जगासारखे का तुझे पोर नाही

Submitted by वैवकु on 19 February, 2014 - 12:30

तुझे दु:ख नुसतेच घनघोर नाही
तुझे दु:ख नुसतेच माजोर नाही

वयानेच केले कडूश्या जिभेचे
तशी चिंच नाही तसे बोर नाही

**उलासाच मुद्दा तरी फार मोठा
"कुणी सान नाही - कुणी थोर नाही "

अता झाक मोरा तुझा हा पिसारा
नशीबी तुझ्या एक लांडोर नाही

किती चोप द्या वा उपाशीच ठेवा
'मना'सारखे कोडगे ढोर नाही

मला बास झाली ..मला बास झाली
तुझ्याएवढा मी नशाखोर नाही

तुझी विठ्ठला ही करामत असावी
मला चोरणारा दुजा चोर नाही

वसंता ..नको काळजी बाळगू की...
जगासारखे का तुझे पोर नाही

________________________

उलासा = इवलासा / छोटासा ,
सान=लहान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

ता झाक मोरा तुझा हा पिसारा
नशीबी तुझ्या एक लांडोर नाही

काळ्जात वार केला.............

तुझी विठ्ठला ही करामत असावी
मला चोरणारा दुजा चोर नाही

वसंता ..नको काळजी बाळगू की...
जगासारखे का तुझे पोर नाही

आवडलेले .