Submitted by अंड्या on 1 March, 2014 - 01:25
ए फ्यांड्री SSSS ईई ..
अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली..
"ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या.." तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली.
यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.
फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा.
दुसर्याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, "काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?"
तर म्हणला कसा, "अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे ..... "
थोडावेळ मला काय बोलावे आणि कोणत्या टोनमध्ये बोलावे समजेणासे झाले..
तरी उत्तरलो,
"म्हणजे तू सुद्धा एखाद्या जातीला आपल्यापेक्षा खालची मानतोस तर..... मग काय फरक राहिला??
आता निरुत्तर व्हायची पाळी त्याची होती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ग्रेट!
ग्रेट!
पण कोणाला अशी हाक का माराविशी
पण कोणाला अशी हाक का माराविशी वाटते?
दोन कृष्णवर्णीय मित्रांचे <<
म्हणजे काय?
आफ्रिकन वंशाचे आहेत का? मग जात कुठून आली?
दोन प्रकार चे भेदभाव
दोन प्रकार चे भेदभाव ........
एक तुम्ही स्वतः केलात
दुसरा तुमचा मित्राने केला...
-----------------------------------
विचार करा ....... तुम्ही दुसर्याला निरुत्तर करण्याचे श्रेय घेत आहेत पण ... स्वतः काय केले ते बघा ...
दोन कृष्णवर्णीय मित्रांचे
दोन कृष्णवर्णीय मित्रांचे <<
म्हणजे काय?
आफ्रिकन वंशाचे आहेत का?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी आज दिवसभर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच पाहिली, पण कुठे काय, कोणीच कृष्णवर्णीय दिसले नाही.
मुळात कृष्ण म्हटले की महाभारत आणि पर्यायाने भारतच आठवायचे सोडून आफ्रिकेपर्यंत का गेलात
विचार करा ....... तुम्ही
विचार करा ....... तुम्ही दुसर्याला निरुत्तर करण्याचे श्रेय घेत आहेत पण ... स्वतः काय केले ते बघा ...
>>>>>>>>>>>>>>
जर तुला खरेच असे वाटत असेल तर तू कुठेतरी अर्थ काढायला चुकलास किंवा मी कुठेतरी अर्थ मांडायला कमी पडलो,
पण तरीही ‘यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.’ हे वाक्य पुरेसे बोलके आहे.
आणि हो, मला यात मी मित्राला कसे निरुत्तर केले वा त्याने कसा भेदभाव केला हे दाखवायचे नव्हते, तर ज्याला समजेल उमजेल त्याने आपण स्वताच्या नकळत कुठे कुठे हा भेदभाव करतो याचे आत्मपरीक्षण करावे हा हेतू बस्स
उदय +१ फँड्री चित्रपट
उदय +१
फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय
>>>
हेच मुळात आवडलेलं नाही.
नीधप नेमकं काय म्हणतेय ते खरच कळालं नाहीये की न कळाल्याचं दाखवतोयेस?
आफ्रिकन वंश याचा अर्थ खरंच
आफ्रिकन वंश याचा अर्थ खरंच कळला नाहीये का?
कृष्णवर्णीय हा शब्द आफ्रिकन वंशाच्या (म्हणजे आफ्रिकन रेस.. देश नव्हे) लोकांसाठी वापरला जातो हे खरेच माहित नाहीये का?
यारी दोस्ती मध्ये हे असे
यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.’ >>>>>> तुझ्यातर्फे तु चालवुन घेत आहेस लेका... समोरच्याने तुला शिवी देउन सुद्धा तु जर हेच म्हणत असेल स्वतःच्या मनाची समजतु काढुन घेण्यासाठी तर मग पुढचे सांगुन काहीही उपयोग नाही.
हा एक लक्षात ठेव .. समोरच्याने तुला चारचौघां समोर पटकन काही बोलले तर तेव्हा सुद्धा " यारी दोस्ती मधे चालतेच " हे तुझेच वाक्य लक्षात ठेव म्हणजे झाले..
फँड्री चित्रपट पाहिल्यापासून
फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय.
खरंच- गेट वेल सून. तुम्हाला मदतीची गरज आहे असं वाटतंय.
उदयन, तू जे पुढे असे झाले तर
उदयन, तू जे पुढे असे झाले तर तसे झाले तर बोलत आहेस ते बालपणापासून होतच आले आहे, आणि समोरच्याने तुला शिवी देऊन सुद्धा जे बोलत आहेस तर त्या मैत्रीखात्यातल्या शिव्या तू अनुभवल्या नसतील कधी तर तू त्यांचा शब्दशा अर्थ काढशील म्हणून तुला त्यामागच्या भावना समजवणेही कठीण आहे..
