मायबोलीवर दिसणार्‍या जाहिराती

Submitted by webmaster on 1 March, 2014 - 15:23

मायबोलीवर सगळीकडे दिसणार्‍या जाहिराती या मायबोलीसाठी एक महत्वाचा भाग आहेत. ते मायबोलीचं उत्पन्नाचं साधन आहे आणि त्या नसतील तर मायबोली चालू राहणार नाही.

यातल्या काही जाहिराती नुसत्या दिसल्यातरी मायबोलीला उत्पन्न मिळते. काही जाहिरातींवर क्लीक केले तर काही जाहिरातींमुळे प्रत्यक्ष विक्री किंवा कृती झाली तरच उत्पन्न मिळते.

मायबोलीवरच्या जाहिराती त्रासदायक नसतील, व्हल्गर नसतील यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. जेंव्हा मायबोलीकरांनी वेळोवेळी अशा त्रासदायक जाहिराती नजरेस आणून दिल्या आहेत , तेंव्हा शक्य तितक्या तातडीने त्या बंद करण्यात आल्या आहे. या सगळ्या मायबोलीकरांचे मनापासून आभार. तुमच्या कडून या पुढेही हा पाठींबा मिळेल अशी आशा आहे.

मायबोलीवर कधीच Pop up (नवीन खिडकी उघडणार्‍या)जाहिराती नसतात. नुकत्याच एका मायबोलीकरणीला अशा जाहिराती मायबोलीवर दिसत होत्या पण त्याचे कारण त्यांच्या संगणकावर आलेला व्हायरस्/मालवेअर होते असे निष्पन्न झाले.

आपोआप ध्वनीत बडबड सुरु करणार्‍या जाहिराती मायबोलीवरून काढून टाकल्या आहेत (त्या दाखवणारे नेटवर्कच बंद केले आहे)

मायबोलीवर प्रकाशित केलेले फोटो जर डाव्या रकान्याच्या मर्यादेत असतील (जसे इतर लेखन असते) तर जाहिरातींचा त्रास होत नाही. ते फोटो जर डाव्या रकान्याच्या बाहेर जाणारे प्रकाशित केले गेले तर जाहिरातीं मधे मधे येतात. थोडक्यात फोटोंनी अतिक्रमण केले तरच जाहिराती फोटोंवर अतिक्रमण करतात.

मायबोलीवर प्रकाशित होणारे लेखन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ते आधी तपासून पाहून मगच प्रकाशीत करणे शक्य नाही. तसेच येणार्‍या जाहिराती इतक्या वेगवेगळ्या मार्गाने, नेटवर्कमधून येतात की त्या सगळ्या आधी तपासून पाहणे शक्य नसते. त्यातूनही आजकाल बर्‍याच जाहिराती या भौगोलिक पातळीवर मर्यादित (Geo targeted) , किंवा वाचकाच्या आंतरजालावरच्या वाटचालीनुसार मर्यादित (behavioral targeted) असल्याने कुणितरी सांगितल्याशिवाय पडताळूनही पाहता येत नाही.

फक्त मायबोलीसाठीच नाही तर मराठी आंतरजालाच्या वाढीसाठी, जास्तीत जास्त मजकूर प्रकाशित होण्यासाठी या आवश्यक आहेत. यांचं स्थान थोडसं मराठी सिरियलच्या प्रायोजकांसारखं आहे, ते जर नसते तर आज अनेक मराठी व्यक्तींना नवीन व्यवसायाच्या/नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नसत्या. या जाहिरातींमुळेच , जाहिरातदारांना, मराठी ग्राहकवर्ग मोठा आहे, ऑनलाईन आहे , त्याच्या कडे खरेदीची क्षमता आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याची जाणीव होते आहे.

काही जाहीराती, जाहिरातदार अतिशय त्रासदायक जाहिराती दाखवत असतात याची आम्हाला कल्पना आहे आणि त्या येऊ नयेत म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. अशी जाहिरात आली तर

१) पानाचा screenshot घेऊन आम्हाला कळवा.
२) काही जाहिरातींवर, त्या त्या जाहिरात नेटवर्कला प्रतिसाद द्यायची सोय असते ती वापरून ती जाहिरात का योग्य नाही ते कळवा.

