तर सध्याचा काळ मोठा बाका आहे. आता हेच पहा ना, हे पहिलेच वाक्य 'तर' ने सुरु करायचे प्रयोजन काय असा प्रश्न काही वर्षापूर्वी आम्हाला आणि लोकांनाही पडला असता आणि आम्ही जरा तर्र असताना लेख लिहिला असावा अशीही समजूत झाली असती. पण आता तसे होत नाही कारण काळाची चाल तिरकी, नागमोडी इ.इ. न राहता पार ब्राउनीअन मोशन झाली आहे. म्हंजे नक्की काय त्याचा आम्ही शोध घेत आहोत पण लेखात काही शास्त्रीय उपमा असणे अनिवार्य आहे असे आमचे अझरबैझानरिटर्न फ्रेंड,फिलॉसॉफर व गाईड अर्थात ददा* यांचे मत आहे.
असो, तर सध्याचा काळ मोठा बाका आहे. नुसते स्वतःचे काम नीट, मन लावून करणे म्हणजे काहीच न करणे हे आता आम्हाला कळू लागले आहे. राजकीय मते असणे आणि पक्षकार्य करणे म्हणजे अधिक काहीतरी असे वाटण्याचाही एक काळ होता जो प्रदिर्घ आजारानंतर अलीकडेच निवर्तला. सामाजिक कार्य करण्याचा काळ मात्र जोरात आहे. त्यातही झोपडपट्टी विकास, प्रार्थमिक शिक्षण, अंध असल्या कामांपेक्षा अल्झायमर्स, ब्रेस्ट कँसर किंवा त्याहूनही दुर्मिळ आणि चमत्कारिक आजारांचा 'अवेअरनेस' वाढवण्याच्या कामात मॅरॅथॉन भरवणे जास्त उच्चीचे आहे. सामाजिक जाणिव आणि राजकीय कार्य यांचा जितका कमी संबंध दाखवता येईल तितके चांगले असाही ग्रह आहेच. 'disinterested service of the people in any sphere ultimately helps the country politically' असे नोटेवरच्या बाबाने कधीकाळी म्हटले होते, पण ते एक असो.
मात्र या सर्वांपेक्षाही महत्वाची जाणिव जी विकसीत झाली नसेल तर तुम्ही माणूसच नव्हे असे आम्हाला सांगण्यात आले आहे ती म्हणजे कलाजाणिव. इतके दिवस आमचा असा समज होता की आमचे वाचन बर्यापैकी, म्हणजे चारचौघे वाचतात त्या पुस्तकापेक्षा जरा अधिक आहे. घरात बसून शांतपणे पुस्तक वाचावे, जरा चिंतन, मनन करावे, काही वाटलेच तर आपल्यापुरते खरडावे एवडीच आमच्या कलाजाणिवेची झेप. मनाला भावेल त्याचे संगीत ऐकावे नाही आवडले तर आपल्याला ती 'टेस्ट' नाही म्हणून गप्प बसावे असा आमच्या खाक्या.
पण लेखात सुरुवातीला म्हटले आहे तसे काळाच्या या गडबडगुंड्यात आमच्या या क्वालिटीचे फारसे महत्व उरलेले नाही ह्याची जाणिव तीव्रतेने होऊ लागली. किंबहुना घरात बसून गपचीप आस्वाद घेणेच मुळात उपयोगाचे नाही तर चर्चा रंगवता आली पाहिजे असा क्लॉज निघाला. मग आम्हीही तयारी केली आणि आता वेळप्रसंगी आम्हीही मुराकामी,पामुक,अमुक तमुक अशी नावे फेकून चर्चेचा तोल सांभाळू शकतो (तोल जाण्याचे कारण कितीही वेगळे असूद्या) . सिनेमाच्या बाबतीतही आम्हाला दबंगमधला सलमान कितीही आवडत असला तरी 'तू चिलिअन डायरेक्टर जुलिआन आंद्रादेचा कोल्ड वॉटर इन बकेट पाहिलास का? द सररिअॅलिझम इटसेल्फ इज सिंबॉलिझम' अशा एका वाक्यात चारपाच जणांना गारद करण्याचे सामर्थ्य आम्ही बाळगून आहोत असा आमचा समज होता.