रिया, कळलेय ना नीधपना काय म्हणायचेय ते पण थेट काळ्या रंगावरून चिडवण्याचा संबंध वर्णभेदाशी जोडायला गेलेत तर आता काय बोलणार, कदाचित वर्णभेद हा काय प्रकार असतो हे त्यांना माहीत नसावे इतकेच बोलू शकतो
बाकी जर तुम्ही आजवर तुमच्या कुठल्या मित्राला "ए काळ्या, जाड्या, ढापण्या, सुकड्या... वगैरे वगैरे अशी त्याच्या व्यंगावरून हाक मारली नसेल तर इतकेच बोलेन की तुमच्या मैत्रीच्या व्याख्या आणि बेंचमार्क माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत आणि यात तुम्ही बरोबर किंवा मी चूक असे नाहीये, म्हणून आपल्या मताचा आदर आहे च.
पण चांगलेय, मी माझ्या
पण चांगलेय, मी माझ्या मित्राला मस्करीत चिडवायला फॅंड्री हाक मारणेही लोकांना रुचत नाहीये, म्हणजे ज्यांना खरोखर समाजात फॅंड्री म्हणून बघितले जाते अश्यांच्या पाठीशी बरेच लोक उभे राहू शकतात.
या भावना अश्याच राहू द्या !!
ते पण थेट काळ्या रंगावरून
ते पण थेट काळ्या रंगावरून चिडवण्याचा संबंध वर्णभेदाशी जोडायला गेलेत तर आता काय बोलणार, कदाचित वर्णभेद हा काय प्रकार असतो हे त्यांना माहीत नसावे इतकेच बोलू शकतो <<
अहो तुम्ही कृष्णवर्णीय हा शब्द वापरला आहेत. हा शब्द केवळ रंगाने काळ्या व्यक्तीसाठी वापरत नाहीत. हा शब्द स्पेसिफिकली आफ्रिकन वंशाच्या लोकांबद्दल वापरला हे तुम्हाला माहित तरी नाहीये किंवा आपला शब्द चुकलाय हे मान्य करायचे नसल्याने दुसर्यांना वर्णभेद काय प्रकार असतो वगैरे माहित नाहीये असला प्रकार करताय.
अर्थात तुमच्या आजवरच्या सगळ्या लेखांमधे तुम्ही हेच केलंय त्यामुळे अपेक्षा नाहीच काही.
अहो, मला हे खरेच माहीत नाही
अहो, मला हे खरेच माहीत नाही की कृष्णवर्णीय हा शब्द स्पेसिफिकली आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी वापरतात, पण जर खरेच असे असेल तर ओके शब्द उगाचच अलंकारीक बनवण्याच्या नादात चुकला हे कबूल करतो. त्याचबरोबर माहितीसाठी धन्यवाद
बाकी माझ्या आजवरच्या सर्व लेखांमध्ये? काय कुठले लेख? अंड्याचे फंडे का?
गिनतीयों में ही गिने जाते हैं
गिनतीयों में ही गिने जाते हैं हर दौर में हम
हर कलमकार की बेनाम खबर के हम हैं
- निदा फाजली.
लेख अतिशय आवडला मोजक्या
लेख अतिशय आवडला मोजक्या शब्दात तुम्ही नेमके मुद्दे मांडलेत.
अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे ....>>>>> येथील व्यवस्था हि अशीच आहे.आपल्यापेक्षा खालची जात कुठ्लीतरी आहे ह्याच वांझोट समाधान ह्यातच सारे गुंतलेत.आपल्या इथे जी जातीव्यवस्था आहे तिच्यात क्रमिक असमानता आहे. उच्चवर्णीय जातीच्या पाठोपाठ खालच्या क्रमाने उतरत गेलो तर असे आढळून येईल कि ह्या उतरत्या क्रमातच त्या अविकसित सुद्धा आहेत.जाती व्यवस्था हि एक शोषण व्यवस्था असल्याने जातीच्या उतरत्या क्रमात शोषणाची तीव्रता वाढत जाते नि त्या मुळेच विशिष्ट जाती समूहाचा अविकासाशी व मागासलेपणाशी सरळ संबंध प्रस्थापित होतो.
अवांतर--तुम्ही मित्रांना चिडवता त्यात जातीयवाद नाही हे तुमच्या लेखनावरून कळते .
सचिन पगारे +१
सचिन पगारे +१
मस्त
मस्त
सचिन पगारे _ प्रतिसादाबद्दल
सचिन पगारे _ प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि धागा ट्रॅकवर आणल्याबद्दल आभार
साती, चिंन्गु, विदे _ धन्यवाद
रसप _ फुल्ल बाऊन्सर, गरीबांसाठी सोप्या भाषेत समजवाल का?
मला हा किस्सा आवडला. त्या
मला हा किस्सा आवडला. त्या चौथ्या वाक्याला मलाही खटकल्यासारखं झालं. पण वाचून झाल्यावर मनातला किंतू दूर झाला. यातल्या मैत्रीचा जातीयवादाशी दुरान्वयेही संबंध नाही हे पटू शकते.
गिनतीयों में ही गिने जाते हैं
गिनतीयों में ही गिने जाते हैं हर दौर में हम
हर कलमकार की बेनाम खबर के हम हैं
- निदा फाजली.