जाहीरात संस्थांना या त्रासदायक जाहिराती कमी होण्याची गरज माहिती आहे आणि त्यासाठी अनेक उपायही योजले जात आहे. उदा, काही जाहिराती नेटवर्क जितकी जाहिरात त्रासदायक किंवा वाचकांचा वाईट प्रतिसाद तितकी जाहिरात दाखवण्याची किंमत आपोआप वाढवतात आणि चांगल्या, वाचकांचा प्रतिसाद असणार्‍या जाहिरातींची किंमत कमी करतात.

या विषयावर तुमची मतं किंवा येणार्‍या अडचणी समजून घ्यायला जरूर आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गुगलवर जे सर्च करते त्याच्याशी संबंधितच जाहिराती मला शक्यतो दिसत असतात. उदा. काल नॅनो ट्विस्टबद्दल माहिती काढून वाचली आणि आज फक्त गाड्यांच्या अ‍ॅड्स आहेत.

अपवाद फक्त मॅट्रिमोनिअल साईट्स किंवा सर्च युवर पार्टनर टाईप जाहिरातींचा ! ती एक सदासर्वकाळ दिसते. बहुतेक 'होणार सून मी त्या घरची', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'जुळून येती रेशीमगाठी' इत्यादी धाग्यांशी ह्या जाहिराती जोडलेल्या असाव्यात किंवा मग 'आहारशास्त्र आणि पाककृती' ह्या ग्रूपशी Happy

माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. म्हणजे आपण ज्या साईटवर बर्‍याचदा जातो त्याच जाहिराती आपल्याला दिसतात हे मी ही नोटीस केलंय. त्यामुळे मला मोस्टली कपडे, दागिने ह्यांच्याच वेबसाईट दिसतात. आता जी साडी इथल्या जाहिरातीत सारखी दिसतेय ती मात्र शोधूनही मला मिळत नाहीये असं झाल्याने माझी चिडचिड झालीये Proud

Sayo ben Lol

माझ्या घरच्या मशिनवर लेकीने अ‍ॅड बॉक केल्याने मला घरून काहीछ दिसत नाही.

ऑफिसात मात्र मस्त मिन्त्रा, जयपोर, स्झन्स्कार इ. जाहीराती दिसतात, मी क्लिक करुन तिकडे जाऊन बघत बसते वेळ असला की. मस्त टिपी होतो.

काहीजणांना दिसत असलेल्या नकोश्या जाहिराती मला माझ्या ऑफिसात दिसत नाहीत कारण ऑफिसातली फायरवॉल खुपच मजबुत आहे. बरेचसे की- वर्डस बॅन्ड आहेत. जसे पॅशन, मॅजिक, लिरिक, साँग, फिल्म, गेम इत्यादी अनेक शब्द जे वेब्साईटच्या नावात असतील तर ती साईट ओपन होत नाही. क्राफ्ट्पॅशन नावाची पुर्ण क्राफ्टला वाहिलेली साईट केवळ त्यात पॅशन हा शब्द असल्याने माझ्याकडे ओपन होत नाही. यामुळे माबोवरच्या अडचणीत आणणा-या जाहिराती मला दिसत नाही आणि ज्या दिसतात त्यांचा मला फारसा उपद्रव होत नाही.

मात्र मी जे गुगलुन पाहते त्या संदर्भातल्या जाहीराती मला माबोवर ब-याच वेळेस दिसतात.

रच्याकने, घरचा अ‍ॅडब्लॉक माबोसाठी लावलेला नाहीय तर लेकीने तिच्या कामासाठी लावलाय. मी घरुन फार कमी माबो बघते. एकतर घरी ए वढा वेळ नसतो आ णि दुसरे क्रोममुळे मराठी टायपिंग करणे म्हणजे जीव जायची वेळ येते. वरच्या दहा ओळीत किती चुका अहेत.. त्यापेक्षा ऑफिस परवडले.

आज आयफोनवरून मायबोलीवर आलं की मधेच (प्रत्येक वेळी नाही) 'गेम ऑफ वॉर' ह्या अ‍ॅपच्या पानावर रिडिरेक्ट केलं जातंय. हे कशामुळे?

