्त मजकूर प्रकाशित होण्यासाठी या आवश्यक आहेत. यांचं स्थान थोडसं मराठी सिरियलच्या प्रायोजकांसारखं आहे, ते जर नसते तर आज अनेक मराठी व्यक्तींना नवीन व्यवसायाच्या/नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नसत्या. या जाहिरातींमुळेच , जाहिरातदारांना, मराठी ग्राहकवर्ग मोठा आहे, ऑनलाईन आहे , त्याच्या कडे खरेदीची क्षमता आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याची जाणीव होते आहे.

काही जाहीराती, जाहिरातदार अतिशय त्रासदायक जाहिराती दाखवत असतात याची आम्हाला कल्पना आहे आणि त्या येऊ नयेत म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. अशी जाहिरात आली तर

१) पानाचा screenshot घेऊन आम्हाला कळवा.
२) काही जाहिरातींवर, त्या त्या जाहिरात नेटवर्कला प्रतिसाद द्यायची सोय असते ती वापरून ती जाहिरात का योग्य नाही ते कळवा.

जाहीरात संस्थांना या त्रासदायक जाहिराती कमी होण्याची गरज माहिती आहे आणि त्यासाठी अनेक उपायही योजले जात आहे. उदा, काही जाहिराती नेटवर्क जितकी जाहिरात त्रासदायक किंवा वाचकांचा वाईट प्रतिसाद तितकी जाहिरात दाखवण्याची किंमत आपोआप वाढवतात आणि चांगल्या, वाचकांचा प्रतिसाद असणार्‍या जाहिरातींची किंमत कमी करतात.

या विषयावर तुमची मतं किंवा येणार्‍या अडचणी समजून घ्यायला जरूर आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दोनदा वायरसचा त्रास झालेला मायबोली साईटवरूनच.

मला ऑफीसमधून जराही अ‍ॅसेस नाहीये. घरून जेव्हा कामं करते तेव्हा घरचा पीसी बाजूलाच ठेवून मायबोली वाचते कधी कधी. पण एक दोनदा अनुभव वाईट आलेला तेव्हा काही दिवस बंद केलं. मग चाम्गल वायरस आणि अ‍ॅनटाय्मेलवेअर लावलं आणि पुन्हा इथे येणं झालं.

अ‍ॅड बाबतीत, बर्‍याच वेळा मी जे काही सर्च करतेच त्याच अ‍ॅड दिसतात असे नाही असा माझा अनुभव आहे.
बर्‍याच बिकि* घातलेली , पोट पुढे आलेली बाईचे चित्र दिसते. मी घरूनच काम करताना अ‍ॅसेस करते मायबोली पण माझी लहान मुलगी , मम्मा who is that lady, ? विचारलेले. Happy मी एकदम गुंग होवुन लिहिताना मला तिने बावचळले हा प्रश्न विचारून. Proud

मंजुडी , समजा तू एखाद्या कलिगच्या सिस्टमवर डोकावलीस आणि तिथे तुला अर्धनग्न स्त्रीयांचे फोटोज (जी एखाद्या अंतरवस्त्राची अ‍ॅडही असू शकते) दिसले तर तू आधी काय विचार करशील? "काय बघतोय हा?" का "कुठल्या तरी साईट वरती कुठली तरी जाहीरात अपोआप आलीये बहुदा" हा?>>> मी काहीच विचार करणार नाही. तो ज्या वेबसाईट बघतोय तो त्याचा चॉईस आहे, तो अ‍ॅडल्ट आहे, त्याने काय बघावे हा त्याचा चॉईस आहे.
अर्धनग्न स्त्रियांचे/ पुरुषांचे फोटो आमच्या ऑफिसमधे दिसतच नाहीत. Wink त्यामुळे कोणाबद्दल काही मत बनवण्याचा काही प्रश्नच नाही. तरीही, विचार करायचा तर मी असा करेन की 'पॉप स्क्रिन आहे बहुतेक!'

म्हणजे कुठल्या धाग्यावर वाचलं? >>>> नक्की कुठल्या धाग्यावर वाचलं याने काही फरक पडतो का?>> अगं हो, पडतो ना. म्हणजे नक्की कोणाचे असले विचार आहेत ते समजायला मदत होते.

कालपासून मायबोलीवर खूप त्रास झाला आहे.. बेफी म्हणताहेत अगदी तसाच प्रॉब्लेम येतोय... क्लिक करताना खूप काळजी घेउनही अचानक ब्लिंक होणार्‍या जाहिरातीवर क्लिक झाले नि नेटघोळ सुरु झालाय... फायरफॉक्स मध्ये पीसीवरुनच ब्राउज करताना ही समस्या येतेय.. तरीही उपाय म्हणून इतिहास सगळा उडवून पाहिला.. कुकीज उडवल्या.. तरीपण मायबोली सुरु करतोय तर डाव्या बाजूने एक जाहीरात आत सरकते.. त्यात माय ट्रिपची उजवीकडून आत सरकरणारी जाहीरात.. नि खालून अचानक उगवणारी 'win prize' जाहिरात (आयडूने वरती सचित्र उल्लेख केला आहेच).. !! या नक्कीच माबोच्या जाहिराती नाहीत हे लगेच लक्षात येतेय पण प्रॉब्लेम आहे हे नक्की... काल संध्याकाळपासून हा प्रॉब्लेम सुरु आहे.. आधी वाटले नेटजालावरुन वायरस आला असावा पण बेफींनाही हाच प्रॉब्लेम येतोय म्हटल्यावर नक्की क्ळत नाहीये.. आज दिवसभरात पीसी बंद होता पण आता मायबोली सुरु केले नि पुन्हा तोच त्रास म्हणून ही पोस्ट !

