क्रिस्टल ऑन पेपर: माध्यम- जलरंग आणि रंगीत पेन्सिल्स

Submitted by यशस्विनी on 3 February, 2014 - 00:14

नमस्कार मायबोलीकर्स,

कागदावर क्रिस्टल ग्लासेस काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न... यासाठी मी एकच चित्र दोन माध्यमं वापरुन काढली आहेत. एक म्हणजे रंगीत पेन्सिल्स ज्यात मी थोडीबहुत चित्र काढली आहेत व दुसरे म्हणजे जलरंग ज्यात सध्या तरी सुरुवात आहे. अधिक सरावाने अचुक क्रिस्टल ग्लासेस काढायचा प्रयत्न करणार आहे.

१. रंगित पेन्सिल्स वापरुन - डेरवन्ट कलरसॉफ्ट ऑन ब्रिस्टॉल कार्ड ए३

Crystal-Color-Pencils.jpg

२. जलरंग वापरुन - विन्सर न्युटन कॉटमन ऑन डलेर रोवनी कोल्डप्रेस पेपर

Crystal-Watercolor.jpg

धन्यवाद,
वर्षा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स स्मिता चिन्नु....

मला पहिले चित्र काढायला जास्त वेळ लागला. अजुन त्यात डिटेलिंग करणार आहे. पण दुसरया चित्रातील जलरंगाचा प्रयत्न देखील छानच झाला म्हणायचा Happy खरे म्हणजे चित्र अजुन छान व अचुक दिसायला खुप पेशन्सने एक एक भाग रंगवावा लागतो. सध्या पेशन्स कमी आहे व खुप काही शिकण्याचा उत्साह जास्त Happy

ग्लासवेअर वॉटरकलर ने रंगवणे कठीण असते, चांगला प्रयत्न
क्रिस्टल मधे हायलाईट्स येक दम शुभ्र ठेवाव्या लागतात , त्यासाठी शक्य असेल तर fabriano extra white paper सारखे स्पेशलाईज्ड पेपर वापरुन पांढरा भाग निट सोडावा लागतो. सिंगापुरात बहुतेक art Lounge madhe मिळतो तो पेपर. ( मास्किंग फ्लुईड वापरले तर काम सोप्पे होते) तसेच ग्लास वेअरवर आजुबाजुची रीफ्लेक्शन्स पडतात ती दाखवली तर अजुन मजा येते.

ड्रॉईंग मधे काही चुका आहेत. खास करुन cyclinderical object च्या कडा क्लिप होतायत त्या oval असाव्यात . क्रिस्टल्स येका स्ट्रेट लाइन मधे दिसतायत ते थोडे curve असावेत

चांगला प्रयत्न....सॉरी पण एक सांगु का.....क्रिस्टल ची अपेक्षित चमक येत नाहीये....अजुन खुप खुप मेहनत घ्यावी लागेल...पेन्सिल रेंडरिंग मधे स्मूथनेस अजुन खुपच यायला हवा...वॉटर कलर वर्क मधे पोस्टर कलर चा फील येतो आहे...
मी वर्क सुधारायला डिटेलिंग सांगतेय....राग मानु नका....पटलं तर घ्या...नाहीतर फाट्यावर मारा... Happy

धन्यवाद प्रज्ञा, नंदिनी, रंगासेठ....

पाटील आपल्या डिटेल्ड मार्गदर्शनाबद्द्ल धन्यवाद...

अनिश्का तुझी प्रतिक्रिया नोट केली आहे.. हा धागा सार्वजनिक आहे त्यामुळे सर्वप्रकारच्या प्रतिक्रिया येणार हे अपे़क्षित आहे... त्यामुळे नो हार्ड फिलिंग्ज Happy धन्यवाद....

छान Happy