जानेवारी, फेब्रुवारी असा उच्चार करणे अथवा लिहिणे चूकीचे आहे काय?

Submitted by ग्रेटथिन्कर on 20 February, 2014 - 02:54

जानेवारी, फेब्रुवारी असा उच्चार करणे अथवा लिहिणे चूकीचे आहे काय?
january, february या इंग्रजी महिन्यांचा उच्चार आणि मराठी कॅलेंडरातील उल्लेख जानेवारी आणि फेब्रुवारी असा आहे,हे उच्चार योग्य आहेत काय.?
jan -yoo- er- ee आणि feb -roo- er -ee अशी त्यांची उच्चारांची फोड दिलेली आहे.याचा उच्चार जान्युअरी ,फेब्रुअरी असा होतो कि आणखि कसा...कि जानेवारी फेब्रुवारी हेच उच्चार योग्य आहेत.?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोम्बला ... आपण इथे इंग्रजानी गावाच्या नावाच्या अपभ्रंशाबद्दल बोलतो आहोत. बी म्हणतो तसे त्यानी या गावांचा उच्चार जसा ऐकू आला तसा त्यानी उच्चारला आणि राज्यकर्ते असल्याने तसा तो अभिलेखितही केला. साधारणतः बोलताना सोपा शोर्ट्कट अवलबून किमान एनर्जी खर्च करण्याकडे आपली प्रवृत्ती असते.

आमच्या गावाजवळ 'वेसदरे ' नावाचे खेडे आहे. आमच्या गावाच्या पंचक्रोशीत या शब्दाचा उच्चार जर कोणी वेसदरे असा केला तर लोक त्याच्याकडे आपादमस्तक न्याहाळून पाहतील त्यावेळी त्यांच्या मनात 'अलीबागसे आयेला है' 'पौडाचा पावणा दिसतोय' 'वडिंग्याहून आलेलं दिस्तंय 'अशा प्रकारची वाक्ये आलेली असतात. एवढा शुद्ध तुपाळ उच्चार कोणीही तिथं करीत नाहीत. गेली अनेक दशकं बालपणापासून मी त्याचा उच्चार 'यस्तारं ' असा ऐकतोय. आणि तत्सम म्हणजे 'यस्तार्‍याहून आलो , यस्तार्‍याला चाललो' यस्तार्‍याचा सरपंच' वगैरे . फक्त तलाठी ग्रामसेवक शिक्षक असे चाकरमाने त्यांच्या रेकॉर्डला इमाने इतबारे वेसदरे असे लिहितात.

अशी स्थानिक उच्चार करप्ट झालेली (इंग्रजांन्नी नव्हे तर स्थानिकांनी केलेली) अनेक गावे आमच्या आसपास आणि इतरत्रही आहेत. कंसातील शब्द आजही वापरातले प्रत्यक्ष उच्चार आहेत ...उदा. निवडुंगेवाडी (लेढुंगवाडी), करंदी (करंडी), गाजदीपूर (गायजीपूर), तिखोल(तिखुल), भोन्द्रे (भाँद्रं), बेल्हे (ब्याल्हं), पांडेश्वर (पांडीसार),विरोली(इरुली),

आहेत की नाहीत पॅरिस्=पारी, रोम= रोमा , बॅस्टिल =बास्टिअं च्या दर्जाचे: उच्चार ! Proud

एक ख्रिश्चन फादर लहानपणी त्या भागात भेटत असे. तो नुकताच तिकडून धर्मप्रसारासाठी इकडे आला होता (लिम्ब्या सावधान). तो स्थानिकांशी बोलताना व्यक्तींच्या नावाचे , गावाचे उच्चार लोकांकडून समजावून घेई व त्याला जमेल तसे तो उच्चारून बघे. त्यावर मग मोठ्ठा हशा उसळे. मला आठवते वनकुटे नावाच्या गावाचा उच्चार तो 'वंकुतं असा करी !

