जानेवारी, फेब्रुवारी असा उच्चार करणे अथवा लिहिणे चूकीचे आहे काय?

Submitted by ग्रेटथिन्कर on 20 February, 2014 - 02:54

जानेवारी, फेब्रुवारी असा उच्चार करणे अथवा लिहिणे चूकीचे आहे काय?
january, february या इंग्रजी महिन्यांचा उच्चार आणि मराठी कॅलेंडरातील उल्लेख जानेवारी आणि फेब्रुवारी असा आहे,हे उच्चार योग्य आहेत काय.?
jan -yoo- er- ee आणि feb -roo- er -ee अशी त्यांची उच्चारांची फोड दिलेली आहे.याचा उच्चार जान्युअरी ,फेब्रुअरी असा होतो कि आणखि कसा...कि जानेवारी फेब्रुवारी हेच उच्चार योग्य आहेत.?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Command in Army on border when someone is seen crossing or attempting to cross the border
"HALT WHO COMES THERE"
अन याचा गोड अपभ्रंश

हट्ट हुकुमसे डर !!!!!!!!
Happy

मला हिंदी लोकांच पटत, १५० वर्षे राज्य केलय आपल्यावर त्यामुळे त्याच्या भाषेची वाट लावून बदला घेणार.

जांघेवारी
फेफरेवारी

हीरा यांनी प्रतिपादलेले, ब्रिटिश लोकांनी भारतीय शब्द वाकवले असे नसावे. उलट या शब्दांचे जास्तीत जास्त मुळाबरहुकूम उच्चार त्यांच्याकडून होतील अशी स्पेलिंग्ज़ त्यांनी बनवली. हे म्हणणे काही पटत नाही. पुणे, खडकी, कोलकाता या गावांसाठी इंग्रजांनी केलेले स्पेलिंग, बंडोपाध्याय, मुखोपाध्याय सारख्या मोठ्या जाऊचद्या पण ठाकूर सारख्या छोट्या नावांची जी स्पेलिंग केली त्याचा उलगडा अजीबात होत नाही.

शींव (अनुस्वारासकट) या शब्दाचा शक्यतो व्यवस्थित उच्चार व्हावा म्हणून एस आय ओ एन हे लेखन. आपण सायन उच्चारतो ती वेगळी गोष्ट. हे काही समजले नाही. शींव चे स्पेलिंग एस आय ओ एन असे करताना श साठी फक्त एस आणि व साठी फक्त व्हे न घेता ओ आणि त्या शि वरच्या अनुस्वारासाठी त्या 'ओ' नंतर एन हे काहीतरी गंडलंय असे नाही वाटत?

जसे इंदौर, बंगळूरु किंवा बँगलोर हे मराठीत इंदूर किंवा बंगळूर होते, तसेच मराठी मधील 'लता' 'गीता' 'भरत' दक्षिण भारतात लथा, गीथा, भरथ होतात, मराठी माधुरी, गुळ हे उत्तरेतील काही भागात माधुडी, गुड असे होते, आख्खा भरत ज्याला 'व' म्हणतो ते 'ब' उच्चारणे ही तर बंगालाची खासीयत.

गोव्यामध्ये ज्या गावाला मराठीत कुठ्ठाळी असे संबोधले जाते त्याचे स्पेलिंग सी ओ आर टी ए एल आय एम Cortalim असे करतात. म्हापसाचे स्पेलिंग ज्याचा उच्चार मापुसा होईल असे करतात. डिचोली नावाचे तर चक्क बी पासून Bicholim असे स्पेलिंग करतात. (हा कदाचित पोर्तुगिझ भाषेचा प्रभाव असू शकेल.)

फ्रेंच पीएर इंग्रजी पीटर, फ्रेंच ज्याँ इंग्रजी जॉन होतो असेही ऐकून आहे.

सगळेच जण आपापल्या भाषेच्या उच्चारण पार्श्वभूमीनुसार असे बदल करत असावेत. त्यामुळे हे जे 'भाषा वाकवणे' म्हटले जात आहे ती जागतिक रीतच आहेसे दिसते.

हर्पेन,

<गोव्यामध्ये ज्या गावाला मराठीत कुठ्ठाळी असे संबोधले जाते त्याचे स्पेलिंग सी ओ आर टी ए एल आय एम Cortaliam असे करतात. म्हापसाचे स्पेलिंग ज्याचा उच्चार मापुसा होईल असे करतात. डिचोली नावाचे तर चक्क बी पासून Bicholim असे स्पेलिंग करतात. (हा कदाचित पोर्तुगिझ भाषेचा प्रभाव असू शकेल.)>

बरोबर, तो पोर्तुगीज भाषेचा प्रभाव आहे. इंग्रजी नव्हे.