सायो,
तुम्ही मुद्दाम त्या जाहिरातीवर टिचकी मारल्याशिवाय काहीच व्हायला नको. ती जाहिरात वर पानाच्या सुरुवातीला, डावी उजवीकडे कुठे दिसतेय?

पराग
मायबोलीच्या खरेदी विभागातून पुस्तके घेऊनही मायबोलीला आर्थिक मदत होऊ शकते. पण हे लिहताना मी मुद्दाम जास्त वेळ घेतला. कारण फक्त मायबोलीला मदत म्हणून कुणी पुस्तक घेऊ नये. मायबोली एक फॉर प्रॉफीट संस्था आहे त्यामुळे अशी मदत मागणे मनाला पटत नाही.
एक ग्राहक म्हणून मायबोलीच्या सुविधा योग्य आणि रास्त वाटत असतील तरच घ्या. कारण मदत म्हणून पुस्तके घेतली तर स्पर्धेत टिकून राहता येणार नाही. ग्राहकांना योग्य सेवा आणि समाधान दिले तरच टिकून राहता येईल याची आम्हाला जाणीव आहे.

मायबोलीवर दिसणार्‍या नाही पण इतर साइटसवरून येणार्‍या अ‍ॅडससाठी अ‍ॅडब्लॉक लावणे गरजेचे झालेले आहे. तर प्रश्न असा आहे की अ‍ॅडब्लॉक हे ब्राऊझरला लावले जाते तर ते लावताना एखादी साइट त्यातून वगळता येते का?

वार्षिक अथवा मासिक वर्गणी घेऊन 'जाहिरात मुक्त' सदस्यत्व घेण्याचा विकल्प उपलब्ध करता येईल काय? वर्गणी साधारणपणे प्रत्येक सदस्याकडून होणारे जाहिरातीतून उत्पन्न याची सरासरी असे काही कोष्टक मांडून ठरविता येइल.

तुम्ही गुगल अकाउंट वापरत असाल तर लॉगिन करुन https://www.google.com/settings/ads किंवा सेटिंग्स मध्ये जाऊन अ‍ॅडसेन्स असे सर्च करा. आणि आलेल्या ऑप्शन मधुन 'अ‍ॅड्स सेटिंग्स' सिलेक्ट मध्ये जा. तिथे "इंटरेस्ट्स" या कॉलमला जाऊन पहा.

तुम्ही गुगल, युट्युब इ. ठिकाणी केलेल्या सर्चेस वरुन गुगलने तुमचे इंटरेस्ट्स ठरवले आहेत.
तुम्ही ते एडिट करुन काही इंटरेस्ट्स काढुन टाकु शकता तसेच तुम्हाला काही ठराविक विषयावरच्या जाहिराती मुद्दाम यायला हव्या असतील तरी तिथे ते इंटरेस्ट्स अ‍ॅड करु शकता.

ऑफिसच्या मजबूत फायरवॉलबद्दल साधना + १.
मला आत्तापर्यंत माझ्या उपयोगाच्याच जाहिराती मायबोलीवर दिसल्या आहेत Wink
मध्यंतरी घरच्या कॉम्पवरून लॉगिन केल्यावर एक अडचण येत होती, पण ती इथे वाहत्या बाफवर व्यक्त केल्यावर त्यावर त्वरीत उपाय सुचवले गेले आणि ते अंमलात आणल्यावर अडचण दूर झाली होती.

मायबोलीवरच्या जाहिराती दिसूच नयेत किंवा इतर पद्धतीने मायबोलीला मिळणारे इतर उत्पन्न कमी होईल असे उपाय काही मायबोलीकर अगदी हिरीरीने, मायबोलीवरच मुद्दाम दुसर्‍यांना सांगत असतात >>> हे तिकडच्या धाग्यावर वाचलं.>> म्हणजे कुठल्या धाग्यावर वाचलं?