मुळात स्थानिक सांगणारेच चुकीचा उच्चार करीत असतील तर त्या बिचार्‍या इंग्रजानी काय करावे: Proud

रॉहु :). पुण्याचा "पुणा" हा उच्चार पुण्यापासून पन्नास किमीवरच्या खेड्यांतील यष्टीच्या ष्ट्यांडांव कायम ऐकलेला आहे "पुणा गाडी आहे का ही?" Happy

ज्या शब्दाच्या शेवटी e अक्शर येते त्या ई चा उच्चार होत नाही. उदा: Tune याचा उच्चार ट्यून होतो ट्यूने नाही. Dune, cute, mule.etc त्या पद्धतीने Pune चा उच्चार पुन... पुनं sssss... , पुना असा झाल्याचे मला वाटते मा का देशपांडे यांच्या हसत खेळत इंग्रजी या पुस्तकात वाचल्याचे स्मरते. महराष्ट्रातील बहुसंख्य गावाची नावे एकारान्त असल्याने त्याच्या शेवटी स्पेलिंगमध्ये ई e येते. त्या सर्वांचे भ्रष्टीकरण याच न्यायाने झाले असावे. ठाणे =ठाणा, सटाणे = सटाणा, वाडे= वाडा, सातारे =सातारा. (भुसावळ तालुक्यात एक सातारे आहे ते अजून आपले नाव टिकवून आहे :)) , सुपे=सुपा, लोणावळे,खंडाळे= लोणावळा खंडाळा

बर्‍याचदा आजही बोली भाषेत सातारं , सुपं , सटाणं, ठाणं असे शब्द आपण वापरतोच तेच विंग्रजानी जरा जास्तच दीर्घ केल...::फिदी:

poona ऐवजी poonay असे स्पेलिंग करायला हवे होते.

सर्वसाधारण निरीक्षण आहे कि मराठी लोक हिंदी बोलताना जास्तीत जास्त शब्द हिंदी बोलू पाहतात किंवा मग मारून मुटकून मराठीचे हिंदीकरण केलेले शब्द वापरतात त्यामुळे आपले हसे होते. मराठी लोकांनी हिंदी (क्वचित प्रसंगी ज्याना गुजराती , कानडी बोलता येते त्यांनी) किंवा अन्य भाषा बोलताना त्या भाषेतला योग्य शब्द आठवला नाही तर सरळ पर्यायी इंग्रजी शब्द वापरावा. उगाच मराठी शब्दाचे मारून मुटकून हिंदीकरण करू नये. उदा 'निंबू निचोडना' वगैरे म्हणता येत नसेल तर सरळ लेमन स्क्वीझ / प्रेस किया असे म्हणावे. रताळे , गोगलगाय आदी साठी हिंदी शब्द माहित नसतील तर सरळ स्वीट पोटाटो, स्नेल आदी शब्द वापरावेत. नाहीतरी हिंदी/ मराठी ऐवजी हिंग्लिश/ मिंग्लिशचीच आजकाल चलती आहे.शहरी लोकांना तर हे समजतेच आणि ऐकणारा जर गावाकडचा (खेड्यातला) असेल तर मग असे धेडगुजरी इंग्रजी- हिंदी मारल्याने आपली वट पण आणखीनच वाढते. त्याच धर्तीवर आपल्याला मई, अगस्त, अक्टूबर, नवंबर जमत नसेल तर सरळ मी, ऑगस्ट , ऑक्टोबर, नोवेंबर असे बोलावे तीच गोष्ट तौलीया (टॉवेल) वगैरे शब्दाची

खूप चांगली मराठी वा मातृभाषा बोलणारे अलिकडे अभावानेच भेटतात. हल्लीच्या तरुण पिढीला तर भाषेचा फारसा गंध उरलेला नाही. बोलीभाषेतून आपण खूप काही शिकतो. नेमकी ही बोलिभाषाच बिघडत चालली आहे. ह्याला कारण ही मुले नसून माध्यम जगत, मुलांचे हाय फाय शिक्षण, साहित्याकडे कानाडोळा हे आहेत.

मधे एक मुलगी तिच्या मैत्रिणीला म्हणत होती ... "ये तू किती पातळ झालीस" Happy हे तिने चक्क "तुम कितनी पतली हो गयी हो" चे मराठी भाषांतर केले होते Happy

मधे मी पुण्यात होतो पंधरा दिवस तर काही विशेषणे ऐकून थक्क झालो. पेरूचा हंगाम होता. एक मुलगा पेरूवाल्याला म्हणाला. मला मऊ पेरु द्या कडक नको!!! अस्सल पुणेकर असून मऊ आणि कडक पेरु असली विशेषणे. पेरु एकतर पिकलेला, कच्चा वा निबर असतो. मी पुढे होऊन पेरूवाल्याला म्हंटले मी माझ्या हातानी पाच निबर पेरू निवडतो. तर त्याला मराठी असून निबर म्हणजे काय कळलेच नाही!