अगं हो, पडतो ना. म्हणजे नक्की कोणाचे असले विचार आहेत ते समजायला मदत होते. >>>>
अजय यांनी 'मराठी भाषेतील ई-पुस्तके...' या धाग्यावर लिहिलेल्या पोस्टीतला काही भाग मी कॉपी-पेस्ट केला होता. ही माहिती मिळाल्यावर असले किंवा कसलेही विचार नक्की कोणाचे आहेत हे समजायला तुला अपेक्षित असलेली मदत झाली असेल अशी आशा.

मी काहीच विचार करणार नाही. तो ज्या वेबसाईट बघतोय तो त्याचा चॉईस आहे, तो अ‍ॅडल्ट आहे, त्याने काय बघावे हा त्याचा चॉईस आहे.
>>
Wink
आमच्या हापिसात इत्क्या उत्तूंग विचाराचे लोक्स नाहीत Wink Proud

आमच्या हापिसात इत्क्या उत्तूंग विचाराचे लोक्स नाही > अग्दी!
पहिले काय दिसतं या लोकांना ते त्यावरूनच बोलणार. साईट्पेज च्या कंन्टेंट शी त्यांना काही देणंघेणं नसतचं!

अजय यांनी 'मराठी भाषेतील ई-पुस्तके...' या धाग्यावर लिहिलेल्या पोस्टीतला काही भाग मी कॉपी-पेस्ट केला होता.>> धन्यवाद! तो बाफ मी वाचलाच नव्हता त्यामुळे मला कसलाही संदर्भ लागला नव्हता. आता तो बाफही वाचला. पुनश्च धन्यवाद!!

मला फ्रीजच्या ऐवजी मोबाईल, दागिने आणि मेकप किट्स दिसत आहेत.
पण ते स्लीमवेअर, दागिने, मेकप किट्स आणि मोबाईलच्या किंमती मी सध्या वरचेवर गुगलते आहे त्यामुळे मला त्या अ‍ॅड दिसत आहेत.
तुम्ही फ्रिजचे रेट्स किंवा मॉडेल्स सध्या कधी गुगलले होते का?

हे आधीपासूनच होते की नाही ते माहीत नाही, पण आज जेंव्हा क्रोमात काही आक्षेपार्ह जाहिराती दिसल्या, तेंव्हा त्या जाहिरातींवर माऊस नेल्यावर वर कोपर्‍यात 'क्लोज' करण्याची फुली आली. फुलीवर क्लिक केल्यावर दुसरी जाहिरात उघडू नये / फुली ही दुसर्‍या जाहिरातीची लिंक असू नये, अशी आशा करत फुलीवर क्लिक केले, तर सुखद धक्का बसला कारण ती जाहिरात दिसेनाशी झाली. आणि ती जाहिरात 'तुम्हाला का नको वाटली?' हे सांगण्यासाठी खाली तीन पर्याय आले. (अनुचित, असंबंध इ.) त्यातला एक पर्याय निवडल्यावर, 'अभिप्रायाबद्दल धन्‍यवाद!
भविष्‍यात आपला अनुभव सुधारण्‍यासाठी आम्‍ही या जाहिरातीचे पुनरावलोकन करु.
आपल्या जाहिरात सेटिंग्ज अद्यतनित करून आपल्याला उत्तम जाहिराती दर्शविण्यात आम्हास मदत करा.' असा संदेश दिसला. क्या बात है. छान वाटले.

अ‍ॅडमिन, यासाठी अनेक धन्यवाद.

काल पासून मोबाईल वॉर व्हिडीओ ad येऊ लागल्यात आणि रिप्लाय देने अशक्य स्लो झालंय. हा ad सोर्स बदला। प्रचंड स्लो झालंय

तुम्ही जर त्या जाहिरातीचा स्क्रीन्शॉट घेतला आणि इथे कळवला तर काहि करता येईल. किंवा त्या जाहिरातीच्या कोपर्‍यात कुठेतरी एक त्रिकोण असेल त्यावर टीचकी मारली तर ती कुठल्या अ‍ॅड नेटवर्कवरून येते आहे ते कळेल.

एवढी चर्चा चाललीए येथे मग मलाच का जाहिराती दिसत नाही? मी काहीही ब्राऊझर सेटींग वगैरे केली नाहीये. मायबोली अगदी निट ॲन्ड क्लिन दिसते नेहमी. बरेच आहे पण कुतुहल.

>>मायबोली अगदी निट ॲन्ड क्लिन दिसते नेहमी. बरेच आहे पण कुतुहल.<<

मलाहि अ‍ॅड्स दिसत नाहित. सेटिंग म्हणाल तर फक्त पॉपप ब्लॉकर ऑन आहे. बहुतेक मॅकओएस/सफारीची पुण्याई असावी...

Pages