झोकून देऊन प्रेम करावं !

Submitted by मी मी on 4 February, 2014 - 13:43

झोकून देऊन प्रेम बीम पुस्तकी भाषा वाटते नाही. पण प्रत्येकाच्या मनात हि असीम प्रेमाची अढी असतेच कुठेतरी. प्रेम हवंच असतं कुणाचतरी. आपल्यावरही अगदी कुणी झोकून देऊन प्रेम करावं अस वाटत असतंच. पण करतांना मात्र आपण प्रेम करतो ते हातचं राखूनच…. प्रेम मिळवण्यापेक्षा स्वतः प्रेमात असतांना मिळणार सुख अधिक असतं. मिळवतांना किती मिळतंय ह्याचा हिशेब आपल्या हातात कुठेय पण देतांना हातचा सुद्धा शिल्लक न ठेवता अगदी अगदी ऋणात राहूनही देता येतं. सतत २४/७ प्रेमात राहण्याचं सुख ते काय ना ?

एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याच्या, कला गुणांच्या, एखाद्याच्या अगदी हसण्या रडण्याच्याही प्रेमात पडावं. कुणाच्यातरी चित्रकलेच्या, लिखाणाच्या कुणाच्यातरी गायनाच्या वादनाच्या, कुणाच्या रुसण्या फुगण्याच्याही प्रेमात पडावं कुणाच्या सतत बोलण्याच्या कुणाच्या स्तब्ध शांत राहण्याच्याही, कुणाची गालाची खळी तर कुणाच्या केसांची बट, कुणाच्या डोळ्यांची धग तर कुणाच्या अंगातली रग पण या सर्वात नुसतंच पडू नये त्यात डुंबून जावं त्या त्या गोष्टींवर मग झोकून देऊन प्रेम करावं. तुझी हि अशी बाब आवडते मला हा उपकार पुढल्यावर नको आपण प्रेम करतोय यात एक सुप्त सुख असतं ते सुख भरून मिळवून घ्यायला प्रेम करावं. आपल्याच आत्मिक गरजेच्या पूर्ततेसाठी प्रेम करावं पण प्रेम मात्र करावंच अगदी झोकून देऊन करावं. दुष्मनी दुष्मनी मे तो लाखो मरते देखे है …. सालं प्रेमात आकंठ असतांना मृत्यू बित्यू आला तर नशीबच म्हणावं …. म्हणून मरे पर्यंत प्रेम करावं.

एखाद्या कलेवर प्रेम करावं, एखाद्या कामावर प्रेम करावं निर्जीव वस्तूवर प्रेम करावं कुठल्याश्या रंगावर, एखाद्या गंधावर कुठल्याश्या ऋतूवर, पहाटवेळी कातरवेळी, वाहती नदी खळाळता समुद्र गळते पान हिरवे रान अगदी कशा कशावरही करावं. प्रेम हे स्वप्नाळू असते पण खोटे मात्र नसते प्रेम हे वेड आहे. वेड्यागत प्रेम करावं हट्टाला पेटून शब्दाला जागून प्रेम करावं. मोठेपणा विसरून प्रेम करावं आणि लहानपण घेऊन प्रेम करावं. प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देते. स्वतःच्याही कल्पनेच्या पलीकडे जाऊन प्रेम करावं. कसंही, कुठेही, कुणावरही कराव पण प्रेम मात्र करावंच.

raj_nargis_shree420.jpgगैरसमज होतायेत तर होऊ ध्यावे
जगाला असेच भ्रमित राहू द्यावे
कुणाच्यातरी मनात घर घ्यावे
कुणाच्या तरी मनाचे घर व्हावे

images.jpgsilsila-amitabh-rekha.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा Proud प्रेम पोळ्याला प्रेम करावं अन ईद दिवाळीलाही प्रेम करावं प्रेम मात्र करावंच राव Wink

आपल्यावरही अगदी कुणी झोकून देऊन प्रेम करावं अस वाटत असतंच. पण करतांना मात्र आपण प्रेम करतो ते हातचं राखूनच…>> +१

प्रेम मिळवण्यापेक्षा स्वतः प्रेमात असतांना मिळणार सुख अधिक असतं. >>> अगदी अगदी.. माझी दहावी बारावी ईंजिनीअरींग सारी हेच सुख उपभोगण्यात गेलीय. आणि गंमत म्हणजे प्रत्येकवेळी आधीच्यापेक्षा यंदाच्या वेळी मी जास्त सुखी आहे असे वाटायचे.

झोकून देऊन प्रेम बीम पुस्तकी भाषा वाटते नाही.>>" झोकून देऊन प्रेम बीम ही पुस्तकी भाषा वाटते, नाही? " असं हवंय ना?
आणि अढी?? नक्की हाच शब्द वापरायचा होता का? अढी म्हणजे आपल्या सोप्या भाषेत grudge. त्यामुळे अढीच लिहायचं असेल, तर पुढची वाक्यं सुसंगत वाटत नाहीत.

नताशा …. पण प्रत्येकाच्या मनात हि असीम प्रेमाची अढी असतेच कुठेतरी. प्रेम हवंच असतं कुणाचतरी. आपल्यावरही अगदी कुणी झोकून देऊन प्रेम करावं अस वाटत असतंच. पण करतांना मात्र आपण प्रेम करतो ते हातचं राखूनच…… असं पूर्ण वाक्य आहे ते. आपल्याला हवंय पण तसंच देता येत नाही हा जो काही चक्रम फॉर्मुला असतो मनात त्याला म्हणलंय प्रेमाची अढी किंवा मग ह्यासाठी नेमका शब्द नाही सापडला मला त्यावेळी

दुष्मनी दुष्मनी मे तो लाखो मरते देखे है …. सालं प्रेमात आकंठ असतांना मृत्यू बित्यू आला तर नशीबच म्हणावं >>>> मस्त. खुप छान लिहिलय.

" दुष्मनी दुष्मनी मे तो लाखो मरते देखे है …. सालं प्रेमात आकंठ असतांना मृत्यू बित्यू आला तर नशीबच म्हणावं "....क्या बात है!! मस्तं.