मी देखील 'निबर' शब्द फळांच्या संदर्भात वापरलेला ऐकला नव्हता. आम्ही फळांसाठी कच्चे, कोवळे, जून, पिकलेले, तयार, बावलेले/जवलेले, उतरलेले असे शब्द वापरतो.

मला मऊ पेरु द्या कडक नको!!! अस्सल पुणेकर असून मऊ आणि कडक पेरु असली विशेषणे.>>

पुण्यात पेरू खाण्यात मी अग्रगण्य आहे. त्यामुळे इथे लिहू शकेन. पेरू अति पिकला की तो पिवळा व पिचकट मऊ होतो. त्याला एक वास पण येतो. या उलट फार कच्चा पेरू कडक, आतून दड्स असतो. तो कितीही दिवस ठेवला तरी खाण्यास योग्य होत नाही त्यामुळे असे पेरू खरेदी करण्यात पैसे वाया जातात. उत्तम पेरू हा एक विशिष्ट नरमाईला असतो पण आपले हिरवे घट्टपणही जपून असतो. तो कापल्यावर एक ताजा सुरेख वास येतो - साधारण
ताज्या, वाहत्या पाण्यासारखा. हा खायला, चवीला अतिशय सुरेख. तिखट मीठ पण लागत नाही. त्याचा रंग देखील एक विशिष्ट पोपटी असतो. पिवळटपणा कडे झुकलेला पेरू अतिपक्व होत जातो. असे पेरू देखिल मुंबईत
दहा रुपयांना विकले जातात हे बघून दु:ख झाले. गुलाबी पेरू ही चवीच्या बाबतीत एक फसवणूक आहे.

निबर हे विशेषण माणसांनाही वापरले जाते , जसे मुलगी थोराड दिसते असे म्ह्णायचे असेल तर निबर आहे मुलाच्या मानाने असे आंतरपाटाच्या बाफावर लिहीता येइल. परंतु, कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी लग्न करून
नेमके काय साध्य होते हेच मला समजलेले नाही; त्यामुळे सध्या इतकेच.

शुद्धलेखन रोज पाच वाक्ये लिहून काढल्याने नक्की सुधारते. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता अर्थही कळे?!

पुण्यातील साजूक शुद्ध मंडळीही स्वारगेट हा धेडगुजरी शब्द का वापरतात?

स्वार हा मराठी शब्द, गेट हा इंग्रजी शब्द ना?

सटाणे = सटाणा, >>>

आजही बोली भाषेत सातारं , सुपं , सटाणं, ठाणं असे शब्द आपण वापरतोच >>>

याच्याही वरताण म्हणजे, अख्ख्या सटाणा / सटाणे तालुक्यात फिरून लोकांचं बोलणं ऐकलं तर 'सटणं' हेच सगळीकडे ऐकू येईल. Proud

आता ते स्वारगेट नाव कुणी पाडल त्ये आमाला काय ठाऊक? आमी बापड म्हन्तो त्याला ल्हानपणापासुन स्वारगेट, तर स्वारगेट.:फिदी: ते विन्ग्लिश कमेन्टेटर नाय का गावस्कर ला गवास्कर म्हनत्यात, तसच. आमच्या नासिककड तर अहिराणी अन शुद्ध मराठी भाषेची सरमिसळ सापडल बघा तुमाला.

बाय द वे/ रस्त्याच्या कडेकडेने/ रच्याकने सान्गायचे झाले तर सध्या आमी क्रोमातुन टायपत हावोत, त्यामुळे वर टिम्ब ( अनुस्वार) देता येत न्हायीत. आमचा इन्टरेन्ट येक्सप्लोरर कामातुन ग्येला हाये. ग्वाड मानुन घ्या.:फिदी:

अख्ख्या सटाणा / सटाणे तालुक्यात फिरून लोकांचं बोलणं ऐकलं तर 'सटणं' हेच सगळीकडे ऐकू येईल. फिदीफिदी
<<
सटनं. किंवा सट्ना. Wink
बागलाण पट्टा आहे तो. साक्री-धमनार-सट्ना.

Pages