मिक्स पिठाच्या दशम्या.

Submitted by गायू on 1 March, 2014 - 05:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पीठ १ वाटी
गव्हाचे पीठ १ वाटी
दूध/साय गरजेनुसार
मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

आज गोड दशम्यांची रेसिपी पाहिल्यावर, आमच्याकडे होणाऱ्या दश्म्यांची रेसिपी शोधली मायबोली वर..पण बहुतेक हा प्रकार इथे झाला नाहीये..
तांदळाचे आणि गव्हाचे पीठ समप्रमाणात घेऊन दूध/निम्मे दूध निम्मे पाणी/साय ह्यापैकी कशातही भिजवावे. नेहमीची कणिक भिजवतो तसेच. नंतर दोन छोट्या लाट्या कराव्यात. (ठेपल्याच्या/पराठ्याच्या असतात तेवढ्याच). एका लाटीला आतल्या बाजूने किंचित तेल लावावे. दुसऱ्या लाटीला तांदळाचे पीठ लावावे. दोन्ही लाट्या एकमेकांवर गोल फिरावाव्यात जेणेकरून तेल आणि पीठ मिक्स होईल. आणि एकमेकांवर ठेवून हलक्या हाताने लाटाव्यात. पोळी एवढ्या पातळ लाटल्या नाहीत तरी चालेल. आणि मग तूप सोडून किंवा न सोडता भाजून घ्यायच्या पोळीसारख्या! तव्यावरून काढल्यावर त्याला पापुद्रे सुटतात ते लगेच अलगद बाजूला काढावेत. तांदळाच्या पीठामुळे एकदम मऊसर होतात त्यामुळे घरातल्या आजी आजोबांना खायला एकदम मस्त!

वाढणी/प्रमाण: 
२ वाटी पिठाच्या साधारण ८-१० होतात.
अधिक टिपा: 

ही दशमी शिळी सुद्धा छान लागते!
माझ्या सासूबाईंचं बालपण दापोलीत गेलंय. तिथला प्रकार आहे हा..
कारळ्याच्या/ लसणाच्या चटणीबरोबर चविष्ट लागते!

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याची लाटी, कणकेच्या लाटीत भरून पोळ्या करतात इतकं माहित होतं.तुमची पा.कृ.आणखी सोपी आहे.करून पहायला हवीच.
तसेच पंचामृतात (दूध्,दही,मध,तूप,साखर) यांत कणीक भिजवून त्याच्याही पोळ्या चांगल्या लागतात.लोकसत्तेत
शुभांगी संगवईंनी दिलेली पा.कृ.

दक्षिणा, नेक्स्ट टाईम नक्की! वर म्हणल्याप्रमाणे, गोड दशम्या ची पाकृ वाचली आणि ह्या आठवल्या. आता घरी केल्या कि नक्की फोटो टाकेन Wink