केक रस्क

Submitted by मृणाल साळवी on 22 February, 2014 - 16:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

मैदा - १५० ग्रॅम
साखर - १५० ग्रॅम
बटर - १५० ग्रॅम
अंडी - ३
बेकिंग पावडर - १/२ छोटा चमचा
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा
मिक्स ड्राय फ्रुट्स - १/४ वाटी
मिठ चिमुटभर

क्रमवार पाककृती: 

१. एका भांड्यामधे मैदा, मिठ व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे.
२. दुसर्‍या भांड्यामधे बटर व साखर फेटुन घ्यावे.
३. साखर निट मिक्स झाल्यावर त्यात १-१ अंडे टाकुन फेटुन घ्यावे.
४. ह्यात मैदा व ड्राय फ्रुट्स टाकुन एकत्र करावे.
५. एका बेकिंग ट्रे ला बटर लावावे व त्यावर मैदा भुरभुरावा. त्यामुळे केक भांद्यास चिटकत नाही.
६. हे सर्व करताना ओव्हन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
७. Preheat झालेल्या ओव्ह्न मधे केक टेवुन १५-२० मिनिट बेक करुन घ्यावा.
८. १५-२० मिनिटात केक तयार झाला असेल.
९. केकचा ट्रे बाहेर काढुन १ तास थंड होउन द्यावा.

cake

१०. केक पुर्ण थंड झाल्यावर त्याचे १ सेमीचे तुकडे करुन घ्यावेत.
११. हे सर्व एका ट्रे मधे ठेवुन ओव्हन मधे १५० degree celcius ला १५ मिनिटे परत बेक करावे. १५ मिनिटांनी ओव्ह्न बंद करावा व तो ट्रे ओव्ह्न मधेच १० मिनिटे ठेवावा.

cake2

१२. १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढल्यावर केक रस्क तयार झाले असतील.
१३. हे केक रस्क वाफाळत्या चहा सोबत किंवा नुसतेच सुद्धा खुप छान लागतात.

ruskrusk2rusk3

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही.....च. आज मला हे फोटो दिसले फायनली.>>>>> +१

माझ्या लहानपणी याला केकटोस्ट म्हणायचे. खूप आवडायचे त्यावेळी. पण नंतर येणार्‍या अंड्याच्या वासाने कंटाळून खायचे सोडून दिले होते.

Pages