पण आता इतक्यानेही भागेना कारण तुमची कलाजाणिव सशक्त आहे याचा पुरावा द्यायचा असेल तर तुमचे 'सामाजिकला' जीवन हॅपनिंग हवे असे आम्हाला कळू लागले. म्हणजे तुम्ही समाजात कलाविष्कारांचा आनंद घेताना दिसला पाहिजेत. घरात पुस्तके वाचू नका पण साहित्य 'गोष्ठीं'ना जा, घरात रेडीओही ऐकू नका पण 'कॉन्सर्ट्स'ना दिसा, फिल्म फेस्टीव्हलला तर नक्कीच जा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काही कराल ते लगेच फेसबूकवर टाका.
या नव्या रगाड्यात एक कला जी आम्ही इतके दिवस टाळत आलो तिच्याकडे लक्ष देणे भाग पडले. व्हिजुअल आर्ट्स हा प्रकार आम्ही बरेच दिवस ऐकून होतो; हे म्हणजे केवळ चित्रकला नव्हे अजून बरेच काही असते इ.इ. आता या सामाजिकला हायब्रीडमध्ये पुढे जायचे तर या कलेकडेही लक्ष पुरवणे आले. म्हणून मग आम्ही यावर्षीच्या 'काला घोडा' महोत्सवात हजेरी लावायचे ठरवले. पूर्वतयारीखातर आम्ही १५ दिवस आधीपासूनच 'मी काला घोडाला जाणार आहे, यू नो' हा सूर लाउन धरला. मधूनमधून परदेशातील अशाच कार्यक्रमांची नावे पेरायलाही विसरलो नाही. मात्र अशी भरपूर वातावरणनिर्मीती चालू असताना प्रत्येक वेळी काला घोडा हे शब्द आले की आमच्या मनी 'गजानन, डबल घोडा आण' हेच वाक्य उमटे हे ही खरेच.
अशा रितीने सर्व जामानिमा करुन रवीवारी दुपारी आमची वरात काळ्या घोड्याच्या दारी पोचली. दक्षिण मुंबईचा आह्लाददायक वारा आणि तितकाच कूल क्राऊड बघून आमच्या कॅफेलिओपाल्डभारीत** मेंदूला अंमळ गुंगीच आली. पण अशी व्यवधाने सांभाळण्याची कला आम्हाला आताशा जमते.
एंट्रीलाच एका बाजूला लाकडाचा वापर करुन बनवलेले एक मोठे इन्टलेशन होते, ज्या कलाकाराच्या मार्गदर्शनाखाली ते बनवलेले होते त्याचे नाव खरेच ओळखीचे निघाले म्हणून अधिक उत्सुकतेने ते पाहू लागलो तेवढ्यात एक चौकोनी कुटूंब तेथे प्रकटले आणि त्यातली मुले त्या लाकडी प्लँक्सना धरुन पोझ घेत उभी राहिली आणि त्यांचे उत्साही पालक धपाधप फोटू काढू लागले! लोक इन्टलेशन्सवर चढत होते, दमले तर त्यावर बसत होते आणि हाच प्रकार सर्वच्या सर्व इन्स्टलेशन्सजवळ चाललेला पाहिला. गर्दी प्रचंड होती त्यामुळे कुठलीच कलाकृती लांबून, सर्व बाजूंनी पाहण्याचा प्रश्नच नव्हता, तसा आग्रहही नव्हता पण निदान तो एक कलाविष्कार आहे त्याच्याजवळ पोझ देऊन फोटो काढायला तो सर्कशीतला वाघ अथवा हत्ती नाही इतके तारतम्य तरी असायला हरकत नव्हती. पुन्हा आपल्या पाल्यावर कलाविषयक संस्कार करायला आलेले जागरुक पालक हा नुमुना होताच
प्रत्येक वर्षी ज्या थीम्सवरती इन्स्टेलेश्न्स असतात, जे माध्यम वापरुन ते तयार केले जातात त्यात काही नाविन्य असावे ही अपेक्षाही गैरवाजवी नाही. तेच ते प्लास्टीकच्या बाटल्यांचे पर्यावरण वाचवा संदेश, मोडक्या कार्सवरची पेंटींग्स आणि त्याहूनही त्रासदायक म्हणजे अत्यंत उथळ, बटबटीत 'अॅट युअर फेस' मेसेज देणारे इन्टलेशन्स.
बाजूच्या स्टॉल्समध्येदेखील ज्याला kitsch म्हणतात अशाच गोष्टींचा बाजार, तो ही जबरदस्त चढ्या किमतीत.तिथेही गर्दी आणि विक्रीही कारण पुन्हा काळा घोडाला गेलो याचे काहीतरी प्रतिक तर हवेच ना. बाहेरच्याच फुटपाथवर त्याच आणि तशाच कलाकृती कमी किमतीत, आमचे डोके तर पार चक्राऊन गेले. सगळे फिरुन झाले, काही आवडले बरेचसे नाही. थोडीफार खरेदीही झाली.
