बालि सहल - भाग ६ ब - बालि बर्ड पार्क

Submitted by दिनेश. on 27 February, 2014 - 14:47

पक्ष्यांच्या दुनियेत बर्ड्स ऑफ पॅराडाईज म्हणून एक खास वर्ग आहे. अत्यंत देखणे असे हे पक्षी अर्थातच शिकारीला बळी पडल्याने आता फारच दुर्मिळ झालेत. त्यातले बरेचसे पक्षी या पार्क मधे आहेत. हे पक्षी मी कधी काळी प्रत्यक्ष
बघेन असे स्वप्नातही वाटले नव्हते.
पण वाईट याचे वाटतेय कि ते पिंजर्‍यात असल्याने त्यांचे फोटो मात्र काढता आले नाहीत. एरवी जंगलात हे पक्षी
दिसणे अगदीच कठीण आहे.

तरी जेवढे जमले तेवढे पक्षी दाखवतोच.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

तिथेही अनेक बर्ड शोज आणि बर्ड फिडींग चे कार्यक्रम होत असतात. निदान चार पाच तास तरी काढले पाहिजेत तिथे.

१०)

११)

१२)

१३)

१४)

हे फुल नाही, फळ आहे

१५)

१६)

१७)

१८)

१९)

ही फॅमिली तर रस्त्यात्च ठाण मांडून बसली होती

२०)

अगदी नाईलाज झाला म्हणून

२१)

२२)

हा पांढरा पक्षी (जलक) बालिचा राष्ट्रपक्षी. सध्या बाहेर तो दिसणे दुर्मिळ आहे. त्यांच्या नाण्यावर पण याला स्थान आहे.

२३) जरा जवळून.. याच्य डोक्यावर तुरा पण असतो.

२४)

२५) क्लोज अप... हे धटींगण पक्षी कॅमेराला अजिबात बूजत नाहीत.

२६) ही मैना, आपल्या शब्दांची, शिटीची हुबेहुब नक्कल करते

२७)

प्रत्येक पक्ष्याची अशी नेमकी माहिती तिथे दिलेली आहे. खास करून चित्ररुप माहिती बघा.

२८)

२९)

३०)

या पक्ष्याचा नीट फोटो काढता आला नाही याचे खुप वाईट वाटतेय. दिसतेय तेवढी झलक बघूनही कल्पना येईलच.

अजून आहेत...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो!!! किती सुंदर रंगीबेरंगी ,ब्राईट कलर्स चे पक्षी आहेत... कुणीतरी रंगवून ठेवल्यासारखे...

इंडोनेशिया ला ती शिट्टी कॉपी करणारी मैना आणी बोलणारा काकातुआ (कि काकाकुआ??) कित्येक घरांत पाळलेला दिसतो.. त्यांचे पिंजरे खूप मोठे आणी कलात्मक असतात.. Happy

आभार दोस्तांनो,

वर्षू, तो काकाकुआ आफ्रिकेत पण खुप दिसतो. हाकांची नक्कल तर छानच करतो.
कंसराज... तो अ‍ॅग्रेसिव्ह पण असतो ना ?

जिप्स्या, इंद्रा... माझ्याकडे छोट्या लेन्सवाला कॅमेरा हवा होता म्हणजे जाळीच्या आत ती लेन्स घुसवून फोटो काढता आले असते. तिथे एक माणूस तसेच करत होता. त्याने साधारण वेब कॅमेरा असतो तसा कॅमेरा काठीला
बांधून घेतला होता. पुढच्या वेळी तशी आयडीया करायला पाहीजे.

आणखी पण आहेत फोटो... रात्री टाकतो.

वर्षा, नाव शोधावे लागेल मला. काही फोटो पिंजर्‍यातल्या पक्ष्यांचे आहेत. त्यांचे पूर्ण फोटो नाही घेता आले.

वा! मस्तच फोटो!!
काकाकुवा म्हटल्यावर पु.ल.देशपांडेनी "पाळीव प्राणी" मधील त्याचे केलेले वर्णन आठवले. Proud