<फ्रेंच पीएर इंग्रजी पीटर, फ्रेंच ज्याँ इंग्रजी जॉन होतो असेही ऐकून आहे.>

हे तितकंसं बरोबर नाही. स्पेलिंगं वेगळी आहेत.

हीरा,
तुमचे सगळे मुद्दे पटले नाहीत.

तसेच मराठी मधील 'लता' 'गीता' 'भरत' दक्षिण भारतात लथा, गीथा, भरथ होतात,
<<<< असं नाहीये. स्पेलिंगमध्ये टीएच असल्याने आपण ते तसं वाचतो. ते लोक लता, गीता, भरतच म्हणतात. नुसता टी असेल तर त्याचा उच्चार ट करतात. माझ्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये मी फक्त टी वापरत असल्याने काही दाक्षिणात्य सहकारी सवयीने 'कोटवाल' असा उच्चार करत.

तसेच मराठी मधील 'लता' 'गीता' 'भरत' दक्षिण भारतात लथा, गीथा, भरथ होतात, >> तमिळ भाषेमध्ये
थ, ध, ख, घ, झ, ढ, ठ हे "महाप्राण" असलेले वर्ण नाहीत.(चूकभूल देणे घेणे) त्यामुळे इंग्रजीमध्ये लिहिताना "ट" आणि "त" मधला फरक दाखवायला ते "H" अक्षर वापरतात.

<हिंदीमध्ये ऐ चा उच्चार आपल्यासारखा अई असा होत नाही तर तो अ‍ॅ असा होतो. कैसे हा शब्द आपण कइसे असा उच्चारू तर हिंदीभाषक (खडी बोली) तो क्यय्से म्हणजे आपल्या अ‍ॅ ला जवळचा असा उच्चारतील. म्हणून हिंदीमध्ये इंग्लिश अ‍ॅ साठी ऐ हे अक्षर नेमले गेले आहे. म्हणून खडी बोलीत साधारणतः बँक, स्टँप असेच उच्चार होतात, लेखनात मात्र ऐ वापरतात. अर्थात पुरवैय्या लोकांचे उच्चार वेगळे असतात. ते कैसे चा उच्चारच मुळी कइसे असाच करतात.>

पटले नाही. मराठीतल्या 'ऐ' या उच्चारासाठी हिंदीत कोणते चिन्ह वापरतात मग?
है चा उच्चार हॅ केला तर अर्थाचा अनर्थ होईल.

<हिंदीमध्ये ऐ चा उच्चार आपल्यासारखा अई असा होत नाही तर तो अ‍ॅ असा होतो. कैसे हा शब्द आपण कइसे असा उच्चारू तर हिंदीभाषक (खडी बोली) तो क्यय्से म्हणजे आपल्या अ‍ॅ ला जवळचा असा उच्चारतील. म्हणून हिंदीमध्ये इंग्लिश अ‍ॅ साठी ऐ हे अक्षर नेमले गेले आहे. म्हणून खडी बोलीत साधारणतः बँक, स्टँप असेच उच्चार होतात, लेखनात मात्र ऐ वापरतात. अर्थात पुरवैय्या लोकांचे उच्चार वेगळे असतात. ते कैसे चा उच्चारच मुळी कइसे असाच करतात.>

बॉलीवूड मोड ऑन
'उंची है बिल्डिंग' गाण्यामध्ये हिंदीभाषक अन्नू मलिकसुद्धा 'कइसे' असाच उच्चार करतो हो... Proud

@ भरत मयेकर आणि श्रद्धा, आपण 'कैसी पहेली है यह जिंदगानी' हे गाणे ऐकले असेल तर त्यात हा उच्चार अगदी स्पष्ट आहे. अनेक शब्द आहेत. खैर हा शब्द खडी बोलीत खइर असा उच्चारत नाहीत. वैध,सैर, तैरना,पैर हे सर्व शब्द खडी बोलीत अ‍ॅ ह्या उच्चाराच्या जवळपास असणार्‍या उच्चारात उच्चारले जातात. अर्थात पूर्वेच्या बोलींत मात्र कइसे, जइसे, असे उच्चार आहेत. मैं तो एक ख्वाब हूं, मैंने शायद तुम्हें, मैं तो तुम संग नैन (नइन नव्हे) लगाके हार गयी, मैं तो भूल चली बाबुल का देश, है तेरे साथ मेरी वफा अशा अनेक गीतांत ऐ हा उच्चार मराठीतल्यासारखा (अइ किंवा अई ) नाही. स्व. महम्मद रफीसाहेबांच्या खड्या बोलीतल्या अनेक गाण्यांमध्ये हा उच्चार ऐकायला मिळतो.
इंग्लिशमधला अ‍ॅ हा उच्चार आपल्याकडे (मराठीत ) नव्हता. त्यासाठी आपल्याकडे वर्णमालेत वर्ण नव्हता, तो आपण निर्माण केला.

