गव्हाचा उपमा (खिचडा)

Submitted by मी कोल्हापुरी on 15 February, 2014 - 12:13

लागणारा वेळ:
२० मिनिटे, पुर्व तैयारी ( ३ दिवस )

लागणारे जिन्नस:
२ वाटी गहू,
जिरे,
मोहरी,
हिन्ग,
हळद,
तेल,
हिरव्या मिरच्या
कडी पत्ता,
आले लसूण पेष्ट,
गाजर,
कान्दा,
मटार
कोथिंबीर
मीठ
पाणी
पाककृती:

१. गहू पाण्यात भिजत घालायचे.
२. दोन ते तीन दिवस, ते स्वच्छ धुवून पुन्हा भिजत घालायचे.
३. दोन ते तीन दिवसानी ते दाबुन बघा. त्यातून थोडासा चिक बाहेर यायला हवा.
४. नन्तर त्यातून पाणी काढून, गव्हाचे मिश्रण भरडून घ्या.
५. त्या मिश्रणाच्या कुकर मधुन तीन शिट्ट्य करुन घ्या.
६. उकडलेले मिश्रण एका ताटात पसरून गार व्हायला ठेवा.
७. एका कढईत फोडणी (जास्त तेलात) करुन घ्या. आले लसूण पेष्ट घाला
८. बारीक चिरलेला कान्दा, गाजर, मटार, हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
९. थोडे मिठ, साखर मिक्स करुन घ्या.
१०. गव्हाचे गार झालेले मिश्रण घालून परतून घ्या.
११. झाकण ठेउन एक वाफ येवू द्या.
१२. कोथिंबीरीने सजवून खायला द्या.

वाढणी/प्रमाण:
तीन लोकासाठी

प्रेरणा
आई

फोटो :
DSCN1124.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सायो :
हो, हा गव्हाचा चिक पौष्टिक असतो.

@prady :
हा बर्‍यापैकी आंबतो, पण खाताना जाणवत नाही.

आभारी आहे दिनेशदादा Happy

च्या मायला ....आता प्रिंट काढूनच देतो बायकोला ....दररोज सकाळी "नाश्त्याला काय करू" हा जागतिक प्रश्न विचारते ना ......

उत्तम व नवी रेसिपी. आम्ही गव्हाचा चिक करतो व तोही हिंग मीठ घालून शिजवला की छान लागतो. आई व सौ. गव्हाच्या कुर्डया करायच्या तेंव्हा आम्हाला हटकून हा चिक मिळायचा त्याची आठवण झाली.