कारण अनेकदा ऑफिसात "हायला , काय बघतेयेस तू हे? असलं पण असतं का तुमच्या मायबोलीवर ?" वगैरे ऐकावं लागतं. माझ्या आणि माबोच्या इमेजला हे भलतंच हनिकारक आहे >>> Uhoh
आजकाल ९०% वेबसाईट्स जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवत असतात, इथे मायबोलीवर पॉप-अप्स बंद केल्या आहेत हे मला हा बाफ वाचल्यावरच समजले, पण बाकी वेबसाईटवर कुठलं पान कधी उघडेल याचा काहीच भरवसा नसतो. त्यामुळे अश्या प्रकारचे प्रश्न उपस्थित व्हावेत, तेही आयटी कंपनीतल्या स्टाफकडून याचं नवल वाटतं.
आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या या जाहिरातींमुळे स्वतःच्या किंवा मायबोलीच्या इमेजला धक्का कसा काय पोहोचतो हेही कळण्यापलिकडचं आहे.

आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या या जाहिरातींमुळे स्वतःच्या किंवा मायबोलीच्या इमेजला धक्का कसा काय पोहोचतो हेही कळण्यापलिकडचं आहे. <<< मंजू, माझ्या नेटवावराच्या अनुभवावरून आपण ज्या वेबसाईटवर जाऊ (उदा. बेबी सेंटर!) त्या वेबसाईटवर त्या पानाच्या कंटेंटशी निगडीत इतर गोष्टींच्या जाहिराती दिसतात. (उदा. डायपर्स!). याचा अंदाज ज्याला असेल (आणि 'नेहमी हे असेच होते' असे ज्याच्या डोक्यात पक्के पसलेले असेल तर) मायबोलीवर दिसणार्‍या अशा जाहिरातींमुळे (ज्यांचा मायबोलीच्या पानाच्या कंटेंटशी काही संबंधही नाही) मायबोलीविषयी गैरसमज होऊ शकतो.

---------------------------

एक ग्राहक म्हणून मायबोलीच्या सुविधा योग्य आणि रास्त वाटत असतील तरच घ्या. कारण मदत म्हणून पुस्तके घेतली तर स्पर्धेत टिकून राहता येणार नाही. ग्राहकांना योग्य सेवा आणि समाधान दिले तरच टिकून राहता येईल याची आम्हाला जाणीव आहे.
<<< वेबमास्तर, या खुलाश्याबद्दल धन्यवाद. मी मायबोलीच्या खरेदीविभागातून याआधी पुस्तक खरेदी केलेली आहे आणि माझा अनुभव चांगलाच आहे. (याबद्दल बरेच जण वेळोवेळी नमूदही करत असतात.) पण इथे आम्ही पुस्तके विकणार्‍या इतर संस्थळांविषयी, तिथल्या बर्‍या-वाईट अनुभवांविषयीही बोलत असतो. तुमचे तिकडच्या बाफावरचे '...किंवा इतर पद्धतीने मायबोलीला मिळणारे इतर उत्पन्न कमी होईल असे उपाय काही मायबोलीकर अगदी हिरीरीने, मायबोलीवरच मुद्दाम दुसर्‍यांना सांगत असतात....' हे वाक्य वाचल्यापासून हे समजत नव्हते की असे इतर संस्थळांवरच्या खरेदी अनुभवांविषयी मायबोलीवर बोलावे की न बोलावे.

आजकाल ९०% वेबसाईट्स जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवत असतात, इथे मायबोलीवर पॉप-अप्स बंद केल्या आहेत हे मला हा बाफ वाचल्यावरच समजले, पण बाकी वेबसाईटवर कुठलं पान कधी उघडेल याचा काहीच भरवसा नसतो. त्यामुळे अश्या प्रकारचे प्रश्न उपस्थित व्हावेत, तेही आयटी कंपनीतल्या स्टाफकडून याचं नवल वाटतं.
>>>
गजानन यांच्या उत्तराला करोडो मोदक!

