बालि सहल - भाग ५ - एका कार्या बोटॅनिकल गार्डन

Submitted by दिनेश. on 9 February, 2014 - 13:18

एका कार्या बोटॅनिकल गार्डन हे एक अत्यंत सुंदर रितीने राखलेले वनस्पति उद्यान आहे. बालितल्या लोकांना
फुलांचे वेड आहे आणि तिथे जागोजाग फुलझाडे आहेत. हे गार्डन मात्र खास वनस्पतिंसाठी आहे. त्यांच्या दृष्टीने
महत्वाच्या झाडांचा तो संग्रह आहे. यात पहिल्यांदा जाणवते कि ती झाडे मुद्दाम लावली आहेत असे वाटतच नाही तर ते सर्व नैसर्गिक जंगलच वाटते. अर्थात तिथे निवडुंग, ऑर्किड, फर्न यांच्यासाठी खास विभाग आहेतच.

तर चला

१) उद्यानात आपले स्वागत

२) प्रवेश केल्यावर नजरेत भरते ते जटायूचे सुंदर शिल्प

३ अ) त्यानंतर दिसते ते रावणाचे अतिभव्य शिल्प. त्याच्यावर वानरसेनेने हल्ला केलेला आहे.
तिथल्या सर्वच शिल्पांची रचना, सौंदर्य आणि स्वच्छता... अप्रतिम आहे,

३ब) तोच पुतळा मागून

४) हे आहे खास निवडुंगाचे दालन

५) आतमधले निवडुंगाचे प्रकार

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२ )

१३)

१४)

१५) या एपिफाइट्स बद्दल एकदा लिहायचे आहे !

१६)

१७) बाहेर पडूया आता

१८) असे सुंदर कारंजे बघितल्यावर मन कसे प्रसन्न होते.

१९) सीतेची वेणी... सम एक प्रकार

२०) पुढचे दालन होते ऑर्किड्स चे पण हा त्यांचा फुलण्याचा सिझन नसल्याने काही मोजकीच फुले होती.

२१ )

२२) विसाव्याच्या जागा पण अशा सुंदर

२३)

२४)

२५) सर्व झाडांखाली त्यांची सविस्तर माहिती होती. ( हा फोटो नीट वाचता येत नाही, सॉरी )

२६) या फोटोतले झाड खास वाटणार नाही..

२७) आता लक्षात आली, खासियत !!

२८) त्यांच्या औषधी झाडांचाही संग्रह होताच.. पण कुठेही झाडांना हात लावू नका, फुले तोडू नका असे फलक नव्हते. हे शहाणपण त्यांना उपजतच असावे का ?

२९) मला आवडलेली फ्रेम

३०) अतिभव्य असे झाड होते हे

३१) कॉम्प्यूटरवरचा नव्हे तर खराखुरा वॉलपेपर बनवावा.. याचा.

३२) तिथल्या रावणाच्या पुतळ्याच्या वाटीकेच्या कडेवर दिसलेले हे सुंदर गजमुख.

३३ ) प्रवेशाजवळची बाग

३४) आत यायचा रस्ता

३५) सभोवतालचा भाग

३६) शेवटी मी दूरीयान खाल्लेच. यात फणसासारखी पाती नसतात. पण मोठी बी असते. सर्व गर खाण्याजोगा.
फळात तीन चार कप्पे असतात. केदारने खायला नकार दिला म्हणून मी विजयला विनंती केली.

३७) तिथे असे स्तंभ अनेक घराच्या दाराजवळ दिसत होते. घरात काही शुभकार्य असेल तर असे स्तंभ लावतात. त्या घरासमोर गाडी थाम्बवून फोटो काढणे मला प्रशस्त वाटले नाही. पण आमच्या गाडीसमोर
एका पिक अप मधे ते दिसल्यावर मी फोटो घेतलाच.

३८) बांबू, सुपारीची पाने, भाताच्या ओंब्या असे बरेच साहित्य वापरून अशी कलापूर्ण रचना केली जाते.

३९) बदक छाप चहा का हा ?

४०) रामबुतान. यावरचे काटे मऊ असतात आणि आतला गर आपल्या लिचीसारखाच असतो.

४१) तिथली खासियत. स्नेक स्कीन फ्रुट. याची साल खरबरीत असते पण सहज सुटी होते. आतला गर गुलाबी
रंगाचा असतो. पोत बोरासारखा आणि चव सफरचंद + गाजर + अननस अशी काहीशी

४२ ) हॉटेलमधे स्वगताला अशी फुले होतीच.

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपी, टेक्श्चरला तो एखाद्या क्रीम चीजसारखा असतो तर चवीला गोड लागतो. पण यातही वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याकडे लोकांना आवडेल असे वाटतेय.

आहाहा.. सुंदर फोटोज..

ईए... तू खरच दुरियन खाल्लंस .. गॉश.. Happy

ते बदक छाप नसून त्याचा अर्थ ,' रायनोसिरास छाप' आहे

आणी ,' मासुक अंगिन' म्हंजे ,'कॅच अ कोल्ड'

मासुक अंगिन झाले असता रायनोसिरास छापाचा चहा पिणे!!!! Lol
बाहासा मधे ,' सी' अक्षराचा उच्चार ,'छ' आहे

दक्षे, आता आपण सगळ्यांनी एक परदेशवारी करायची आहे.. लक्षात आहे ना ?
तूम्ही सगळ्यांनी फोटो बघितल्याशिवाय मलाही माझी सहल पूर्ण झाली असे वाटतच नाही.