शोधा म्हणजे सापडेल.............
चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन
ओळखा पाहू यात लपलं आहे कोण ?
रोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.
ही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.
चला तर मग ही वैविध्यपूर्ण अशी कोडी डोकं चालवून पटापट सोडवा बरं!
नियम :-
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. या खेळात ठराविक वेळेच्या अंतराने वेगवेगळी कोडी दिली जातील. दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पूर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरील प्रतिसादात अपलोड करायचा.
दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
कागदावर उतरवून घ्यायचे मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
एक्सेल वर बनवा. तिथे सोडवा नंतर त्याचा स्क्रिनशॉट चा फोटो इथे प्रतिसादात द्या
ज्यांना आधीचे तिन्ही पर्याय जमत नसतील ते प्रतिसादात व्यवस्थित क्रमांक घालून उत्तरे लिहू शकतात.
परंतु पुर्ण कोडे/उत्तरेच येथे द्यायची आहेत. कृपया अपुर्ण कोडी/उत्तरे प्रतिसादात देऊ नयेत.
४. काही वेळेस कोडे सोडवण्याबरोबरच अधिकची माहितीही विचारली जाईल. कोड्यासोबत ती माहितीही देणे अनिवार्य आहे.
५. नविन कोडी इथेच मुख्य धाग्यावरती दिली जातील.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
शब्दकोडे क्रमांक - ५ . नियती
यात आपल्याला १५ पात्रांची नावे शोधायची आहेत. आणि त्यांचे लेखक आणि त्यांच्या कथा/कादंबरींचे नाव यांचा देखील उल्लेख करायचा आहे.
---------------------------------------------------------
"शब्दकोडे क्रमांक ८"... उदयन
यात आपल्याला २४ पुस्तकांची नावे शोधायची आहेत आणि त्यांच्या लेखकांचा उल्लेख सुध्दा करायचा आहे.
उभी, आडवी, तिरकी, खालुन वर... सगळ्या प्रकारची आहे ... शोधा शोधा..
-----------------------------------------------------------------------------------------------
उत्तरे प्रतिसादात लिहिली तरी चालतील परंतु पुर्ण कोडे कृपया मुळ कोड्यावरुनच सोडवुन इथे देण्याचा प्रयत्न करावा इतरांना देखील उत्तरे कळायला हवीत.
हां, माझं अनुभुती चुकलंय...
हां, माझं अनुभुती चुकलंय... ते रानभुली हवं.
संयोजक, हे घ्या सुधारीत उत्तर :
सोनपरीचे आजोबा - गो. नी. दांडेकर
कविन, कृपया प्रतिसाद संपादन
कविन, कृपया प्रतिसाद संपादन करू नका. जितकी उत्तरं देता येत असतील तेवढी दिली तरी चालतील.
हा खेळ आहे, स्पर्धा नाही.
छ्या! माझे १४ झाले तोपर्यंत
छ्या! माझे १४ झाले तोपर्यंत उत्तर आलंही!

अनुभूती राहिलंय माझं.
ओह! ते चुकीचंय, खालीच रुमाली रहस्य होतं की!
मंजूडी... मस्तच!!!! लैच
मंजूडी... मस्तच!!!!
लैच फास्ट बै!
धन्यवाद संयोजक यंदा काही
धन्यवाद संयोजक
यंदा काही डिजिटल बक्षीसे/ खाऊ वगैरे नाही का?
द्या की काहीतरी.
चहा तरी द्या निदान... वेळ झालीये की चहाची.
जैत रे जैतच्या बाजूला
जैत रे जैतच्या बाजूला 'जवानीपीटीका' असा शब्द बनतोय
१. माचीवरला बुधा २.
१. माचीवरला बुधा
२. पूर्णामायची लेकरे
३. वाघरु
४. जैत रे जैत
५. मृण्मयी
६. झुंजारमाची
७. दुर्गभ्रमण
८. तुझ्याविना
९. तांबडफुटी
१०. चंद्रमौळी
११. दास डोंगरी राहतो
१२. शितु
१३. रानभुली
१४.दर्याभवानी
१५. पडघवली
पूर्णामायची
पूर्णामायची लेकरे
दुरभ्रमणगाथा
माचीवरला बुधा
मृण्मयी
शितु (?)
पडघवली
रानभुली
झुंजार माची
दर्याभवानी
जैत रे जैत
रूमाली रहस्य
इब्लिस, जस्ट मिस्ड!! अनुभुती,
इब्लिस, जस्ट मिस्ड!!
म्हणून बदललं.
अनुभुती, दर्याभवानी ही पुस्तकेही आहेत काय? अनुभुती गो.नी.दांचं असण्याबद्दल मी जरा साशंक होते. पहिलं उत्तर पोस्ट केल्यावर रानभुली दिसलं
लैच फास्ट बै तु मंजुडे!