आपण इन्ग्रजी शब्दांच्या उच्चाराबाबत इतका काथ्याकूट करतो , पण आपल्याच राज्यात धुळे ,जळ्गाव पासून कोल्हापूर पावेतो आणि चान्द्यापसून बान्द्यापावेतो बोलल्या जाणार्‍या मराठी च्या विविध रुपांकडे कधी लक्ष देतो काय हा खरा प्रश्न आहे. नाशिक ग्रामिण भागातील एक लाइनमन , बदली केल्याने , नंदुरबार येथे हजर व्हावयास आला होता . त्याच्या शब्दात " म्या तेथून ढळलो आणि येथे आदळलो " हे ऐकून मला सुरवातीला काहीच समजले नव्हते. जळ्गावकर लोकांच्या बोलण्यात वाक्याच्या शेवटी " बारे " शब्द बोलल्याखेरीज त्यांचे वाक्य पूर्ण होतच नाही
सातारा , कोल्हापूर कर " जा की " " घे की " असे बोलण्यात धन्यता मानतात .
म्हणून आपल्या आजूबाजूला जे आहे तेच समजून घ्या की ! !

आपण इन्ग्रजी शब्दांच्या उच्चाराबाबत इतका काथ्याकूट करतो , पण आपल्याच राज्यात धुळे ,जळ्गाव पासून कोल्हापूर पावेतो आणि चान्द्यापसून बान्द्यापावेतो बोलल्या जाणार्‍या मराठी च्या विविध रुपांकडे कधी लक्ष देतो काय हा खरा प्रश्न आहे. नाशिक ग्रामिण भागातील एक लाइनमन , बदली केल्याने , नंदुरबार येथे हजर व्हावयास आला होता . त्याच्या शब्दात " म्या तेथून ढळलो आणि येथे आदळलो " हे ऐकून मला सुरवातीला काहीच समजले नव्हते. जळ्गावकर लोकांच्या बोलण्यात वाक्याच्या शेवटी " बारे " शब्द बोलल्याखेरीज त्यांचे वाक्य पूर्ण होतच नाही
सातारा , कोल्हापूर कर " जा की " " घे की " असे बोलण्यात धन्यता मानतात .
म्हणून आपल्या आजूबाजूला जे आहे तेच समजून घ्या की ! !

उच्चार वेगळेवेगळे आहेत, पण त्यात चूक काय नि बरोबर हे कोण ठरवणार?
हिंदीत सुद्धा पवन करे सोरला नूतनने पवन करे शोर (तिच्या आणि बर्‍याच लोकांच्या मते शोर बरोबर,). पण सुनील दत्त म्हणतो अरे बाबा, शोर नही सोर!

बाकी इंग्रजीची खरी मजा अमेरिकेत! कशाचे काय उच्चार करतील! त्यातून अ‍ॅक्सेंट!!

आता कुणि रसम लाई खाता का? किंवा करम रकर नावाचा माझा मित्र आहे म्हंटले तर आपल्याला ते प्रथम विचित्र वाटेल, पण आपण इंग्रजी शब्दांचे तस्सेच हाल करतो ते त्यांना खपवून घ्यावेच लागतात! पण कुणि चळवळ करत नाहीत की उच्चार सुधारा.
अगदी अमेरिकन कुटुंबात जन्मलेला, अमेरिकन शाळेत कॉलेजमधे जाऊन इंग्रजीची पदवी घेतलेला, व्यवसायाने लेखक असा माणूस सुद्धा अ‍ॅस्क (ज्याला ब्रिटीश लोक आ स्क म्हणतात) त्याचा उच्चार अ‍ॅक्स असा करतो अ‍ॅस्टेरिस्क
ऐवजी अस्टेरिक्स म्हणतो.