मंजुडी , समजा तू एखाद्या कलिगच्या सिस्टमवर डोकावलीस आणि तिथे तुला अर्धनग्न स्त्रीयांचे फोटोज (जी एखाद्या अंतरवस्त्राची अ‍ॅडही असू शकते) दिसले तर तू आधी काय विचार करशील? "काय बघतोय हा?" का "कुठल्या तरी साईट वरती कुठली तरी जाहीरात अपोआप आलीये बहुदा" हा?
त्यात समजा ती व्यक्ती एखादी चिनी साईट पहात असेल ज्याची लिपी तुला कळत नाही. किंवा साऊथ इंडिअन साईट जे लिहिलेलं वाचता आलं तरी त्याचा अर्थ कळत नाही. तर त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय असेल? कोणी तुला हे उत्तर दिलं की "ही एक चांगली लिहा-वाचायची साईट आहे पण तिथे अ‍ॅड्स दिसतायेत फक्त. ज्याचा साईटशी काहीही संबंध नाही" तर तूला हा प्रश्न पडणार नाही का की मग या अ‍ॅड्स अहेतच कशाला इथे? किंवा एकदा दोनदा नाही तर अनेक वेळेला सेम अ‍ॅड्स दिसल्या तर असं वाटणार नाही का की आता ही व्यक्ती बनवाबनवी करतेय. नेहमी याच अ‍ॅड्स कशा असू शकतात?

आणि मुळात मला माझ्या ऑफिसात मायबोलीवर पहाणारे एक - दोन नाहीत अनेक आहेत. प्रत्येक जण माझ्यापाशी येऊन,' तू हे काय पहातेयेस' असं विचारण्याची शक्यता किती आहे? आणि स्वतःहुन मत बनवण्याची शक्यता किती टक्के असेल? नक्कीच जास्त असेल ना?

आत्ताही मी हा प्रतिसाद टाईप करताना मला इथे सेह्जारी एक अ‍ॅड दिसतेय. जेंव्हा तुम्ही प्रतिसाद टाईप करता तेंव्हा प्रतिसादाची विंडो आणि शेजारी एक अ‍ॅड इतकंच माझ्याकडे दिसतयं. मेनी टाईम ही अ‍ॅड विचित्र असते. ज्यांना माबो माहीत नाही त्यांच्यासाठी मी कुठे तरी चॅटींग करतेय आणि शेजारी एक अश्लिल/विचित्र चित्रं आहे इतकंच दृश्य आहे. माझी इमेज याने खराब होतेच की.

मुळात मी 'एखादी' साईट पहातेय , ती साईट नेमकी काय आहे हे कोणाला माहीत? म्हणजे माझ्या इमेजवर त्याचा फरक पडणारच ना? आणि जरी मी सांगितलं की मी मायबोली पहातेय तरी त्यांच्या समोर माबोवर जे दिसलंय त्याने माबोबद्दल मत बनणार नाही का? Uhoh
किती सोप्पं आहे हे Uhoh

यातली सगळ्यात खालची जाहिरात "You are Today's Lucky winner" हीचा मायबोलीशी काहीही संबंध नाही.
तुम्ही लावलेले कुठलेसे प्लगीन किंवा तुमच्या संगणकावर असलेले मालवेअर यातून ती जाहिरात येते आहे.

वर असलेल्या दोन जाहिराती "Lehenga sarees" आणि "designer bags" या अधिकृत जाहिराती आहेत.

वेबमास्टर साहेब,

हा धागा व काही प्रतिक्रिया वाचल्या. मात्र गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून मायबोलीचे कोणतेही पान उघडले की ते उजवीकडे सरकत आहे व डावीकडे एक पानभर उंचीची जाहिरात दिसत आहे. ही जाहिरात, तिच्या उजवीकडची जाहिरात, पानाच्या पूर्ण उजव्या बाजूची जाहिरात, ह्या सगळ्या मिळून मायबोलीचे पान कुरूप करत आहेत. ह्या उप्पर, मायबोलीचे पान उघडणे म्हणजे एखाद्या व्यवसायाची जाहिरात बघण्यासारखे स्वस्त वाटू लागले आहे. मनःपूर्वक दिलगीरी व्यक्त करतो ह्या विधानासाठी!

आता हे सगळे माझ्याच लॅपटॉपवर, चुकीच्या सेटिंग्जमुळे वगैरे घडत असेल तर मी असे म्हणेन की मी काहीही बदल न करता असे झालेले आहे.

आपणांस नम्र विनंती आहे की जाहिरातींनी व्यापली जाणारी जागा व प्रत्यक्ष मायबोलीवरचे लेखन ह्यांच्या प्रमाणातील सुसह्यतेची पातळी प्रभावित होणार नाही ह्यासाठीचे उपाय विचारात घेतले जावेत. तरीही, माझ्यापुरती काही सेटिंग्ज करून मी ह्यापासून सुटका करून घेऊ शकत असेन तर कृपया तसे मार्गदर्शन करावेत.