लोक इतक्या प्रचंड संख्येने येतात ही चांगली गोष्ट आहे का याचीच आता शंका येऊ लागली आहे. त्या गर्दीतले बरेचसे आमच्यासारखेच, 'मी काळा घोड्याला गेलो' हे सांगण्यासाठी आलेले. पण मग असेही वाटते की हरकत काय आहे? इथे जाणे, मी तिथे गेलो हे सांगणे लोकांना महत्वाचे वाटते हे देखील महत्वाचे नाही का? पण अशा गर्दीच्या अस्तित्वाने जे सादर केले जाते आहे त्याची समीक्षा गंभीरपणे होते का? की त्याची गरजच नाही, तो उद्देशच नाही? अशा महोत्सवातून आपण लोकांना कला कशी बघायची हे शिकवण्याचा काही प्रयत्न होणार आहे की हा सगळाच प्रकार, दर्शक आणि कलाकारही केवळ एक स्टेट्स सिंबल म्हणून घेत आहेत?
काळा घोडा एक निमीत्त आहे पण आपल्या सर्वांच्या कलास्वादाच्या पद्धतीचीच समीक्षा होण्याची गरज निर्माण झाली आहे.
अर्थात यावर फार खोलात न जाता हा तथाकथित गंभीर विचारही फेसबुकात कसा टाकायचा याचाच विचार आम्ही करीत आहोत.
तळटीपा-
* हा टायपो नव्हे आम्हाला ददा च लिहायचे आहे, दादा नव्हे, ते खरेतर the दा असे आहे.
** आम्ही किती खुबीने आमची आवड प्रकट केली आहे ते चाणाक्ष ओळखतीलच.
अजूनपर्यंत एकदाही काळाघोडा
अजूनपर्यंत एकदाही काळाघोडा उत्सवाला गेले नाही. गिरगावात लहानची मोठी होऊनही गेले नाही तर ठाण्याहून मिरवणूक जाणे कठीणच. कलात्मक जाणीवाच नाहीत आमच्यात तर तिथे जाऊन करणार काय?
हायला, एकाच खवट लेखाने
हायला, एकाच खवट लेखाने विचारवंत!
म्हणजे आमचे आत्तापर्यंतचे प्रामाणिक, गुडीगुडी नॉस्टॅलजिक लिखाण वायाच म्हणायचे, काळ बदलला आहे तो असा!
व्यक्त होणं ही गरज माणली तरी
व्यक्त होणं ही गरज माणली तरी त्याचा इतरांना त्रास होतोय हे बर्याच फेसबुकीपंडितांना कळत नाही >>>> अरे पण तुम्ही फेसबुकवर 'व्यक्त' होणार्यांचा त्रास करून का घेता ? फेसबुक म्हणजे काय गणपतीतले लाऊडस्पिकर थोडीच आहेत की कान बंद केलेत तरी आवाज आदळतच रहाणार! तुम्हांला कोणाचे अपडेट वाचणं नको असेल त्या व्यक्तीचे अपडेट्स न वाचणं, दे आपल्याला दिसूच नयेत असं सेटींग करणं, त्यांना अनफ्रेंड करणं, अधूनमधून फेसबुकाचा संन्यास घेणं, किंवा मुळात फेसबुकावर अकाऊंटच न काढणं असे अनेक पर्यात आहेत की!
सोशल नेटवर्किंग तुम्ही करालं तितकं असतं.. फक्त ऑफिसच्या इमेल्स आणि एक पर्सनल अकाऊंट एव्हडंच चेक करा..सोशल नेटवर्कींगचा अजिबात त्रास होत नाही!
ज्यांना **लं, पा*लं फेसबुक वर टाकायचं त्यांना टाकू द्याना.. तुम्ही बापडे का त्रास करून घेता?
म्हणजे आमचे आत्तापर्यंतचे
म्हणजे आमचे आत्तापर्यंतचे प्रामाणिक, गुडीगुडी नॉस्टॅलजिक लिखाण वायाच म्हणायचे, काळ बदलला आहे तो असा!
>>>
त्रास करून का घेता ? >>. हं
त्रास करून का घेता ? >>. हं ते ही खरचं आहे. पाँईट टेकन !