मी न्यू जर्सीत कार पार्क करतो, पण असामी का पा़क करतो. आम्ही म्हणतो तो बॉस्टन मधे रहातो, तो म्हणतो बा स्टन मधे.

हर्पेन, पुणे व कोलकाताचे माहीत नाही पण खडकी चे तरी बरोबर वाटते. ते स्पेलिंग तेव्हा Kirkee/Kirki असे लिहीलेले वाचून आम्ही हसायचो (स्टेशनवर इंग्रजीत तसेच लिहीलेले होते पूर्वी). पण एखाच्या ब्रिटिश्/अमेरिकन माणसाला खडकी चा उच्चार करायला सांगितला तर तो बहुधा खरकी असाच करेल व त्यातून ते स्पेलिंगही तसे होईल. मराठी/हिन्दीतील "ड" हा "र" सारखा उच्चारणे परदेशात खूप कॉमन आहे.

गाव/गाँव या शब्दाचे स्पेलिंग ब्रिटीश gaav ऐवजी gaon करायचे, तेही उच्चार बरोबर यावेत म्हणून... कि तसेच बरोबर आहे?

ग्रे.थिं., जेव्हा इंग्रजांनी ही स्पेलिंग्ज् बनवली तेव्हा मराठीत अनुनासिके लेखनात आणि उच्चारात प्रचलित होती. गाव हा शब्द गांव असा लिहिला जाई आणि तसाच उच्चारलाही जाई. जी ए ए वी या लेखनात अनुस्वार कुठे बसवायचा? वास्तविक तो जी सह यायला पाहिजे. पण जी एन ए ए वी या लेखनाचा उच्चार भलताच होईल. म्हणून एन शेवटी टाकला. आणि इंग्लिश भाषेची भारतीय भाषांसंदर्भात काही कन्वेन्शन्ज् होती. त्यानुसार ए ओ चा उच्चार व होत असे . म्हणन शींव (स्थानिक उच्चार सींव्)चे इंग्लिश लेखन एस आय ओ एन. बसीन या उच्चाराबाबतही तसेच आहे.मुळात वसई शब्दाच्या स्थानिक उच्चारात अनुनासिक होते. मूळचे स्थानिक लोक अजूनही वस्संय असा उच्चार करतात. इंग्लिश ई-आय या जोडवर्णाचा उच्चार आइ असा होतो. उदा. आइन्स्टाइन. ही जर्मन भाषेची किंवा जर्मेनिक मुळाची देणगी. त्यामुळे बसीन चा उच्चार बसंई आहे. आपला व हा थोडा कठोर आणि अधिक ओष्ठ्य असतो तो इंग्लिश वी किंवा डब्ल्यू मधे व्यक्त होऊ शकत नाही. तो इंग्लिश बी च्या जवळचा. शिवाय हे लेखन पोर्तुगीजांनी बनवले असावे. पोर्तुगीज भाषेत आणखीनच वेगळी कन्वेन्शन्स असू शकतील. तसेही पोर्तुगीज मधे बी चे वेगवेगळे उच्चार नुक्ता, रेघ वगैरेनी दर्शवले जातात असे ऐकले आहे. तज्ज्ञांनी खुलासा करावा.
या संदर्भात शेजारी सध्या एका धाग्यावर सुंदर आणि माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत. पण शेजारील संस्थळाचा संदर्भ इथे देणे उचित ठरेल का?

व्वा !पुन्हा एकदा शंकानिरसनार्थ अभ्यासपुर्ण पोष्ट.

माहितीपूर्ण/रोचक प्रतिसाद असतील, तर लिंक द्यायला अडचण नसावी. दुसर्‍या संस्थळाची जाहिरात होईल असे वर्तन नसले, तर माबोच्या धोरणात बसते, असे वाचल्याचे आठवते.

हीरा:
इंग्रज हे भारतीय शब्दांच्या उच्चाराबाबत खूप काटेकोर होते हे मला पटत नाही. वसाहतवाद भरात असताना गोर्‍या इंग्रजांना अहंगंड होता. त्यांचा भारतीय लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन तुच्छतेचा होता हे वेळोवेळी दिसले आहे. अशा परिस्थितीत ते भारतीय भाषेला मान देतील हे पटण्यासारखे नाही. त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे स्पेलिंग केले. आपण राज्यकर्ते आहोत. आपण नावांची इंग्रजीला सोपे जाईल अशी मोडतोड करू, आपल्याला कोण विचारतय अशीच वृत्ती मला दिसते.