>>
आमची फक्त गणना केली जाते.. खानेसुमारी. आमचे अस्तित्व हे तेव्हढ्यापुरतंच मर्यादित आहे. त्याला त्याहून जास्त काही महत्व नाही. हरेक लेखकाने न लिहिलेल्या, त्याच्या कधीच समोर न आलेल्या कथेत आम्ही असतो. आमचे दु:ख, आमची व्यथा नेहमी 'बेनाम', अनामिक, अव्यक्तच राहिली आहे किंवा मग ती बदनामच ठरली आहे.
हा शेर 'अपनी मर्जी से कहां अपने सफर के हम हैं' ह्या जगजीत सिंग ह्यांनी गायलेल्या गझलेतला 'अनसंग' शेर आहे. (ही गझल 'सैलाब' ह्या सिरियलचं शीर्षक गीत होती.) हा शेर मी जेव्हा वाचला तेव्हा मला तो समाजातील उपेक्षितांवर बेतलेला आहे, असंच वाटलं. अगदी अलिकडेच हा शेर वाचला आणि तेव्हा नुकताच 'फँड्री' आला होता. नकळतच मी तो 'फँड्री'शीही 'रिलेट' केला होता.
मला हा किस्सा आवडला. त्या
मला हा किस्सा आवडला. त्या चौथ्या वाक्याला मलाही खटकल्यासारखं झालं. पण वाचून झाल्यावर मनातला किंतू दूर झाला. यातल्या मैत्रीचा जातीयवादाशी दुरान्वयेही संबंध नाही हे पटू शकते.>>>> अगदी अगदी
मुग्धमानसी, स्नेहनिल __
मुग्धमानसी, स्नेहनिल __ धन्यवाद,
रसप__ शेर उलगडल्याबद्दल आभार, अन्यथा ते नुसते वाचून बापजन्मात समजले नसते.
ए फ्यांड्री SSSS ईई .. _ _
ए फ्यांड्री SSSS ईई ..
_ _ कथासार
कथेतील नायक हा "फँड्री" नामक बहुचर्चित चित्रपट बघून आला आहे. त्या चित्रपटातील प्रमुख पात्र `जब्या' हा रंगाने काळा असल्याने कथेच्या नायकाने मस्करीत आपल्या दोन मित्रांचेही नामकरण फँड्री असे केले आहे. अर्थात याआधीही त्यांच्यात अशी मस्करी चालावीच अशी त्यांची यारीदोस्ती. पण हे नाव एकाने चालवून घेतले तर एकाला रुचले नाही. नायकाने चौकशी करता त्याला समजले की त्याने मित्राला काळ्या रंगावरून पाडलेले नाव मित्राने चुकीच्या अँगलने जाऊन जातीयवाचक संबोधन म्हणून घेतले. त्या मित्राला तसे वाटले कारण समाजात त्याची जात तुलनेत खालची समजली जाते आणि हे कुठेतरी त्याच्या डोक्यात घोळत होते. पण हे नायकाला अनपेक्षित होते. अप्रत्यक्षपणे आपल्यावर जातीयवादाचा आरोप करणार्या आपल्या या मित्राला काय स्पष्टीकरण द्यावे हे नायकाला समजले नाही. समाजातील जातीभेदाच्या भिंती कुठेतरी मैत्रीत येत आहेत याची जाणीव बरेचदा विषण्ण करणारी असते, जी त्याला त्या क्षणी झाली. पण पुढे त्या मित्राने उच्चारलेल्या वाक्याचा धागा पकडूनच नायक उत्तरला, जर तुला वाटत असेल की मी तुझ्या जातीला हलके लेखत असेल तर तू तरी वेगळे काय करत आहेस.... मित्र निरुत्तर झाला पण आपण विचार करायला घ्यालच !
खरे तर असे उलगडण्यात मजा नाही म्हणतात काही जण, पण याबाबतीत जे मांडायचे होते ते नीट पोहोचलेच नाही तर लिहिलेलेच व्यर्थ म्हणून हे थोडक्यात स्पष्टी...
याउपर कोणाला काही शंका असल्यास मला व्यक्तीगत संपर्क साधा तर इतरांसाठी म्हणून हे गाणे.. तुझा झग्गा ग झग्गा ग वार्यावरती उडतो.. माझा जब्या ग्ग जब्या ग्ग शालूवरती मरतो... एंजाँय
>>>> समाजातील जातीभेदाच्या
>>>> समाजातील जातीभेदाच्या भिंती कुठेतरी मैत्रीत येत आहेत याची जाणीव बरेचदा विषण्ण करणारी असते, जी त्याला त्या क्षणी झाली <<<<<
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत कधी गेला असता, त्यांच्या निवासी शिबिरात हजेरी लावली असती, तर मूळात जातीभेदाच्या भिंती मैत्रीच्या आड येऊच शकत नाहीत हे कळले असते. कारण तिथे या भिंतीन्ना स्थानच नाही. असो
आम्हाला मात्र संघाच्या शाखेत न जाताही या भिती कधी आडव्या आल्या नाहीत! येणारही नाहीत.