लैच फास्ट बै तु मंजुडे!
(No subject)
इब्लिस, जस्ट मिस्ड!! << रेस
इब्लिस, जस्ट मिस्ड!!


<<
रेस पळताना बाकीचे कुठेत ते मागे वळून पाहू नये, हा नियम विसरलो, अन तुमचा चुकलेला शब्द बरोबर समजून पुढचे सोडून दिले
जौद्या.
पुढचे कोडे पाहू काय येतेय ते
अहो संयोजक,
या स्पीडने नवा स्वयंपाक करायला लागेल पश्चिमेच्या पंगतीसाठी, बरं का!
ज्यांना चहा चालेल असे वाटते,
ज्यांना चहा चालेल असे वाटते, त्यांनी या!
संयोजक | 27 February, 2014 -
संयोजक | 27 February, 2014 - 16:13
इब्लिस, तुम्ही शब्दकोडे १ जवळजवळ पूर्ण सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
<<
धन्यवाद!
नमस्कार. अजुन ही उत्तरे
नमस्कार.
अजुन ही उत्तरे पुर्णतः दिलेले नाही
कृपया योग्य पुस्तकांची नावे योग्य पध्दतीने लिहुन द्यावीत .
संयोजकांची शिफ्ट बदललेली
संयोजकांची शिफ्ट बदललेली दिसतेय.... नव्याने नमस्कार घालताहेत.
अहो, कोणी उत्तरं पूर्णतः दिलेली नाहीत ते सांगा...
सगळ्यांनीच
सगळ्यांनीच
अरेच्या!! मग माझं अभिनंदन
अरेच्या!! मग माझं अभिनंदन कशासाठी केलं होतं आधी? आणि आता पोस्ट एडीट केलेली दिसतेय.
संयोजक, संदिग्ध पोस्टी लिहू नका. खेळ नीट मॉनिटर करा कृपया.
घ्या! १५ मोजून घेणे
घ्या!
१५ मोजून घेणे
मुग्धानंद यांची लिस्ट पूर्ण व
मुग्धानंद यांची लिस्ट पूर्ण व बरोबर दिसते आहे.
इब्लिस, ती सगळी उत्तरं मी
इब्लिस, ती सगळी उत्तरं मी आधीच दिली आहेत की
जैत रे जैतच्या बाजूला
जैत रे जैतच्या बाजूला 'जवानीपीटीका' असा शब्द बनतोय>>>
हे मी आत्ता वाचलं.
लेखक : गो.नी.
लेखक : गो.नी. दांडेकर
माचीवरला बुधा
दुर्गभ्रमण गाथा
शितू
रानभुली
पुर्णामायची लेकरे
दास डोंगरी रहातो
पडघवली
वाघरु
रुमाली रहस्य
जैत रे जैत
झुंजारमाची
तांबडफुटी
मृण्मयी
किल्ले
दर्याभवानी
मघाशी जवळजवळ सगळे सोडवले होते
मघाशी जवळजवळ सगळे सोडवले होते पण 'तुझ्याविना' जुळत नव्हते म्हणून उत्तर लिहिले नाही
हो @ मंजूडी. पण कदाचित
हो @ मंजूडी. पण कदाचित त्यांना खाडाखोड नको असेल, म्हणून माझी/तुमची प्रवेशिका सोडून मुग्धानंद यांचे उदाहरण सांगितले.
'तुझ्याविना' हे गोनीदांचं
'तुझ्याविना' हे गोनीदांचं पुस्तक नाहीये बहुतेक...
बरं संयोजक, हे घ्या सुधारीत उत्तर :
सोनपरीचे आजोबा - गो. नी. दांडेकर
उत्तर चुकले असेल तर तसं लिहा तरी...
अचुक १५ उत्तरे दिल्याबद्दल
अचुक १५ उत्तरे दिल्याबद्दल "अगो" यांचे हार्दिक अभिनंदन..
तसेच मंजुडी आणि इब्लिस यांचे सुध्दा अभिनंदन .. आपण जास्तीतजास्त कोडे सोडवले..
गोनिदा यांचे "तुझ्याविना" हे पुस्तक नाही आहे ....
(No subject)
धन्यवाद संयोजक बाकीची १४
धन्यवाद संयोजक
बाकीची १४ लगेच मिळाली होती पण पंधरावे कळत नव्हते म्हणून पोस्ट करत नव्हते. वेगवेगळे शब्द सर्चमध्ये देऊन पाहिले पण जुळत नव्हते. दर्याभवानी सुचवल्याबद्दल मुग्धानंद आणि इब्लिस ह्यांचे आभार
हे भारी आहे. एकदम लाइव्ह
हे भारी आहे.
एकदम लाइव्ह प्रकार.
तेवढा वेळ नाही. पण लैच भारी आयड्या.
कोडं इथेच सोडवता आलं पाहिजे होतं.
Pages