पुण्याचे स्पेलिंग पूना का? पी यू एन ई वाय असे का नाही केले?
गंगेचे स्पेलिंग ग्यांजेस का?
भारतीय संस्कृतीविषयी इतका पराकोटीचा आदर असता तर जिथे तिथे व्हिक्टोरिया, एडवर्ड नि जॉर्ज का? क्वीन आणि किंग का? घारापुरीला एलिफंटा का केले? वेरूळला एलोरा का?

हीरा, माफ करा, पण आपले स्पष्टीकरण सरसकटपणे पटण्यासारखे नाहीये.

इतर, विशेषतः भारतीय भाषांबद्दल इंग्रजांना जर खरोखरच आस्था असती तर त्यांनी ती त्या त्या भाषेतील तज्ञांकडून व्यवस्थित समजून घेऊन त्यांची इंग्रजी स्पेलिंग्ज नेमकेपणाने केली असती....त्या ऐवजी त्यांना सोयिस्कर अशी स्पेलिंग्ज बनवून त्यांनी इथल्या स्थानिक नावांचे वाटोळे केले असे मला खात्रीने वाटते.

हे बघा इथे तुम्ही जी चर्चा करत आहात ना ती मुळात करायची मुळीच गरज नाही. जन्माला येणार्‍या प्रत्येकाची एक मातृभाषा असते. इतर कुठलीही भाषा शिकताना आपण आपल्या भाषेचा आधार घेऊनच नवीन भाषा शिकतो असतो. जर आपल्याच गावात अनेक भाषा बोलल्या जात असतील तर इतर भाषा आपण आपली मातृभाषा शिकता शिकताच शिकत असतो. जसे की मी हिन्दी आणि मराठी सोबत सोबतच शिकलेलो आहे. कदाचित, इथे आपण सगळेच!!!!

मी पॅरीस मधे गेलो तेंव्हा कळले तिथे लोक पॅरीसला पारी म्हणतात.
मी रोम मधे गेलो तेंव्हा कळले तिथे लोक रोमला रोमा म्हणतात. फ्लोरेन्सला फिरेन्झो म्हणतात.

वर हिरा ह्यांनी ब्रिटिशांचे आणि पोर्तुगीजांचे जे समर्थने केले आहे ते पटले नाही. इथे अगदी सरळ साधी गोष्ट आहे की परकिय भाषा शिकताना जे उच्चार त्यांच्या कानी पडले आणि ते उच्चार करताना ज्या प्रकारे त्यांची जिभ वळली त्याप्रमाणे त्यांनी त्या शब्दाचे उच्चार केले. आता शिव स्टेशनाचे सायन झाले. पण दोन्ही मधे काहीच साम्य वाटत नाही. गंगेचे गॅन्जेज झाले ह्यातही काही साम्य वाटत नाही! उच्चारांचा हा अनुवाद चुकीचाच होता पण तो रुढ झाला. असे अनेक भाषेतील अनेक शब्द इतर भाषेत वेगळ्याच रितीने लिहिले वाचले आणि उच्चारले गेले आहेत. हिन्दी लोकांना मे चा उच्चार जमू नये असे होऊ नये पण ही लोक मे महिन्याना मई म्हणतात. आपण नृत्य तर हिन्दी न्रित्य आणि कृष्ण ला क्रिष्ण .. कोण बरोबर कोण चुक ह्यावर चर्चा करणे मला अयोग्य वाटते.

आता विदर्भात बघा. केवढे अपभंश झाले आहेत शब्दांचे. मी पहिल्यांदा बाळंतविडा हा शब्द ऐकला पुण्यात तेंव्हा तो मला कळलाच नाही कारण आमच्याकडे बाळातिळा म्हणतात. घडवंची ला घडोच्चि म्हणतात. असे अनेक शब्द आहेत हे १००० वेळा म्हणून म्हणून जो उच्चार वेगाने करत करन ऐकायला आला तसा तो शब्द अपभ्रंश ठरला.

मागे एकदा रस्त्यानी जाता जाता मी माझा तमिळ कलगीला म्हंटले - आर यू तमिळीयन. त्यावर ती म्हणाला तू अगदी परेफेक्ट उच्चार केला. लोक - आर यू तॅमिलिअन? असे जे म्हणतात ते कानाला कसेसेच वाटते. मला देखील तमिळ लोक मराठीला मरात्ति किंवा मर्‍हात्ति असे जे म्हणतात ते ऐकवत नाही.

Pages