लोकहो, 'काळाघोडा : एक समृद्ध
लोकहो,
'काळाघोडा : एक समृद्ध अडगळ' नावाची कादंबरी लिहीन म्हणतो. शीर्षक कसं आहे? ठीक नाही वाटलं तर कलात्मक जाणीवा धारदार करून पहा. म्हणजे अडगळचं वेडगळ करा.
अवांतर : इथे अस्मादिकांच्या एक मित्राचा एक चक्ष्वै:सत्यं अनुभव आहे.
आ.न.,
-गा.पै.
>>>> 'काळाघोडा : एक समृद्ध
>>>> 'काळाघोडा : एक समृद्ध अडगळ' <<<<<, ह्हा ह्हा हाअ.....
आताकळ्ळ, आगाऊ असे कसे काय लिहू लागला ते, ती दुसरी कुठली अडगळीची कादम्बरी आहेना, ती वाचल्याचे परिणाम हो हे! याच गतीने सुरू राहिले तर हा आगाऊ मायबोलीला देखिल अडगळ घोषित करुन टाकेल.
पराग, अनुमोदन.
मला तर असे वाटते आहे की असे विचार म्हणजे "गॉसिपची" नविन तर्हा आहे, नै त काय मेल? जिथे डोकावुन बघायची देखिल गरज नाही, तिथे डोकावायच, अन दिसलेल वाईट कस आहे यावर चर्चा करत बसायच, नावे ठेवत बसायच.. थोडक्यात काय? पूर्वीचा धोबीघाट नव्याने सुरू होतोय नेटवर, या गॉसिपच्या रूपात. असो.
गामा, ती लिन्क वाचली. वेगळेपण
गामा, ती लिन्क वाचली.
वेगळेपण जपणं अन विक्षिप्तपणे वागणं यातली सीमारेषा फारच पुसट आहे, एकमेकात मिसळलेली आहे असे वाटते.
अडगळीच्या शोधात असलेल्यान्ना अशा पुसट रेषा म्हणजे आढळणे म्हणजे अडगळीचा खजिना सापडल्यासारखेच होत असेल.
आगावा लेख जबरी(रच्याकने ते
आगावा लेख जबरी(रच्याकने ते 'ददा*' वाचून जरा माझ्याबद्दल काही संदिग्ध का होईना पण असेल असं वाटून मन जरा जोरात लावून वाचला लेख. कस्चं काय... )
तुला तसं वाटेल की काय अशी
तुला तसं वाटेल की काय अशी शंका मलाही होती
उजवीकडे प्रत्य्क पानावर मला
उजवीकडे प्रत्य्क पानावर मला "कट्टर विचार नाहीत, तरुणांचा जोश" अशी जाहिरात दिसते आहे. पुढे लिहीलय, "प्रत्येक हातात शक्ति प्रत्येक हातात प्रगति" जोडीला एका पन्जाचे चित्र अन तिनरन्गी पट्टी.
हे नेमके काय आहे? कुणि अर्थ सान्गू शकेल काय?
चला म्हणजे काळा घोडा न
चला म्हणजे काळा घोडा न बघितल्याचं फार काही मनाला लावून घ्यायला नको!
दाद,
मलाही तुझ्याबद्दल काहीतरी वाचायला मिळेल असच वाटत होतं!
प्रामाणिक, गुडीगुडी
प्रामाणिक, गुडीगुडी नॉस्टॅलजिक लिखाण वायाच >>> विचारवंत होण्याकडे तुम्ही पहिले पाऊल टाकले आहे आता स्मरणरंजन राहूच देत. मराठी इ-साहित्याचे बोर्या वाजवणारे फुटकळ लेखक त्याचं काय ते बघून घेतील
अवांतर : 'काळाघोडा : एक
अवांतर :
'काळाघोडा : एक समृद्ध अडगळ' हे नाव सिद्ध करणारी घटना घडलीच शेवटी!
-गा.पै.
अत्यंत वाईट निर्णय.
अत्यंत वाईट निर्णय.
छान लेख.
छान लेख.
अगदीच पटलं! इनस्टाग्रॅम
अगदीच पटलं!
इनस्टाग्रॅम बद्द्ल लिहिलं नाही ?
मस्त लिहिलंय हे वाचायचं
मस्त लिहिलंय
हे वाचायचं राहिलं होतं आणि राहिलंय हे मला माहिती होतं
(हा लेख नजरेतून कसा काय सुटला कोण जाणे वगैरे नाही :फिदी:)
Pages