माझ्या ह्या अभिप्रायाचा कृपया राग मानू नयेत अशी विनंती!

सस्नेह!

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
कृपया तुम्ही हे डेस्कटॉप/लॅपटॉप का मोबाईल वर दिसते आहे ते सांगणार का? तसेच त्या पानाचा स्क्रीनशॉट पाठवू शकाल का?

>आपणांस नम्र विनंती आहे की जाहिरातींनी व्यापली जाणारी जागा व प्रत्यक्ष मायबोलीवरचे लेखन ह्यांच्या प्रमाणातील सुसह्यतेची पातळी प्रभावित होणार नाही ह्यासाठीचे उपाय विचारात घेतले जावेत.

१०० टक्के कबूल. तुम्ही म्हणता आहेत तितक्या प्रमाणात कुठल्याही जाहिराती दिसणार नाही अशी आमच्याकडून नेहमीच काळजी घेतो आहे. किंवा गेल्या १० दिवसात मायबोलीवर आमच्याकडून काहिही बदल केलेले नाहीत त्यामुळे हे जाणून घ्यायला मीही उत्सुक आहे.

सिंडरेला
कळवल्याबद्दल धन्यवाद. शोध चालू आहे. तुम्हालाही फक्त आयफोन वर प्रॉब्लेम येतो आहे की डेस्कटॉपवरूनही?

मायबोलीवर फक्त याच जाहिराती दिसायला हव्या. जिथे जाहिराती दिसायला हव्या ती जागा काळ्या चौकटीत बंदीस्त केली आहे. यापेक्षा जास्त, मोठ्या आकारात किंवा दुसरीकडेच दिसणार्‍या जाहिराती या तुमच्या संगणाकात कुठला तरी व्हायरस असल्यामुळे दिसू शकतात. मायबोलीवर कुठेही आपोआप उघडणार्‍या, आवाज करणार्‍या जाहिरातीही दिसायला नको.
- बर्‍याच पानावर फक्त २ आणि कुठल्याही पानावर ३ पेक्षा जास्त जाहिराती दिसायला नकोत.
- गेल्या १० दिवसात यातल्या कुठल्याच जाहिरातींच्या आकारात बदल केलेला नाही.

मुखपृष्ठ

maayboli_front.jpg

नवीन लेखनाचे पान

maayboli_whats_new1.jpgmaayboli_whats_new2.jpg

गुलमोहर
maayboli_gulmohar.jpg

मायबोलीवरचे बहुतेक सगळे धागे

maayboli_dhaga_1jpg.jpgmaayboli_dhaga_2jpg.jpg

शोध चालू आहे. तुम्हालाही फक्त आयफोन वर प्रॉब्लेम येतो आहे की डेस्कटॉपवरूनही? >>> मी आज फोन/ आयपॅडवरूनच लॉगिन केलं आहे त्यामुळे लॅपटॉपचं सांगता येणार नाही.

वर वेबमास्तरांनी दाखबल्या तशाच जाहिराती, त्यानी दाखवलेल्या जागीच मला दिसतात. घरचा पिसी सोडुन ऑफिसच्या पिसीवर, माझ्या टॅबवर आणि मोबाईलवर. पॉप अप्स कुठेच येत नाहीत.

वेबमास्टर साहेब,

आपल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार! आपल्याला स्क्रीन शॉट पाठवत होतो. दरम्यान मी स्वतःहूनच एक प्रयत्न करून पाहिला. गेल्या काही दिवसात आपोआपच इन्स्टॉल झालेले काही प्रोग्रॅम्स मी नष्ट करून पाहिले. नक्की माहीत नाही की त्यामुळेच झाले की कसे, पण ते केल्यापासून आपण दाखवलेल्या आहेत तेवढ्याच जाहिराती आता दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा मायबोलीवरील लिखित साहित्याचा अ‍ॅक्सेस सुलभ वाटू लागला आहे.

ह्याचा अर्थ बहुधा माझ्या लॅपटॉपवर आपोआप इन्स्टॉल झालेल्या काही प्रॉग्रॅम्समुळे तसे होत असावे असे दिसते.

धन्यवाद!

Pages